Shetmal taran karj yojana 2024
आपण पाहणार आहोत कृषी तारण कर्ज योजना म्हणजेच शेतमाल तारण कर्ज योजना तर काय आहे मित्रांनो ही योजना आपण सविस्तरपणे बघूया. शेतकऱ्याला आलेल्या आर्थिक गरजे पोटी तसेच स्थानिक पातळीवर शेतमाल साठवणुकीच्या पुरेसं सुविधा नसल्यामुळे शेतीमालाची काढणी हंगामात मोठ्या प्रमाणात होते व विक्रीसाठी येते साहजिकच शेतमालाचे बाजारभाव खाली येतात सादर शेतमाल साठवन करून काही कालावधीनंतर बाजारपेठेत विक्रीसाठी आणल्यास त्या शेतमालास जादा भाव मिळू शकतो तेव्हा शेतकऱ्यांना त्यांच्या शेतमालासाठी योग्य भाव मिळावा या दृष्टिकोनातून कृषी पणन महामंडळ सन 1990 ते 91 पासून शेतमाल तारण कर्ज योजना राबवीत आहे.
या योजनेमध्ये सोयाबीन, सूर्यफूल, चना, भात, करडे, ज्वारी, बाजरी, मका, गहू, घेवडा, काजू बी, बेदाणा, सुपारी, हळद या शेतमालाचा समावेश करण्यात आलेला असून या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना बाजार समितीच्या गोदामात तारणात ठेवलेल्या शेतमालाच्या एकूण किमतीच्या 75 टक्के पर्यंत रक्कम सहा महिने म्हणजेच 180 दिवस कालावधीसाठी सहा टक्के व्याजदराने तारण कर्ज देण्यात येते.
या योजनेअंतर्गत राज्य अथवा केंद्रीय वखार महामंडळाचे गोदाम पावतीवरही शेतकऱ्यांना तारण कर्ज उपलब्ध करून देण्यात येते सदर योजना बाजार समिती मार्फत राबवल्या जात असून सहा महिन्याच्या आत तारण कर्जाची परतफेड करणाऱ्या समित्यांना तीन टक्के व्याज सवलत देण्यात येते.
कृषी तारण कर्ज योजना (एमएसएएमबी) थोडक्यात ही योजना काय आहे हे जाणून घेऊयात.
आपण पाहणार आहोत कृषी तारण कर्ज योजना म्हणजेच शेतमाल तारण कर्ज योजना तर काय आहे मित्रांनो ही योजना आपण सविस्तरपणे बघूया. शेतकऱ्याला आलेल्या आर्थिक गरजे पोटी तसेच स्थानिक पातळीवर शेतमाल साठवणुकीच्या पुरेसं सुविधा नसल्यामुळे शेतीमालाची काढणी हंगामात मोठ्या प्रमाणात होते व विक्रीसाठी येते, साहजिकच शेतमालाचे बाजारभाव खाली येतात सादर शेतमाल साठवन करून काही कालावधीनंतर बाजारपेठेत विक्रीसाठी आणल्यास त्या शेतमालास जादा भाव मिळू शकतो तेव्हा शेतकऱ्यांना त्यांच्या शेतमालासाठी योग्य भाव मिळावा या दृष्टिकोनातून कृषी पणन महामंडळ सन 1990 ते 91 पासून शेतमाल तारण कर्ज योजना राबवीत आहे.
या योजनेत खालील पिकांचा समावेश करण्यात आला आहे ते खाली देत आहोत, सोयाबीन, सूर्यफूल, चना, भात, करडे, ज्वारी, बाजरी, मका, गहू, घेवडा, काजू बी, बेदाणा, सुपारी, हळद या शेतमालाचा समावेश करण्यात आलेला असून या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना बाजार समितीच्या गोदामात तारणात ठेवलेल्या शेतमालाच्या एकूण किमतीच्या 75 टक्के पर्यंत रक्कम सहा महिने म्हणजेच 180 दिवस कालावधीसाठी सहा टक्के व्याजदराने तारण कर्ज देण्यात येते.
या योजनेअंतर्गत राज्य अथवा केंद्रीय वखार महामंडळाचे गोदाम पावतीवरही शेतकऱ्यांना तारण कर्ज उपलब्ध करून देण्यात येते सदर योजना बाजार समिती मार्फत राबवल्या जात असून सहा महिन्याच्या आत तारण कर्जाची परतफेड करणाऱ्या समित्यांना तीन टक्के व्याज सवलत देण्यात येते.
योजनेची रचना आणि अंमलबजावणी
1990 पासून महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ ही तारण कर्ज योजना राबवत आहे. तर या योजनेचा मुख्य उद्देश म्हणजे शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवणे आणि त्यांना बाजारातील दर वाढल्यावर चांगल्या किमतीमध्ये माल विकण्याची संधी उपलब्ध करून देणे.
योजनेअंतर्गत प्रक्रिया कशी आहे माहिती करून घेऊयात.
- प्रथम शेतकरी आपला माल एपीएमसीच्या गोदामात सुरक्षित ठेवतो.
- मालाच्या बाजारातील मूल्याच्या 75% इतकी रक्कम शेतकऱ्याला कर्ज स्वरूपात दिली जाते.
- येथे कर्जाचे व्याजदर 6% आहे, जो सहा महिन्यांच्या कालावधीसाठी लागू होतो.
- शेतकऱ्याला आपला माल विक्री करिता ठेवण्यासाठी कोणतेही साठवणूक शुल्क आकारले जात नाही.
- जर शेतकऱ्याने कर्जाची परतफेड सहा महिन्यांच्या आत केली, तर त्याला 3% प्रोत्साहन म्हणून व्याज सवलत दिली जाते.
महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाने 1990-91 ते 2021-22 दरम्यान या योजनेद्वारे शेतकऱ्यांना 24,831.73 लाख रुपयांचे तारण कर्ज वितरित केले आहे, त्यामुळे तो शेतकऱ्यांना मोठा आर्थिक दिलासा ठरला आहे.
कर्ज मर्यादा आणि व्याजदर
या योजनेत विविध पिकांसाठी कर्ज मर्यादा आणि व्याजदर निश्चित करण्यात आलेले आहेत.
शेतमाल तारण कर्ज योजनेची वैशिष्ट्ये, अटी आणि शर्ती
पात्रता
शेतमाल तारण कर्ज योजनेअंतर्गत फक्त उत्पादक शेतकऱ्यांचा शेतीमाल स्वीकारला जातो, व्यापाऱ्यांचा शेतीमाल या योजनेअंतर्गत स्वीकारल्या जात नाही. प्रत्यक्षात तारण ठेवलेल्या शेतमालाची किंमत ही त्या दिवसाच्या बाजारभाव किंवा शासनाने जाहीर केलेल्या खरेदी किंमत यापैकी जी किंमत असेल त्यावर ठरवली जाते, तारण कर्जाची मुदत सहा महिने म्हणजेच 180 दिवस असून तारण कर्जास सहा टक्के व्याजदर आहे.
मालाची किंमत
शेतमालाचा बाजारभाव किंवा सरकारद्वारे जाहीर हमीभाव, जो कमी असेल, त्यावरून कर्जाची रक्कम ठरते. यामुळे बाजारातील अनियमित किमतींमुळे शेतकऱ्यांचे नुकसान होण्याचे प्रमाण कमी होते.
कर्ज कालावधी आणि व्याजदर
तारण कर्जासाठी सहा महिन्यांचा कालावधी आहे (180 दिवस). या कालावधीत व्याजदर 6% आहे. 180 दिवसांनंतर हा दर 8% होतो आणि 365 दिवसांनंतर 12% होतो.
प्रोत्साहन सवलत
बाजार समित्यांनी जर 180 दिवसांच्या आत कर्जाची परतफेड केली, तर त्यांना 3% व्याज सवलत दिली जाते. ही सवलत शेतकऱ्यांना आणि बाजार समित्यांना प्रोत्साहन देते.
साठवणूक आणि सुरक्षा
बाजार समित्या शेतकऱ्यांच्या मालाची साठवणूक, देखरेख आणि सुरक्षा मोफत करतात. त्याचबरोबर, संबंधित बाजार समिती मालाचा विमा उतरवण्याची जबाबदारी घेतात.
गोदाम पावत्यांवर कर्ज
राज्य गोदाम महामंडळ किंवा केंद्रीय गोदाम महामंडळाच्या पावत्यांवरही शेतकऱ्यांना कर्ज दिले जाते. तारण ठेवलेल्या शेतमालाची साठवणूक देखरेख व सुरक्षा बाजार समिती करते ती पण विनामूल्य असते तारानातील शेतमालाचा विमा उतरवण्याची जबाबदारी संबंधित बाजार समितीकडे राहते, राज्य अथवा केंद्रीय वखार महामंडळाचा गोदाम पावतीवरही बाजार समित्याकडून तारण कर्ज उपलब्ध करून देण्यात येते.
योजनेचे फायदे काय आहेत जाणून घेवूयात.
- शेतकऱ्यांना बाजारातील अनियमित दरांपासून संरक्षण मिळते.
- त्यांना आर्थिक स्थैर्य प्राप्त होते आणि आपल्या मालावर चांगल्या किमती मिळवण्याची संधी मिळते.
- माल सुरक्षित ठेवण्यासाठी कोणतेही शुल्क लागत नाही, त्यामुळे शेतकऱ्यांचा खर्च वाचतो.
- तारण कर्ज योजनेमुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नियोजन सुधारते आणि नुकसान कमी होते.
एमएसएएमबीची कृषी तारण कर्ज योजना शेतकऱ्यांसाठी एक अत्यंत प्रभावी उपाय आहे. या योजनेमुळे शेतकऱ्यांना बाजारातील दरांमधील चढउतारांशी सामना करण्यासाठी आर्थिक पाठबळ मिळते. शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी आणि त्यांच्या उत्पन्नवाढीसाठी ही योजना महत्त्वाची भूमिका बजावते.
शेतकऱ्यांना या योजनेबद्दल अधिक माहिती हवी असलल्यास शासनामार्फत संपर्क क्रमांक आणि वेबसाईट देण्यात आली आहे.
- संपर्क क्रमांक : 8657593808 आणि 8657593809
- https://www.msamb.com/Documents/pledge_finance_formats.pdf या लिंक मार्फत तुम्हाला आम्ही pdf स्वरुपात माहिती पुस्तिका देत आहोत.
निष्कर्ष :- Shetmal taran karj yojana 2024
Shetmal taran karj yojana 2024 | शेतमाल तारण कर्ज योजना : महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ. (एमएसएएमबी), या योजनेमध्ये आम्ही तुम्हाला परिपूर्ण माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे, यामध्ये या योजनेविषयी थोडक्यात माहिती, त्याचे ठळक मुद्दे, योजनेची पात्रता, योजनेचे फायदे, योजनेच्या अटी व शर्ती, योजनेसाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे, आणि ऑनलाईन अर्ज कसा करावा , असा हा परिपूर्ण लेख आम्ही तुमच्यासाठी सादर करत आहोत तो तुम्ही शेवटपर्यंत वाचल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद।
FAQ’s :-
१. Shetmal taran karj yojana 2024 काय आहे ?
उत्तर – 1990 पासून महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ ही तारण कर्ज योजना राबवत आहे. तर या योजनेचा मुख्य उद्देश म्हणजे शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवणे आणि त्यांना बाजारातील दर वाढल्यावर चांगल्या किमतीमध्ये माल विकण्याची संधी उपलब्ध करून देणे.
२. Shetmal taran karj yojana 2024 या योजनेमध्ये शेतकर्यांना काय मिळते ?
उत्तर – शेतकऱ्यांना बाजारातील अनियमित दरांपासून संरक्षण मिळते.
३. Shetmal taran karj yojana 2024 कोणासाठी आहे ?
उत्तर – Shetmal taran karj yojana 2024 ही योजना शेतकर्यांसाठी आहे.
पुढील लेख देखील वाचावेत!
Home solar power generation new technology आता घरातच वीजनिर्मिती होणार ! नवीन सोलर सेल तंत्रज्ञान आले, जाणून घ्या तपशील.
SIP Mutual Fund Calculator 2024 केवळ 1000 रुपयांच्या मासिक TOP 10 SIP मध्ये गुंतवा व कमवा 3 कोटी - जाणून घ्या कसे.
शेतकऱ्यानच्या फायद्या साठी वाचा. किसान सन्मान निधी योजना
आपल्या लाडक्या लेकीच्या उज्वल भविष्यासाठी जाणून घ्या सुकन्या समृद्धी योजना
Drone Subsidy Scheme in 2024 केंद्र पुरस्कृत कृषी यांत्रिकीकरण उप अभियान: ड्रोन अनुदान योजना
महिलांना व्यवसाय स्थापन करण्यासाठी प्रोत्साहन पर योजना म्हणजेच महिला समृद्धी कर्ज योजना, अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी या योजनेवर क्लिक करा.
आपल्याला आपल्या हक्काचे घर मिळणार रमाई आवास घरकुल योजना अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी या योजनेवर क्लिक करा.
मुलीच्या उज्ज्वल भविष्यासाठी शासन घेऊन आले आहे लेक लाडकी योजना.
Best Home Insurance Policies in 2024 सर्वोत्तम होम इन्शुरन्स योजना निवडण्याबाबत संपूर्ण मार्गदर्शन
Tractor Anudan Yojana apply Online 2024 ट्रॅक्टर अनुदान योजना 2024 अर्ज प्रक्रिया – सविस्तर मार्गदर्शन