Solar Pump Beneficiary List 2024 सोलर पंप योजनेची लाभार्थी यादी ऑनलाईन पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

Solar Pump Beneficiary List 2024

पंतप्रधान कुसुम योजना ही शेतकऱ्यांसाठी एक मोठी संधी घेऊन आली आहे. या योजनेचा मुख्य उद्देश असा आहे की, शेतकऱ्यांनी त्यांच्या शेतात सौरऊर्जेचा वापर करून सिंचन आणि वीज निर्मिती करावी. सौरऊर्जेच्या वापरामुळे डिझेलवर चालणारे पंप आता सौर ऊर्जेवर चालणार असून, यामुळे पर्यावरणाला हानी न पोहोचवता शेतकऱ्यांना पाणी आणि वीज उपलब्ध होईल.

या योजनेअंतर्गत, केंद्र सरकार शेतकऱ्यांना 60% अनुदान आणि 30% कर्ज उपलब्ध करून देते, ज्यामुळे शेतकऱ्यांना फक्त 10% खर्च करावा लागतो. या प्रकल्पातून निर्माण झालेली अतिरिक्त वीज शेतकरी वीज वितरण कंपनीला विकू शकतो, ज्यामुळे त्यांना दरमहा काही प्रमाणात उत्पन्न मिळवता येईल.

सरकारला या योजनेच्या मदतीने देशातील विजेची टंचाई कमी करून घराघरात वीज पोहोचवायची आहे.

पी एम कुसुम योजना PM Yojana Maharashtra योजनेचा लाभ

  • सोलर पॅनल च्या वापराने डिझेल आणि विजेवर चालणारे पंप यासाठी लागणारा खर्च शेतकऱ्यांचा वाचेल.
  • शेतकऱ्यांनी या योजनेच्या माध्यमातून लाभ घेतल्यास तो प्रत्येक महिन्याला विजेचे उत्पादन घेऊन वर्षाकाठी जवळपास 80 हजारापर्यंत उत्पन्न स्वतः देखील मिळवू शकतो.
  • लाईट नसताना शेताला पाणी देण्यासाठी शेतकऱ्याला पेट्रोल डिझेलचा वापर करून पंप चालवून पाणी द्यावे लागते त्यामुळे प्रदूषणाची हानी होते पण या योजनेचा लाभ घेतल्याने होणारी प्रदूषणाची हानी शेतकरी टाळू शकतो.
  • सोलर पॅनल च्या वापराने शेतकरी आपल्या पिकांना वेळेवर पाणी देऊ शकतो त्यामुळे पिकांचे होणारे नुकसान तो टाळू शकतो.
  • एका वर्षामध्ये एक मेगा वॅट प्लांट जवळपास 11 लाख युनिट वीज निर्माण करतो आणि आपल्या जवळची वीज वितरण कंपनी 30 पैसे प्रती युनिटला याप्रमाणे आपल्याकडून ती विकत घेईल.
  • सुरुवातीला आपल्या देशामध्ये जवळपास 20 लाखांपेक्षा जास्त शेतकऱ्यांना या योजनेअंतर्गत लाभ दिला जाईल.
  • आता योजनेची लाभार्थी यादी ऑनलाइन प्रदर्शित झाली आहे.

सोलर पंप योजनेची लाभार्थी यादी ऑनलाइन पाहण्यासाठी ही खालील पद्धत फॉलो करा.

खाली दिलेल्या वेबसाइटला भेट द्या.

प्रथम, दिलेल्या लिंकवर जा. https://pmkusum.mnre.gov.in/#/beneficiary-list

लाभार्थी यादी विभाग निवडा.

    पेज ओपन झाल्यावर, तुम्हाला Beneficiary List किंवा लाभार्थी यादी दिसेल, त्यावर क्लिक करा.

    तुमचे राज्य आणि जिल्हा यांची निवड करा.

      लाभार्थी यादी बघण्यासाठी, तुम्हाला तुमचं राज्य, जिल्हा, तालुका इत्यादी माहिती भरावी लागेल.

      प्रत्येक पर्याय योग्यप्रकारे टिक करून संपूर्ण माहिती भरा.

      लाभार्थी यादी पाहा.

        सर्व माहिती भरल्यानंतर, Search या बटनावर क्लिक करा.

        यामुळे तुम्हाला तुम्ही निवडलेल्या विभागातील लाभार्थी यादी स्क्रीनवर दिसेल.

        यादी तपासा.

          स्क्रीनवर आलेली यादी तपासा. यामध्ये लाभार्थ्यांचे नाव, अर्ज क्रमांक, आणि इतर आवश्यक माहिती मिळेल.

          डाउनलोड करा.

            तुम्ही ही यादी डाउनलोड करून प्रिंट देखील करू शकता, जर तुम्हाला भविष्यात संदर्भासाठी ठेवायची असेल.

            ही प्रक्रिया फॉलो केल्यास, तुम्हाला सोलर पंप योजनेच्या लाभार्थ्यांची यादी अगदी सहजपणे ऑनलाइन पाहता येईल.

            निष्कर्ष :-

            पी एम कुसुम योजना(pm kusum yojna) या योजनेमध्ये आम्ही तुम्हाला परिपूर्ण माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे, यामध्ये या योजनेविषयी थोडक्यात माहिती, त्याचे ठळक मुद्दे, योजनेची पात्रता, योजनेचे फायदे, योजनेच्या अटी व शर्ती, योजनेसाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे, आणि ऑनलाईन अर्ज कसा करावा , असा हा परिपूर्ण लेख आम्ही तुमच्यासाठी सादर करत आहोत तो तुम्ही शेवटपर्यंत वाचल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद। pm yojana maharashtra

            FAQ’s :-

            १. पी एम कुसुम योजना pm yojana maharashtra काय आहे ?

            उत्तर – पी एम कुसुम योजना ही शेतकर्यांना सोलार ऊर्जेपासून सोलार पंप व त्यापासून वीज निर्मिती व्हावी व शेतकऱ्यांना या पासून फायदा व्हावा तसेच इंधनाची बचत व विजेची बचत व बढत व्हावी हा सरकारचा उद्देश .

            २. पी एम कुसुम योजना pm yojana maharashtra या योजनेमध्ये शेतकर्यांना किती अनुदान मिळते ?

            उत्तर – पीएम कुसुम योजनेच्या अंतर्गत केंद्र सरकारकडून 60 % अनुदान आणि 30 % कर्ज दिले जाते.

            ३. पी एम कुसुम योजना pm yojana maharashtra कोणासाठी आहे ?

            उत्तर – पी एम कुसुम योजना ही ज्या शेतकर्यांनी आत्तापर्यंत कोणत्याही सोलर संबंधित योजनेचा लाभ घेतलेला नाही असे सर्व शेतकरी या योजनेसाठी पात्र ठरतील.


            पुढील लेख देखील वाचावेत!

            Home solar power generation new technology आता घरातच वीजनिर्मिती होणार ! नवीन सोलर सेल तंत्रज्ञान आले, जाणून घ्या तपशील.

            SIP Mutual Fund Calculator 2024  केवळ 1000 रुपयांच्या मासिक TOP 10 SIP मध्ये गुंतवा व कमवा 3 कोटी - जाणून घ्या कसे.

            शेतकऱ्यानच्या फायद्या साठी वाचा. किसान सन्मान निधी योजना

            आपल्या लाडक्या लेकीच्या उज्वल भविष्यासाठी जाणून घ्या सुकन्या समृद्धी योजना

            Drone Subsidy Scheme in 2024 केंद्र पुरस्कृत कृषी यांत्रिकीकरण उप अभियान: ड्रोन अनुदान योजना

            महिलांना व्यवसाय स्थापन करण्यासाठी प्रोत्साहन पर योजना म्हणजेच महिला समृद्धी कर्ज योजना, अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी या योजनेवर क्लिक करा. 

            आपल्याला आपल्या हक्काचे घर मिळणार रमाई आवास घरकुल योजना अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी या योजनेवर क्लिक करा.

            मुलीच्या उज्ज्वल भविष्यासाठी शासन घेऊन आले आहे लेक लाडकी योजना. 

            Best Home Insurance Policies in 2024 सर्वोत्तम होम इन्शुरन्स योजना निवडण्याबाबत संपूर्ण मार्गदर्शन

            Tractor Anudan Yojana apply Online 2024 ट्रॅक्टर अनुदान योजना 2024 अर्ज प्रक्रिया – सविस्तर मार्गदर्शन