Newly Built Vehicles Through Dealers! केंद्र शासनाच्या रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालयाच्या अधिसूचनेनुसार, राष्ट्रीय सूचना केंद्राने (NIC) 4.0 संगणकीय प्रणाली विकसित केलेली आहे. या प्रणालीचा उपयोग करून नव्याने पूर्ण बांधणी झालेल्या (Fully Built) अशा परिवहन संवर्गातील वाहनांची नोंदणी आता अधिकृत वाहन विक्रेत्यांमार्फतच थेट होणार आहे. यामध्ये पर्यटक टॅक्सी, तीन चाकी मालवाहू वाहने, आणि 7,500 किलोग्रॅम पेक्षा कमी सकल भार क्षमता असलेली चारचाकी वाहनांचा यामध्ये समावेश असणार आहे.
या निर्णयामुळे वाहनधारकांना आता परिवहन कार्यालयात जाऊन नोंदणी करण्याची गरजच राहणार नाहीये, ज्यामुळे त्यांचा वेळच वेळ आणि त्रास या दोन्ही गोष्टी वाचणार आहेत. नोंदणीसाठी विक्रेत्यांकडेच सर्व प्रक्रिया पार पाडली जाणार असल्याने, वाहनधारकांना सोयीस्कर सेवा मिळेल. अंदाजे 7 ते 8 लाख वाहनधारकांना या निर्णयाचा थेट लाभ होणार आहे.
यापूर्वी केवळ दुचाकी आणि कार सारख्या वाहनांचीच नोंदणी विक्रेत्यांमार्फत होत होती, परंतु आता या निर्णयानुसार, पूर्णत: नवीन बांधणी असलेल्या सर्व परिवहन वाहनांची नोंदणीसुद्धा विक्रेत्यांकडे होणार आहे. यामुळे प्रक्रिया अधिक गतीशील, पारदर्शक, आणि त्वरित होईल. वाहनधारकांना कागदपत्री कामकाजाचे कष्ट कमी होतील आणि डिजिटायझेशनमुळे सर्व प्रक्रिया हि संगणक प्रणालीवर सहज पार पाडली जाईल.
ऑटोमोबाईल असोसिएशनने या निर्णयाचे स्वागत केले असून, महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे देखील आभार मानले आहेत. परिवहन आयुक्त विवेक भिमनवार यांनी सर्व विक्रेत्यांना 4.0 संगणकीय प्रणालीचा वापर करून नव्याने तयार झालेल्या परिवहन वाहनांची नोंदणी करण्याचे आवाहन केले आहे.

नवीन प्रणालीमुळे वाहन नोंदणी अधिक सोपी आणि सोयीची होणार असून, यामुळे वाहनधारकांना जलद सेवा मिळण्याची अपेक्षा आहे.
महत्वाचे फायदे | Newly Built Vehicles Through Dealers!
वेळ आणि श्रमांची बचत- वाहनधारकांना परिवहन कार्यालयात जाण्याची गरज उरणार नाही.
जलद प्रक्रिया- 4.0 प्रणालीमुळे प्रक्रिया अधिक गतीमान होणार.
डिजिटायझेशन- कागदपत्री कामकाजाची आवश्यकता कमी होईल, त्यामुळे सर्व प्रक्रिया ऑनलाइन पार पाडली जाणार.
विक्रेत्यांचा सहभाग- अधिकृत विक्रेते आता थेट नोंदणी प्रक्रिया हाताळणार आहेत, त्यामुळे ग्राहकांना त्वरित सेवा मिळणार.
Seamless Registration Of Newly Built Vehicles Through Dealers! नवीन बांधणी झालेल्या वाहनांची विक्रेत्यांमार्फत नोंदणी !

येथे खाली लिंक देत आहोत. | Newly Built Vehicles Through Dealers!
https://parivahan.gov.in/parivahan//en/content/license-registration-details
निष्कर्ष | Newly Built Vehicles Through Dealers!
मित्रांनो, तुम्हाला आम्ही दिलेली Newly Built Vehicles Through Dealers! | नवीन बांधणी झालेल्या वाहनांची विक्रेत्यांमार्फत नोंदणी ! याबद्दलची माहिती कशी वाटली याबद्दल तुम्ही आम्हाला लेखाच्या खाली कमेंट करून कळवू शकता तसेच आमच्यासाठी काही सूचना असतील त्याही तुम्ही आम्हाला सुचवू शकता अशाच सरकारी योजना संबंधी अपडेटेड माहिती मिळवण्यासाठी आमच्या योजना गॅरंटी डॉट कॉम (yojnaguarantee.com) या संकेतस्थळाला भेट देत राहा धन्यवाद|
हे देखील वाचा :-
योजना प्रत्येक ज्येष्ठ नागरिकाला आपल्या उतरत्या वयात जीवन सुकर व्हाव म्हणून महाराष्ट्र सरकारने आणली आहे मुख्यमंत्री वयोश्री योजना. | {Mukhyamantri Vayoshri Yojna}
शेतकऱ्यानच्या फायद्या साठी वाचा. किसान सन्मान निधी योजना | {Kisan Sanman Nidhi Yojna}
आपल्या लाडक्या लेकीच्या उज्वल भविष्यासाठी जाणून घ्या सुकन्या समृद्धी योजना। {Sukanya Samrudhi Yojna}
जर तुम्ही बेरोजगार असाल तर तुम्ही बेरोजगार भत्ता योजनेचा लाभ घेऊ शकता. अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी बेरोजगार भत्ता अर्ज कसा करावा हे वाचा. | {Berojgar Bhatta yojna arj ksa karava}
महिलांना व्यवसाय स्थापन करण्यासाठी प्रोत्साहन पर योजना म्हणजेच महिला समृद्धी कर्ज योजना, अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी या योजनेवर क्लिक करा. | {Pm pik vima yojna 2024}
आपल्याला आपल्या हक्काचे घर मिळणार रमाई आवास घरकुल योजना अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी या योजनेवर क्लिक करा. | {Ramai Awas Gharkul Yojna}
मुलीच्या उज्ज्वल भविष्यासाठी शासन घेऊन आले आहे लेक लाडकी योजना. | {LEK LADKI YOJNA}
गर्भवती महिलांना पोषक आहार मिळावा यासाठी सरकार देते रोख रक्कम त्याकरिता वाचा व अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी या योजनेवर क्लिक करा | जननी सुरक्षा योजना.
व्यवसाय सुरु करण्यासाठी सरकार देत आहे बिनव्याजी कर्ज वाचा व अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी या योजनेवर क्लिक करा | अण्णासाहेब पाटील कर्ज योजना. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना