मागेल त्याला शेततळे योजना |how to apply for Magel Tyala Shettale Yojna
| करेल जो शेततळ्याची निवड, चांगले आयुष्य करेल त्याची निवड |
शेतजमिनीच्या उतारावरील असलेल्या बाजूस पावसाचे वाहून जाणारे पाणी अडचणीच्या वेळी पिकास उपलब्ध होईल अशा दृष्टीने खोदलेल्या तळयास शेततळे असे म्हणतात. हे तळे खास करून वाहते पाणी जिथे नैसर्गिकरित्या वाहत जाऊन जमा होईल अशा पडीक क्षेत्रात घेतले जाते.

मागेल त्याला शेततळे योजना थोडक्यात|how to apply for Magel Tyala Shettale Yojna)
मागेल त्याला शेततळे योजना आपले सरकार शेतकऱ्यांच्या बाबतीत फार संवेदनशील आहे कारण आपला बहुतांश समाज हा शेती करतो व आपली प्राथमिक इकॉनोमी ही शेतीवर अवलंबून आहे, शेती व शेतकरी टिकावा तरच जग टिकेल असे म्हणतात. जागतिक हवामान बदलामुळे आज होत असलेले परिणाम हे फार भयावह असे आहेत. हवामान बदलामुळे शेती च्या उत्पादनात घट होत आहे.
हवामान बदलामुळे पिण्याच्या पाण्याची प्रश्न निर्माण होत आहेत जंगलामधील पशुपक्षी हे राहत्या वस्त्यांमध्ये पाण्यासाठी येत आहेत आणि त्यातून अनेक अनुचित घटना घडत आहेत. अवेळी पडणारा पाऊस, गारपीट यामुळे उभ्या पिकांचे नुकसान आपण पाहत आहोत. जनावरांचा चाऱ्याचा प्रश्न निर्माण होत आहे. त्यामुळे आपले सरकार नेहमीच शेतकऱ्यांसाठी वेगवेगळ्या प्रकारच्या कल्याणकारी योजना घेऊन येत असते.त्याच प्रकारची एक कल्याणकारी योजना जिचे नाव आहे मागील त्याला शेततळे योजना 2024 महाराष्ट्र सरकार घेऊन आले आहे.
मागेल त्याला शेततळे योजना शेतकऱ्यांसाठी एक मैलाचा दगड ठरेल अशी योजना आहे कारण उन्हाळ्यामध्ये येणारी पाण्याची अडचण ही त्या ने दूर होणार आहे व त्यांचा पिकांच्या साठीचा पाण्याचा स्रोत अखंड राहील. ही महाराष्ट्र सरकारच्या नियोजन विभागाद्वारे सुरू करण्यात आलेली महत्त्वाची योजना आहे. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना त्यांच्या शेतात शेततळे बांधण्यासाठी आर्थिक मदत दिली जाईल. गेल्या काही वर्षांमध्ये पावसाचे प्रमाण फार अत्यल्प तसेच अनिश्चित झाले आहे.
याचा परिणाम जास्त करून कोरडवाहू क्षेत्रातील पूर्णतः पावसावर अवलंबून असलेल्या शेती पिकांवर आणि त्यांच्या उत्पादनांवर होत असताना दिसून येत आहे. शेतकऱ्यांचे होणारे नुकसान टाळण्यासाठी आणि शेती उत्पादनांमध्ये शाश्वती आणण्यासाठी शेततळे उपयुक्त असल्याने शेतकऱ्यांची मागणी सरकार पूर्ण करत आहे.
यामुळे आपण दुष्काळावर मात करू शकतो. सरकारच्या पाणलोट व जलसंवर्धनाच्या योजनांच्या माध्यमातून शेततळ्यांमार्फत जलसिंचनाच्या सोयी वाढवणे हे सरकारचे उद्दिष्ट आहे.
जलसिंचनाची शाश्वत आणि सुरक्षित सुविधा निर्माण करण्यासाठी हिवाळी अधिवेशनात आपल्या मुख्यमंत्र्यांनी मागेल त्याला शेततळे योजना जाहीर केली. यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ होऊन शेतकऱ्यांचे जीवनमान सुधारण्यास मदत होईल. मागेल त्याला शेततळे योजना ही शेतकऱ्यांच्या जीवनातील संजीवनी ठरत आहे.
Table of Contents
मागेल त्याला क्षेत्र योजना ठळक मुद्दे
योजनेचे नाव | मागेल त्याला शेततळे योजना |
योजना सरकारच्या कोणत्या विभागाने आणली | महाराष्ट्र शासनाच्या नियोजन विभागाद्वारे सुरू करण्यात आलेली ही महत्त्वाची योजना आहे. |
योजना कोणत्या सरकारने आणली | महाराष्ट्र सरकार |
योजनेचे उद्दिष्ट | सरकारच्या पाणलोट व जलसंवर्धनाच्या योजनांच्या माध्यमातून शेततळ्यांमार्फत जलसिंचनाच्या सोयी वाढवणे हे सरकारचे उद्दिष्ट आहे. |
मागेल त्याला शेततळे योजना याचं अधिकृत संकेतस्थळ | https://aaplesarkar.mahaonline.gov.in/ |
लाभार्थ्याच्या सातबारा उताऱ्यावर शेततळ्याची नोंद करणे . | बंधनकारक राहील. |
ऑनलाईन अर्ज कुठे करावा यासाठीची लिंक | http://egs.mahaonline.gov.in/ |
मागेल त्याला शेततळे योजना पात्रता| eligibility criteria for Magel Tyala Shettale Yojna
- मागेल त्याला शेततळे योजना यासाठीची पात्रता खाली देत आहोत, ती काळजीपूर्वक अभ्यासावी
- मागेल त्याला शेततळे योजनासाठीची प्रथम अट म्हणजे अर्जदार शेतकऱ्याकडे त्याच्या नावावर कमीत कमी 0.60 हेक्टर जमीन असावी.
- अर्जदार शेतकऱ्यांनी यापूर्वी असा कोणताही लाभ घेतलेला नसावा म्हणजे शेततळे सामुदायिक शेततळे अशा प्रकारचे योजना मध्ये तो सहभागी झालेला नसावा, हेच अर्जदार या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र असतील.
- अर्जदार शेतकऱ्यांची जमीन शेततळ्याकरिता तांत्रिकदृष्ट्या सुद्धा पात्र असणे आवश्यक राहील. (शेतजमिनीच्या उतारावरील असलेल्या बाजूस पावसाचे वाहून जाणारे पाणी अडचणीच्या वेळी पिकास उपलब्ध होईल अशा दृष्टीने खोदलेल्या तळयास शेततळे असे म्हणतात. हे तळे खास करून वाहत पाणी जिथे नैसर्गिकरित्या वाहत जाऊन जमा होईल अशा पडीक क्षेत्रात घेतले जाते.) eligibility criteria for Magel Tyala Shettale Yojna
मागेल त्याला शेततळे योजना लाभार्थ्यांची निवड कशाप्रकारे करतात :-
- शेततळ्यांच्या लाभार्थ्यांची निवड करण्यासाठी अर्जदाराला शेती असावी हे प्रथम अट आहे.
- अर्जदार शेतकरी जर दारिद्र्यरेषेखालील असल्यास त्याला प्रथम प्राधान्य देण्यात येते.
- अर्जदार शेतकरी जर आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील असेल तर अशा कुटुंबातील सदस्यांना सर्वात आधी प्राधान्य दिले जाते.
- आणि इतर सर्वच प्रवर्गातील शेततळे मागणाऱ्या शेतकऱ्यांची यादी करून प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य याप्रमाणे त्यांची निवड करण्यात येते.
मागेल त्याला शेततळे योजना फायदे| Magel Tyala Shettale Yojna benefits
- मागेल त्याला शेततळे योजना यामधील फायदे आम्ही खाली देत आहोत.
- सर्वात महत्त्वाचा फायदा म्हणजे अनुदान अनुदानाची जास्तीत जास्त रक्कम ही 50 हजार रुपये इतकी राहील. जर लाभार्थ्याला त्यापेक्षाही जास्त खर्च आल्यास 50 हजाराच्या उर्वरित रक्कम संबंधित लाभार्थ्याला स्वतः भरावी लागेल.
- या योजनेमुळे लाभार्थ्याच्या पाणलोट क्षेत्रातील भूगर्भातील पाण्याच्या पातळीत वाढ होणार आहे.
- पुरेशा सिंचनामुळे पिकांच्या उत्पादनात होईल.
- शेततळ्यांचा मत्स्यसंवर्धनासाठी उपयोग करता येईल.
- मे महिन्याच्या कडक उन्हाळ्यात पिकांना तसेच जनावरांना पाणी पिण्यासाठी पाणी उपलब्ध होईल.
Magel Tyala Shettale Yojna benefits

मागेल त्याला शेततळे योजना अटी व शर्ती |
- कृषी विभागाच्या कृषी सहाय्यकांनी शेततळ्यासाठी निश्चित केलेल्या जागेवरच शेततळे बांधणे शेतकऱ्याला बंधनकारक राहील.
- शेततळे बांधण्याचा आदेश मिळाल्यापासून शेततळ्याचे काम पुढील तीन महिन्यात पूर्ण करणे बंधनकारक असणार आहे.
- शेततळे बांधण्यासाठी कोणतीही आगाऊ रक्कम दिली जाणार नाही.
- लाभार्थ्याने स्वतःचा बँक खाते क्रमांक ( राष्ट्रीयकृत बँक किंवा अन्य बँक ) बँक पासबुक च्या छायांकित प्रति सह संबंधित कृषी सहाय्यकाकडे सादर करणे गरजेचे आहे.
- शेततळ्याची निगा राखणे तसेच वेळे प्रसंगी त्याची दुरुस्ती करण्याची संपूर्णतः जबाबदारी ही लाभार्थ्यांची राहील.
- पावसाच्या दिवसांमध्ये शेततळ्यामध्ये गाळ वाहून येणार नाही आणि साचणार नाही यासाठी लाभार्थ्याने तशी व्यवस्था करावी.
- लाभार्थ्याच्या सातबारा उताऱ्यावर शेततळ्याची नोंद शेतकऱ्याला घ्यावी लागेल आणि ती त्याला बंधनकारक राहील.
- शेततळे पूर्ण झाल्यानंतर शेततळे योजनेचा बोर्ड लाभार्थ्याला स्वखर्चाने लावणे बंधनकारक राहील.
- शेताच्या बांधांवरती तसेच शेततळ्याच्या पाण्याच्या प्रवाहाच्या मार्गांमध्ये वनस्पतींची लागवड लाभार्थ्याला करावी लागेल.
- नैसर्गिक आपत्तीमुळे जर शेततळ्याला कोणत्याही प्रकारची हानी झाल्यास लाभार्थ्याला नुकसान भरपाई मिळणार नाही याची त्याने नोंद घ्यावी.
- लाभार्थ्याला ज्या आकारमानाचे शेततळे मंजूर झाले आहे त्याच आकारमानाचे शेततळे खोदणे लाभार्थ्यास बंधनकारक असेल.
- इनलेट व आउटलेट विरहित शेततळे घेणाऱ्या लाभार्थ्यांकडे शेततळ्यामधील पाण्याचा उपसा तसेच पाणी त्यात टाकता येणे या साठीच्या सुविधा असणे गरजेचे आहे व अशा प्रकारचा लाभ घेणाऱ्या शेतकऱ्यांनी प्लास्टिक अस्तरीकरण स्वखर्चाने करावे.
मागेल त्याला शेततळे योजनेच्या साठी लागणारी आवश्यक कागदपत्रे
- जमिनीचा सातबारा उतारा
- दारिद्र्य रेषेखालील कार्ड
- आत्महत्याग्रस्त कुटुंब वारसाचा दाखला
- ८-अ प्रमाणपत्र
मागेल त्याला शेततळे योजना ऑनलाइन अर्ज कसा करावा :-
अर्ज करण्यासाठी महा-ई-सेवा केंद्र किंवा तालुकास्तरावरील तालुका कृषी अधिकारी यांना भेटावे तिथे तुम्हाला अर्ज कुठे करावा कसा करावा याबाबत सांगितलं जाईल.
आम्ही तुम्हाला ऑनलाईन अर्ज कुठे करावा यासाठी खाली लिंक देत आहोत तेथे क्लिक करावे.
http://egs.mahaonline.gov.in
आपले सरकार या प्रोफाईल मधून लॉगीन केल्यावर तुम्हाला एक पेज ओपन होईल, तेथे
“अर्ज भरण्यासाठी इथे क्लिक करा” असे लिहिलेल्या ठिकाणी क्लिक कराव लागेल.
निष्कर्ष :-
मागेल त्याला शेततळे योजनेवर आम्ही तुम्हाला परिपूर्ण माहिती देण्याचा प्रयत्न करत आहे, यामध्ये या योजनेविषयी थोडक्यात माहिती, त्याचे ठळक मुद्दे, योजनेची पात्रता, लाभार्थ्याची निवड कशा प्रकारे केली जाईल, योजनेचे फायदे, योजनेच्या अटी व शर्ती, योजनेसाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे, आणि ऑनलाईन अर्ज कसा करावा , असा हा परिपूर्ण लेख आम्ही तुमच्यासाठी सादर करत आहोत तो तुम्ही शेवटपर्यंत वाचल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद।
FAQ‘S :-
१. मागेल त्याला शेततळे योजनेमध्ये मिळणारी रक्कम किती ?
उत्तर- जास्तीत जास्त रक्कम रुपये ५०,००० /- , त्यापेक्षा जास्त रक्कमेचा खरच आल्यास लाभार्थ्याला तो स्वतः करावा लागेल.
२. लाभार्थ्याला त्याच्या सातबारा उताऱ्यावर शेततळ्याची नोंद करणे बंधनकारक राहील का ?
उत्तर- हो, लाभार्थ्याला त्याच्या सातबारा उताऱ्यावर शेततळ्याची नोंद करणे बंधनकारक राहील.
३. मागेल त्याला शेततळे योजना याचे अधिकृत संकेतस्थळ काय आहे ?
उत्तर- https://aaplesarkar.mahaonline.gov.in/
हे देखील वाचा :-
मुलीच्या उज्ज्वल भविष्यासाठी शासन घेऊन आले आहे लेक लाडकी योजना. { LEK LADKI YOJNA }
योजना प्रत्येक ज्येष्ठ नागरिकाला आपल्या उतरत्या वयात जीवन सुकर व्हाव म्हणून महाराष्ट्र सरकारने आणली आहे मुख्यमंत्री वयोश्री योजना.{Mukhyamantri Vayoshri Yojna}
शेतकऱ्यानच्या फायद्या साठी वाचा किसान सन्मान निधी योजना |Kisan Sanman Nidhi Yojna
आपल्या लाडक्या लेकीच्या उज्वल भविष्यासाठी जाणून घ्या सुकन्या समृद्धी योजना। Sukanya Samrudhi Yojna। Bharat Sarkar।Women Empowerment.
जर तुम्ही बेरोजगार असाल तर तुम्ही बेरोजगार भत्ता योजनेचा लाभ घेऊ शकता. अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी बेरोजगार भत्ता अर्ज कसा करावा हे वाचा.
महिलांना व्यवसाय स्थापन करण्यासाठी प्रोत्साहन पर योजना म्हणजेच महिला समृद्धी कर्ज योजना, अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी या योजनेवर क्लिक करा.
आपल्याला आपल्या हक्काचे घर मिळणार रमाई आवास घरकुल योजना अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी या योजनेवर क्लिक करा. how to apply for Magel Tyala Shettale Yojna