magel tyala solar pump yojana online registration-मागेल त्याला सौर कृषी पंप योजना; अर्ज करण्यासाठी नवीन वेबपोर्टल सुरु!

magel tyala solar pump yojana-मागेल त्याला सौर कृषी पंप योजना

ज्या शेतकऱ्यांकडे कायमस्वरूपी पाण्याचा स्रोत आहे, परंतु पारंपारिक पद्धतीने शेतीसाठी विजेची सोय त्यांच्याकडे नाही, अशा शेतकऱ्यांसाठी “मागेल त्याला सौर कृषी पंप योजना” (MTSKPY) सुरू केली जात आहे. या योजनेच्याअंतर्गत राज्यभरामध्ये सौर कृषी पंप बसवले जाणार आहेत.

२०१५ पासून सौर ऊर्जेचे महत्त्व लक्षात आल्याने महाराष्ट्र शासनाने विविध सौर कृषी पंप योजना राबवायला सुरुवात केली आहे. याआधी “अटल सौर कृषी पंप योजना” आणि “मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना” यशस्वीपणे राबविण्यात आलेल्या होत्या.
सध्या “प्रधानमंत्री कुसुम योजना – घटक ब” अंतर्गत सौर कृषी पंपांचा वापर सुरू आहे. ६ सप्टेंबर २०२४ पर्यंत महाराष्ट्र मध्ये एकूण २,६३,१५६ सौर कृषी पंप बसवण्यात आलेले आहेत. शेतकऱ्यांनी सौर ऊर्जेच्या या योजनांना दिलेला प्रतिसाद आणि त्यांना झालेला फायदा लक्षात घेऊन सरकारने “मागेल त्याला सौर कृषी पंप योजना” जाहीर केली आहे.

या योजनेत भाग घेण्यासाठी, सामान्य गटातील शेतकऱ्यांना सौर कृषी पंपाच्या किंमतीचा दहा टक्के रक्कम भरावी लागणार आहे, तर अनुसूचित जाती आणि जमातीच्या शेतकऱ्यांना फक्त ५% रक्कम भरावी लागेल.

ज्या शेतकऱ्यांकडे शाश्वत असा जलस्रोत आहे आणि ज्या भागात पूर्वीपासून पारंपारिक कृषीपंपासाठी वीजपुरवठा उपलब्ध नाहीये, अशा सर्व शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळू शकतो. महावितरणकडे पैसे भरलेले आहेत मात्र वीज कनेक्शन प्रलंबित आहेत असे शेतकरी या योजनेचा प्रामुख्याने समाविष्ट होतील.

सौर कृषीपंपाची कार्यक्षमता वाढवण्यासाठी सोलर पॅनलवरती पूर्ण सूर्यकिरणे पडतील याची खात्री करावी, व तसेच कोणतीही सावली किंवा आडोसा त्यावर पडणार नाही, आणि पॅनलवर धूळ, घाण जमा होणार नाही याची काळजी घ्यावी. सोलर पॅनल हा अशा ठिकाणी बसवावा जेथे सूर्यकिरणांच्या दिशेने त्याची जागा बदलण्यासाठी जागा असेल, त्याचबरोबर जमिनीचा भूभाग समपातळीवर असावा. पाण्याच्या स्रोताजवळ पॅनल लावल्यास त्याची स्वच्छता करण्यास सोपे होते, आणि सोलर पंपही पॅनलच्या जवळच असावा, व सिंचनासाठी लागणाऱ्या क्षेत्रातच तो बसवावा.

एकदा सौर कृषीपंप बसवला की तो पुन्हा दुसऱ्या ठिकाणी हलवणे किंवा पुनर्स्थापित करणे योग्य ठरत नाही. शासनाच्या ५ मार्च २०२४ रोजीच्या शुद्धीपत्रकानुसार, लाभार्थी शेतकऱ्यांना त्यांचा सौर कृषीपंप विकण्यास किंवा हस्तांतर करण्यास बंदी घातली गेलेली आहे. जर लाभार्थी शेतकऱ्याने असा सौर पंप विकला किंवा हस्तांतर केला, तर त्यावर महावितरणाकडून त्यांच्याविरुद्ध कायदेशीर कारवाई केली जाईल.[magel tyala solar pump yojana]

magel tyala solar pump yojana-मागेल त्याला सौर कृषी पंप योजना-योजनेची प्रमुख वैशिष्ट्ये:

शेतकऱ्यांसाठी सिंचनाची स्वतंत्र आणि शाश्वत सोय उपलब्ध करणे.

सर्वसामान्य गटातील शेतकऱ्यांसाठी फक्त १०% रक्कम भरून सौर पॅनेल आणि कृषी पंपाचा संपूर्ण संच मिळणार आहे.

अनुसूचित जाती-जमातीतील शेतकऱ्यांना फक्त ५% रक्कम भरून हा संच घेता येणार आहे.

उर्वरित खर्च केंद्र आणि राज्य सरकारकडून अनुदान स्वरूपात दिला जाणार आहे.

जमिनीच्या क्षेत्रानुसार ३ ते ७.५ HP क्षमतेचे पंप उपलब्ध करून दिले जाणार आहेत.

त्याबरोबरच पाच वर्षांची दुरुस्तीची हमी, तसेच इन्शुरन्ससह हे संच उपलब्ध करून दिले जाणार आहेत.

या योजनेमुळे वीज बिलाचा त्रास नाही, लोडशेडिंगची काळजी आता असणार नाही.

दिवसा सिंचनासाठी हक्काचा वीजपुरवठा या मार्फत उपलब्ध होणार आहे.

magel tyala solar pump yojana-मागेल त्याला सौर कृषी पंप योजना-लाभार्थी निवडीचे निकष:

२.५ एकरपर्यंत शेतजमीन असलेल्या शेतकऱ्यांना ३ HP पर्यंतचा सौर कृषीपंप मिळेल. २.५० ते ५ एकरपर्यंत शेतजमीन असणाऱ्यांना ५ HP क्षमतेचा, तर ५ एकरपेक्षा जास्त जमीन असणाऱ्यांना ७.५ HP क्षमतेचा सौर कृषीपंप शासनामार्फत देण्यात येईल. कमी क्षमतेच्या पंपाची मागणी केल्यास ती देखील मान्य होईल.

वैयक्तिक किंवा सामुदायिक शेततळे, विहिर, बोअरवेल असणारे शेतकरी तसेच बारमाही वाहणाऱ्या नदी-नाल्याजवळ शेतजमीन असणारे शेतकरी देखील या योजनेसाठी पात्र ठरणार आहेत.

बोअरवेल, विहिर किंवा नदी यांसारख्या स्थायी जलस्रोताची उपलब्धता महावितरणद्वारे तपासली जाईल. मात्र, जलसंधारण कामांमध्ये पाणी जिरवण्यासाठीच्या पाणीसाठ्यातून पाणी उपसण्यासाठी हे पंप तुम्हाला वापरता येणार नाहीत.

“अटल सौर कृषी पंप योजना-१,” “अटल सौर कृषी पंप योजना-२,” आणि “मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना” शासनाच्या या तिन्ही योजनांमध्ये लाभ न घेतलेले शेतकरी देखील या योजनेत सहभागी होऊ शकतील.

magel tyala solar pump yojana-मागेल त्याला सौर कृषी पंप योजना-आवश्यक कागदपत्रे:

  1. शेतकऱ्यांच्या जमिनीचा 7/12 उतारा.
  2. आधार कार्ड.
  3. अनुसूचित जाती/जमाती लाभार्थींसाठी जातीचे प्रमाणपत्र.
  4. अर्जदार एकटा जमिनीचा मालक नसल्यास इतर मालकांचा ना हरकत दाखला आवश्यक असेल.
  5. पाण्याचा स्त्रोत डार्क झोनमध्ये असेल तर भुजल सर्वेक्षण विभागाचे ना हरकत प्रमाणपत्र अनिवार्य राहील.
  6. अर्जदाराच्या संपर्कासाठी मोबाईल क्रमांक आणि ईमेल.
  7. पाण्याचा स्रोत व त्याच्या खोलीची माहिती अर्जात नमूद करणे आवश्यक.

मागेल त्याला सौर कृषी पंप योजना – ऑनलाईन अर्ज कसा करावा बघुयात :

या योजनेअंतर्गत नवीन सौर कृषी पंप मिळवण्यासाठी महावितरणाने स्वतंत्र वेब पोर्टल उपलब्ध करून दिले आहे. अर्जदाराला खालील वेब पोर्टलवर जाऊन A-1 फॉर्म भरून द्यायचा आहे, सोबत आवश्यक कागदपत्रे अपलोड करायची आहेत.

अधिकृत वेब पोर्टल: अधिक माहितीसाठी अधिकृत पोर्टल येथे पहा.

https://www.mahadiscom.in/solar_MTSKPY/index_mr.php

लाभार्थी अर्जदाराने ऑनलाईन अर्ज सबमिट करतात अर्जदारास त्याच्या मोबाईल नंबर वर लाभार्थी क्रमांक व इतर माहिती एसएमएस द्वारे कळविण्यात येईल तसेच विविध टप्प्यावर अर्जाची सद्य:स्थितीची माहिती देखील अर्जदारास त्याच्या मोबाईल नंबर वर एसएमएस द्वारे कळविण्यात येईल. याव्यतिरिक्त, अर्जदारास वेबपोर्टलवर जावून लाभार्थी क्रमांकच्या आधारे अर्जाची सध्यस्थिती बघता येणार आहे.


एखाद्या अर्जदार शेतक-यास ऑनलाईन अर्ज करण्यास अडचण आल्यास महावितरणच्या तालुका स्तरावरील उपविभागीय कायार्लयाशी संपर्क साधावा. याशिवाय महावितरणच्या मध्यवर्ती ग्राहक सुविधा केंद्राशी संपर्क तुम्ही साधू शकता. यासाठी महावितरणचे टोल फ्री क्रमांक खाली देत आहोत,
१८००-२३३-३४३५ किंवा १८००-२१२-३४३५ .

magel tyala solar pump yojana
magel tyala solar pump yojana

हे देखील वाचा

PM KUSUM YOJNA|पी एम कुसुम योजना|PM Solar Scheme|PM Free Solar Panel Yojna