Rabbi pik vima 2024 | आता रब्बी पीक विमा योजना १ रुपयात, करा ऑनलाईन अर्ज

Rabbi pik vima 2024

आता रब्बी हंगामातही केवळ एक रुपयांत रब्बी पीक (Rabbi Pik Vima) विमा भरता येणार आहे. या योजनेत सहभागी होण्यासाठी १५ डिसेंबरची अंतिम मुदत pik vima rabbi 2024 last date ठेवण्यात आली आहे. रब्बी हंगामात पिकांना विमा सरंक्षण मिळेल. यामुळे शेतकऱ्यांनी मुदतीत विमा भरणे गरजेचे असणार आहे.

रब्बी पिक विमा हे महाराष्ट्र शासनाची शेतकऱ्यांसाठी एक योजना या योजनेच्याद्वारे शेतकऱ्यांना रब्बी हंगामामध्ये पिकांच्या नुकसानीसाठी आर्थिक संरक्षण दिले जाते या मार्फत पीक विमा मिळवण्यासाठी शेतकऱ्यांनी पिकाची योग्य वेळेत नोंदणी करावी लागेल आणि विमा प्रीमियम भरावा लागेल नैसर्गिक आपत्ती रोग कीड यामुळे झालेल्या पिकांच्या नुकसानीसाठी ही योजना शेतकऱ्यांना मदत करते.

रब्बी पिक विम्याची प्रमुख वैशिष्ट्ये खाली देत आहोत,

  • रब्बी हंगामातील पिकांसाठीच हा विमा लागू असेल.
  • नैसर्गिक आपत्ती, किड व रोग यांपासून पिकांचे संरक्षण.
  • शेतकऱ्यांनी ऑनलाईन किंवा जवळच्या सेवा केंद्रात जाऊन नोंदणी करणे आवश्यक असेल.
  • शेतकऱ्यांसाठी खूप कमी दरात प्रिमियम.
  • शेतकऱ्यांना नुकसान भरपाईसाठी तक्रार नोंदवण्याची सुविधा यात दिली जाते.

पिक विमा म्हणजे काय ते आपण प्रथम जाणून घेऊयात.

“पिक विमा” म्हणजे शेतकऱ्यांसाठी एक प्रकारचे विमा संरक्षण, जो त्यांना त्यांच्या पिकांच्या नुकसानीसाठी आर्थिक मदत पुरवतो. पिक विमा योजना शेतकऱ्यांना नैसर्गिक आपत्ती, किड व रोगामुळे पिकांना होणाऱ्या नुकसानीसाठी भरपाई देतो.

पिक विम्याचे मुख्य उद्दीष्ट

  1. पिकांना झालेल्या नुकसानीपासून शेतकऱ्यांना संरक्षण देणे, विशेषत: अतिवृष्टी, दुष्काळ, वादळ, रोग, कीड अशा इतर नैसर्गिक आपत्ती.
  2. शेतकऱ्यांना पिकांच्या नुकसानीमुळे होणाऱ्या आर्थिक नुकसानाची भरपाई मिळवून देणे.
  3. पिक विमा योजना शेतकऱ्यांना कमी प्रीमियमच्या दरात उपलब्ध करून देणे, ज्याच्या मुळे शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या परवडते.

पिक विम्याचे प्रमुख प्रकार जाणून घेऊयात.

  1. प्रधानमंत्री पीक विमा योजना (PMFBY)- ही देशभरातील शेतकऱ्यांसाठी सुरू केलेली योजना आहे, ज्यात विविध प्रकारच्या पिकांना विमा दिला जातो.
  2. राष्ट्रीय कृषी विमा योजना (NAIS)- काही विशिष्ट पिकांसाठी असलेल्या विमा योजनेचा प्रकार.
  3. राज्यस्तरीय विमा योजना- वेगवेगळ्या राज्यांमध्ये वेगवेगळ्या पिकांसाठी विविध योजना राबवल्या जातात.

पिक विमा कसा काम करतो ते इथे बघुयात?

  1. शेतकऱ्यांना त्यांच्या पिकांची विमा नोंदणी करणे गरजेचे असते.
  2. शेतकऱ्यांना विम्याचा प्रीमियम थोड्याफार प्रमाणात भरावा लागतो.
  3. पिकांचे नुकसान झाल्यास, शेतकऱ्यांना त्यांनी नोंदवलेल्या तक्रारीनंतर आणि ते चेक केल्यानंतरच विमा रक्कम दिली जाते.

पिक विमा शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वपूर्ण साधन आहे, जे त्यांना अनिश्चिततेच्या काळात आर्थिक अडचणीतून वाचवते.

पिक विमा रब्बी आणि खरीप या दोघांसाठी कसा आता हे बघुयात.

पिक विमा योजना रब्बी आणि खरीप या दोन्ही हंगामातील पिकांना आर्थिक संरक्षण देण्यासाठी आहे. प्रत्येक हंगामातील हवामानाच्या स्थितीनुसार आणि जोखमींनुसार ही विमा योजना राबवली जात असते.

खरीप हंगामातील पिक विमा-

खरीप हंगाम जून ते सप्टेंबरपर्यंत चालतो. या हंगामात पिके पावसावर अवलंबून असतात, त्यामुळे पाऊसाचे प्रमाण जास्त किंवा कमी झाल्यास पिकांना मोठा धोका असतो. खरीप पिकांसाठी विमा योजना शेतकऱ्यांना अतिवृष्टी, दुष्काळ, पूर, वादळ आणि कीटकनाशकांपासून संरक्षण देते.

खरीप पिके – तांदूळ, ज्वारी, बाजरी, मका, सोयाबीन, कापूस इत्यादी.

त्या दिवसातील धोके – अतिवृष्टी, अनियमित पाऊस, कीड आणि रोगांचा प्रसार.

विमा संरक्षण – खरीप हंगामात नुकसान झाल्यास विमा कंपन्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देतात.

रब्बी हंगामातील पिक विमा-

रब्बी हंगाम ऑक्टोबर ते मार्चपर्यंत चालतो. या हंगामात कमी पाऊस आणि थंड हवामानामुळे वेगवेगळे धोके निर्माण होतात. रब्बी पिकांसाठी विमा योजना थंडी, गारपीट, दुष्काळ आणि पिकाच्या गुणवत्तेत आलेली घट यापासून शेतकऱ्यांना संरक्षण देते.

रब्बी पिके – गहू, हरभरा, ज्वारी, मसूर, भुईमूग इत्यादी.

धोके – थंडी, गारपीट, दुष्काळ किंवा कमी पाऊस.

विमा संरक्षण – रब्बी हंगामात नुकसान झाल्यास विमा कंपन्या नुकसान भरपाई देतात.

Rabbi pik vima 2024
Rabbi pik vima 2024

रब्बी पीक विमा योजना | Rabbi pik vima 2024

रब्बी हंगामात प्रति अर्ज एक रुपयात रब्बी पिक विमा योजनेत शेतकऱ्यांना सहभागी होता येईल, नैसर्गिक आपत्ती असेल, कीड आणि इतर रोगांमुळे पिकांचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना विमा संरक्षण मिळेल.

कर्जदार तसेच बिगर कर्जदार शेतकऱ्यांना ऐच्छिकतेप्रमाणे योजनेत सहभागी होता येणार आहे, पीक विमा योजना अधिसूचित पिकांसाठी केवळ अधिसूचित क्षेत्रासाठी लागू असणार आहे याची शेतकऱ्यांनी नोंद घ्यावी.

रब्बी हंगामा मध्ये विविध पिके अधिसूचित करण्यात आलेले आहेत, मुदतीपूर्वी शेतकऱ्यांनी विमा योजनेत सहभागी व्हावे यासाठी कृषी विभागाकडून गाव स्तरावर जनजागृती केली जात आहे.

CSC केंद्रावर भरता येईल ऑनलाईन अर्ज:

Rabbi Pik Vima पिक विमा योजनेचा भाग घेण्यासाठी शेतकऱ्यांना आता अर्ज एकदम सहज करताय यावा यासाठी ऑनलाईन अर्ज करण्याची देखील सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे तुम्ही वेबसाईटवर स्वतः तसेच बँक, विमा कंपनी प्रतिनिधी व सामूहिक सेवा केंद्र यांच्यामार्फत देखील अर्ज करू शकता.

मुदतीपूर्वी विमा भरावा.

तुमच्या पिकांना विमा संरक्षण असल्यास नैसर्गिक आपत्तीत नुकसान झाल्यास भरपाई म्हणून विमा कंपनीकडे मोबदला मागता येतो, त्यासाठी रब्बी हंगामात पेरणी केलेल्या शेतकऱ्यांनी विमा योजनेत सहभागी होण्यासाठी मुदत संपण्यापूर्वी अर्ज करणे गरजेचे असणार आहे.

ऑनलाईन अर्ज (Apply Online for Rabbi Pik Vima)

1 रुपयात रब्बी पीक (Rabbi pik vima 2024) विम्याचा ऑनलाईन अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा.

pik vima rabbi 2024 pdf

रब्बी पीक विमा अ‍ॅप (Rabbi Pik Vima App): रब्बी पीक विमा अ‍ॅप डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा.

विमा कंपनी संपर्क: विमा कंपनी संपर्क यादीसाठी इथे क्लिक करा.

सामायिक सुविधा केंद्राच्या (CSC) माध्यमातून विमा अर्ज (Crop Insurance Application) करताना शेतकरयाला प्रति अर्ज एक रुपया प्रमाणे शुल्क द्यावे लागेल. यासाठी शेतकऱ्याने स्वतःचा सातबारा उतारा व इतर कागदपत्रे बरोबर घेऊन जाणे गरजेचे आहे.

याव्यतिरिक्त अतिरिक्त शुल्काची मागणी सामायिक सुविधा केंद्र चालकाने केल्यास याबाबत तक्रार खालील टोल फ्री क्रमांकावर करण्यात यावी, तुमच्या तक्राराची दखल घेऊन योग्य ती कार्यवाही केली जाईल, असे कळविण्यात आले आहे.

येथे काही नंबर तुम्हाला देत आहोत, सीएससी CSC गव्हर्नर सर्विसेस इंडिया लिमिटेड
टोल फ्री क्रमांक :- १४५९९/१४४४७
व्हाट्सअप क्रमांक :- ९०८२६९८१४२
तक्रार नोंद क्रमांक :- ०११- ४९७५४९२३ /४९७५४९२४

निष्कर्ष :- Rabbi pik vima 2024

मित्रांनो, तुम्हाला आम्ही दिलेली Rabbi pik vima 2024 | आता रब्बी पीक विमा योजना १ रुपयात, करा ऑनलाईन अर्ज. या लेखाबद्दलची माहिती कशी वाटली याबद्दल तुम्ही आम्हाला लेखाच्या खाली कमेंट करून कळवू शकता तसेच आमच्यासाठी काही सूचना असतील त्याही तुम्ही आम्हाला सुचवू शकता अशाच सरकारी योजना संबंधी अपडेटेड माहिती मिळवण्यासाठी आमच्या योजना गॅरंटी डॉट कॉम (yojnaguarantee.com) या संकेतस्थळाला भेट देत राहा धन्यवाद|


FAQ :-


१. Rabbi pik vima 2024 ची अंमलबजावणी कधी पर्यंत आहे?

उत्तर-१५ डिसेंबर २०२४ पर्यंत असेल.

२. Rabbi pik vima 2024 या योजनेचा ऑनलाइन अर्ज करायचा असल्यास अधिकृत संकेतस्थळ कोणते?

उत्तर-   https://www.pmfby.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर आपण ऑनलाईन स्वरुपात अर्ज करू शकतो.

इथे लिंक देत आहे जी तुम्हाला उपयोगी पडेल.

Link

पुढील लेख देखील वाचावेत!

Home solar power generation new technology आता घरातच वीजनिर्मिती होणार ! नवीन सोलर सेल तंत्रज्ञान आले, जाणून घ्या तपशील.

SIP Mutual Fund Calculator 2024  केवळ 1000 रुपयांच्या मासिक TOP 10 SIP मध्ये गुंतवा व कमवा 3 कोटी - जाणून घ्या कसे.

शेतकऱ्यानच्या फायद्या साठी वाचा. किसान सन्मान निधी योजना

आपल्या लाडक्या लेकीच्या उज्वल भविष्यासाठी जाणून घ्या सुकन्या समृद्धी योजना

Drone Subsidy Scheme in 2024 केंद्र पुरस्कृत कृषी यांत्रिकीकरण उप अभियान: ड्रोन अनुदान योजना

महिलांना व्यवसाय स्थापन करण्यासाठी प्रोत्साहन पर योजना म्हणजेच महिला समृद्धी कर्ज योजना, अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी या योजनेवर क्लिक करा. 

आपल्याला आपल्या हक्काचे घर मिळणार रमाई आवास घरकुल योजना अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी या योजनेवर क्लिक करा.

मुलीच्या उज्ज्वल भविष्यासाठी शासन घेऊन आले आहे लेक लाडकी योजना. 

Best Home Insurance Policies in 2024 सर्वोत्तम होम इन्शुरन्स योजना निवडण्याबाबत संपूर्ण मार्गदर्शन

Tractor Anudan Yojana apply Online 2024 ट्रॅक्टर अनुदान योजना 2024 अर्ज प्रक्रिया – सविस्तर मार्गदर्शन