Apang pension yojna 2024|अपंग पेन्शन योजना कागदपत्रे

योजनेचे नाव Apang pension yojna / अपंग पेन्शन योजना कागदपत्रे

अपंग पेन्शन योजना ही अपंगांसाठी सरकारकडून एक पर्वणीच म्हणावी अशी ही योजना आहे.

Apang pension yojna 2024 |अपंग पेन्शन योजना २०२४ , या योजनेबद्दल आम्ही तुम्हाला परिपूर्ण माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहे, यामध्ये या योजनेविषयी थोडक्यात माहिती, त्याचे ठळक मुद्दे, योजनेची पात्रता, योजनेचे फायदे, योजनेच्या अटी व शर्ती, योजनेसाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे, आणि ऑनलाईन अर्ज कसा करावा , असा हा परिपूर्ण लेख आम्ही तुमच्यासाठी सादर करत आहोत तो तुम्ही शेवटपर्यंत वाचवा हि मनापासून इच्छा व्यक्त करत आहोत. तर चला मग बघुयात योजनेविषयी परिपूर्ण अशी माहिती,

आज आपला भारत देश हा महासत्ता होण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे आणि तसेच आपण लोकसंख्येच्या बाबतीतही जगात एक नंबर च्या दिशेने आपली वाटचाल आहे चीनला आपण मागे टाकत आहोत, त्याचप्रमाणे भारतामध्ये अपंगांचे प्रमाणही तसे जास्तच आहे अपंगत्व जाण्यासाठी आपण स्वतंत्र झाल्यापासून आपल्या देशाने खूप प्रयत्न केले की अपंगत्व माणसाला येऊ नये त्यासाठी खूप योजना गव्हर्मेंट घेऊन आले आरोग्य सुविधा भरपूर दिल्या गेल्या पण आपल्या 2011 च्या सेंसेसनुसार आणि 2018 सालच्या नॅशनल सॅम्पल सर्वे ऑफ इंडिया च्या सर्वेनुसार भारतामध्ये शारीरिक अपंगत्वाचे प्रमाण आपल्या लोकसंख्येच्या 2.21% आहे म्हणजे जवळजवळ 2.68 करोड लोकांना शारीरिक अपंगत्व आलेले आहे.

आज आपण बघतो दहा लोकांमध्ये जर एखादा अपंग माणूस असेल तर त्याकडे एक वेगळ्याच नजरेने बघितले जाते एक कमजोर व्यक्तिमत्व, लाचार व्यक्तिमत्व पण जो अपंग आहे त्याला त्याच्या अपंगत्वापेक्षा लोकांनी त्याला समजलेली कमजोर व्यक्ती किंवा लाचार व्यक्ती ही जास्त त्रासदायक आहे शारीरिक अपंगत्व एक वेगळी गोष्ट आहे, शारीरिक अपंगत्व हे कधी कधी जन्मानुसार येतं कधी कधी जन्मानंतर देखील आयुष्यात येतं ते आयुष्यात कधीही येऊ पण त्याच्यावर मात करण्यासाठी झगडावच लागतं खूप गोष्टींना सामोर जावंच लागतं.

आज अपंग व्यक्तींना वाटते की समाजात आपल्याला इतर लोकांप्रमाणेच हक्क मिळाले पाहिजेत, समान संधी मिळायला पाहिजेत, रोजगाराच्या संधी समान मिळायला हव्यात, तसेच त्यांच्या जीवनातील अंधकार दूर व्हावा अशी त्यांची अपेक्षा आहे त्यासाठीच आपले सरकार अशी एक योजना घेऊन आले आहे तिचं नाव आहे अपंग पेन्शन योजना 2024.

अपंग पेन्शन योजना २०२४ ची ठळक मुद्दे :- { Apang pension yojna 2024 }

योजना २०२४ ची ठळक मुद्दे :- { Yojna Maharastra 2024 } याची ठळक मुद्दे आम्ही तुम्हाला येथे देत आहोत या मुद्द्यांमुळे तुम्हाला या योजनेत काय महत्त्वाचं आहे ते समजणार आहे व तुम्हाला योग्य दिशा या योजनेचा लाभ घेण्यासाठी मिळेल अशी आशा करतो.

योजनेचे नावअपंग पेन्शन योजना २०२४ \ Apang pension yojna 2024
योजना कोणा व्दारा सुरु झाली {Started By Whom}
सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, महाराष्ट्र राज्य.
लाभार्थी {Beneficiary}आपल्या राज्यातील अपंग व्यक्ती
योजने मार्फत काय लाभ होणार आहेरूपये 600 महिन्याला
अधिकृत वेबसाईट {Authorized Website}https://sjsa.maharashtra.gov.in/mr/scheme-category/disability-welfare
अर्ज करण्याची पद्धत {Process of Application}ऑनलाईन / ऑफलाईन
येथून मिळवा फॉर्म https://narega.net/wp-content/uploads/2021/02/mahatrastra-Disability-Certificate-Application-Form.pdf
Apang pension yojna 2024
Apang pension yojna 2024

अपंग पेन्शन योजना २०२४ या योजनेची उद्दिष्टे (Aim to Start Apang pension yojna 2024 ) :-

अपंग पेन्शन योजना 2024 या योजनेचे उद्दिष्ट आपण बघुयात,
अपंग पेन्शन योजना 2024 चा मुख्य उद्देश म्हणजे अपंगांना आर्थिक मदत, त्यांना आपल्या दैनंदिन गोष्टी करण्यासाठी अडचणी येतात त्या अडचणींवर मात करण्यासाठी तसेच त्यांच्या जीवनातील हरवलेला आत्मविश्वास पुन्हा मिळवून देणे हा मुख्य उद्देश सरकारचा ही योजना आणण्यामागे आहे.

अपंग पेन्शन योजना २०२४ या योजनेची पात्रता (Eligibility for Apang pension yojna 2024 ) :-

  • अपंग पेन्शन योजना 2024 या योजनेसाठी काय पात्रता असायला हव्यात त्या आपण बघुयात.
  • अर्ज करणारी व्यक्ती ही महाराष्ट्र राज्याची कायमची रहिवासी असावी.
  • अर्जदाराचे वय हे 18 ते 65 वर्ष या दरम्यान असावे.
  • सरकारी नोकरदारांना या योजनेचा लाभ दिला जाणार नाही
  • जो अर्जदार आहे त्याच्या कुटुंबाचे मिळून वार्षिक आर्थिक उत्पन्न हे रुपये पस्तीस हजारांपेक्षा जास्त नसावे.
  • या योजनेचा लाभ घेण्यासाठी अपंग व्यक्तींना 80% एवढे अपंगत्व असणे गरजेचे आहे तरच या योजनेचा लाभ त्यांना घेता येईल.

अपंग पेन्शन योजना २०२४ या योजनेच्या नोंदणीसाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे ( Apang pension yojna 2024 kagadpatre) :-

अपंग पेन्शन योजनेसाठी लागणारी कागदपत्रे आपण बघुयात,

  • आधार कार्ड (Aadhar Card)
  • रेशन कार्ड (Ration Card)
  • रहिवासी दाखला (Residence Proof)
  • मोबाईल नंबर (Mobile Number) अर्जदाराचा मोबाईल नंबर आधार कार्डशी जोडलेला असायला हवा.
  • ई-मेल आयडी (Email ID)
  • पासपोर्ट साईजचेे दोन फोटो (2 Passport Size Photographs)
  • स्वयंघोषित प्रतिज्ञापत्र (Self Declartion Form)
  • जातीचा दाखला (Caste Certificate)
  • 80% अपंगत्व प्रमाणपत्र ( Physical Disability Certificate)

अपंग पेन्शन योजना २०२४ या योजनेचे फायदे (Benefit’s of Apang Pension Yojna 2024 ) :-

पंग पेन्शन योजना 2024 या योजनेचे फायदे आपण बघणार आहोत.

  • आपल्या राज्यातील अपंगांना या योजनेचा लाभ दिला जाईल.
  • या योजनेमुळे त्यांना दैनंदिन जीवन जगण्यासाठी येणाऱ्या आर्थिक अडचणी सोडवता याव्यात यासाठी आर्थिक मदत दिली जाईल.
  • त्यांना त्यांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी इतर कोणावर अवलंबून राहण्याची गरज नाही किंवा कर्ज घेण्याची गरज नाही या योजनेमुळे त्यांचे आर्थिक शोषण रोखले जाईल.
  • या योजनेच्या माध्यमातून अपंग व्यक्तींना प्रत्येक महिन्याला सहाशे रुपये इतकी आर्थिक मदत सरकारकडून दिली जाईल.
  • या योजनेतून ज्या अपंगांना काहीच करणे शक्य नाही म्हणजे एखाद्याचे वय झाले असेल पण तो अपंग आहे अशा वेळेस उदरनिर्वाहासाठी त्यांना मिळणारी रक्कम ही फार महत्त्वाची असेल तसेच त्यामुळे त्यांचे घर चालण्यासाठी हातभार मिळेल.

अपंग पेन्शन योजना २०२४ या योजनेची अर्ज प्रक्रिया (How to apply for Apang pension yojna 2024) :-

Apang pension yojna 2024
Apang pension yojna 2024

अपंग पेन्शन योजना २०२४ या योजनेची ऑफलाइन अर्ज प्रक्रिया खालील प्रमाणे :-

आता आपण या योजनेसाठी ऑफलाईन अर्ज कसा करावा हे बघणार आहोत,


  • ऑफलाइन अर्ज करण्यासाठी तुम्हाला जिल्हाधिकारी कार्यालय किंवा तहसीलदार कार्यालय किंवा तलाठी कार्यालयात जायचे आहे.
  • तिथे गेल्यानंतर तुम्हाला अपंग पेन्शन योजनेचा फॉर्म घ्यायचाय आणि आणखीन एक तुम्हाला जर फॉर्म डाऊनलोड करून संबंधित कार्यालयात घेऊन जायचा असेल तर त्यासाठी आम्ही खाली लिंक देत आहोत. { https://narega.net/wp-content/uploads/2021/02/mahatrastra-Disability-Certificate-Application-Form.pdf }
  • तो फॉर्म तुम्ही कार्यालयात जाऊन भरू शकता किंवा फॉर्म डाऊनलोड करून तुम्ही आपल्या घरी देखील तो भरून कार्यालयात घेऊन जाऊ शकता.
  • फक्त अर्जामध्ये विचारलेली माहिती अचूक भरा कागदपत्रे त्याला अचूक जोडा आणि संबंधित विभागाकडे सुपूर्त करा.
  • अशा रीतीने तुमची अर्जाची पडताळणी केली जाईल आणि शासनाच्या नियमानुसार तुमचे पेन्शन सुरू केले जाईल.

अपंग पेन्शन योजना २०२४ या योजनेची ऑनलाइन अर्ज प्रक्रिया खालील प्रमाणे :-

योजनेसाठी ऑनलाईन अर्ज कसा करावा ते आपण बघुयात,

अपंग पेन्शन योजना २०२४
अपंग पेन्शन योजना २०२४
  • या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची पद्धत आम्ही तुम्हाला खाली देत आहोत कृपया व्यवस्थित अभ्यासा आणि त्याप्रमाणे कृती करा.
  • प्रथम तुम्हाला महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभाग या विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर जाणे.
  • त्या संकेतस्थळावर गेल्यानंतर तुम्हाला अपंग पेन्शन योजनेसाठी नोंदणीचा पर्याय दिसेल त्या बटणावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे.
  • नवीन पेज वरती तुम्हाला अर्ज दिसेल तो अर्ज व्यवस्थित भरावा सांगितलेली माहिती तिथे व्यवस्थित भरावी त्यानंतर आवश्यक असणारी कागदपत्रे तिथे सांगितल्यानुसार तिथे अपलोड करावेत आणि तुमचा फॉर्म सबमिट करा अशा रीतीने आपण ऑनलाइन प्रक्रिया पूर्ण केलेली आहे.

निष्कर्ष :-

मित्रांनो, तुम्हाला आम्ही दिलेली अपंग पेन्शन योजना २०२४ \ Apang pension yojna 2024 या योजनेबद्दलची माहिती कशी वाटली याबद्दल तुम्ही आम्हाला लेखाच्या खाली कमेंट करून कळवू शकता तसेच आमच्यासाठी काही सूचना असतील त्याही तुम्ही आम्हाला सुचवू शकता अशाच सरकारी योजना संबंधी अपडेटेड माहिती मिळवण्यासाठी आमच्या योजना गॅरंटी डॉट कॉम (yojnaguarantee.com) या संकेतस्थळाला भेट देत राहा धन्यवाद|


FAQ :-


१. अपंग पेन्शन योजना २०२४ योजनेचा अर्ज कसा करावा ?

उत्तर- ऑनलाईन तसेच ऑफलाइन या दोन्ही पद्धतीने अर्ज करू शकता.

२. अपंग पेन्शन योजना २०२४ या योजनेचा ऑनलाइन अर्ज करायचा असल्यास अधिकृत संकेतस्थळ कोणते?

उत्तर- https://sjsa.maharashtra.gov.in/mr/scheme-category/disability-welfare

३. अपंग पेन्शन योजना २०२४ कोणत्या राज्यामध्ये लागू आहे?

उत्तर- अपंग पेन्शन योजना २०२४ महाराष्ट्र राज्यामध्ये लागू आहे.

४. अपंग पेन्शन योजना २०२४ चे लाभार्थी कोण आहेत ?

उत्तर- वय 18 ते 65 वर्षांच्या दरम्यान असणारे सर्व अपंग व्यक्ती.

5. अपंग पेन्शन योजना २०२४ अंतर्गत दिले जाणारे लाभ ?

उत्तर- या योजनेच्या माध्यमातून अपंग व्यक्तींना प्रत्येक महिन्याला सहाशे रुपये इतकी आर्थिक मदत सरकारकडून दिली जाईल.

6. अपंग पेन्शन योजना २०२४ चा उद्देश काय आहे ?

उत्तर- मुख्य उद्देश म्हणजे अपंगांना आर्थिक मदत होय.

हे देखील वाचा :-


योजना प्रत्येक ज्येष्ठ नागरिकाला आपल्या उतरत्या वयात जीवन सुकर व्हाव म्हणून महाराष्ट्र सरकारने आणली आहे मुख्यमंत्री वयोश्री योजना. {Mukhyamantri Vayoshri Yojna}


शेतकऱ्यानच्या फायद्या साठी वाचा. किसान सन्मान निधी योजना | {Kisan Sanman Nidhi Yojna}


आपल्या लाडक्या लेकीच्या उज्वल भविष्यासाठी जाणून घ्या सुकन्या समृद्धी योजना। {Sukanya Samrudhi Yojna}


जर तुम्ही बेरोजगार असाल तर तुम्ही बेरोजगार भत्ता योजनेचा लाभ घेऊ शकता. अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी बेरोजगार भत्ता अर्ज कसा करावा हे वाचा.{Berojgar Bhatta yojna arj ksa karava}


महिलांना व्यवसाय स्थापन करण्यासाठी प्रोत्साहन पर योजना म्हणजेच महिला समृद्धी कर्ज योजना, अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी या योजनेवर क्लिक करा. {Pm pik vima yojna 2024}


आपल्याला आपल्या हक्काचे घर मिळणार रमाई आवास घरकुल योजना अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी या योजनेवर क्लिक करा. {Ramai Awas Gharkul Yojna}


मुलीच्या उज्ज्वल भविष्यासाठी शासन घेऊन आले आहे लेक लाडकी योजना. {LEK LADKI YOJNA}


गर्भवती महिलांना पोषक आहार मिळावा यासाठी सरकार देते रोख रक्कम त्याकरिता वाचा व अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी या योजनेवर क्लिक करा  जननी सुरक्षा योजना.


व्यवसाय सुरु करण्यासाठी सरकार देत आहे बिनव्याजी कर्ज वाचा व अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी या योजनेवर क्लिक करा अण्णासाहेब पाटील कर्ज योजना.