Manodhairya Yojana Maharastra 2024|मनोधैर्य योजना २०२४

Manodhairya Yojana Maharastra 2024 (मनोधैर्य योजना २०२४)

आपला देश जसा विकासाच्या दिशेने आगेकूच करत आहे त्याचप्रमाणे काही कुकृती देखील आपल्या देशामध्ये पाया रोऊन उभ्या आहेत. आजही आपल्याकडे अनेक बलात्काराच्या घटना घडतात तसेच लहान मुलांचे लैंगिक शोषण देखील केले जाते किंवा अनेक तरुणींना ॲसिड हल्ल्याला सामोरे जावे लागते. अशाप्रकारे मानसिक खच्चीकरण झाल्यानंतर पुन्हा उभे राहणे अवघड होऊन जाते परंतु आपले राज्य सरकार अशा लोकांसाठी वेगवेगळे योजना नेहमी घेऊन येते.

या योजनेंद्वारे पीडित आपल्या पायावर उभे राहू शकतात व पुन्हा नव्याने जगण्याची उमेद स्वतःमध्ये निर्माण करू शकतात .आज आपण अशाच एका योजनेबद्दल जाणून घेणार आहोत .योजनेचे नाव आहे मनोधैर्य योजना प्रामुख्याने ही योजना महिला व आपल्या देशातील बालक यांच्यासाठी सरकारने राबवण्याचेे ठरविले आहे. बलात्कार झालेली तरुणी किंवा ॲसिडचा हल्ला झालेली महिला आणि लैंगिक शोषण झालेली बालक यांना आर्थिक मदत करणे हे या योजनेचे प्रमुख उद्दिष्टे आहे.

या योजनेद्वारे महिला व बालक यांना मानसिक त्रासातून बाहेर काढणे. त्यांच्या अन्न ,वस्त्र, निवाराची सोय करून देणे त्यांना वैद्यकीय मदत करणे ,तसेच कायदेशीर काही मदत किंवा मानसिक आधारासाठी समुपदेश उपलब्ध करून देणे हा या योजनेचा हेतू आहे जेणेकरून झालेले मानसिक खच्चीकरणातून ते लवकर बाहेर येतील हा सर्व विचार करून आपल्या शासनाने ही योजना सुरू केली आहे.

या योजनेद्वारे एक लाख रुपये ते दहा लाख रुपये अशी आर्थिक मदत केली जाते. याद्वारे त्यांना शिक्षणासाठी किंवा व्यवसायिक शिक्षणासाठी मदत केली जाते, जेणेकरून अर्जदार स्वतःच्या पायावर लवकरात लवकर उभे राहून झालेल्या हानी तून लवकर बाहेर पडतील. ITPA अंतर्गत सुटका झालेल्या मुलींना या योजनेमध्ये अर्थसहाय्य दिले जाते.मनोधैर्य योजना २०२४ ही सिंगल विंडो हँडलर द्वारे चालविली जाते.मनोधैर्य योजनेसाठी ७ कोटी ८0 लाख रुपयांच्या निधीची तरतूद आपल्या राज्य सरकारने केली आहे.

माझी वाचकांना विनंती आहे की या लेखाद्वारे आम्ही आपणास या योजनेची उद्दिष्टे व अर्ज कसा करावा हे सखोल पद्धतीने सांगितले आहे आपण लेख शेवटपर्यंत वाचावा.

Manodhairya Yojana Maharastra 2024

मनोधैर्य योजना २०२४ ची ठळक मुद्दे :- {Manodhairya Yojana Maharastra 2024 }

मनोधैर्य योजना २०२४ ची ठळक मुद्दे :- {Manodhairya Yojana Maharastra 2024 } याची ठळक मुद्दे आम्ही तुम्हाला येथे देत आहोत या मुद्द्यांमुळे तुम्हाला या योजनेत काय महत्त्वाचं आहे ते समजणार आहे व तुम्हाला योग्य दिशा या योजनेचा लाभ घेण्यासाठी मिळेल अशी आशा करतो.

योजनेचे नावManodhairya Yojana Maharastra 2024 (मनोधैर्य योजना २०२४)
योजना कोणा व्दारा सुरु झाली {Started By Whom}
महाराष्ट्र सरकार {Government of maharashtra}
लाभार्थी {Beneficiary}बलात्कार झालेली तरुणी किंवा ॲसिडचा हल्ला झालेली पीडित महिला आणि लैंगिक शोषण झालेली बालक
योजना कोणत्या विभागा मार्फत राबवली जाते
{Which Department}
महिला व बालविकास विभाग
अधिकृत वेबसाईट {Authorized Website}Manodhairya Yojana Maharastra 2024 (मनोधैर्य योजना २०२४)
अर्ज करण्याची पद्धत {Process of Application}ऑनलाईन / ऑफलाईन
योजनेची सुरुवात कधी झाली२१ ऑक्टोबर २०१३

मनोधैर्य योजना २०२४ या योजनेची उद्दिष्टे(Purpose of Manodhairya Yojana Maharastra 2024 ):-

  • बलात्कार पीडित महिला किंवा ऍसिड लैंगिक शोषण झालेले बालक यांना आर्थिक सहाय्य करून त्यांचे मनोधैर्य वाढवणे हे या योजनेमार्फत सरकारचे प्रमुख उद्दिष्ट आहे.
  • अर्जदारांना त्यांना स्वतःच्या पायावर उभे करण्यासाठी त्यांना शिक्षणासाठी मदत करणे व व्यवसायाचे प्रशिक्षण देणे जेणेकरून ते आर्थिक दृष्ट्या सक्षम होतील व झालेल्या त्रासातून यांना लवकरात लवकर सावरणास मदत करणे हे या योजने उद्दिष्ट आहे.
  • याद्वारे पीडितांचे जीवन चांगल होईल.
  • या योजनेद्वारे पिढीतांना वैद्यकीय मदत करणे ,कायदेशीर मदत करणे ,अन्न ,वस्त्र, निवारा या मूलभूत गरजांसाठी मदत करणे ,व्यावसायिक प्रशिक्षण देणे हा उद्देश सरकारचा आहे.
  • समाजात जागरूकता निर्माण केल्यामुळे लैंगिक शोषणाला आळा बसेल व बलात्कार नामक कुकृती आपल्या समाजातून कमी करणे हा उद्देश या योजनेअंतर्गत सरकार राबवत आहे.

मनोधैर्य योजना २०२४ या योजनेची पात्रता(Eligibility of Manodhairya Yojana Maharastra 2024 ):-

  • मनोधैर्य योजना आपल्या महाराष्ट्र राज्य शासनाने चालवलेली योजना आहे त्यामुळे या योजनेचा अर्जदार हा महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असणे आवश्यक आहे.
  • मनोधैर्य योजनेच्या अर्जदाराकडे स्वतःचे बँक खाते जे आधार कार्डशी लिंक आहे आवश्यक आहे.
  • लैंगिक शोषण शोषण झालेले बालकांच्या पालकाचे बँकेत अकाउंट असणे आवश्यक आहे.

मनोधैर्य योजना २०२४ या योजनेची वैशिष्ट्ये:-

  1. योजनेसाठी पीडितांना केंद्र सरकार 50% व राज्य सरकार 50% अशा पद्धतीने मदत करते.
  2. या योजनेसाठी प्रत्येक जिल्ह्यामध्ये एक वेगळा विभाग तयार करण्यात आला आहे या योजनेचे सर्व काम गुप्त पद्धतीनेे करण्यात येते.
  3. या योजनेद्वारे पीडित महिला किंवा लहान बालकांची नावे कुठे सांगितली जात नाही.
Manodhairya Yojana Maharastra 2024-

मनोधैर्य योजना २०२४ या योजनेची अर्ज प्रक्रिया (How to apply for Manodhairya Yojana Maharastra 2024) :-

१.ऑनलाईन-

  • खाली दिलेल्या अधिकृत वेबसाईटवर क्लिक करावे.
  • आपल्यासमोर एक पेज ओपन होईल.
  • तेथे आपल्याला रजिस्ट्रेशन करायचे आहे आपल्या युजरनेम व पासवर्ड क्रिएट आहे.
  • आपल्या युजरनेम व पासवर्ड टाकून लॉगिन करायचे आहे.
  • आता आपल्याला मनोधैर्य योजना यावर क्लिक करायचे आहे.
  • आता आपल्यासमोर एक अर्ज ओपन होईल त्यात आपल्याला आपली संपूर्ण माहिती भरायची आहे दिलेली सर्व कागदपत्रे जोडायचे आहेत.
  • त्यानंतर आपल्याला सबमिट बटन वर क्लिक करायचे आहे.
  • अशाप्रकारे आपला फॉर्म पूर्ण होईल त्यानंतर आपल्या कागदपत्र व फॉर्म ची तपासणी केली जाईल त्यानंतर आपल्याला या योजनेचा लाभ मिळेल.

२.ऑफलाईन-

या योजनेचा अर्ज आपल्याला ऑफलाइन पद्धतीने देखील भरता येईल.

  • या योजनेचा ऑफलाईन फायदा घेण्यासाठी आपल्याला आपण ज्या क्षेत्रात राहतो तेथील महिला व बालविकास विभागात जाऊन अर्ज घ्यायचा आहे.
  • अर्जात विचारलेली संपूर्ण माहिती आपल्याला व्यवस्थित भरायची आहे कागदपत्रे त्यासोबत जोडायची आहेत.
  • त्यानंतर आपल्याला हा फॉर्म महिला व बालविकास विभागात जमा करायचा आहे.[How to apply for Manodhairya Yojana Maharastra 2024]

निष्कर्ष :-

Manodhairya Yojana Maharastra 2024 (मनोधैर्य योजना २०२४), आम्ही तुम्हाला परिपूर्ण माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे, यामध्ये या योजनेविषयी थोडक्यात माहिती, त्याचे ठळक मुद्दे, योजनेची पात्रता, योजनेचे फायदे, योजनेच्या अटी व शर्ती, योजनेसाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे, आणि ऑनलाईन अर्ज कसा करावा , असा हा परिपूर्ण लेख आम्ही तुमच्यासाठी सादर करत आहोत तो तुम्ही शेवटपर्यंत वाचल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद।

मित्रांनो तुम्हाला आम्ही दिलेल्या मनोधैर्य योजना २०२४ योजनेबद्दल ची माहिती कशी वाटली याबद्दल तुम्ही आम्हाला लेखाच्या खाली कमेंट करून कळवू शकता तसेच आमच्यासाठी काही सूचना असतील त्याही तुम्ही आम्हाला सुचवू शकता अशाच सरकारी योजना संबंधी अपडेटेड माहिती मिळवण्यासाठी आमच्या योजना गॅरंटी डॉट कॉम (yojnaguarantee.com)या संकेतस्थळाला भेट देत राहा धन्यवाद

FAQ-

१.मनोधैर्य योजना कोणासाठी आहे?

उत्तर-मनोधैर्य योजना लैंगिक अत्याचार झालेले लहान मुले ऍसिड हल्ला झालेल्या तरुणी यांच्यासाठी आपले राज्य सरकार आर्थिक मदत म्हणून ही योजना राबवते.

२.मनोधैर्य योजनेचा अर्ज कुठे करावा?

उत्तर-मनोधैर्य योजनेचा अर्ज आपण ऑनलाइन किंवा ऑफलाईन पद्धतीने करू शकतो .ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्यासाठी आपल्याला ऑफिशियल वेबसाईटवर जाऊन अर्ज करायचा आहे व ऑफलाइन अर्ज करायचा असेल तर आपल्या परिसरातील महिला व बालविकास विभागाकडे जाऊन आपल्याला अर्ज घ्यायचा करायचा आहे.

३. मनोधैर्य योजना २०२४ अंतर्गत दिले जाणारे लाभ ?

उत्तर-पिडीताना २ लाख ते १० लाख पर्यंतची मदत या योजने अंतर्गत केली जाते.

४. मनोधैर्य योजना २०२४ चा उद्देश काय आहे?

उत्तर-मनोधैर्य योजनेअंतर्गत ऍसिड यांना झालेल्याया तरुणी बलात्कार झालेल्या महिला व लैंगिक शिक्षण झालेले बालक यांना आर्थिकदृष्ट्या जेणेकरून पीडित लवकरात लवकर आपल्या पायावर उभे राहतील व या धक्क्यातून सावरू शकतील यासाठी सरकार दोन लाख ते दहा लाखापर्यंतयासाठी सरकार दोन लाख ते दहा लाखापर्यंतचे आर्थिक सहाय्य करणे.

हे देखील वाचा :-


योजना प्रत्येक ज्येष्ठ नागरिकाला आपल्या उतरत्या वयात जीवन सुकर व्हाव म्हणून महाराष्ट्र सरकारने आणली आहे मुख्यमंत्री वयोश्री योजना. {Mukhyamantri Vayoshri Yojna}


शेतकऱ्यानच्या फायद्या साठी वाचा. किसान सन्मान निधी योजना | {Kisan Sanman Nidhi Yojna}


आपल्या लाडक्या लेकीच्या उज्वल भविष्यासाठी जाणून घ्या सुकन्या समृद्धी योजना। {Sukanya Samrudhi Yojna}


जर तुम्ही बेरोजगार असाल तर तुम्ही बेरोजगार भत्ता योजनेचा लाभ घेऊ शकता. अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी बेरोजगार भत्ता अर्ज कसा करावा हे वाचा.{Berojgar Bhatta yojna arj ksa karava}


महिलांना व्यवसाय स्थापन करण्यासाठी प्रोत्साहन पर योजना म्हणजेच महिला समृद्धी कर्ज योजना, अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी या योजनेवर क्लिक करा. {Pm pik vima yojna 2024}


आपल्याला आपल्या हक्काचे घर मिळणार रमाई आवास घरकुल योजना अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी या योजनेवर क्लिक करा. {Ramai Awas Gharkul Yojna}


मुलीच्या उज्ज्वल भविष्यासाठी शासन घेऊन आले आहे लेक लाडकी योजना. {LEK LADKI YOJNA}


गर्भवती महिलांना पोषक आहार मिळावा यासाठी सरकार देते रोख रक्कम त्याकरिता वाचा व अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी या योजनेवर क्लिक करा  जननी सुरक्षा योजना. {Pm pik vima yojna 2024}


व्यवसाय सुरु करण्यासाठी सरकार देत आहे बिनव्याजी कर्ज वाचा व अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी या योजनेवर क्लिक करा अण्णासाहेब पाटील कर्ज योजना. {Pm pik vima yojna 2024}