Dairy Development Project 2024:दुग्ध विकास प्रकल्प टप्पा-2
Dairy Development Project 2024 आपण या लेखात दुग्ध विकास प्रकल्पाच्या टप्पा-2 मध्ये शासनाने 19 जिल्ह्यांमध्ये गाई आणि म्हशी गट वाटपासाठी सुरू केलेल्या नवीन योजनेची सविस्तर माहिती येथे घेणार आहोत. महाराष्ट्र राज्य शासनाने 2028 पर्यंत अर्थव्यवस्था 1 ट्रिलियन डॉलरपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र आर्थिक सल्लागार परिषदेने तयार केलेला पथदर्शी आराखडा अहवाल शासनास सादर केला आहे. या अहवालात राज्याच्या विकासाला चालना देत असताना असमतोल कमी करण्याचे महत्त्व अधोरेखित केले आहे. तसेच, जीडीपीमध्ये कमी योगदान देणाऱ्या जिल्ह्यांच्या शाश्वत आणि संतुलित विकासाला गती मिळावी यासाठी काही गोष्टी अधोरेखित केल्या आहेत.
राज्याची अर्थव्यवस्था 2028 पर्यंत 1 ट्रिलियन डॉलरपर्यंत नेण्यासाठी शेती आणि शेतीपूरक व्यवसायांना प्रोत्साहन देण्याचे या अभ्यासाअंती सांगितले आहे, ज्यामध्ये दुग्धव्यवसायाचाही समावेश आहे. सन 2022-23 च्या आकडेवारीनुसार, महाराष्ट्र राज्य हे दुग्ध उत्पादनात देशात सहाव्या क्रमांकावर आहे. देशात दरडोई दुधाचे सेवन 459 ग्रॅम प्रति व्यक्ती प्रतिदिन आहे, पंजाबमध्ये हे प्रमाण 1283 ग्रॅम आहे, तर महाराष्ट्रात हे प्रमाण 329 ग्रॅम आहे. या सर्व कारणांमुळे राज्यात दुग्ध उत्पादन वाढविण्याची मोठी संधी आपल्याला आहे.
पश्चिम व उत्तर महाराष्ट्रातील दुग्ध व्यवसाय मोठ्या प्रमाणावर असला तरी विदर्भ आणि मराठवाड्यात याची कमतरता आहे. या भागात कमी पर्जन्यमानामुळे शेतकऱ्यांना शेतीतून स्थिर उत्पन्न मिळत नाही. त्यामुळे दुग्ध व्यवसायातून त्यांना अतिरिक्त उत्पन्नाचा मार्ग उपलब्ध करून देणे ही काळाची गरज आहे. विदर्भ व मराठवाड्यात शेतकरी आत्महत्यांचे प्रमाण अधिक असल्याने त्यांना आर्थिक आधार मिळावा, म्हणून दुग्ध व्यवसाय महत्वाचा ठरतो.
2016 ते 2022 या कालावधीत विदर्भ आणि मराठवाड्यातील 11 जिल्ह्यांमध्ये दुग्ध विकास प्रकल्प-टप्पा-1 हा यशस्वीपणे राबविण्यात आला होता. याच अनुभवांच्या आधारे आता, संपूर्ण विदर्भ आणि मराठवाडा म्हणजेच 19 जिल्ह्यांमध्ये दुग्ध विकास प्रकल्प-टप्पा-2 राबविण्याचा प्रस्ताव 13 ऑगस्ट 2024 रोजी मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजूर करण्यात आला. त्यानुसार, शासनाने हा निर्णय जारी केलेला आहे.
Dairy Development Project 2024:दुग्ध विकास प्रकल्प टप्पा-2-दुग्ध विकास प्रकल्प टप्पा-2:
सन २०२४-२५ ते २०२६-२७ या तीन वर्षांच्या कालावधीत विदर्भ आणि मराठवाड्यातील १९ जिल्ह्यांमध्ये दुग्ध विकास प्रकल्प टप्पा-२ (Dairy Development Project Phase-2) राबविण्यासाठी शासन मान्यता देण्यात येत आहे, दोन वर्षांनंतर प्रकल्प कसा राबवला गेला याचे पुनरावलोकन करून २०२६-२७ या वर्षात प्रकल्पाची अंमलबजावणी सुरू ठेवण्याचा निर्णय विभागाच्या पातळीवर घेतला जाणार आहे.
दुग्ध विकास प्रकल्प टप्पा-2 अंतर्गत, खालीलप्रमाणे या ९ घटक आणि त्यांच्या भौतिक उद्दिष्टांचे तपशील (रुपयांमध्ये कोटीत) देण्यात येत आहे.
क्र. | प्रकल्पांतर्गत घटक | भौतिक लक्ष | घटकावरील खर्च | लाभार्थी हिस्सा | राज्य हिस्सा |
1. | उच्च दुध उत्पादन क्षमता असलेल्या दुधाळ गायी- म्हशींचे शेतकरी, पशुपालक यांना वाटप | १३,४०० | १३४.०० | ६७.०० (५० टक्के) | ६७.०० (५० टक्के) |
2. | उच्च दुध उत्पादन क्षमता असलेल्या भृणांचे प्रत्यारोपण केलेल्या कालवडींचे शेतकऱ्यांना वाटप | १,००० | १४.५० | ३.६२ (२५ टक्के) | १०.८८ (७५ टक्के) |
3. | पशु प्रजनन पुरक खाद्य (Fertility Feed) चा पुरवठा (३०,००० मे.टन) | १,००,००० गायी- म्हशी | ९६.०० | ७२.०० (७५ टक्के) | २४.०० (२५ टक्के) |
4. | दुधातील फॅट व एसएनएफ वर्धक (Enhancing) खाद्य पुरकांचा पुरवठा | ३३,००० गायी / म्हशी | १४.८५ | ११.१४ (७५ टक्के) | ३.७१ (२५ टक्के) |
5. | बहुवार्षिक चारा पिके घेण्यासाठी अनुदान | २२,००० | १३.२० | निरंक | १३.२० |
6. | शेतकरी, पशुपालक यांना विद्युतचलित कडबाकुट्टी सयंत्रांचे वाटप | १०,००० | ३०.०० | १५.०० (५० टक्के) | १५.०० (५० टक्के) |
7. | मुरघास वाटप | ३३,००० | १४.८५ | १०.४० (७० टक्के) | ४.४५ (३० टक्के) |
8. | गायी-म्हशींमधील वंध्यत्व निवारण कार्यक्रम | २,००,००० | ३.२८ | निरंक | ३.२८ |
9. | आधुनिक पध्दतीने दुग्ध व्यवसाय करण्यासाठी शेतकऱ्यांना प्रशिक्षण | ३६,००० | १.३० | निरंक | १.३० |
एकुण | – | ३२१.९८ | १७९.१६ | १४२.८२ | |
प्रशासकीय खर्च | योजना खर्चाच्या २ टक्के | ६.४४ | – | ६.४४ | |
एकुण | ३२८.४२ | १७९.१६ | १४९.२६ |
Dairy Development Project 2024:दुग्ध विकास प्रकल्प टप्पा-2-प्रकल्पाचे कार्यक्षेत्र:
विदर्भ व मराठवाडा दुग्ध विकास प्रकल्प टप्पा-२ / Development Project Phase-2 हा विदर्भ व मराठवाडा या विभागातील १९ जिल्ह्यांमध्ये राबविण्यात येणार आहे.
Dairy Development Project 2024:दुग्ध विकास प्रकल्प टप्पा-2-प्रकल्पाचा कालावधी:
हा प्रकल्प २०२४-२५ ते २०२६-२७ या तीन वर्षांच्या कालावधीमध्ये राबविला जाणार आहे.
Dairy Development Project 2024:दुग्ध विकास प्रकल्प टप्पा-2-प्रकल्पाची उद्दिष्टे समजून घेऊया:
- दुधाळ जनावरांची संख्या वाढवणे – शेतकऱ्यांच्या गायी-म्हशींमध्ये कृत्रिम रेतनाचा व भृण प्रत्यारोपण तंत्रज्ञानाचा वापर करून जास्त दूध देणाऱ्या जनावरांची संख्या वाढवणे.
- पशु आहारामध्ये सुधारणा – शेतकरी आणि पशुपालकांना जनावरांसाठीचा पोषक आणि संतुलित आहाराबाबत सल्ला देऊन, वैरण विकासासारख्या योजनांद्वारे जनावरांच्या आहारात सुधारणा घडवून आणणे.
- पशु आरोग्य सेवांची उपलब्धता – खेडेगावांमध्ये त्वरित आणि नियमित आरोग्य सेवा पुरवून जनावरांचे आरोग्य सुधारणे.
- उत्पादनक्षमता चांगली असणाऱ्या जनावरांचे वितरण – अधिक दूध देणाऱ्या गायी आणि म्हशींचे शेतकऱ्यांना वाटप करून उत्पादनक्षमता वाढवणे.
- शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करणे – जनावरांच्या आरोग्यामध्ये सुधारणा करून शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी मदत करणे.
- स्थानिक रोजगार निर्मिती – पशुपालनाच्या विविध प्रकल्पांमधून स्थानिक पातळीवर रोजगाराच्या संधी निर्माण करणे.
Dairy Development Project 2024:दुग्ध विकास प्रकल्प टप्पा-2-प्रकल्पातील घटक:
(१) उच्च दूध उत्पादन क्षमता असलेल्या गायी-म्हशींचे वाटप त्यासाठीच्या असणाऱ्या अटी आणि शर्ती जाणून घेऊयात :-
एका लाभार्थ्याला ८-१० लिटर दुध देण्याची क्षमता असली गाय/म्हैस वाटप करण्यात येणार आहे.
जनावरांना डिजिटल ट्रॅकिंग काउ कॉलर आणि जिओ टॅगिंग करणे बंधनकारक असणार आहे.
या योजनेचा फायदा मिळालेल्यांना ३ वर्षांपर्यंत गाय/म्हैस विकता येणार नाही.
गाय/म्हैस प्रकल्प संचालकांच्या नावे तारण राहील.
३ वर्षांचा विमा अनिवार्य असणार आहे.
Dairy Development Project 2024:दुग्ध विकास प्रकल्प टप्पा-2-लाभार्थ्यांच्या निवडीचे निकष:
लाभार्थ्यांकडे किमान २ दुधाळ जनावरे असणे गरजेचे आहे.
मागील वर्षभरात किमान ३ महिने तरी दूध विक्री केलेली असावी.
एक कुटुंबातील एक व्यक्ती पात्र असणार.
एका गावात जास्तीत जास्त ५ लाभार्थी असतील.
Dairy Development Project 2024:दुग्ध विकास प्रकल्प टप्पा-2-अनुदान आणि लाभ:
५०% अनुदान किंवा रु. ५०,०००/- यामध्ये जी रक्कम कमी असेल ती अनुदान म्हणून दिली जाईल.
लाभार्थ्यांना गाय/म्हैस खरेदी केल्यानंतर व त्यांनी ती विमा पावती जमा केल्यानंतर अनुदान दिले जाईल.
(२) जास्त दुध उत्पादन क्षमता असलेल्या भृणांचे प्रत्यारोपण – बाह्यफलन (IVF) या तंत्रज्ञानाद्वारे ७ महिन्याच्या गाभण असलेल्या कालवडींचा पुरवठा केला जाईल.
लाभार्थ्यांना ७५% / रु. १,०८,७५०/- अनुदान दिले जाईल.
(३) पशु प्रजनन पुरक खाद्याचा पुरवठा –
पशुधनाची प्रजनन क्षमता सुधारण्यासाठी ६० दिवसांसाठी ५ कि. ग्रॅ. प्रति दिवस नुसार खाद्य पुरवठा.
अनुदान २५% वर आधारित असणार आहे.
एकूण १ लाख जनावरांना याचा लाभ मिळेल.
(४) दुधातील फॅट आणि एसएनएफ वर्धक खाद्याचा पुरवठा –
दुधातील गुणवत्ता सुधारण्यासाठी विकसित खाद्यांचा वापर.
विदर्भ व मराठवाडा दुग्ध विकास प्रकल्प टप्पा-२ योजनेसाठी अर्ज प्रक्रिया खालील प्रमाणे करावी लागेल.
Dairy Development Project 2024:दुग्ध विकास प्रकल्प टप्पा-2-कुठे आणि कसा अप्लाय करावा जाणून घेऊया
१. ऑनलाइन अर्ज प्रक्रिया-
लाभार्थ्यांना योजनेसाठी अर्ज महाडीआयडीएस (MahaDIDS) पोर्टल किंवा अधिकृत कृषी व पशुसंवर्धन विभागाच्या वेबसाइट वर जाऊन ऑनलाइन अर्ज करावा लागेल.
अर्ज करण्यासाठी अधिकृत वेबसाइट खाली देत आहोत
Dairy Development Project 2024:दुग्ध विकास प्रकल्प टप्पा-2
२. रजिस्ट्रेशन प्रोसेस-
अर्जदाराने प्रथम दिलेल्या पोर्टलवर स्वतःची नोंदणी करावी.
नोंदणीसाठी आधार क्रमांक, संपर्क तपशील, वय, शेतकरी असल्याचा पुरावा आणि इतर आवश्यक अशी कागदपत्रे जोडावी.
अर्जदाराने आपली पात्रता तपासून योग्य त्या प्रकल्पासाठी अर्ज करावा (उदा. जास्त दूध उत्पादन क्षमता असलेली गाय/म्हैस, भृण प्रत्यारोपण इत्यादी).
अर्ज ऑनलाइन भरावा व संलग्न कागदपत्रे तेथे अपलोड करावीत.
३. आवश्यक कागदपत्रे:
आधार कार्ड
उत्पन्नाचा दाखला
जमीनधारणा प्रमाणपत्र (७/१२ उतारा)
दुग्धविक्रीचा पुरावा / पावत्या
बँक खात्याचा तपशील
जनावरांसाठी केलेला विमा दाखला
४. वैयक्तिकरित्या अर्ज करणे (ऑफलाइन प्रक्रिया):
जर एखाद्याला ऑनलाइन अर्ज करण्यास अडचण येत असेल, तर त्याने संबंधित जिल्ह्याच्या पशुसंवर्धन विभागाच्या कार्यालयात जाऊन अर्ज करता येणार आहे.
पशुधन विकास अधिकारी किंवा तालुका दुग्ध विकास अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा.
५. सहाय्य व मार्गदर्शन केंद्र:
प्रत्येक जिल्ह्यातील पशुसंवर्धन विभागाचे कार्यालय, सेवा केंद्रे (CSC Centers), येथे देखील अर्ज भरून देता येईल.
शेतकऱ्यांना अर्ज प्रक्रियेबद्दल मार्गदर्शन आणि सहाय्य मिळू शकणार आहे.
६. अर्ज करण्याची अंतिम तारीख:
योजनेची शेवटची तारीख संबंधित जिल्ह्यांच्या अधिसूचना किंवा वेबसाइटवर अद्ययावत केली जाईल. अर्जदारांनी वेळेत अर्ज करावा.[Dairy Development Project 2024:दुग्ध विकास प्रकल्प टप्पा-2 ]
निष्कर्ष :-
मित्रांनो, तुम्हाला आम्ही दिलेली Dairy Development Project 2024:दुग्ध विकास प्रकल्प टप्पा-2 या योजनेबद्दलची माहिती कशी वाटली याबद्दल तुम्ही आम्हाला लेखाच्या खाली कमेंट करून कळवू शकता तसेच आमच्यासाठी काही सूचना असतील त्याही तुम्ही आम्हाला सुचवू शकता अशाच सरकारी योजना संबंधी अपडेटेड माहिती मिळवण्यासाठी आमच्या योजना गॅरंटी डॉट कॉम (yojnaguarantee.com) या संकेतस्थळाला भेट देत राहा धन्यवाद|
हे देखील वाचा :-
योजना प्रत्येक ज्येष्ठ नागरिकाला आपल्या उतरत्या वयात जीवन सुकर व्हाव म्हणून महाराष्ट्र सरकारने आणली आहे मुख्यमंत्री वयोश्री योजना. {Mukhyamantri Vayoshri Yojna}
शेतकऱ्यानच्या फायद्या साठी वाचा. किसान सन्मान निधी योजना | {Kisan Sanman Nidhi Yojna}