Mahajyoti Free Tablet Yojna 2024 (महाज्योती फ्री टॅबलेट योजना २०२४)
आजही आपण आपल्या देशात बघतो ग्रामीण भागातील किंवा शहरी भागातील विद्यार्थ्यांना आर्थिक दृष्ट्या गरिबी असल्यामुळे आपले शिक्षण अर्धवट सोडावे लागते. अशा विद्यार्थ्यांसाठी आपले केंद्र शासन व राज्य शासन नवीन योजना घेऊन येत असते त्यातील एक महत्त्वपूर्ण योजना म्हणजे महाज्योती फ्री टॅबलेट योजना.आज मेडिकल किंवा इंजीनियरिंग च्या पूर्व परीक्षेची तयारीसाठी विद्यार्थी मित्र शहरी भागात जाऊन राहतात तेथे त्यांना प्रचंड खर्च लागतो कोचिंगची देखील खूप मोठ्या प्रमाणात फी आहेत तसेच राहण्याचा खर्च देखील खूप आहे या सर्व गोष्टींचा विचार करून दोन वर्ष आधीच या पूर्व परीक्षेच्या अभ्यासाच्या तयारीसाठी विद्यार्थी मित्रांना टॅबलेट दिला जात आहे.
या योजनेअंतर्गत आर्थिक दृष्ट्या गरीब असणाऱ्या विद्यार्थ्यांना तसेच ओबीसी(OBC),व्हीजेयनटी (VJNT),यसबीसी(SBC) या विद्यार्थ्यांना आपले शासन फ्री टॅबलेट देत आहे. ज्या विद्यार्थ्यांनी आत्ताच दहावीची परीक्षा उत्तीर्ण केली आहे व अकरावीसाठी सायन्स विभागाला प्रवेश घेतला आहे. त्या विद्यार्थ्यांसाठी ही योजना आहे .या योजनेअंतर्गत एमएच-सीईटी(MHCET),आय इ एल(IEL), (NEET) यांच्यासारख्या परीक्षेच्या पूर्व तयारीसाठी या योजनेची सुरुवात झाली आहे. या योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना टॅबलेट तसेच प्रति दिवसाला सहा जीबी इंटरनेट डेटा देखील दिला जाणार आहे. या योजनेअंतर्गत आपल्या राज्यातील ग्रामीण तसेच शहरी भागातील 30 लाखापर्यंत हुशार विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे व आपले भविष्य उज्वल करता येणार आहे.
अतिशय सोप्या पद्धतीने घरबसल्या आपण या योजनेचा लाभ घेऊ शकतो. इंजीनियरिंग तसेच मेडिकलच्या पूर्व परीक्षेच्या तयारीसाठी हा टॅबलेट दिला जात आहे. माझी आपल्या विद्यार्थी मित्रांना विनंती आहे की जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रांनी या योजनेचा लाभ घ्यावा.
Mahajyoti Free Tablet Yojna 2024 |महाज्योती फ्री टॅबलेट योजना २०२४, या योजनेबद्दल आम्ही तुम्हाला परिपूर्ण माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहे, यामध्ये या योजनेविषयी थोडक्यात माहिती, त्याचे ठळक मुद्दे, योजनेची पात्रता, योजनेचे फायदे, योजनेच्या अटी व शर्ती, योजनेसाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे, आणि ऑनलाईन अर्ज कसा करावा , असा हा परिपूर्ण लेख आम्ही तुमच्यासाठी सादर करत आहोत तो तुम्ही शेवटपर्यंत वाचवा हि मनापासून इच्छा व्यक्त करत आहोत. तर चला मग बघुयात योजनेविषयी परिपूर्ण अशी माहिती,
महाज्योती फ्री टॅबलेट योजना २०२४ ची ठळक मुद्दे :- {Impoetant Points of Mahajyoti Free Tablet Yojna 2024 }
योजना २०२४ ची ठळक मुद्दे :- { Yojna Maharastra 2024 } याची ठळक मुद्दे आम्ही तुम्हाला येथे देत आहोत या मुद्द्यांमुळे तुम्हाला या योजनेत काय महत्त्वाचं आहे ते समजणार आहे व तुम्हाला योग्य दिशा या योजनेचा लाभ घेण्यासाठी मिळेल अशी आशा करतो.
योजनेचे नाव | Mahajyoti Free Tablet Yojna 2024 (महाज्योती फ्री टॅबलेट योजना २०२४) |
योजना कोणा व्दारा सुरु झाली {Started By Whom} | राज्य सरकार |
लाभार्थी {Beneficiary} | ११ वी ला विज्ञान विभागाला प्रवेश घेतलेले विद्यार्थी |
योजने मार्फत काय लाभ होणार आहे | फ्री टॅबलेट आणि दिवसाला ६ GB डेटा |
अधिकृत वेबसाईट {Authorized Website} | Mahajyoti Free Tablet Yojna 2024 (महाज्योती फ्री टॅबलेट योजना २०२४) |
अर्ज करण्याची पद्धत {Process of Application} | ऑनलाईन |
योजनेचा हेल्पलाईन नंबर | 7066888845 8956775376 8956775377 8956775378 |
महाज्योती फ्री टॅबलेट योजना २०२४ या योजनेची उद्दिष्टे (Purpose of Mahajyoti Free Tablet Yojna 2024 ):-
- आर्थिक परिस्थिती गरीब असल्यामुळे शिक्षण सोडून घरी बसणाऱ्या विद्यार्थ्यांना अकरावीला प्रवेश केल्या नंतर इंजीनियरिंग किंवा मेडिकल साईटच्या कोचिंग साठी जिल्ह्याच्या ठिकाणी राहावे लागते अशा परिस्थितीत परिस्थितीमुळे सर्व विद्यार्थ्यांना हे शक्य होत नाही म्हणून आपल्या घरबसल्या आपण या कोचिंग चा फायदा घेता येण्यासाठी फ्री टॅबलेट सुविधा आपल्या सरकारने या हुशार विद्यार्थ्यांसाठी आणली आहे.
- या योजनेमुळे आर्थिक दृष्ट्या मागास असणाऱ्या विद्यार्थ्यांना आपल्या शिक्षणापासून वंचित रहावे लागणार नाही.
- या योजनेअंतर्गत विद्यार्थी आपले शिक्षण पूर्ण करून स्वतःच्या पायावर उभे राहू शकतात व आपले राज्य प्रगतीच्या दिशेने वाटचाल करण्यासाठी मदत करू शकतात.
- या योजनेअंतर्गत विद्यार्थी आपले उज्वल भविष्य घडवू शकतात.
- सामाजिक दृष्ट्या व आर्थिक दृष्ट्या विद्यार्थी सक्षम होण्यास मदत होणार आहे
- इंजीनियरिंग किंवा मेडिकलच्या पूर्व तयारीसाठी दोन वर्षाचा अवधी मिळत असल्यामुळे विद्यार्थी उत्कृष्टरित्या या परीक्षेचा अभ्यास करू शकतात.
- कोचिंग साठी कोणत्या विद्यार्थ्यांना जिल्ह्याच्या ठिकाणी राहून कोचिंग साठी किंवा राहण्यासाठी जे पैसे लागतात ते घालवण्याची गरज पडणार नाही कारण सरकार फ्री टॅबलेट सुविधा देत आहे व दिवसाला सहा जीबी डेटा या विद्यार्थ्यांना मोफत दिला जात आहे या योजनेअंतर्गत विद्यार्थींना स्वावलंबी बनवणे हा आपल्या सरकारचा उद्देश आहे.
महाज्योती फ्री टॅबलेट योजना २०२४ या योजनेच्या नोंदणीसाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे ( Documents For Mahajyoti Free Tablet Yojna 2024) :-
योजनेसाठी खालील कागदपत्रे आवश्यक आहेत-
- आधार कार्ड (Aadhar Card)
- रेशन कार्ड (Ration Card)
- रहिवासी दाखला (Residence Proof)
- दहावीचे मार्कशीट (10th marksheet)
- अर्जदाराचे अकरावीला ऍडमिशन घेतल्याचे प्रवेश पत्र (id card)
- नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट
- मोबाईल नंबर (Mobile Number)
- ई-मेल आयडी (Email ID)
- पासपोर्ट साईजचेे दोन फोटो (2 Passport Size Photographs)
- स्वयंघोषित प्रतिज्ञापत्र (Self Declartion Form)
- जातीचा दाखला (Caste Certificate)
महाज्योती फ्री टॅबलेट योजना २०२४ या योजनेची पात्रता (Eligibility for Mahajyoti Free Tablet Yojna 2024 ) :-
- अर्जदार विद्यार्थी या महाराष्ट्राचा रहिवासी असणे आवश्यक आहे.
- या योजनेचा लाभ शहरी तसेच ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना घेता येणार आहे जर इयत्ता दहावी मध्ये शहरी भागात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना 70 टक्के किंवा त्यापेक्षा जास्त गुण असतील तर विद्यार्थी या योजनेचा लाभ घेऊ शकतात व इयत्ता दहावी ग्रामीण भागातील शिकणाऱ्या विद्यार्थ्याला 60% पेक्षा जास्त गुण असतील तर तो या योजनेचा लाभ घेऊ शकतो.
- इयत्ता दहावी पास झाल्यानंतर अकरावीला सायन्स साईटला ऍडमिशन घेणाऱ्या विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे.
- अर्जदार आर्थिक दृष्ट्या मागास असणे आवश्यक आहे.
- अर्जदाराने यापूर्वी शासनाच्या कोणत्याही योजनेद्वारे टॅबलेटचा अर्ज केलेला नसावा.
- अर्जदाराचे आई किंवा वडील कोणत्याही केंद्रशासित अथवा राज्यशासित सरकारी नोकरी नसावेत.
- कोणत्याही कारणाने विद्यार्थ्यांनी आपले शिक्षण अर्धवट सोडल्यास त्याला या योजनेतून मिळालेल्या टॅबलेट परत करणे अनिवार्य आहे.
- या टॅबलेटची वॉरंटी एक वर्षाची असेल त्यानंतर जर आपल्या टॅबलेटला काही झाले तर त्याची सर्वस्वी जबाबदारी ही त्या विद्यार्थ्यांची असेल.
- या योजनेअंतर्गत विद्यार्थ्याला प्रति दिवसाला सहा जीबी इंटरनेट मिळणार आहे परंतु त्यापेक्षा जास्त इंटरनेट हवी असेल तर ते मिळणार नसल्याचे सरकारच्या जीआर मध्ये स्पष्ट केलेले आहे.
महाज्योती फ्री टॅबलेट योजना २०२४ या योजनेची अर्ज प्रक्रिया (How to apply for Mahajyoti Free Tablet Yojna 2024) :-
- खाली दिलेल्या अधिकृत संकेतस्थळावर क्लिक करा.
Mahajyoti Free Tablet Yojna 2024 (महाज्योती फ्री टॅबलेट योजना २०२४)
- आता आपल्या समोर महाज्योती वेबसाईटचे पेज ओपन होईल.
- नोटीस बोर्ड वर क्लिक करायचे आहे.
- MH-CET /JEE / NEET वर क्लिक करायचे आहे आणि ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरायचा आहे.
- अर्ज दिलेली सर्व माहिती आपल्याला व्यवस्थित भरायचे आहे.
- वर दिलेली सर्व कागदपत्रे आपल्याला अपलोड करायची आहेत.[How to apply for Mahajyoti Free Tablet Yojna 2024]
निष्कर्ष :-
मित्रांनो, तुम्हाला आम्ही दिलेली महाज्योती फ्री टॅबलेट योजना २०२४ या योजनेबद्दलची माहिती कशी वाटली याबद्दल तुम्ही आम्हाला लेखाच्या खाली कमेंट करून कळवू शकता तसेच आमच्यासाठी काही सूचना असतील त्याही तुम्ही आम्हाला सुचवू शकता अशाच सरकारी योजना संबंधी अपडेटेड माहिती मिळवण्यासाठी आमच्या योजना गॅरंटी डॉट कॉम (yojnaguarantee.com) या संकेतस्थळाला भेट देत राहा धन्यवाद|
आशा आहे हा लेख सर्वांना आवडला असेल माझी वाचकास विनंती आहे की हा लेख जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा जेणेकरून जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रांना या योजनेचा लाभ घेता येईल.
FAQ(वारंवार विचारले जाणारे प्रश्न):-
१.महाज्योती फ्री टॅबलेट योजना २०२४ काय लाभ मिळणार आहे?
उत्तर-महाज्योती फ्री टॅबलेट योजना २०२४ या योजने मार्फत विद्यार्थी मित्रांना फ्री टॅबलेट व दररोज 6gb डेटा मिळणार आहे.
२.महाज्योती फ्री टॅबलेट योजना २०२४ चा लाभ कुणाला होणार आहे?
उत्तर-महाज्योती फ्री टॅबलेट योजना २०२४ चा लाभ ओबीसी (OBC),व्हीजेयनटी (VJNT),यसबीसी (SBC) च्या गरीब विद्यार्थी मित्रांना होणार आहे.
हे देखील वाचा :-
योजना प्रत्येक ज्येष्ठ नागरिकाला आपल्या उतरत्या वयात जीवन सुकर व्हाव म्हणून महाराष्ट्र सरकारने आणली आहे मुख्यमंत्री वयोश्री योजना. {Mukhyamantri Vayoshri Yojna}
शेतकऱ्यानच्या फायद्या साठी वाचा. किसान सन्मान निधी योजना | {Kisan Sanman Nidhi Yojna}
आपल्या लाडक्या लेकीच्या उज्वल भविष्यासाठी जाणून घ्या सुकन्या समृद्धी योजना। {Sukanya Samrudhi Yojna}
जर तुम्ही बेरोजगार असाल तर तुम्ही बेरोजगार भत्ता योजनेचा लाभ घेऊ शकता. अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी बेरोजगार भत्ता अर्ज कसा करावा हे वाचा.{Berojgar Bhatta yojna arj ksa karava}
महिलांना व्यवसाय स्थापन करण्यासाठी प्रोत्साहन पर योजना म्हणजेच महिला समृद्धी कर्ज योजना, अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी या योजनेवर क्लिक करा. {Pm pik vima yojna 2024}
आपल्याला आपल्या हक्काचे घर मिळणार रमाई आवास घरकुल योजना अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी या योजनेवर क्लिक करा. {Ramai Awas Gharkul Yojna}
मुलीच्या उज्ज्वल भविष्यासाठी शासन घेऊन आले आहे लेक लाडकी योजना. {LEK LADKI YOJNA}
गर्भवती महिलांना पोषक आहार मिळावा यासाठी सरकार देते रोख रक्कम त्याकरिता वाचा व अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी या योजनेवर क्लिक करा जननी सुरक्षा योजना.
व्यवसाय सुरु करण्यासाठी सरकार देत आहे बिनव्याजी कर्ज वाचा व अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी या योजनेवर क्लिक करा अण्णासाहेब पाटील कर्ज योजना.