Mofat pithachi girani yojna 2024|मोफत पिठाची गिरणी योजना २०२४-अर्ज चालू झाले आहेत

Mofat pithachi girani yojna 2024 |मोफत पिठाची गिरणी योजना २०२४

आपल्या दैनंदिन आयुष्यात लागणाऱ्या अनेक गोष्टींच्या योजना आपले सरकार आपल्या लोकांसाठी घेऊन येत असते त्यातच एक महत्त्वाची योजना म्हणजे पिठाची गिरणी योजना.या योजने अंतर्गत आपल्या देशातील सर्वसामान्य लोक आपला एक घरगुती लघुउद्योग सुरू करू शकतात व आपली आर्थिक व्यवस्था सबळ करू शकतात.मोफत पिठाची गिरणी योजना ही योजना महिला व बालकल्याण विभागा मार्फत आपले राज्य सरकार राबवत आहे. या योजनेचा लाभ घेणारी बहुतांश जनता ही आपल्या ग्रामीण भागातील जनता आहे.

आपल्या ग्रामीण भागातील महिला वर्गांना उपजीविकेसाठी रोजंदारीचे काम करावे लागतात. या वर पर्याय म्हणून मोफत पिठाचे गिरणी योजनेअंतर्गत पिठाची गिरणी मिळाली तर महिला आपल्याला लघुउद्योग सुरू करू शकतात व आपल्या पायावर उभे राहू शकतात तसेच आपल्या कुटुंबाची जबाबदरी देखील चांगल्या प्रकारे पार पडू शकतात.
पिठाची गिरणी खरेदीसाठी आपले सरकार 100% अनुदान देत आहे यामुळे महिला वर्गांना 0 रुपये खर्च करून आपला व्यवसाय सुरू करण्यास मदत होणार आहे.अनुसूचित जाती अनुसूचित जमातीतील महिला वर्गांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे.

Mofat pithachi girani yojna 2024 |मोफत पिठाची गिरणी योजना २०२४, या योजनेबद्दल आम्ही तुम्हाला परिपूर्ण माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहे, यामध्ये या योजनेविषयी थोडक्यात माहिती, त्याचे ठळक मुद्दे, योजनेची पात्रता, योजनेचे फायदे, योजनेच्या अटी व शर्ती, योजनेसाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे, आणि ऑनलाईन अर्ज कसा करावा , असा हा परिपूर्ण लेख आम्ही तुमच्यासाठी सादर करत आहोत तो तुम्ही शेवटपर्यंत वाचवा हि मनापासून इच्छा व्यक्त करत आहोत. तर चला मग बघुयात योजनेविषयी परिपूर्ण अशी माहिती,

मोफत पिठाची गिरणी योजना २०२४ ची ठळक मुद्दे :- { Important points of Mofat pithachi girani yojna 2024 }

योजना २०२४ ची ठळक मुद्दे :- { Yojna Maharastra 2024 } याची ठळक मुद्दे आम्ही तुम्हाला येथे देत आहोत या मुद्द्यांमुळे तुम्हाला या योजनेत काय महत्त्वाचं आहे ते समजणार आहे व तुम्हाला योग्य दिशा या योजनेचा लाभ घेण्यासाठी मिळेल अशी आशा करतो.

योजनेचे नावMofat pithachi girani yojna 2024 (मोफत पिठाची गिरणी योजना २०२४)
योजना कोणा व्दारा सुरु झाली {Started By Whom}
राज्य सरकार
लाभार्थी {Beneficiary}आपल्या राज्यातील अनुसूचीत जाती आणि अनुसूचीत जमातीतील महिला
योजने मार्फत काय लाभ होणार आहेमोफत पिठाची गिरणी
अधिकृत वेबसाईट {Authorized Website}
Mofat pithachi girani yojna 2024 (मोफत पिठाची गिरणी योजना २०२४)
अर्ज करण्याची पद्धत {Process of Application}ऑफलाईन
योजना कोणत्या विभागा मार्फत राबवली जातेमहिला व बाल कल्याण विभाग

मोफत पिठाची गिरणी योजना २०२४ या योजनेची उद्दिष्टे (Purpose of Mofat pithachi girani yojna 2024 ):-

  • या योजनेअंतर्गत अनुसूचित जाती अनुसूचित जमाती प्रवर्गातील महिलांना लघुउद्योग करण्यास प्रोत्साहन देणे हे या योजनेमागे आपल्या सरकारचे प्रमुख उद्दिष्टे आहे.
  • दैनंदिन जीवनातील गरजा भागविण्यासाठी व आपल्या कुटुंबाला चालविण्यासाठी महिलांना प्रोत्साहन देणे व महिलांना स्वतःच्या पायावर उभे करून महिलांचे सबळीकरण करणे हा या योजनेचा उद्देश आहे.
  • या योजनेद्वारे अनुसूचित जाती अनुसूचित जात जमाती प्रवर्गातीललांना चांगले जीवन जगण्याची संधी देणे व स्वतःच्या पायावर उभे राहण्यास सक्षम करणे देखील या योजनेचा उद्देश आहे.
  • या योजनेद्वारे महिलांच्या आर्थिक उत्पन्नात वाढ करणे व त्याद्वारे कुटुंब व्यवस्था सबळ करणे हा या योजनेचा उद्देश आहे.

Mofat pithachi girani yojna 2024
Mofat pithachi girani yojna 2024

मोफत पिठाची गिरणी योजना २०२४ या योजनेच्या नोंदणीसाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे ( Documents of Mofat pithachi girani yojna 2024 ) :-

योजनेसाठी खालील कागदपत्रे आवश्यक आहेत-

  • आधार कार्ड (aadhar card)
  • रेशन कार्ड (ration card)
  • रहिवासी दाखला (Domicile certificate)
  • अर्जदाराचे जमिनीचा सातबारा (7/12)
  • अर्जदाराच्या जमिनीचा अट अ (8A)
  • मोबाईल नंबर (mobile no)
  • ई-मेल आयडी (email-id)
  • पासपोर्ट साईजचेे दोन फोटो (passport size photos)
  • स्वयंघोषित प्रतिज्ञापत्र (Affidavit)
  • जातीचा दाखला (cast certificate)
  • लाईट बील ची प्रत (light bill print)

मोफत पिठाची गिरणी योजना २०२४ या योजनेची पात्रता(Eligibility of Mofat pithachi girani yojna 2024 ):-

  1. अर्जदार महाराष्ट्राचा रहिवासी असणे आवश्यक आहे.
  2. अर्जदार महिला असणे आवश्यक आहे.
  3. घराला अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती असल्यास अनुसूचित जाती ,अनुसूचित जमाती असल्यास जातीचा दाखला जमा करणे गरजेचे आहे.
  4. दारिद्र्यरेषेखाली महिलांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे त्यामुळे अर्जदारा कडे दारिद्र्यरेषेखाली दाखला असणे गरजेचे आहे.
  5. या योजनेचा लाभ घेणाऱ्या व्यक्तींच्या कुटुंबातील कोणीही शासकीय कर्मचारी नसावे.
  6. कुटुंबातील एकाच व्यक्तीला या योजनेचा लाभ घेता येणार आहे.
  7. कुटुंबातील कोणत्याही व्यक्तीने यापूर्वी केंद्र शासन किंवा राज्य शासन अंतर्गत पिठाच्या गिरणीचा फायदा घेतलेला नसावा.
  8. या योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलेचे वय 18 वर्ष ते ६० वर्ष असावे.
  9. या योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलेच्या कुटुंबाचे उत्पन्न एक लाख वीस हजार किंवा त्यापेक्षा कमी असावे.

मोफत पिठाची गिरणी योजना २०२४ या योजनेची अर्ज प्रक्रिया (How to apply for Mofat pithachi girani yojna 2024) :-

योजनेचा अर्ज करायचा असल्यास आपल्याला तो तात्पुरता ऑफलाइन पद्धतीने करावा लागेल आता पर्यंत या योजनेसाठी कुठलहि सरकारी पोर्टल सरकारने उपलब्ध करून दिलेले नाही तर बघू आता की ऑफलाइन अर्ज कसा भरता येईल.

मोफत पिठाची गिरणी योजना २०२४ या योजनेची ऑफलाइन अर्ज प्रक्रिया खालील प्रमाणे :-

  • पिठाची गिरणी या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर आपल्याला पण ज्या क्षेत्रात राहतो त्या क्षेत्रातील ग्रामपंचायत कार्यालय किंवा महिला व बाल विकास कार्यालयामध्ये जाणे गरजेचे आहे.
  • तेथून आपल्याला पिठाच्या गिरणीचा अर्ज घ्यायचा आहे.
  • त्यानंतर आपल्याला हा अर्ज व्यवस्थित भरायचा आहे व वरती दिलेली सर्व कागदपत्रे या अर्जासोबत जमा करायची आहेत.
  • आता आपल्याला हा अर्ज ग्रामपंचायत कार्यालय किंवा महिला व बालविकास विभागात जाऊन जमा करायचा आहे.
  • संबंधित अधिकाऱ्याकडून आपल्याला पोहोच पावती घ्यायची आहे जी आपल्याला भविष्यात उपयोगी ठरेल.
  • अतिशय सोप्या पद्धतीने आपण मोफत पिठाची गिरणी या योजनेचा लाभ घेऊ शकतो व आपले कुटुंब आर्थिक दृष्ट्या सक्षम बनवू शकतो.
Mofat pithachi girani yojna 2024
Mofat pithachi girani yojna 2024

निष्कर्ष :-

मित्रांनो, तुम्हाला आम्ही दिलेली मोफत पिठाची गिरणी योजना २०२४ या योजनेबद्दलची माहिती कशी वाटली याबद्दल तुम्ही आम्हाला लेखाच्या खाली कमेंट करून कळवू शकता तसेच आमच्यासाठी काही सूचना असतील त्याही तुम्ही आम्हाला सुचवू शकता अशाच सरकारी योजना संबंधी अपडेटेड माहिती मिळवण्यासाठी आमच्या योजना गॅरंटी डॉट कॉम (yojnaguarantee.com) या संकेतस्थळाला भेट देत राहा धन्यवाद|

FAQ’S-

१. मोफत पिठाची गिरणी योजना २०२४ योजनेचा अर्ज कसा करावा ?

उत्तर- ज्या क्षेत्रात राहतो त्या क्षेत्रातील ग्रामपंचायत कार्यालय किंवा महिला व बाल विकास कार्यालयामार्फत या योजनेला अर्ज कसा करावा लागतो.

२. मोफत पिठाची गिरणी योजना २०२४ या योजनेचा ऑनलाइन अर्ज करायचा असल्यास अधिकृत संकेतस्थळ कोणते ?

उत्तर-या योजनेसाठी तुम्हाला ऑफलाईन अर्ज करावा लागेल पण अर्ज करण्यासाठी अर्ज करण्याचा फॉर्म आम्ही तुम्हाला देत आहोत लिंक च्या स्वरूपात धन्यवाद. लिंक

३. मोफत पिठाची गिरणी योजना २०२४ कोणत्या राज्यामध्ये लागू आहे ?

उत्तर- मोफत पिठाची गिरणी योजना २०२४ हि महाराष्ट्र राज्यामध्ये लागू आहे.

४. मोफत पिठाची गिरणी योजना २०२४ चे लाभार्थी कोण आहेत ?

उत्तर- अनुसूचित जाती / जमातीच्या महिलांसाठी.

5. मोफत पिठाची गिरणी योजना २०२४ अंतर्गत दिले जाणारे लाभ ?

उत्तर- मोफत पिठाची गिरणी हाच एक लाभ आहे.

6. मोफत पिठाची गिरणी योजना २०२४ चा उद्देश काय आहे ?

उत्तर- अनुसूचित जाती जमातीच्या महिलांना आर्थिक स्थैर्य मिळावे आणि त्यांना आत्मनिर्भर बनवून आत्मसन्मान प्राप्त व्हावा यासाठी शासना ने ही योजना सुरू केली आहे.

हे देखील वाचा :-


योजना प्रत्येक ज्येष्ठ नागरिकाला आपल्या उतरत्या वयात जीवन सुकर व्हाव म्हणून महाराष्ट्र सरकारने आणली आहे मुख्यमंत्री वयोश्री योजना. {Mukhyamantri Vayoshri Yojna}


शेतकऱ्यानच्या फायद्या साठी वाचा. किसान सन्मान निधी योजना | {Kisan Sanman Nidhi Yojna}


आपल्या लाडक्या लेकीच्या उज्वल भविष्यासाठी जाणून घ्या सुकन्या समृद्धी योजना। {Sukanya Samrudhi Yojna}


जर तुम्ही बेरोजगार असाल तर तुम्ही बेरोजगार भत्ता योजनेचा लाभ घेऊ शकता. अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी बेरोजगार भत्ता अर्ज कसा करावा हे वाचा.{Berojgar Bhatta yojna arj ksa karava}


महिलांना व्यवसाय स्थापन करण्यासाठी प्रोत्साहन पर योजना म्हणजेच महिला समृद्धी कर्ज योजना, अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी या योजनेवर क्लिक करा. {Pm pik vima yojna 2024}


आपल्याला आपल्या हक्काचे घर मिळणार रमाई आवास घरकुल योजना अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी या योजनेवर क्लिक करा. {Ramai Awas Gharkul Yojna}


मुलीच्या उज्ज्वल भविष्यासाठी शासन घेऊन आले आहे लेक लाडकी योजना. {LEK LADKI YOJNA}


गर्भवती महिलांना पोषक आहार मिळावा यासाठी सरकार देते रोख रक्कम त्याकरिता वाचा व अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी या योजनेवर क्लिक करा  जननी सुरक्षा योजना.


व्यवसाय सुरु करण्यासाठी सरकार देत आहे बिनव्याजी कर्ज वाचा व अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी या योजनेवर क्लिक करा अण्णासाहेब पाटील कर्ज योजना.