Atal Pension Yojana 2024|अटल पेन्शन योजना २०२४ |दोघांमिळून मिळेल रुपये १०,००० पेन्शन, मिटेल वृद्धापकाळाच टेन्शन.

Atal Pension Yojana 2024

आता पेन्शन योजनेची सुरुवात माननीय प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वामध्ये एक जून 2015 रोजी सुरू करण्यात आली, त्या माध्यमातून देशातील 18 ते 40 वर्षाच्या आतील युवक या योजनेच्या अंतर्गत गुंतवणुक करू शकतील, त्या सर्व युवकांना 1000 पासून ते 5000 पर्यंत मासिक पेन्शन दिली जाईल. APY Scheme

खूप कमी कालावधीत ही योजना लोकांमध्ये लोकप्रिय झाली कारण प्रत्येकाच्या आयुष्यात म्हातारपण हे अस आहे की ते कुणालाच सुटणार नाहीये, त्यामुळे प्रत्येकाला वाटते की आपली आयुष्याची संध्याकाळी ही सुखात जावी यासाठी ही योजना लाभधारकांना उपयोगी अशी योजना आहे, या योजनेच्या अंतर्गत तुम्हाला कमीत कमी बचत करून तुमच्या तुमच्या उतार वयामध्ये तुम्हाला लागणारा खर्च जसे की औषधाचा खर्च आणि बाकी छोटा मोठा असा खर्च त्यातून भागवता येईल.

जर तुम्ही आयुष्याच्या सुरुवातीला या योजनेमध्ये गुंतवणूक करत असाल तर तुम्हाला या योजनेअंतर्गत चांगला फायदा मिळू शकतो या योजनेत गुंतवणूक करण्यासाठी तुम्हाला बँक किंवा पोस्ट कार्यालयात जाऊन अर्ज करावा लागेल. APY Scheme

आज आपण ॲपद्वारेही या योजनेचा लाभ घेऊ शकता, त्यामुळे तुम्हाला तुम्ही करत असलेल्या गुंतवणुकीची अद्ययावत माहिती मिळते जर तुम्ही तुमचे भविष्य सुरक्षित करण्यासाठी अशा विविध योजनेच्या शोधात असाल तर अटल पेन्शन योजना हा तुमच्यासाठी चांगला पर्याय ठरू शकतो. या योजनेचे महत्त्व लक्षात घेऊन देशातील बहुतेक नागरिक या योजनेमध्ये मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक करत आहेत. देशातील कोणताही नागरिक या योजनेसाठी अर्ज करू शकतो.

अटल पेन्शन योजना ही एक निवृत्ती वेतन देणारी योजना आहे, ही योजना पेन्शन फंड रेग्युलेटरी अँड डेव्हलपमेंट ऑथॉरिटी द्वारे संचालित केली गेली आहे, ही भारत सरकारच्या द्वारे आणली गेलेली योजना आहे त्यामध्ये प्रति महिना ₹ 1000 ते ₹ 5000 पर्यंतच्या पेन्शनची हमी दिली जाते विशेषता: ज्या वंचित व्यक्ती आहेत त्यांना आर्थिक सुरक्षा देण्याचे ध्येय या योजनेचे आहे.

जर तुम्ही सर्व उमेदवार अटल पेन्शन योजनेच्या माध्यमातून फायदा घेऊ इच्छिता तर सर्व उमेदवारांना या योजनेच्या अंतर्गत गुंतवणूक करावी लागेल त्या माध्यमातून तुम्हा सर्वांना प्रत्येक महिन्याला काही रक्कम जमा करावी लागेल, त्यानंतर तुमचे वय वर्ष 60 पूर्ण झाल्यानंतर या योजनेच्या अंतर्गत मानसिक पेन्शन दिली जाईल त्यासाठी तुम्हाला प्रत्येक महिन्याला 210 चा प्रीमियम जमा करावा लागेल. APY Scheme

अटल पेन्शन योजना ही सर्व बँक खातेदारांसाठी खुली आहे.

अटल पेन्शन योजना २०२४
अटल पेन्शन योजना २०२४

Table of Contents

अटल पेन्शन योजनेची ठळक मुद्दे (Atal Pension Yojana 2024) (important points of Atal Pension Yojana)

योजनेचे नावअटल पेन्शन योजना (Atal Pension Yojana)
योजनेची सुरुवात कधी झाली९ मे २०१५
योजनेची सुरुवात कोणी केलीपंतप्रधान नरेंद्र मोदी
योजना कुणाच्या अधिपत्य खाली काम करतेकेंद्र सरकार
योजना कोणत्या विभागाच्या अंतर्गत आहे पेन्शन फंड नियामक आणि विकास प्राधिकरण
योजने अंतर्गत योगदान कालावधी२० वर्ष
योजने अंतर्गत जमा केलेला निधी ची परत फेड कधी सुरु होणार६० वर्ष
योजने अंतर्गत पेन्शन रक्कम किती असणार१०००/- मात्र ते ५०००/- मात्र
योजनेची अधिकृत वेबसाईटअटल पेन्शन योजना २०२४

अटल पेन्शन योजने (Atal Pension Yojana 2024) अंतर्गत अर्जदारांना खाली दिलेल्या तक्त्यानुसार ठराविक रक्कम महिन्याला गुंतवून (आपल्या गुंतवणुकीप्रमाणे) महिन्याला रुपये १०००, २०००, ३०००, ४०००, ५००० /- अशी रक्कम पेन्शन म्हणून मिळवा :- APY Scheme

वय वर्षगुंतवणूक वर्षेरुपये 1000 च्या मासिक पेन्शन साठीरुपये 2000 च्या मासिक पेन्शन साठीरुपये 3000 च्या मासिक पेन्शन साठीरुपये 4000 च्या मासिक पेन्शन साठीरुपये 5000 च्या मासिक पेन्शन साठी
18424284126168210
19414692138183228
204050100150198248
213954108162215269
223859117177234292
233764127192254318
243670139208277346
253276151226301376
263482164246327409
273390178268356446
283297194292388485
2931106212318423529
3030116231347462577
3129126252379504630
3228138276414551689
3327151302453602752
3426165330495659824
3525181362543722902
3624198396594792990
37232184366548701087
38222404807209571196
392126452879210541318
402029158287311641454

अटल पेन्शन योजनेची उद्देश (Atal Pension Yojana 2024) (purpose of Atal Pension Yojana)

  • आपल्या देशातील ज्येष्ठ नागरिकांना उतार वयात कुणावर अवलंबून राहू नये यासाठी ही एक योजना शासन घेऊन आले आहे.
  • आजार किंवा अपघात याद्वारे जर कोणाचे निधन झाले तर त्या कुटुंबाला आर्थिक दृष्ट्या सक्षम करण्यासाठी ही योजनेअंतर्गत भारत सरकारची प्रयत्न करत आहे.
  • असंघटित क्षेत्राला समोर ठेऊन ही योजना सुरू करण्यात आली आहे.
  • या योजनेअंतर्गत तुम्हाला महिन्याला पेन्शन मिळणार आहे जर लाभार्थी पती किंवा पत्नी असेल त्यातील दोघातून एक मृत झालेला असेल तर उर्वरित व्यक्तीला योजनेचा फायदा घेता येणार आहे तसेच दोघेही पती-पत्नी मयत झाली असतील तर नॉमिनी म्हणून ज्या व्यक्तीला ऍड केलेले आहे त्या व्यक्तीला या योजनेचा फायदा घेता येणार आहे. अशा दृष्टीने आपली पूर्ण कुटुंब दृश्य सक्षम करणे हे या योजनेचे उद्दिष्ट आहे.
  • याद्वारे उतार वयातील कोणत्याच व्यक्तीला इतर कुणावर अवलंबून राहण्याची गरज पडणार नाही.
  • उतार वयात लागणारी औषधे किंवा इतर खर्च या योजनेतून मिळणाऱ्या पैश्याद्वारे ज्येष्ठ व्यक्ती भागवू शकतात.
  • पेन्शन योजनेअंतर्गततत लाभार्थीला आर्थिक मदत मिळणार आहे आपणास म्हणू शकतो की प्रथम काळात आर्थिक सुरक्षा कवच सरकार लाभार्थीला देत आहे. National Pension Scheme
  • या योजनेअंतर्गत परवडणारे रकमेत आपल्याला योग्य तो मोबाईल ला मिळणार आहे इच्छित पेन्शन मिळवण्यासाठी स्कीम आहे असा पण म्हणू शकतो
  • या योजनेद्वारे सरकार देखील योगदान करत आहे योगदानासाठी 50% किंवा पाच वर्षाच्या कालावधी प्रतिवर्षी 1000 ची कमी आहे ते बचत लाभार्थी सरकारच्या मदतीने घेऊ शकतो.
  • ही योजना आपल्याला पारदर्शकता देते जेणेकरून आपण आपल्या बँक खात्यामध्ये किंवा पोस्टाच्या कोणत्याही खात्यामध्ये ही रक्कम घेऊ शकतो.
अटल पेन्शन योजना २०२४
अटल पेन्शन योजना २०२४

अटल पेन्शन योजनेची पात्रता (eligibility of Atal Pension Yojana )

  • योजनेचा फायदा घेणारी व्यक्ती भारताची नागरिक असावी.
  • वय वर्ष १८ ते ४० वयोगटातील कुठलीही व्यक्ती या योजनेचा फायदा घेऊ शकते.
  • तुम्ही कधी या योजनेचा फायदा घेता यावर तुमची पेन्सन अवलंबून आहे.
  • आपल्या अधार कार्ड आपल्या बँक खाशी जोडलेले असणे आवशयक आहे.
  • आपल्याला पैसे काढायचे असतील किंवा टाकायचे असतील तरी आपले आधार कार्ड बँक खात्याशी जोडलेले असणे आवश्यक आहे. National Pension Scheme

अटल पेन्शन योजनेची आवश्यक कागदपत्रे (Atal Pension Yojana 2024) (important documents for Atal Pension Yojana )

अटल पेन्शन योजनेसाठी अर्ज करायचा असल्यास खालील कागदपत्रे आवश्यक आहेत.

  • आधार कार्ड
  • पॅन कार्ड
  • अटल पेन्शन योजनेचा भरलेला फॉर्म
  • मोबाईल नंबर
  • ई-मेल आयडी
  • नॉमिनीची सर्व इन्फॉर्मेशन
  • कोणत्याही बँकेचे पासबुक

अटल पेन्शन योजनेसाठी ऑनलाईन अर्ज कसा करावा (How to apply for atal pension yojana)

  • जर तुम्ही अटल पेन्शन योजनेमध्ये अर्ज करू इच्छित आहात तर खाली दिलेल्या पद्धतीने स्टेप बाय स्टेप फॉलो करून अर्ज भरावा ही विनंती. National Pension Scheme
  • सर्वप्रथम तुम्हाला नॅशनल पेन्शन स्कीम च्या अधिकृत संकेतस्थळावर जावे लागेल.
  • त्यानंतर तुम्हाला तिथे आपला पॅन नंबर टाकावा लागेल.
  • त्यानंतर तुम्हाला आपला रजिस्ट्रेशन मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी टाकावा लागेल.
  • या सर्व प्रोसेस नंतर तुम्हाला ओटीपी प्राप्त होईल.
  • त्यानंतर तुम्हाला तो ओटीपी तिथे टाकावा लागेल.
  • त्यानंतर तुम्हाला दोन ऑप्शन दिले जातील ऑनलाइन आणि बँकेत जाऊन तर तुम्हाला ऑनलाईन या ऑप्शनवर क्लिक कराव लागेल.
  • आणि यूपीआय पेमेंटचा ऑप्शन निवडून आपला अकाउंट नंबर आणि आपला यूपीआय नंबर तिथे टाकावा लागेल.
  • त्यानंतर तुम्हाला तिथे आपला यूपीआयचा पिन टाकावा लागेल.
  • आणि तुमचं पेमेंट करावा लागेल. National Pension Scheme
  • या पद्धतीने तुम्हाला रजिस्ट्रेशन करून प्रत्येक महिन्याला रुपये 210 चा प्रीमियम द्यावा लागेल.
  • आणि आता तुम्हाला सगळ्यात शेवटी सबमिट या ऑप्शनवर क्लिक करून ही प्रोसेस पूर्ण करावी लागेल.

अटल पेन्शन योजनेसाठी अर्ज कुठे मिळेल?

अटल पेन्शन योजनेसाठी अर्ज मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

अटल पेन्शन योजनेसाठी अर्ज

निष्कर्ष :-

अटल पेन्शन योजना ह्या योजनेअंतर्गत आपल्या देशातील जेष्ठ नागरिकांना आर्थिक मदत मिळणार आहे. या मदतीचा उपयोग करून ते आपल्या दैनंदिन जीवनामध्ये औषधे वेगवेगळ्या वस्तू या घेऊ शकतात व आपले उरलेले आयुष्य सुखा समाधान आणि जगू शकता. या लेखाद्वारे आपण बघितले की अटळ पेन्शन योजनांमध्ये आपण अर्ज कसा भरू शकतो ,त्यासाठी पात्रता काय आहे ,कागदपत्रे काय काय लागतील किंवा या योजनेची उद्दिष्टे काय आहेत तर अशा करते की हा लेख आपल्याला आवडला असेल हा लेख जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा जेणेकरून ज्यांना या योजनेची गरज आहे ते या योजनेचा लाभ घेऊ शकतात धन्यवाद..! National Pension Scheme

FAQS :-

१.अटल पेन्शन योजना मध्ये बंद करू शकतो का?

उत्तर-अटल पेन्शन योजना आपण बंद करू शकतो परंतु त्यासाठी काही अटी आहेत या अटीद्वारे तुमचाा भरलेल्या पैशांपैकी काही पैसे वजा करून घेतले जातात व बाकीचे पैसे तुम्हाला तुमच्या बँकच्या अकाउंटट मध्ये काढता येऊ शकतात. National Pension Scheme

२.अटल पेन्शन अंतर्गत प्रति महिन्याला 5000 कसे मिळतील?

उत्तर-यासाठी लाभार्थीला 42 वर्षापर्यंत प्रति महिन्याला 210 एवढा हप्ता जमा करावा करावा लागेलरून लाभार्थीला पाच हजाराची पेन्शन दर महा मिळेल.

३.अटल पेन्शन चे खाते बंद कधी होते?

उत्तर-जर दोन वर्षापर्यंत आपली हप्ता थकत असेल त्या परिस्थितीत अटल पेन्शन योजनेचे खाते बंद केले जाते.

हे देखील वाचा :-

मुलीच्या उज्ज्वल भविष्यासाठी शासन घेऊन आले आहे लेक लाडकी योजना. { LEK LADKI YOJNA }


योजना प्रत्येक ज्येष्ठ नागरिकाला आपल्या उतरत्या वयात जीवन सुकर व्हाव म्हणून महाराष्ट्र सरकारने आणली आहे मुख्यमंत्री वयोश्री योजना.{Mukhyamantri Vayoshri Yojna}


शेतकऱ्यानच्या फायद्या साठी वाचा किसान सन्मान निधी योजना |Kisan Sanman Nidhi Yojna


आपल्या लाडक्या लेकीच्या उज्वल भविष्यासाठी जाणून घ्या सुकन्या समृद्धी योजना। Sukanya Samrudhi Yojna। Bharat Sarkar।Women Empowerment.


जर तुम्ही बेरोजगार असाल तर तुम्ही बेरोजगार भत्ता योजनेचा लाभ घेऊ शकता. अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी बेरोजगार भत्ता अर्ज कसा करावा हे वाचा.


महिलांना व्यवसाय स्थापन करण्यासाठी प्रोत्साहन पर योजना म्हणजेच महिला समृद्धी कर्ज योजना, अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी या योजनेवर क्लिक करा.


आपल्याला आपल्या हक्काचे घर मिळणार रमाई आवास घरकुल योजना अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी या योजनेवर क्लिक करा.