Mukhyamantri Yojana Maharashtra : Mukhyamantri Tirth Darshan Yojana
भारतातील एकूण 73 व महाराष्ट्र राज्यातील 66 तीर्थक्षेत्रांचा या योजनेमध्ये समावेश करण्यात आला आहे. जवळपास देशातील व राज्यातील सर्व महत्त्वाच्या तीर्थक्षेत्रांचा समावेश करण्यात आला आहे.
इथे काही स्थळांची लिस्ट दे आहे, mukhyamantri tirth yatra yojana places list.
देशातील –
वैष्णवदेवी | केदारनाथ |
अयोध्या राम मंदिर | तिरुपती |
जगन्नाथ मंदिर | गंगोत्री मंदिर |
कोणार्क सूर्य मंदीर | वैष्णवदेवी |
द्वारका | बद्रिनाथ |
कामाख्यादेवी | अमरनाथ |
काशी | अजमेर दर्गा |
सोमनाथ मंदिर |
महाराष्ट्रातील –
गणपतीपुळे | शिर्डी साईबाबा मंदिर |
शनी मंदिर, शनी शिंगणापूर | महाकाली मंदिर, चंद्रपूर |
रामटेक | दीक्षाभूमी, नागपूर |
सप्तशृंगी मंदिर | काळाराम मंदिर |
पैठण | त्र्यंबकेश्वर |
खंडोबा मंदिर, माळेगाव, नांदेड | गुरू गोविंद सिंग, हुजुर साहिब, नांदेड |
रेणुका देवी मंदिर नांदेड | जैन मंदिर कोल्हापूर |
शिखर शिंगणापूर | महागणपती रांजणगाव |
पंढरपूर | आळंदी |
जेजुरी खंडोबा मंदिर | देहू |
महालक्ष्मी मंदिर | सिद्धिविनायक मंदिर |
राज्यामधील ज्येष्ठ नागरिकांना महाराष्ट्र राज्य व भारत देशातील प्रमुख तीर्थ स्थळांपैकी एका स्थळाच्या यात्रेकरिता पात्र व्यक्तीला या योजनेचा एकवेळ लाभ घेता येईल. तसेच प्रवास खर्चाची कमाल मर्यादा प्रती व्यक्ती 30 हजार इतकी राहील. यामध्ये प्रत्यक्ष प्रवास, भोजन, निवास इ. सर्व बाबींचा समावेश असेल.
राज्यातील सर्व धर्मातील ६० वर्षे किंवा त्याहून अधिक वय असलेल्या ज्येष्ठ नागरिकांना भारतातील तीर्थक्षेत्रांना भेट देण्याची संधी मिळावी, अशी अनेकांची इच्छा असते.
मात्र, गरीब आणि सामान्य कुटुंबातील ज्येष्ठ नागरिकांना आर्थिक अडचणी, सोबतीच्या अभावामुळे किंवा पुरेशी माहिती नसल्याने तीर्थयात्रेचे स्वप्न साकार करता येत नाही. हे लक्षात घेऊन, ज्येष्ठ नागरिकांना देशातील प्रमुख तीर्थस्थळांना भेट देऊन अध्यात्मिक शांती आणि मानसिक समाधान मिळावे, यासाठी राज्य शासनाने “मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना” सुरू करण्यास मान्यता दिली आहे, ज्यामध्ये सर्व धर्मातील ज्येष्ठ नागरिकांना राज्यातील आणि देशातील तीर्थस्थळांना मोफत भेट देण्याची संधी उपलब्ध करून दिली जाईल.
Mukhyamantri Yojana Maharashtra : Mukhyamantri Tirth Darshan Yojana
अशी असणार आहे मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना Mukhyamantri Yojana Maharashtra
या योजनेत भारतातील एकूण ७३ आणि महाराष्ट्रातील ६६ तीर्थक्षेत्रांचा समावेश करण्यात आला असून, जवळपास सर्व महत्त्वाच्या तीर्थस्थळांचा यात अंतर्भाव आहे. महाराष्ट्रातील ज्येष्ठ नागरिकांना या योजनेद्वारे राज्य आणि देशातील प्रमुख तीर्थस्थळांपैकी एका स्थळाला भेट देण्यासाठी एकदाच लाभ घेता येईल.
प्रवासासाठी खर्चाची कमाल मर्यादा प्रति व्यक्ती ३० हजार रुपये आहे, ज्यामध्ये प्रवास, भोजन, निवास यासारख्या सर्व सुविधा समाविष्ट आहेत. या योजनेसाठी पात्र होण्यासाठी महाराष्ट्रातील रहिवासी असणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांचे वय किमान ६० वर्षे असावे आणि वार्षिक उत्पन्न २.५० लाख रुपयांपेक्षा जास्त नसावे.
अर्जासोबत ज्येष्ठ नागरिकांना सरकारी वैद्यकीय अधिकाऱ्याकडून आरोग्य तपासणी करून, प्रस्तावित प्रवासासाठी सक्षम असल्याचे प्रमाणपत्र (प्रवासाच्या तारखेपासून १५ दिवसांपेक्षा अधिक जुनं नसलेलं) सादर करणे आवश्यक आहे. मागील वर्षी लॉटरीत निवडूनही प्रवास न केलेले अर्जदार या योजनेत पुन्हा पात्र ठरणार नाहीत.
अर्जदाराने खोटी माहिती दिल्यास किंवा तथ्ये लपविल्यास त्याला योजनेपासून वंचित ठेवले जाऊ शकते. या योजनेच्या पात्रता आणि अपात्रता निकषांमध्ये आवश्यकता भासल्यास शासनाच्या मान्यतेनुसार बदल करण्यात येऊ शकतात.
या योजनेच्या लाभासाठी अजासोबत काय द्यावे लागतील डॉक्युमेंट Mukhyamantri Yojana Maharashtra
या योजनेचा लाभ घेण्यासाठी ऑनलाईन अर्ज करणे आवश्यक आहे.
- अर्जासोबत लाभार्थ्याचे आधारकार्ड किंवा रेशनकार्ड,
- महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र किंवा राज्यातील जन्मदाखला जोडणे आवश्यक आहे.
- अधिवास प्रमाणपत्र नसल्यास, लाभार्थ्याचे १५ वर्षांपूर्वीचे रेशनकार्ड, मतदार ओळखपत्र, शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र किंवा जन्मदाखला या चारपैकी कोणतेही एक दस्तऐवज ग्राह्य धरले जाईल.
- अर्जासोबत सक्षम प्राधिकाऱ्याने दिलेला कुटुंब प्रमुखाचा वार्षिक उत्पन्नाचा दाखला (रु. २.५० लाखांपर्यंत असणे आवश्यक), किंवा पिवळे/केशरी रेशनकार्ड, वैद्यकीय प्रमाणपत्र, पासपोर्ट आकाराचा फोटो, जवळच्या नातेवाईकाचा मोबाइल क्रमांक आणि
- योजनेच्या अटी व शर्तींचे पालन करण्याबाबतचे हमीपत्र जोडणे बंधनकारक आहे.
जाणून घ्या कोणाला या योजनेचा लाभ घेता येणार नाही. Mukhyamantri Yojana Maharashtra
या योजनेसाठी काही अपात्रता निकष निश्चित करण्यात आले आहेत. कुटुंबातील सदस्य आयकरदाता असल्यास, किंवा कोणत्याही सरकारी विभाग, उपक्रम, मंडळ, भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थांमध्ये नियमित/कायमस्वरूपी कर्मचारी असले आणि निवृत्तीनंतर निवृत्तीवेतन घेत असले तरीही, तो कुटुंब सदस्य या योजनेसाठी पात्र ठरणार नाही. मात्र, रु. २.५० लाखांपर्यंत उत्पन्न असलेले बाह्य यंत्रणेद्वारे कार्यरत कर्मचारी, स्वयंसेवी कामगार, आणि कंत्राटी कर्मचारी योजनेसाठी पात्र ठरतील.
विद्यमान किंवा माजी खासदार/आमदार असलेले कुटुंबातील सदस्य, तसेच भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या बोर्ड/कॉर्पोरेशन/उपक्रमांमधील अध्यक्ष, उपाध्यक्ष, संचालक, किंवा सदस्य असलेल्या व्यक्ती देखील अपात्र ठरतील. शिवाय, ज्या कुटुंबातील सदस्यांकडे चारचाकी वाहन (ट्रॅक्टर वगळून) नोंदणीकृत आहे, ते देखील या योजनेसाठी पात्र ठरणार नाहीत.
लाभार्थ्याला शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या प्रवासासाठी सक्षम असणे आवश्यक आहे, तसेच कोणत्याही संसर्गजन्य रोगासारख्या टीबी, हृदयरोग, कोरोनरी अपुरेपणा, कोरोनरी थ्रोम्बोसिस, मानसिक आजार, संसर्गजन्य कुष्ठरोग इत्यादी आजारांपासून मुक्त असणे आवश्यक आहे.
अशी होणार लाभार्थ्यांची निवड Mukhyamantri Yojana Maharashtra
या योजनेसाठी रेल्वे आणि बस प्रवासाचे आयोजन अधिकृत टूरिस्ट कंपन्या तसेच IRCTC प्रमाणित नोंदणीकृत कंपन्यांच्या माध्यमातून विहित निविदा प्रक्रियेद्वारे केले जाईल. लाभार्थ्यांची निवड जिल्हा स्तरावर स्थापित जिल्हास्तरीय समिती करून केली जाईल.
प्रत्येक जिल्ह्यासाठी प्रवासाच्या कोट्याची व्याख्या त्या जिल्ह्याच्या लोकसंख्येच्या प्रमाणावर आणि अर्जदारांच्या संख्येवर आधारित केली जाईल. निवेदनाच्या संख्येच्या आधारे कोटा अधिक करण्यासाठी लॉटरी प्रणाली (संगणकीकृत ड्रॉ) वापरली जाईल. लॉटरीमध्ये निवडलेले व्यक्तीच यात्रेला जाऊ शकतील आणि त्यांना इतर कोणालाही सोबत घेऊन जाण्याची परवानगी नसेल.
तसेच, जोडीदारांनी स्वतंत्रपणे अर्ज केला असल्यास, आणि एकाच्या निवडीसाठी लॉटरीला मंजुरी मिळाली पण दुसऱ्याला न मिळाल्यास, आयुक्त, समाजकल्याण आयुक्तालय, पुणे त्यांना एकत्र प्रवास करण्याचा निर्णय घेऊ शकतील.
प्रवास प्रक्रिया
जिल्हास्तरीय समितीने निवडलेल्या प्रवाशांची यादी आयुक्त, समाजकल्याण, पुणे यांना सादर केली जाईल. यादी नंतर अधिकृत टुरिस्ट कंपनी किंवा एजन्सीला दिली जाईल, जी टूरवर जाणाऱ्या प्रवाशांच्या गटाच्या प्रस्थानाची व्यवस्था करेल. प्रवासाच्या आवश्यक सुविधांचा निर्णय राज्य शासन घेईल, आणि प्रवाशांना नियोजित स्थळी पोहोचण्यासाठी त्यांचे स्वतःचे खर्च उचलावे लागतील.
एकदा प्रवास सुरू झाल्यावर, मध्यभागी प्रवासी प्रवास सोडू इच्छित असल्यास, त्याला सरकारी सुविधा मिळणार नाही. मात्र, विशेष परिस्थितीमध्ये, मार्गदर्शकाच्या परवानगीने प्रवासी प्रवास स्वखर्चाने सोडू शकतात. देवस्थान व विभागाने ठरवलेली सेवा आणि निकषाव्यतिरिक्त कोणत्याही अतिरिक्त सुविधांसाठी प्रवाशांना अतिरिक्त खर्च सहन करावा लागेल.
अर्ज करण्याची प्रक्रिया | mukhyamantri tirth yatra yojana maharashtra online registration
या योजनेसाठी अर्ज पोर्टल, मोबाईल ॲप किंवा सेतू सुविधा केंद्रांद्वारे ऑनलाइन भरता येतील. पात्र ज्येष्ठ नागरिक या योजनेसाठी स्वतः ऑनलाईन अर्ज करू शकतात. जे ज्येष्ठ नागरिक स्वतः ऑनलाईन अर्ज करू शकत नाहीत, त्यांच्यासाठी सेतू केंद्रांमध्ये मोफत अर्ज सुविधा उपलब्ध आहे. अर्ज प्रक्रियेची संपूर्ण सेवा विनामूल्य असेल.
अर्जदाराने स्वतः निवडलेल्या ठिकाणी उपस्थित राहून थेट फोटो काढून घेणे आणि KYC प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक आहे. यासाठी अर्जदाराने कुटुंबाचे ओळखपत्र (रेशनकार्ड) व स्वतःचे आधार कार्ड सोबत आणणे गरजेचे आहे.
अर्ज सबमिट झाल्यानंतर, पात्र अर्जदारांची तात्पुरती यादी पोर्टल किंवा अॅपवर प्रकाशित केली जाईल. अंतिम यादीत असलेल्या कोणत्याही अर्जदाराचे निधन झाल्यास, त्यांचे नाव लाभार्थी यादीतून काढले जाईल.
Online Portal Link – https://mahadbt.maharashtra.gov.in/ Mukhyamantri Yojana Maharashtra
75 वर्षावरील अर्जदाराला त्याच्या जीवनसाथी किंवा सहाय्यकाला नेण्यास परवानगी
७५ वर्षांवरील अर्जदाराला त्याच्या जीवनसाथी किंवा सहाय्यकाला सोबत घेऊन जाण्याची परवानगी असेल. तथापि, अर्जात हे नमूद करणे आवश्यक आहे की त्याचा जीवनसाथी/सहाय्यक प्रवासासाठी इच्छुक आहे.
७५ वर्षांच्या वयावर असलेल्या अर्जदाराच्या जोडीदाराचे वय ६० वर्षांपेक्षा कमी असले तरी सहाय्यक त्याच्यासोबत प्रवास करू शकतो. तथापि, सहाय्यकाची सुविधा फक्त त्या अर्जदारांसाठी उपलब्ध असेल ज्याचे वय ७५ वर्षांपेक्षा जास्त आहे आणि ज्याने एकट्याने रेल्वे प्रवासासाठी अर्ज केला आहे.
जर अर्जदाराचे वय ७५ वर्षांपेक्षा कमी असेल तर सहाय्यकाला परवानगी दिली जाणार नाही. जोडीदारासोबत मदतनीस घेण्याची सुविधा देखील उपलब्ध नाही. तथापि, जर दोन्ही पती-पत्नीचे वय ७५ वर्षांपेक्षा जास्त असेल आणि अर्जामध्ये मदतनीस नोंदणीकृत असेल, तर तो व्यक्ती प्रवासात सहभागी होऊ शकतो. सहाय्यकाचे वय किमान २१ वर्षे आणि कमाल ५० वर्षे असावे लागेल.
मदतनीस प्रवासात सहभागी झाल्यास, त्याला त्या प्रवाश्याला मिळणाऱ्या सर्व सुविधांचा लाभ मिळेल. सहाय्यक शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त आणि प्रवासासाठी योग्य असावा लागेल.
प्रवासी, त्याचे जोडीदार आणि सहाय्यक सर्व मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करणे अनिवार्य असेल. सदर योजनेचे राज्य स्तरावर नियमन आणि आढावा घेण्यासाठी, सामाजिक न्याय विभागाचे मंत्री यांच्या अध्यक्षतेखाली १७ सदस्यांची समिती गठित करण्यात आली आहे.
जिल्हास्तरावर योजनेच्या अंमलबजावणीसाठी पालकमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली ७ सदस्यांची समिती कार्यरत असेल. सहाय्यक आयुक्त, समाजकल्याण विभाग हे सदस्य सचिव असतील, आणि राज्यस्तरावर आयुक्त, समाजकल्याण हे नोडल अधिकारी म्हणून काम करतील.
निष्कर्ष :- Mukhyamantri Yojana Maharashtra
मित्रांनो, तुम्हाला आम्ही दिलेलीMukhyamantri Yojana Maharashtra : Mukhyamantri Tirth Darshan Yojana मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना’ जाणून घ्या काय आहे ही योजना? या लेखाबद्दलची माहिती कशी वाटली याबद्दल तुम्ही आम्हाला लेखाच्या खाली कमेंट करून कळवू शकता तसेच आमच्यासाठी काही सूचना असतील त्याही तुम्ही आम्हाला सुचवू शकता अशाच सरकारी योजना संबंधी अपडेटेड माहिती मिळवण्यासाठी आमच्या योजना गॅरंटी डॉट कॉम (yojnaguarantee.com) या संकेतस्थळाला भेट देत राहा धन्यवाद|
FAQ :-
१. Mukhyamantri Yojana Maharashtra च्या अंतर्गत किती स्थळे असतील?
उत्तर- एकूण १३९ पर्यंत स्थळे असतील.
२. Mukhyamantri Yojana Maharashtra या योजनेचा ऑनलाइन अर्ज करायचा असल्यास अधिकृत संकेतस्थळ कोणते?
उत्तर- https://mahadbt.maharashtra.gov.in/ या अधिकृत संकेतस्थळावर आपण ऑनलाईन स्वरुपात अर्ज करू शकतो.
इथे लिंक देत आहे जी तुम्हाला उपयोगी पडेल.
पुढील लेख देखील वाचावेत!
Home solar power generation new technology आता घरातच वीजनिर्मिती होणार ! नवीन सोलर सेल तंत्रज्ञान आले, जाणून घ्या तपशील.
SIP Mutual Fund Calculator 2024 केवळ 1000 रुपयांच्या मासिक TOP 10 SIP मध्ये गुंतवा व कमवा 3 कोटी - जाणून घ्या कसे.
शेतकऱ्यानच्या फायद्या साठी वाचा. किसान सन्मान निधी योजना
आपल्या लाडक्या लेकीच्या उज्वल भविष्यासाठी जाणून घ्या सुकन्या समृद्धी योजना
Drone Subsidy Scheme in 2024 केंद्र पुरस्कृत कृषी यांत्रिकीकरण उप अभियान: ड्रोन अनुदान योजना
महिलांना व्यवसाय स्थापन करण्यासाठी प्रोत्साहन पर योजना म्हणजेच महिला समृद्धी कर्ज योजना, अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी या योजनेवर क्लिक करा.
आपल्याला आपल्या हक्काचे घर मिळणार रमाई आवास घरकुल योजना अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी या योजनेवर क्लिक करा.
मुलीच्या उज्ज्वल भविष्यासाठी शासन घेऊन आले आहे लेक लाडकी योजना.
Best Home Insurance Policies in 2024 सर्वोत्तम होम इन्शुरन्स योजना निवडण्याबाबत संपूर्ण मार्गदर्शन
Tractor Anudan Yojana apply Online 2024 ट्रॅक्टर अनुदान योजना 2024 अर्ज प्रक्रिया – सविस्तर मार्गदर्शन