shravan bal yojna (श्रावण बाळ योजना)
पडत्या काळामध्ये आधाराची काठी म्हणून आपले सरकार घेऊन आली आहे श्रावण बाळ योजना.या योजनेला श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती योजना या नावाने देखीलओळखले जाते. योजनेअंतर्गत आपल्या राज्यातील 65 वर्ष व त्यापेक्षा जास्त वय असणारे व्यक्तीला प्रति महिना 600 रुपये ते १५०० रुपये आपले सरकार देणार आहे .
आपल्या राज्यातील वृद्ध व्यक्तींना त्यांच्या वृद्ध काळामध्ये त्यांच्या आत्मसन्मानाला ठेच पोहोचू नये यासाठी सरकार त्यांनाही मदत करत आहे .या मदतीतून वृद्ध सक्षम होतील व आर्थिक दृष्ट्या आपल्या व आपल्या कुटुंबाच्या गर्जा भागू शकतील .या शासनाने दिलेल्या पैशातून वृद्ध व्यक्ती पडत्या काळामध्ये स्वतःसाठी औषधे तसेच दवाखान्याचा खर्च व दैनंदिन जीवनातील इतर गोष्टी खरेदी करू शकतो. योजने अंतर्गत मिळणारी आर्थिक मदत ज्येष्ठ व्यक्तीच्या बँक खात्यामध्ये जमा केली जाणार आहे.
या योजनेचा फायदा ग्रामीण भागातील तसेच शहरी भागातील ज्येष्ठ नागरिकांना घेता येणार आहे.आपल्याला जर या योजनेचा फायदा घ्यायचा असेल तर आपल्याला आपण केलेल्या अर्जाची व कागदपत्रांची तपासणी करण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना तीस दिवसाचा कालावधी देणे आवशयक आहे.
या लेखा मार्फात सर्वांना श्रावण बाळ योजनेची माहिती, या योजनेसाठी लागणारी कागदपत्रे ,लाभार्थीची लिस्ट कशी पहावी, ऑनलाईन फॉर्म कसा भरावा, ऑफलाइन फॉर्म कसा भरावा ,सरकारची या योजनेमध्ये काय उद्दिष्ट काय आहे हे सांगण्याचा प्रयत्न केला आहे तरी वाचकास विनंती की आपण ही योजना शेवटपर्यंत वाचावी.
Table of Contents
श्रावण बाळ योजना (shravan bal yojna ) या योजनेची ठळक मुद्दे :-
योजनेचे नाव | श्रावण बाळ योजना (shravan bal yojna) |
योजनेचा फायदा कुणाला होणार आहे | ६५ वर्ष वरील जेष्ठ नागरिकांना |
योजने अंतर्गत काय फायदा होणार आहे | ६००/- प्रती महिना ते १५००/- प्रती महिना |
योजना कोणत्या विभागा अंतर्गत राबवली जाते | सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभाग |
योजनेसाठीचा अधिकृत नंबर | 1800-120-8040 |
योजनेची अधिकृत वेबसाईट | shravan bal yojna (श्रावण बाळ योजना) |
श्रावण बाळ योजना या योजनेची कागदपत्रे ( Documents for shravan bal yojna )
श्रावण बाळ योजणे साठी अर्ज करायचा असेल तर खालील कागदपत्रे असणे आवश्यक आहे
- आधार कार्ड
- दोन पासपोर्ट साईज फोटो
- उत्पन्नाचा दाखला
- दारिद्र्यरेषेखाली असेल तर बीपीएल कार्ड
- रहिवासी दाखला
- कोणत्याही राष्ट्रकृत बँकेचे पासबुक
- पॅन कार्ड
- मतदान कार्ड
- शाळा सोडल्याचा दाखला
श्रावण बाळ योजना (shravan bal yojna ) या योजनेची अर्ज करण्याची पध्दत
योजनेसाठी आपल्याला अर्ज करायचा असेल तर अर्ज करण्यासाठी दोन पद्धती आहेत ऑफलाइन आणि ऑनलाईन
- ऑफलाइन:
या योजनेसाठी आपल्याला ऑफलाईन अर्ज करायचा असेल, तर आपल्याला आपण ज्या क्षेत्रात राहतो त्या क्षेत्रातील ग्रामपंचायत कार्यालय किंवा तलाठी कार्यालय किंवा तहसीलदार ऑफिस या ठिकाणी या योजनेचा अर्ज मिळेल. अर्जात दिलेली सर्व माहिती आपल्याला भरायची आहे .त्याचबरोबर वरती दिलेली सर्व कागदपत्रे या अर्जाबरोबर जोडायची आहेत व कार्यालयात जमा करायची आहे. अर्ज आपण कार्यालयात जमा केल्यानंतर तेथील अधिकारी आपल्याला अर्ज पोहोच झाल्याची पावती देतील.
- ऑनलाईन:-
- या योजनेसाठी ऑनलाईन फॉर्म भरावयाच्या असल्यास आपल्याला खालील लिंक वर क्लिक करावे लागेल
- . आपल्यासमोर एक नवीन पेज ओपन होईल
- .समोर आलेल्या पेजवर आपल्याला न्यू रजिस्ट्रेशन या पर्यायावर क्लिक करायचे आहे
- .आता आपण दोन पद्धतीने दोन पद्धतीने रजिस्ट्रेशन करू शकतो आपल्याला आपल्या मोबाईल नंबर द्वारे याची नोंदणी करता येईल त्यासाठी आपल्याला आपला जिल्हा निवडावा लागेल व पासवर्ड टाकावा लागेल
- किंवा समोर दुसरा पर्याय आहे ज्याद्वारे आपण आपली संपूर्ण माहिती गरजेचे आहे जसे की लाभार्थीचे, नाव ,पत्ता मोबाईल नंबर इत्यादी
- त्यानंतर आपल्याला रजिस्ट्रेशन बटन वर क्लिक करायचे आहे.
- अशाप्रकारे आपला नवीन युजरनेम आणि पासवर्ड क्रिएट होईल.
- युजरनेम आणि पासवर्ड चा वापर करून आपल्याला लॉगिन करायचे आहे
- लॉगिन झाल्यानंतर आपल्याला आपल्या जिल्ह्याची निवड करायची आहे
- त्यानंतर आपल्याला सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभाग यावर क्लिक करायचे आहे
- समोर आपल्याला श्रावण बाळ योजना हा पर्याय दिसेल तो निवडा.
- त्यानंतर आपल्याला समोर एक फॉर्म दिसेल त्यावर सगळे माहिती भरून आपल्याला सबमिट बटन वर क्लिक करायचे आहे.
- आता आपल्याला आपली सर्व माहिती व आवश्यक कागदपत्रे जसे की बँकेचे नाव आधार कार्ड पॅन कार्ड या सर्व गोष्टी त्यांचा तपशील व्यवस्थित भरायचा आहे.
- सबमिट बटन वर क्लिक केल्यानंतर आपणांसमोर एक अर्जाचा क्रमांक मिळेल तो आपल्याला भविष्यात कामी येऊ शकतो.
- अशाप्रकारे आपण ऑनलाइन फॉर्म भरू शकतो.
श्रावण बाळ योजना या योजनेची उद्दिष्टे:-
- या योजनेअंतर्गत 65 वर्षाच्या किंवा त्यापेक्षा जास्त वय असणाऱ्या व्यक्तीला आर्थिक दृष्ट्या सक्षम करणे जेणेकरून तो त्याच्या दैनंदिन आयुष्यातल्या सर्व गरजा भागू शकतो हे उद्दिष्ट समोर ठेवून शासनाने ही योजना आपल्या राज्यासाठी राबविली आहे
- या योजनेअंतर्गत वृद्ध व्यक्तींना फक्त काळामध्ये कुणावरही अवलंबून राहण्याची गरज पडणार नाही त्यांच्या औषधाचा खर्च किंवा दवाखान्याचा खर्च ते स्वतः उठव घेऊया योजनेअंतर्गत काळामध्ये कुणावरही अवलंबून राहण्याची गरज पडणार नाही त्यांच्या औषधाचा खर्च किंवा दवाखान्याचा खर्च ते स्वतः घेऊ शकतात.
- या योजनेअंतर्गत 65 वयापेक्षा जास्त वयाच्या वृद्ध व्यक्तींना मानसिक आधार देण्याच्या प्रयत्न सरकार करत आहे.
- या योजनेअंतर्गत ज्येष्ठ व्यक्ती स्वावलंबी होऊन सक्षम होणार आहेत.
श्रावण बाळ योजना (shravan bal yojna ) या योजनेची पात्रता:-
आपल्या महाराष्ट्र सरकारने श्रेणी अ व श्रेणी ब अशा दोन विविध श्रेणीमध्ये या योजनेची वर्गीकरण केली आहे.
श्रेणी अ–
१.या योजनेचा लाभ घेणारा अर्जदार हा महाराष्ट्राचा रहिवासी असावा.
२.या योजनेचा लाभ घेणारा अर्जदार वयाचे 65 वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त वयाचा असावा.
३.या योजनेअंतर्गत लाभ घेणाऱ्या लाभार्थी चे नाव दारिद्र रेषेखालील यादीत असणे आवश्यक आहे.
४. या योजनेअंतर्गत श्रेणी अ मध्ये येणाऱ्या लाभार्थींना ज्यांचे दारिद्र्यरेषेच्या खालील कुटुंबामध्ये नाव आहे .अशा लाभार्थींना 400 रुपये महिना असे वेतन देत आहे तसेच या वयोगटातील अर्जदारांना इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्त वेतन योजनेअंतर्गत 200 रुपये महिना दिला जातो.असे एकूण सहाशे रुपये अर्जदाराला प्रति महिना मिळतात.
श्रेणी ब–
१.श्रेणी ब अंतर्गत येणारे अर्जदार हे महाराष्ट्राचे कायमस्वरूपी चेे रहिवासी असावे.
२.अर्जदाराची वयाची अट श्रेणी अ प्रमानेच आहे.
३.अर्जदाराच्या कुटुंबाचे उत्पन्न 21 हजार किंवा त्यापेक्षा कमी असावे.
४.श्रेणी ब अंतर्गत अर्जदार दारिद्र्यरेषे खालील यादीत नोंदणीकृत नसेल तरीही चालेल.
५.श्रेणी ब मधील अर्जदारांना या योजनेअंतर्गत प्रति महिना 600 रुपये त्यांच्या बँक खात्यात जमा केला जातो.
श्रावण बाळ योजनेअंतर्गत अर्जची स्थिती कशी तपासावी व लाभार्थींनी आपले नाव कसे तपासावे:-
- यासाठी आपल्याला सरकारच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्यायची आहे.
- अर्जाची स्थिती तपासण्याची असेल तर ट्रॅक युवर एप्लीकेशन वर क्लिक करायचे आहे.
- त्यानंतर आपल्यासमोर एक यादी ओपन होईल.
- तेथील संबंधित विभागामध्ये जाऊन आपल्याला आपली ईमेल आयडी आणि पासवर्ड टाकून go करायचे आहे.
- त्यानंतर आपल्याला आपल्या अर्जाची स्थिती काय आहे तेच दिसेल .
- लाभार्थ्याला आपली यादी तपासायची असेल तर आपल्याला आपला जिल्हा गाव ती निवडल्यानंतर या योजनेअंतर्गत ज्या लाभार्थींना लाभ मिळाला आहे त्यांची एक यादी आपणांसमोर येईल त्यात आपले नाव तपासा.
निष्कर्ष :-
श्रावण बाळ योजना आम्ही तुम्हाला परिपूर्ण माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे, यामध्ये या योजनेविषयी थोडक्यात माहिती, त्याचे ठळक मुद्दे, योजनेची पात्रता, योजनेचे फायदे, योजनेच्या अटी व शर्ती, योजनेसाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे, आणि ऑनलाईन अर्ज कसा करावा , असा हा परिपूर्ण लेख आम्ही तुमच्यासाठी सादर करत आहोत तो तुम्ही शेवटपर्यंत वाचल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद।
FAQ:-
१.योजनेचा अर्ज कसा करावा?
उत्तर-योजनेचा अर्ज करा आपण ऑनलाइन ऑफलाईन अशा दोन पद्धतीने करू शकतो.
या योजनेचा फायदा घ्यायचा असेल तर आपल्याला आपल्या क्षेत्रातील ग्रामपंचायत तलाठी कार्यालय किंवा तहसीलदार कार्यालयात जाऊन अर्ज जमा करावा लागेल .आपल्याला ऑनलाइन पद्धतीने या योजनेचा फायदा घ्यायचा असेल तर सरकारच्या अधिकृत साइटवर जाऊन आपली नोंदणी करावी लागेल.
२.योजनेचा ऑनलाइन अर्ज करायचा असल्यास फोटोची साईज काय असावी?
उत्तर-योजनेसाठी अर्जदाराला आपल्या फोटोची साईज 5 kb to 20 kb एवढी पाहिजे आणि jpeg फॉर्माट मध्ये हवा.
हे देखील वाचा :-
योजना प्रत्येक ज्येष्ठ नागरिकाला आपल्या उतरत्या वयात जीवन सुकर व्हाव म्हणून महाराष्ट्र सरकारने आणली आहे मुख्यमंत्री वयोश्री योजना.{Mukhyamantri Vayoshri Yojna}
शेतकऱ्यानच्या फायद्या साठी वाचा किसान सन्मान निधी योजना |Kisan Sanman Nidhi Yojna
आपल्या लाडक्या लेकीच्या उज्वल भविष्यासाठी जाणून घ्या सुकन्या समृद्धी योजना। Sukanya Samrudhi Yojna। Bharat Sarkar।Women Empowerment.
जर तुम्ही बेरोजगार असाल तर तुम्ही बेरोजगार भत्ता योजनेचा लाभ घेऊ शकता. अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी बेरोजगार भत्ता अर्ज कसा करावा हे वाचा.
महिलांना व्यवसाय स्थापन करण्यासाठी प्रोत्साहन पर योजना म्हणजेच महिला समृद्धी कर्ज योजना, अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी या योजनेवर क्लिक करा.
आपल्याला आपल्या हक्काचे घर मिळणार रमाई आवास घरकुल योजना अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी या योजनेवर क्लिक करा.
मुलीच्या उज्ज्वल भविष्यासाठी शासन घेऊन आले आहे लेक लाडकी योजना. { LEK LADKI YOJN