Swadhar Yojana 2024 |स्वाधार योजना-शिक्षणासाठी आधार देते स्वाधार योजना|

Swadhar Yojana 2024(स्वाधार योजना)

स्वाधार योजनेची थोडक्यात माहिती (Information of Swadhar yojana)

स्वाधार योजनेलाच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना या नावाने देखील ओळखले जाते.आपण आजही बघतो आपल्या देशातील अनेक विद्यार्थ्यांना आपले शिक्षण अर्धवट सोडावे लागते व कुठेतरी नोकरी करावी लागते घरची आर्थिक परिस्थिती चांगली नसल्यामुळे विद्यार्थ्यांना पुढचे शिक्षण पूर्ण करता येत नाही. म्हणून या सगळ्यावर पर्याय म्हणून आपले महाराष्ट्र शासन घेऊन आली आहे स्वाधार योजना (Swadhar Yojana). या योजनेअंतर्गत अनुसूचित जाती व नवबौद्ध विद्यार्थी यांना वस्तीगृह भत्ता व इतर खर्चासाठी असे 51 हजार रुपये त्यांच्या बँक खात्यात मिळणार आहेत.

या पैशाचा वापर करून विद्यार्थी आपले शिक्षण पूर्ण करू शकतात व आपल्या पायावर उभी राहू शकतात जेणेकरून विद्यार्थी स्वतः सक्षम होतील व विद्यार्थी शिक्षण झाले तर आपले राज्य देखील सक्षम होईल.
योजनेअंतर्गत दहावी पास झाल्यानंतर किंवा बारावी पास झाल्यानंतर जे उच्च शिक्षण घ्यायचे आहे त्यासाठी सरकार भोजनासाठी, राहण्यासाठी व इतर खर्चासाठी जसे की पुस्तक खरेदी यासाठी शासन 51 हजार इतकी रुपये वार्षिक विद्यार्थ्यांना देणार आहे.

आपण आता बघतो की अनुसूचित जाती अनुसूचित जमाती आणि नव बौद्ध लोकांच्या शिक्षण घेण्याची संख्या वाढत आहे तर यावेळी सर्व विद्यार्थ्यांना वस्तीगृहामध्ये प्रवेश दिला जात नाही किंवा त्यांच्या जागा कमी पडतात यासाठी शासनाणे स्वाधार योजनेची सुरुवात 2016 -17 पासून केली. सामाजिक न्याय विभागा अंतर्गत स्वाधार योजनेचे काम केले जाते.

स्वाधार योजनेअंतर्गत ज्या विद्यार्थ्यांना दहावी बारावी किंवा पदवी किंवा पदव्युत्तर शिक्षणामध्ये 60% किंवा त्यापेक्षा जास्तीत जास्त गुण आहे विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे.याद्वारे बाहेर शिकत असणाऱ्या विद्यार्थ्यांना आपला आर्थिक खर्च भागवता येणार आहे .

या योजनेअंतर्गत तीन प्रवर्गामध्ये एकूण वार्षिक रक्कम मिळणार आहे तर आता आपण बघूयात अनुसूचित जाती व नव बौद्ध प्रवर्गातील विद्यार्थ्यांना कशाप्रकारे अनुदान मिळेल.या योजनेअंतर्गत जर कोणी विद्यार्थी खोटी माहिती देत असेल किंवा खोटे कागदपत्र जमा करत असेल किंवा नोकरीला असून देखील या योजनेचा फायदा घेत असेल तर त्यावेळी सरकार कडक भूमिका बजावणार आहे दिलेल्या रकमेच्या 12% टक्के व्याज व रक्कम असे वसूल करण्यात येईल. अर्जदाराने विद्यालयात 75% इतकी उपस्थिती असणे आवश्यक आहे व या उपस्थितीचे प्रमाणपत्र प्राचार्याकडून दर तीन महिन्याला जमा करणे गरजेचे आहे.[Swadhar Yojana 2024(स्वाधार योजना)]

Swadhar Yojana 2024 |स्वाधार योजना-शिक्षणासाठी आधार देते स्वाधार योजना|
Swadhar Yojana 2024 |स्वाधार योजना-शिक्षणासाठी आधार देते स्वाधार योजना|

स्वाधार योजनेची ठळक मुद्दे (Important points of Swadhar yojana )

योजनेचे नावस्वाधार योजना (Swadhar Yojana 2024)
योजना कोणामार्फत राबवली जातेराज्य सरकार
योजना कोणत्या विभागा अंतर्गत राबवली जातेसमाज कल्याण
योजनेचा अर्ज कोण करू शकतातअनुसूचीत जाती आणि नवबौद्ध विद्यार्थी
योजने अंतर्गत किती लाभ होणार६०,०००/-
योजने अंतर्गत लाभ काय होणारविद्यार्थ्यांना आर्थिक लाभ
योजनेचा अर्ज कसा करावाऑफलाईन
स्वाधार योजनेचा जीआर वाचण्यासाठी पुहील लिंक वर क्लिक कराSwadhar Yojana 2024(स्वाधार योजना)

वार्षिक भत्ता शहरानुसार :-

भत्तामुंबई शहर, मुंबई उपनगर ,नवी मुंबई, ठाणे, पुणे ,पिंपरी चिंचवड ,नागपूर अशा ठिकाणी शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना योजने अंतर्गत मंजूर झालेली रक्कमक प्रवर्ग महानगरपालिकेत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना योजने अंतर्गत मंजूर झालेली रक्कमया व्यतिरिक्त शहरांमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना योजने अंतर्गत मंजूर झालेली रक्कम
वार्षिक भोजन भत्ता
32000/- रुपये मात्र
28000/- रुपये मात्र25000/- रुपये मात्र
वार्षिक निवास भत्ता

20000 /-रुपये मात्र

15000 /- रुपये मात्र12000 /- रुपये मात्र
वार्षिक निर्वाह भत्ता8000/- रुपये मात्र8000/- रुपये मात्र
6000/- रुपये मात्र
एकूण भत्ता60000/- रुपये51000/- रुपये
43000/- रुपये

स्वाधार योजनेची उद्दिष्ट ( Purpose of Swadhar yojana)

  1. या योजनेअंतर्गत व बौद्ध अनुसूचित जाती अनुसूचित जमाती या विद्यार्थ्यांना आर्थिक मदत व्हावी हा प्रमुख उद्देश या योजनेचा आहे.
  2. या योजनेद्वारे बाहेरगावी शिकत असणाऱ्या कोणत्याही विद्यार्थ्याला त्याचे शिक्षण पैसे अभावी अर्धवट सोडता येऊ नये यासाठी भत्ता दिला जाणार आहे.या भत्त्याच्या स्वरूपामध्ये भोजनासाठी पैसे राहण्यासाठी पैसे व इतर उदरनिर्वाह करण्यासाठी अशा स्वरूपात पैसे दिले जाणार आहेत.
  3. या योजनेअंतर्गत अनुसूचित जाती आणि नव बौद्ध विद्यार्थी आर्थिक दृश्य सक्षम होतील व आपल्या शिक्षणासाठी कुणावर अवलंबून राहणार नाही जेणेकरून त्यांचा रोजगार संधी उपलब्ध होतील व साक्षरतेचे प्रमाण आपल्या देशात वाढेल.
Swadhar-Yojana
Swadhar-Yojana

स्वाधार योजनेची पात्रता (Eligibility of Swadhar yojana)

  • सादर योजनेसाठी अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांना दहावी बारावी पदवी किंवा पदव्युत्तर शिक्षणासाठी 60% किंवा त्यापेक्षा जास्त गुण असणे असणे आवश्यक आहे.
  • 60% ची अट विकलांग विद्यार्थ्यांसाठी 50% आहे.
  • या योजनेसाठी अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पालकांची उत्पन्न वार्षिक उत्पन्न दोन लाख 50 हजार किंवा त्यापेक्षा कमी असावे तेच विद्यार्थी या योजनेत साठी अर्ज करू शकतात.
  • बाहेरगावी शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनाच या योजनेचा लाभ घेता येणारआहे.
  • गुणवत्ता यादी नुसार या योजनेचा फायदा विद्यार्थ्यांना घेता येणार आहे.
  • बाकीच्या कोणत्याही सरकारी योजनेचा लाभ घेत असणारा विद्यार्थी या योजनेसाठी पात्र राहणार नाही.
  • या योजनेचा अर्जदार विद्यार्थी त्याचे बँक अकाउंट आपल्या आधार कार्ड सोबत लिंक असणे गरजेचे आहे.
  • सामाजिक न्याय विभागाच्या वस्तीगृहात राहणाऱ्या विद्यार्थ्याला या योजनेचा लाभ घेता येणार नाही.
  • अर्जदार महाराष्ट्राचा रहिवासी असणे गरजेचे आहे.
  • अर्जदाराने विद्यालयात 75% इतकी उपस्थिती असणे आवश्यक आहे व या उपस्थितीचे प्रमाणपत्र प्राचार्याकडून दर तीन महिन्याला जमा करणे गरजेचे आहे.

स्वाधार योजनेची कागदपत्रे (Important documents for Swadhar yojana)

  1. आधार कार्ड
  2. रेशन कार्ड
  3. रहिवासी दाखला
  4. मागील वर्षाची उत्तीर्ण प्रमाणपत्र
  5. मोबाईल नंबर
  6. ईमेल आयडी
  7. पासपोर्ट साईज फोटोज
  8. अर्जदार विद्यार्थी शिकत असलेल्या संस्थेत उपस्थित असल्याचे प्रमाणपत्र
  9. बँकेचे पासबुक
  10. कुटुंबाचा उत्पन्नाचा दाखला
  11. जात प्रमाणपत्र
  12. जन्माचा दाखला
  13. अर्जदार शारीरिकदृष्ट्या विकलांगअसेल तर विकलांग प्रमाणपत्र देणे गरजेचे आहे.
  14. भाडे करारनामा
  15. हमी पत्र(हमीपत्र डाऊनलोड करण्यासाठी या लिंक वर क्लिक करा) स्वाधार योजना
  16. शैक्षणिक व्याप असल्यास त्याचे प्रमाणपत्र
  17. शिक्षण घेत असलेल्या वर्गाचे प्रमाणपत्र
  18. अर्जदार ज्या विद्यालयाची कथा आहे त्याचे प्रमाणपत्र
  19. महाविद्यालय याची नोंदणी क्रमांक किंवा विद्यार्थ्याचेे ओळखपत्र
  20. बँकेचा आयएफएससी कोड
  21. विद्यार्थी ज्या वस्तीगृहात राहतात त्या वस्तीगृहातील जिओग्राफिक फोटो
  22. शेवटच्या वर्षाचे ट्रान्सफर सर्टिफिकेट
  23. भोजनालयाची पावती

स्वाधार योजनेसाठी अर्ज कसा करावा (Swadhar Yojana application process)

  • या योजनेसाठी अर्ज करायचा असेल तर खाली लिंक वर क्लिक करा.

स्वाधार योजनेसाठी अर्ज कसा करावा (How to apply for Swadhar yojana)

  • तेथे आपल्याला एक फॉर्म मिळेल तो फॉर्म डाऊनलोड करा डाऊनलोड फॉर्म सोबत आपण वरती दिलेली सर्व कागदपत्रे आपल्याला जोडायची आहेत .
  • त्यानंतर आपल्याला आपल्या भागातील समाज कल्याण जाऊन अर्ज व सर्व कागदपत्रे जमा करायची आहेत.
  • त्यानंतर मेरिट लिस्टनुसार आपल्याला या योजनेचा फायदा घेता येणार आहे [Swadhar Yojana application process].

निष्कर्ष :-

स्वाधार योजनेवर आम्ही तुम्हाला परिपूर्ण माहिती देण्याचा प्रयत्न करत आहे, यामध्ये या योजनेविषयी थोडक्यात माहिती, त्याचे ठळक मुद्दे, योजनेची पात्रता, लाभार्थ्याची निवड कशा प्रकारे केली जाईल, योजनेचे फायदे, योजनेच्या अटी व शर्ती, योजनेसाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे, आणि ऑनलाईन अर्ज कसा करावा , असा हा परिपूर्ण लेख आम्ही तुमच्यासाठी सादर करत आहोत तो तुम्ही शेवटपर्यंत वाचल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद।

FAQ :-

१. स्वाधार योजना अर्ज कुठे करावा [Swadhar Yojana application process]?

उत्तर- स्वाधार योजनेचा अर्ज करण्यासाठी आपल्याला आपल्या भागातील समाज कल्याण ऑफिसमध्येे जाऊन आपला अर्ज सादर करणे गरजेचे आहे[Swadhar Yojana application process].

२. स्वाधार योजनेचा लाभ कोण घेऊ शकते?

उत्तर- स्वाधार योजनेचा लाभ घेण्यासाठी आपल्या महाराष्ट्रातील विद्यार्थी अनुसूचित जात किंवा अनु बौद्ध या प्रवर्गातील पाहिजे तरच स्वाधार योजनेचा लाभ घेऊ शकतात.

३. इतर कुठल्याही वस्तीगृहात राहणारा व्यक्ती स्वाधार योजनेचा लाभ घेऊ शकतो का?

उत्तर- नाही स्वाधार योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदाराला शासकीय वस्तीगृहात राहणे गरजेचे आहे.

४. नोकरी करणारी व्यक्ती स्वाधार योजनेचा लाभ घेऊ शकते का?

उत्तर – नाही नोकरी करणाऱ्या व्यक्तीला या योजनेचा लाभ घेता येणार नाही जो व्यक्ती दहावी बारावी किंवा पदवी व पदव्युत्तर शिक्षण करत आहे त्या व्यक्तीला या स्वाधार योजनेचा लाभ घेता येईल.

हे देखील वाचा :-

मुलीच्या उज्ज्वल भविष्यासाठी शासन घेऊन आले आहे लेक लाडकी योजना. { LEK LADKI YOJNA }


योजना प्रत्येक ज्येष्ठ नागरिकाला आपल्या उतरत्या वयात जीवन सुकर व्हाव म्हणून महाराष्ट्र सरकारने आणली आहे मुख्यमंत्री वयोश्री योजना.{Mukhyamantri Vayoshri Yojna}


शेतकऱ्यानच्या फायद्या साठी वाचा किसान सन्मान निधी योजना |Kisan Sanman Nidhi Yojna


आपल्या लाडक्या लेकीच्या उज्वल भविष्यासाठी जाणून घ्या सुकन्या समृद्धी योजना। Sukanya Samrudhi Yojna।


जर तुम्ही बेरोजगार असाल तर तुम्ही बेरोजगार भत्ता योजनेचा लाभ घेऊ शकता. अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी बेरोजगार भत्ता अर्ज कसा करावा हे वाचा.


महिलांना व्यवसाय स्थापन करण्यासाठी प्रोत्साहन पर योजना म्हणजेच महिला समृद्धी कर्ज योजना, अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी या योजनेवर क्लिक करा.


आपल्याला आपल्या हक्काचे घर मिळणार रमाई आवास घरकुल योजना अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी या योजनेवर क्लिक करा. {Swadhar Yojana application process}