Desi Gayi palan yojna 2024 | महाराष्ट्र सरकारच्या देशी गाय पालन पोषण अनुदान योजनेचा उद्देश देशी गायींचे पालन पोषण करून शेतकऱ्यांचे आर्थिक सबलीकरण करणे आणि आपल्या देसी जातीचे संरक्षण व संगोपन करून त्याला चालना देणे हा आहे. या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना अनुदान देऊन देशी गायींच्या दूध उत्पादनाला चालना दिली जात आहे. शेतकऱ्यांना स्वावलंबी बनवून त्यांचे उत्पन्न वाढविण्याचे ध्येय या योजनेच्या योगे शासनाने ठेवले आहे.
योजनेचे उद्दिष्ट
देशी गाय पालन पोषण अनुदान योजनेचे प्रमुख उद्दिष्ट म्हणजे शेतकऱ्यांना आर्थिक मदत प्रदान करून देशी गाय पालनास प्रोत्साहन देणे. यामुळे देशी गायींच्या दूध उत्पादनात वाढ होईल आणि शेतकऱ्यांचे उत्पन्न सुधारेल व आपल्या देशाच्या लोकांचे आरोग्य चांगले होण्यामध्ये हातभार लागेल हा शासनाचा दृष्टीकोन आहे.
पात्रता / निकष
या योजनेकरिता अर्ज करणाऱ्या शेतकऱ्यांना खालील पात्रतेचे निकष पूर्ण करणे गरजेचे आहे,
- अर्जदार महाराष्ट्रामधील रहिवासी असावा.
- शेतकऱ्याजवळ किमान २ देशी गायी असायल्या हव्यात.
- वयोमर्यादा- १८ ते ६५ वर्षे असावी.
- अर्जदाराने यापूर्वी अशा कोणत्याही प्रकारच्या योजनेचा लाभ घेतलेला नसावा.
अनुदानाची रक्कम | Subsidy for dairy farmers
या योजनेअंतर्गत महाराष्ट्र सरकारकडून प्रति गाय वार्षिक ₹3,000 रुपये अनुदान दिले जाते. शेतकरी जास्तीत जास्त १० गायींसाठी या योजनेचा लाभ घेऊ शकतो. म्हणजे, शेतकऱ्याला वार्षिक ₹30,000 रुपये पर्यंत अनुदान मिळू शकते.
अर्जची प्रक्रिया (Process for Applying the Yojna)
देशी गाय पालन पोषण अनुदान योजनेसाठी अर्ज करण्यासाठी शेतकऱ्यांनी खालील पद्धतीनुसार अर्ज करावा,
ऑनलाइन अर्ज
- शेतकरी महाराष्ट्र सरकारच्या अधिकृत अशा महाडीबीटी पोर्टल वर जाऊन अर्ज करू शकतात.
- https://mahadbtmahait.gov.in/ या संकेतस्थळावर “शेतकरी योजना” या विभागात जाऊन “देशी गाय पालन पोषण अनुदान योजना” | Desi Gayi palan yojna 2024 निवडावी.
- आवश्यक माहिती भरल्यानंतर त्यासाठी लागणारी संबंधित कागदपत्रे तेथे अपलोड करावी.
कागदपत्रे
अर्ज करताना खालील कागदपत्रे आवश्यक आहेत
- आधार कार्ड. (ओळखपत्राकरिता)
- ७/१२ उतारा. (शेतजमिनीचा पुरावा)
- बँक खाते तपशील. (अनुदान जमा करण्यासाठी बँक खाते)
- गाय खरेदीचा पुरावा किंवा गायींच्या उपस्थितीचा पुरावा. (जर असेल तर)
- अर्जदाराचा फोटो.
अर्ज सादर करणे
- सर्व माहिती भरल्यानंतर अर्ज पूर्ण करून सबमिट करा.
- तुमचा अर्ज मंजुरीसाठी कृषी विभागाकडे पाठवला जाईल.
वैयक्तिक संपर्क
- जर शेतकरी ऑनलाइन अर्ज करू शकत नसतील तर ते जवळच्या कृषी विभाग कार्यालयामध्ये प्रत्यक्ष जाऊन अर्ज करू शकतात.
- तिथे त्यांना मार्गदर्शन मिळेल आणि अर्ज करण्यासाठी मदद देखील केली जाईल.
अर्ज मंजुरी आणि अनुदान वितरण | Subsidy for dairy farmers
- अर्ज भरला गेल्यानंतर त्याची सत्यता पडताळणी केली जाईल.
- अर्ज मंजूर झाल्यावर शेतकऱ्याच्या नोंदणीकृत बँक खात्यावर अनुदानाची रक्कम वर्ग केली जाईल.
महत्त्वाच्या अटी व शर्ती
- अर्जदाराने मिळालेल्या अनुदानाचा उपयोग फक्त देशी गायांच्या पोषणासाठीच करावा.
- अनुदान घेतलेल्या गायींची काळजी आणि निगा राखणे शेतकऱ्याची जबाबदारी असणार आहे.
- स्थानिक कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांकडून देखील गायांच्या देखरेखीची तपासणी होईल.
योजनेचे फायदे
या योजनेद्वारे शेतकऱ्यांना अनेक फायदे मिळतात. जसे कि,
- गायींचे पोषण योग्य प्रकारे केल्याने दूध उत्पादनात वाढ होते.
- शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढून ते आर्थिकदृष्ट्या परिपूर्ण होतील.
- देशी गायींचे संवर्धन होऊन पर्यावरणीय संतुलन राखले जाते.
- ग्रामीण भागात रोजगाराच्या संधी निर्माण केल्या जातात.
योजनेचे उद्दिष्टपूर्तीचे साधन
ही योजना शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्य पुरवून देशी गायींचे पालन करण्यास प्रोत्साहन देते, त्यामुळे केवळ दूध उत्पादनच नाही तर शेतकऱ्यांच्या जीवनमानातही सुधारणा होते. योजनेच्या माध्यमातून मिळालेल्या अनुदानामुळे शेतकऱ्यांना गायींच्या देखरेखीसाठी आर्थिक मदत मिळते.
निष्कर्ष | Desi Gayi palan yojna 2024.
देशी गाय पालन पोषण अनुदान योजना महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वपूर्ण संधी आहे. या योजनेद्वारे देशी गाय पालनासाठी मिळणारे अनुदान शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या मजबूत करेल आणि ग्रामीण भागात दूध उत्पादन वाढविण्यास मदत करेल. शेतकऱ्यांनी या योजनेचा फायदा घेण्यासाठी आवश्यक प्रक्रिया व अटी काळजीपूर्वक पाळाव्यात.
मित्रांनो, तुम्हाला आम्ही दिलेली Desi Gayi palan yojna 2024 | देशी गाय पालन योजना 2024 – मिळवा ₹30,000 पर्यंत अनुदान याबद्दलची माहिती कशी वाटली याबद्दल तुम्ही आम्हाला लेखाच्या खाली कमेंट करून कळवू शकता तसेच आमच्यासाठी काही सूचना असतील त्याही तुम्ही आम्हाला सुचवू शकता अशाच सरकारी योजना संबंधी अपडेटेड माहिती मिळवण्यासाठी आमच्या योजना गॅरंटी डॉट कॉम (yojnaguarantee.com) या संकेतस्थळाला भेट देत राहा धन्यवाद|
हे देखील वाचा :-
योजना प्रत्येक ज्येष्ठ नागरिकाला आपल्या उतरत्या वयात जीवन सुकर व्हाव म्हणून महाराष्ट्र सरकारने आणली आहे मुख्यमंत्री वयोश्री योजना. | {Mukhyamantri Vayoshri Yojna}
शेतकऱ्यानच्या फायद्या साठी वाचा. सरकार देत आहे 10 लाख पर्यंत कर्ज,60% सबसिडी सोबत,असा अर्ज करा आणि आपला व्यवसाय सुरु करा | {Nabard Dairy Loan 2024}
आपल्या लाडक्या लेकीच्या उज्वल भविष्यासाठी जाणून घ्या सुकन्या समृद्धी योजना। {Sukanya Samrudhi Yojna}
Maharashtra Farmer Scheme 2024 : या शेतकर्यांना मिळणार ट्रॅक्टर घेण्यासाठी 90% अनुदान लाभ घेऊ शकता. अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी Maharashtra Farmer Scheme 2024 हे वाचा.
महिलांना व्यवसाय स्थापन करण्यासाठी प्रोत्साहन पर योजना म्हणजेच महिला समृद्धी कर्ज योजना, अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी या योजनेवर क्लिक करा. | {Pm pik vima yojna 2024}
आपल्याला आपल्या हक्काचे घर मिळणार रमाई आवास घरकुल योजना अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी या योजनेवर क्लिक करा. | {Ramai Awas Gharkul Yojna}
मुलीच्या उज्ज्वल भविष्यासाठी शासन घेऊन आले आहे लेक लाडकी योजना. | {LEK LADKI YOJNA}
गर्भवती महिलांना पोषक आहार मिळावा यासाठी सरकार देते रोख रक्कम त्याकरिता वाचा व अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी या योजनेवर क्लिक करा | जननी सुरक्षा योजना.
व्यवसाय सुरु करण्यासाठी सरकार देत आहे बिनव्याजी कर्ज वाचा व अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी या योजनेवर क्लिक करा | अण्णासाहेब पाटील कर्ज योजना.