Mahila bachat gat shaskiya karj yojna 2024 महिला बचत गट शासकीय कर्ज योजना २०२४|अर्ज नोंदणी सुरु.

Table of Contents

{Mahila bachat gat shaskiya karj yojna 2024}

राज्यातील महिला स्वतःचा एखादा व्यवसाय सुरू करण्यासाठी इच्छुक असतात परंतु आर्थिक बाजू मध्ये त्या कमी पडतात त्यासाठी महाराष्ट्र शासन सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाद्वारे राज्यातील महिलांच्या आर्थिक विकासासाठी घेऊन आले आहे कमी व्याजदरामध्ये तसेच अटी व शर्ती देखील कमी असणारी योजना म्हणजे महिला बचत गट शासकीय कर्ज योजना 2024 जेणेकरून महिला स्वतःचा उद्योग सुरू करून स्वतःचा आर्थिक विकास करू शकतील व एक सक्षम कुटुंब, सक्षम राज्य आणि सक्षम देश त्या घडू शकतील.

Mahila bachat gat shaskiya karj yojna 2024
Mahila bachat gat shaskiya karj yojna 2024

महिला बचत गट शासकीय कर्ज योजना २०२४ या योजनेची ठळक मुद्दे :-

योजनेचे नावमहिला बचत गट शासकीय कर्ज योजना २०२४ |Mahila bachat gat shaskiya karj yojna 2024
योजनेचा फायदा कुणाला होणार आहेराज्यामधील बचत गट महिला
योजने अंतर्गत काय फायदा होणार आहेउद्योग व्यवसाय सुरु करण्यासाठी 5 लाख ते 20 लाखांपर्यंत आर्थिक मदद
योजना कोणत्या विभागा अंतर्गत राबवली जातेसामाजिक व न्याय विशेष सहाय्य विभाग
योजनेचे अधिकृत संकेतस्थळ प्रत्येक जिल्ह्याच्या महानगरपालिकेच्या संकेतस्थळावर
अर्जाची पद्धतOffline
Rate of Interest4 टक्के

महिला बचत गट शासकीय कर्ज योजना २०२४ या योजनेची कागदपत्रे ( Documents for Mahila bachat gat shaskiya karj yojna 2024 )

  • आधार कार्ड {Aadhar Card}
  • पॅन कार्ड {Pan Card}
  • रेशन कार्ड {Ration Card}
  • रहिवाशी दाखला {Residence Proof}
  • जन्मप्रमाण पत्र {Birth Certificate}
  • उत्पन्नाचा दाखला {Income Proof}
  • मोबाईल नंबर {Mobile Number}
  • ई-मेल आयडी {Email-ID}
  • बँकेचा तपशील {Bank Details}
  • पासपोर्ट आकाराचे फोटो {Passport Size Photographs}
  • व्यवसाय प्रकल्पाच्या खर्च अंदाजपत्रक {Project Details Report}
  • शपथ पत्र {Self Affidavit}

महिला बचत गट शासकीय कर्ज योजना २०२४ या योजना चे उद्देश :-

राज्यातील ज्या सुशिक्षित बेरोजगार महिला आहेत स्वतःचा उद्योग व्यवसाय करण्यासाठी इच्छुक असतात अशा महिलांचा बचत गट स्थापन करून बचत गटामार्फत त्या महिलांना स्वतःचा उद्योग सुरू करण्यासाठी कमी व्याजदरात कर्ज उपलब्ध करून देणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे.

महिलांना उद्योग व्यवसाय सुरू करण्यासाठी प्रोत्साहन म्हणून ही योजना सरकार घेऊन आले आहे.

महिलांचा आर्थिक सामाजिक विकास घडवून आणणे हे या योजनेमार्फत सरकारचे उद्दिष्ट आहे.

महिलांना आत्मनिर्भर बनवणे व त्यांचा हरवलेला आत्मसन्मान पुन्हा मिळवून देणे हा या योजनेचा उद्देश आहे.

महिला बचत गट शासकीय कर्ज योजना २०२४ या योजनेची अर्ज करण्याची पध्दत :-

महिला बचत गट शासकीय कर्ज योजना 2024 या योजनेसाठी अर्ज करताना जी काही माहिती आवश्यक आहे ती आम्ही खाली देत आहोत :-

  • या योजनेत अर्ज करणाऱ्या महिलेने प्रथम आपल्या जवळच्या जिल्हा कार्यालयात जाऊन सामाजिक व न्याय विशेष सहाय्य विभागात बचत गट शासकीय योजनेचा अर्ज घ्यावा किंवा आम्ही दिलेल्या लिंक वरून डाऊनलोड करून घ्यावा.
  • विचारलेली सर्व माहिती त्यामध्ये योग्यरीत्या भरून जी कागदपत्रे सांगितली आहेत, ती कागदपत्रे त्या अर्जाला जोडायची आहेत व अर्ज जमा करायचा आहे अशाप्रकारे आपण या योजनेमध्ये अर्ज करण्याची प्रक्रिया पूर्ण केली आहे.
  • अर्जाची लिंक इथे देत आहोत यावर click करा.
Mahila bachat gat shaskiya karj yojna 2024
Mahila bachat gat shaskiya karj yojna 2024

महिला बचत गट शासकीय कर्ज योजना २०२४

या योजनेची पात्रता, नियम, अटी व शर्ती :-

  • महिला बचत गट शासकीय कर्ज योजना २०२४ या योजनेसाठी अर्ज करणारी महिला महाराष्ट्र राज्याची रहिवाशी असावी.
  • महिला बचत गट शासकीय कर्ज योजना २०२४ या योजनेसाठी अर्ज करणारी महिला बचत गटामध्ये सदस्य असणे आवश्यक आहे.
  • महिला बचत गट शासकीय कर्ज योजना २०२४ या योजनेच्या अंतर्गत अर्जदार महिलेचे वय 18 वर्ष ते 50 वर्ष दरम्यान असावे.
  • महिला बचत गट शासकीय कर्ज योजना २०२४ या योजनेच्या अंतर्गत कर्ज वितरण झालेल्या तारखेपासून घेतलेले कर्ज 3 वर्षाच्या आत व्याजासह परत करणे.
  • महिला बचत गट शासकीय कर्ज योजना २०२४ या योजनेच्या अंतर्गत ज्या महिलांना बचत गट स्थापन करून किमान दोन वर्षांचा कालावधी पूर्ण झाला आहे अशाच महिला बचत गटांना या योजनेचा लाभ देण्यात येतो.
  • महिला बचत गट शासकीय कर्ज योजना २०२४ या योजनेच्या अंतर्गत फक्त महिलाच या योजनेचा लाभ घेऊ शकतात व पुरुष उद्योजकांना या योजनेचा लाभ मिळणार नाही याची कृपया त्यांनी नोंद घ्यावी.
  • महिला बचत गट शासकीय कर्ज योजना २०२४ या योजनेच्या अंतर्गत महिलांना जास्तीत जास्त 20 लाखांपर्यंत कर्ज उपलब्ध करून दिले जाऊ शकते परंतु त्यापेक्षा जर जास्त रक्कम लाभार्थ्यास लागणार असेल तर त्याला उर्वरित रक्कम स्वतः भरावी लागेल.
  • महिला बचत गट शासकीय कर्ज योजना २०२४ या योजनेच्या अंतर्गत अर्ज करणारी महिला दारिद्र्य रेषेखालील कुटुंबाची सदस्य असावी .
  • महिला बचत गट शासकीय कर्ज योजना २०२४ या योजनेच्या अंतर्गत अर्जदार महिलेचे स्वतःचे बँक खाते असावे तिच्या कुटुंबातील इतर कोणत्याही व्यक्तीच्या बँक खात्याचा तपशील इथे चालणार नाही याची कृपया नोंद घ्यावी.
  • महिला बचत गट शासकीय कर्ज योजना २०२४ या योजनेच्या अंतर्गत अर्ज करणाऱ्या महिला अर्जदाराचे कुठल्याही बँकेत किंवा वित्त पुरवठा करणाऱ्या संस्थेमध्ये थकबाकी असता कामा नये किंवा दिवाळखोर घोषित असू नये.
  • या योजनेच्या अंतर्गत अर्ज करणाऱ्या महिला अर्जदाराने या आधी जर केंद्र किंवा राज्य शासनाद्वारे सुरू करण्यात आलेल्या स्वयंरोजगार योजनेचा लाभ घेतलेला नसावा जर महिलेने या योजनांचा लाभ घेतलेला असेल तर तिला या योजनेमध्ये सहभागी होता येणार नाही.
  • या योजनेच्या अंतर्गत अर्ज करणाऱ्या महिला महाराष्ट्र राज्याच्या बाहेरील रहिवासी नसाव्यात कारण महाराष्ट्र बाहेरील महिलांना या योजनेचा लाभ दिला जाणार नाही.
  • या योजनेच्या अंतर्गत ज्या महिला अर्ज करतात त्यांना 95% कर्ज हे राष्ट्रीय महामंडळाद्वारे व 5 टक्के कर्ज राज्य महामंडळाद्वारे उपलब्ध करून दिले जाते त्यामुळे लाभार्थ्याला यामध्ये सहभाग हा लागत नाही परंतु काही कारणामुळे राज्य महामंडळाकडून जर कर्ज मिळू न शकल्यास किंवा उपलब्ध न झाल्यास लाभार्थी महिलेला स्वतः 5 टक्के रक्कम भरावी लागते.
  • या योजनेच्या अंतर्गत कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न ग्रामीण भागासाठी 98,000/- रुपयांपेक्षा जास्त असू नये व शहरी भागासाठी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 1.2 लाखांपेक्षा जास्त असू नये.

निष्कर्ष :-

महिला बचत गट शासकीय कर्ज योजना २०२४ आम्ही तुम्हाला परिपूर्ण माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे, यामध्ये या योजनेविषयी थोडक्यात माहिती, त्याचे ठळक मुद्दे, योजनेची पात्रता, योजनेचे फायदे, योजनेच्या अटी व शर्ती, योजनेसाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे, आणि ऑनलाईन अर्ज कसा करावा , असा हा परिपूर्ण लेख आम्ही तुमच्यासाठी सादर करत आहोत तो तुम्ही शेवटपर्यंत वाचल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद।


FAQ:-


१. योजनेचा अर्ज कसा करावा ?

उत्तर- या योजनेत अर्ज करणाऱ्या महिलेने प्रथम आपल्या जवळच्या जिल्हा कार्यालयात जाऊन सामाजिक व न्याय विशेष सहाय्य विभागात बचत गट शासकीय योजनेचा अर्ज घ्यावा किंवा आम्ही दिलेल्या लिंक वरून डाऊनलोड करून घ्यावा. विचारलेली सर्व माहिती त्यामध्ये योग्यरीत्या भरून जी कागदपत्रे सांगितली आहेत, ती कागदपत्रे त्या अर्जाला जोडायची आहेत व अर्ज जमा करायचा आहे अशाप्रकारे आपण या योजनेमध्ये अर्ज करण्याची प्रक्रिया पूर्ण केली आहे.

२. महिला बचत गट शासकीय कर्ज योजना २०२४ या योजनेचा ऑनलाइन अर्ज करायचा असल्यास अधिकृत संकेतस्थळ कोणते ?

उत्तर- यासाठी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करावा लागतो पण अर्ज करण्यासाठी अर्जाची लिंक इथे देत आहोत तेथून अर्ज डाउनलोड करावा व तो भरून द्यावा.

https://drive.google.com/file/d/1a0SMD2XIEysfpfmuZBXrK-PTMyvGl9e-/view

३. महिला बचत गट शासकीय कर्ज योजना कोणत्या राज्यामध्ये लागू आहे?

उत्तर- महिला बचत गट शासकीय कर्ज योजना २०२४ महाराष्ट्र राज्यासाठी लागू आहे.

४. महिला बचत गट शासकीय कर्ज योजना २०२४ चे लाभार्थी कोण आहेत ?

उत्तर- महिला बचत गट शासकीय कर्ज योजना २०२४ चे लाभार्थी महाराष्ट्र राज्यातील बचत गट महिला आहेत.

5. महिला बचत गट शासकीय कर्ज योजना २०२४ अंतर्गत दिले जाणारे कर्ज किती वर्षाच्या आत परत करणे अनिवार्य आहे ?

उत्तर- महिला बचत गट शासकीय कर्ज योजना २०२४ या योजनेअंतर्गत दिले जाणारे कर्ज 3 वर्षाच्या आत परत करणे अनिवार्य आहे.

6. महिला बचत गट शासकीय कर्ज योजना २०२४ या योजनेचा लाभ काय आहे ?

उत्तर- महिला बचत गट शासकीय कर्ज योजना २०२४ या योजनेअंतर्गत स्वतःचा उद्योग व्यवसाय सुरु करण्यासाठी इच्छुक बचत गटाच्या महिलांना 5 लाख ते 20 लाखांपर्यंत कर्ज उपलब्ध करून दिले जाते.

7. महिला बचत गट शासकीय कर्ज योजना २०२४ चा उद्देश काय आहे ?

राज्यातील बचत गटातील महिलांना बचत गट शासकीय कर्ज योजना २०२४ मार्फत उद्योग सुरु करण्यासाठी कर्ज उपलब्ध करून देणे व महिलांना सक्षम तसेच राज्यातील बेरोजगार कमी करणे.


हे देखील वाचा :-


योजना प्रत्येक ज्येष्ठ नागरिकाला आपल्या उतरत्या वयात जीवन सुकर व्हाव म्हणून महाराष्ट्र सरकारने आणली आहे मुख्यमंत्री वयोश्री योजना.{Mukhyamantri Vayoshri Yojna}


शेतकऱ्यानच्या फायद्या साठी वाचा किसान सन्मान निधी योजना |Kisan Sanman Nidhi Yojna


आपल्या लाडक्या लेकीच्या उज्वल भविष्यासाठी जाणून घ्या सुकन्या समृद्धी योजना। Sukanya Samrudhi Yojna। Bharat Sarkar।Women Empowerment.


जर तुम्ही बेरोजगार असाल तर तुम्ही बेरोजगार भत्ता योजनेचा लाभ घेऊ शकता. अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी बेरोजगार भत्ता अर्ज कसा करावा हे वाचा.


महिलांना व्यवसाय स्थापन करण्यासाठी प्रोत्साहन पर योजना म्हणजेच महिला समृद्धी कर्ज योजना, अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी या योजनेवर क्लिक करा.


आपल्याला आपल्या हक्काचे घर मिळणार रमाई आवास घरकुल योजना अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी या योजनेवर क्लिक करा.


मुलीच्या उज्ज्वल भविष्यासाठी शासन घेऊन आले आहे लेक लाडकी योजना. { LEK LADKI YOJNA}


गर्भवती महिलांना पोषक आहार मिळावा यासाठी सरकार देते रोख रक्कम त्याकरिता वाचा व अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी या योजनेवर क्लिक करा  जननी सुरक्षा योजना.


व्यवसाय सुरु करण्यासाठी सरकार देत आहे बिनव्याजी कर्ज वाचा व अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी या योजनेवर क्लिक करा अण्णासाहेब पाटील कर्ज योजना