students safety laws in maharastra:विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी ठोस उपाययोजना
महाराष्ट्रातील सर्व शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी ठोस उपाययोजनांची कडक अंमलबजावणी करण्याचा आदेश जारी!
जाणून घ्या काय आहे याबाबतचा कायदा?(Strict Implementation of Comprehensive Safety Measures for Students in All Schools of Maharashtra)
महाराष्ट्रातील सर्व शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी ठोस उपाययोजनांची कडक अंमलबजावणी करण्याचा आदेश जारी!
जाणून घ्या काय आहे याबाबतचा कायदा?
शालेय विद्यार्थ्यांच्या शिक्षणाबरोबरच त्यांच्या सुरक्षेला प्राधान्य देणे तेवढेच गरजेचे आहे. अलीकडीलच्या काळात विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या संदर्भात काही अनुचित घटना समोर आल्यामुळे हा विषय महत्त्वपूर्ण बनला आहे. शासनाने या बाबीकडे गांभीर्याने लक्ष दिले असून, विद्यार्थ्यांच्या, विशेषतः मुलींच्या, सुरक्षेसाठी विविध उपाय योजनांचे आदेश आधीपासूनच लागू केले आहेत.
विद्यार्थ्यांची सुरक्षा ही सर्वाधिक महत्त्वाची असल्याने, कोणत्याही परिस्थितीमध्ये या उपाययोजनांमध्ये कोणतीही तडजोड होऊ शकत नाही. सध्या अस्तित्वात असलेल्या उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी तसेच नव्या काय काय उपाय योजना करता येतील यावर विचारविनिमय केला आहे.
महाराष्ट्रामधील सर्व शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी कडक उपाययोजना लागू – शिक्षण विभागाचा नवा शासन निर्णय जाहीर.
students safety laws in maharastra:विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी ठोस उपाययोजना-शाळा आणि शाळेच्या आवारामध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसविणे:
- शाळा आणि शाळेच्या आवारामध्ये विद्यार्थ्यांसह शिक्षक व इतर कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी सीसीटीव्ही कॅमेरे हा एक फार प्रभावी उपाय आहे.
- हा नियम सर्व खाजगी शाळांसाठी या शासन निर्णयाच्या अंमलबजावणीपासून एका महिन्याच्या आत शाळा आणि शाळेच्या परिसरातील मोक्याच्या ठिकाणी पुरेशी संख्या असलेले सीसीटीव्ही कॅमेरे बसवणे बंधनकारकल राहील. हा नियम पाळला नसल्यास संबंधित शाळांवर कारवाई केली जाईल, ज्यात अनुदान रोखणे किंवा शाळेची मान्यता रद्द करणे यासारखे कठोर निर्णयही घेतले जाऊ शकतात.
- ज्या सरकारी आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमध्ये अद्याप सीसीटीव्ही कॅमेरे बसवलेले नाहीत, त्यांनी तातडीने कॅमेरे बसविण्याची प्रक्रिया सुरू करावी.
शासन निर्णय क्रमांक ३ नुसार,
जिल्हा वार्षिक योजना (DPC) अंतर्गत शालेय शिक्षण आणि क्रीडा विभागाशी संबंधित योजनांसाठी ५ टक्के निधी राखीव ठेवण्यास मान्यता देण्यात आली आहे. याचा वापर सीसीटीव्ही बसवण्यासाठी देखील केला जाऊ शकतो, आणि शाळेच्या व्यवस्थापन समितीने यावर लवकरात लवकर अंमलबजावणी करावी.
- फक्त सीसीटीव्ही कॅमेरे बसवणे पुरेसे नाही तर, त्यांचे फुटेज देखील नियमितपणे तपासणे महत्त्वाचे आहे. फुटेजमध्ये काही आक्षेपार्ह बाबी आढळल्यास त्यावर कार्यवाही करण्याची जबाबदारी मुख्याध्यापकावर आहे. मुख्याध्यापकाने आठवड्यात किमान तीन वेळा फुटेज तपासणे आवश्यक राहील, आणि फुटेजमध्ये काही संशयास्पद आढळल्यास त्वरित स्थानिक पोलिसांशी संपर्क साधावा.
students safety laws in maharastra:विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी ठोस उपाययोजनाशिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या नियुक्तीसाठीची आवश्यक काळजी –
- शाळेतील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची नियुक्ती करताना विशेष काळजी घेणे आणि कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या वर्तनावर नियमित देखरेख ठेवणे आवश्यक आहे. यासाठी शाळेच्या व्यवस्थापनाने प्रभावी उपाययोजना करणे गरजेचे राहील.
- नियमित कर्मचाऱ्यांबरोबरच कंत्राटी भरतीद्वारे नेमलेल्या कर्मचाऱ्यांची, जसे की सुरक्षारक्षक, सफाई कर्मचारी, मदतनीस, स्कूल बस चालक, इत्यादींची, पार्श्वभूमी तपासणे प्रथमतः अत्यावश्यक आहे. यासाठी नेमणुकीपूर्वी संबंधित व्यक्तीचा चारित्र्य पडताळणी अहवाल स्थानिक पोलीस यंत्रणेकडून घेणे आवश्यक आहे. नियुक्तीनंतर, त्या व्यक्तीची छायाचित्रासह संपूर्ण माहिती पोलीस यंत्रणेकडे सादर करण्यात यावी.
- शाळांमध्ये सहा वर्षांपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी कंत्राटी पद्धतीने शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची नियुक्ती करताना साधारणतः महिलांना प्राधान्य द्यावे.
students safety laws in maharastra:विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी ठोस उपाययोजना-शाळांमध्ये तक्रार पेटी आणि सुरक्षा उपायांचा अनिवार्य अंमल – (शिक्षण विभागाचा नवा शासन निर्णय)
- राज्यातील सर्व शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने ठोस उपाययोजना राबवण्यासाठी, शासनाने सर्व माध्यमांच्या व व्यवस्थापनांच्या शाळांमध्ये तक्रार पेटी बसवण्याचे आदेश जारी केले आहेत (संदर्भ क्र. १ शासन परिपत्रक). या पेटींच्या देखरेखीसाठी शाळा व्यवस्थापन आणि क्षेत्रीय यंत्रणांवर जबाबदारी निश्चित करण्यात आली आहे. तक्रार पेटीतील तक्रारींवर कार्यवाही करण्यासंबंधी स्पष्ट निर्देश दिले आहेत. तक्रार पेटींचा प्रभावी वापर होत आहे की नाही, याची तपासणी करणेही आवश्यक आहे.
- तक्रार पेटी बसवणे आणि त्यासंबंधीच्या परिपत्रकातील तरतुदींचे काटेकोर पालन करणे प्रत्येक शाळेसाठी बंधनकारक आहे. यासाठी मुख्याध्यापक व्यक्तिशः जबाबदार धरले जातील, आणि नियमांचे उल्लंघन झाल्यास मुख्याध्यापकावर शिस्तभंगाची कार्यवाही देखील होऊ शकते.
सखी सावित्री समितीच्या तरतुदींचे पालन:
- शाळा, केंद्र, तालुका/शहर साधन केंद्र या स्तरांवर सखी सावित्री समिती गठित करण्याचे आदेश संदर्भ क्र. २ येथील शासन परिपत्रकात दिले आहेत. समितीला नेमून दिलेली कार्ये वेळेत पूर्ण करणे गरजेचे आहे. विशेषत: विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या बाबतीत समितीच्या कार्यांचा आढावा घेणे महत्त्वाचे असणार आहे.
शालेय विद्यार्थी सुरक्षा समितीचे गठन:
- शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी, विशेषतः लैंगिक छळासारख्या अनुचित घटनांचा पूर्णपणे बंदोबस्त करणे आवश्यक असणार आहे. अशा घटनांचे परिणाम विद्यार्थी आणि त्यांच्या कुटुंबावर मोठे परिणाम करतात.
- ज्या पद्धतीने POSH Act 2013 अंतर्गत कार्यस्थळी महिलांच्या लैंगिक छळाच्या तक्रारींसाठी समितीचे गठन केले जाते, त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी देखील शाळांच्या स्तरावर सुरक्षा समितीची स्थापना करणे गरजेचे आहे. शिक्षणाधिकाऱ्यांनी एक आठवड्याच्या आत अशा समितीचे गठन करावे, ज्यामुळे विद्यार्थी आपल्या समस्या मोकळेपणाने मांडू शकतील.
घटनांची तातडीने नोंद-
शाळेत विद्यार्थ्यासोबत घडलेल्या कोणत्याही अनुचित प्रकाराची माहिती शाळा व्यवस्थापनाने २४ तासांच्या आत संबंधित शिक्षणाधिकाऱ्यांना देणे बंधनकारक असणार आहे. अशा घटना दडवण्याचा प्रयत्न झाल्यास संबंधित व्यक्ती किंवा संस्था कठोर कारवाईस पात्र ठरतील.
students safety laws in maharastra:विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी ठोस उपाययोजना-शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचा नवा शासन निर्णय –
राज्यातील सर्व शाळांमध्ये विद्यार्थी आणि विद्यार्थिनींच्या सुरक्षेसाठी करण्यात येणाऱ्या उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी (Education Department Issues New G.R.) शासन निर्णय पाहण्यासाठी येथे क्लिक करा.
https://gr.maharashtra.gov.in/Site/Upload/Government%20Resolutions/Marathi/202408211514345821.pdf
हे देखील वाचा :-
योजना प्रत्येक ज्येष्ठ नागरिकाला आपल्या उतरत्या वयात जीवन सुकर व्हाव म्हणून महाराष्ट्र सरकारने आणली आहे मुख्यमंत्री वयोश्री योजना. {Mukhyamantri Vayoshri Yojna}
शेतकऱ्यानच्या फायद्या साठी वाचा. किसान सन्मान निधी योजना | {Kisan Sanman Nidhi Yojna}
आपल्या लाडक्या लेकीच्या उज्वल भविष्यासाठी जाणून घ्या सुकन्या समृद्धी योजना। {Sukanya Samrudhi Yojna}
जर तुम्ही बेरोजगार असाल तर तुम्ही बेरोजगार भत्ता योजनेचा लाभ घेऊ शकता. अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी बेरोजगार भत्ता अर्ज कसा करावा हे वाचा.{Berojgar Bhatta yojna arj ksa karava}
महिलांना व्यवसाय स्थापन करण्यासाठी प्रोत्साहन पर योजना म्हणजेच महिला समृद्धी कर्ज योजना, अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी या योजनेवर क्लिक करा. {Pm pik vima yojna 2024}
आपल्याला आपल्या हक्काचे घर मिळणार रमाई आवास घरकुल योजना अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी या योजनेवर क्लिक करा. {Ramai Awas Gharkul Yojna}
मुलीच्या उज्ज्वल भविष्यासाठी शासन घेऊन आले आहे लेक लाडकी योजना. {LEK LADKI YOJNA}
गर्भवती महिलांना पोषक आहार मिळावा यासाठी सरकार देते रोख रक्कम त्याकरिता वाचा व अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी या योजनेवर क्लिक करा जननी सुरक्षा योजना.
व्यवसाय सुरु करण्यासाठी सरकार देत आहे बिनव्याजी कर्ज वाचा व अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी या योजनेवर क्लिक करा अण्णासाहेब पाटील कर्ज योजना.