vayoshri yojana maharashtra online apply 2024:वयोश्री योजना अर्ज सुरु
vayoshri yojana information(वयोश्री योजनेची माहिती):
आपल्या महाराष्ट्र शासनाने आपल्या घरातील जे जेष्ठ नागरिक आहेत त्यांना स्वाभिमानाने जगता याव यासाठी एका नवीन योजनेची सुरुवात केली आणि त्याची ऑनलाईन एप्लीकेशन देखील सुरू होणार आहेत. या योजनेचे नाव आहे वयोश्री योजना. आपल्या घरात जर कोणी 65 वर्षापेक्षा जास्त वयोवृद्ध असेल तर त्यांच्यासाठी आनंदाची गोष्ट आहे. त्यांना 3000 /-रुपये शासन देणार आहे. हे पैसे आपल्या घरातील नागरिकांच्या डायरेक्ट बँक अकाउंट वर जमा होणार असल्या कारणामुळे त्यांना कुठल्याही परिस्थितीत आपल्या गरजेच्या वस्तू घेण्यासाठी या गोष्टीचा उपयोग होईल. वयानुसार येणारा अशक्तपणा तसेच अपंगत्व यावर मात करण्यासाठी सरकार मदत करणार आहे.
Benefits of vayoshri yojana (वयोश्री योजना योजनेअंतर्गत मदतीचे स्वरूप कसे असेल)-
या योजनेअंतर्गत एक रकमी 3000 /-रुपये नागरिकांच्या बँक खात्यात जमा केले जाणार आहे त्याद्वारे अर्जदार व्यक्ती स्वतःला उपयुक्त वस्तू खरेदी करू शकतात तसेच वृद्धावस्थेत येणाऱ्या मानसिक तणावामुळे होणाऱ्या त्रासाला सामोरे जाण्यासाठी त्यांना मनुष शांती केंद्र तसेच योगपचारकेंद्र यामध्ये प्रवेश घेण्यासाठी देखील सरकार मदत करणार आहे तसेच रोज जीवनावश्यक असणाऱ्या वस्तू खरेदी करण्यासाठी सरकार मदत करणार आहे जसे की-
- Walking sticks: चालण्याची काठी
- Walkers or crutches: चालण्याचे सहाय्यक उपकरण किंवा काठी
- Elbow crutches: कोपर काठी
- Tripods or quad pods
- Artificial dentures: कृत्रिम दात
- Wheelchairs: व्हीलचेअर
- Hearing aids: श्रवणयंत्र
- Spectacles: चष्मा
Who is eligible for vayoshri yojana 2024(वयोश्री योजनेचा लाभ घेऊ शकतात)-
- योजनेचा लाभ घेणारा व्यक्ती हा 31 डिसेंबर 2023 रोजी 65 वर्षे पूर्ण केलेला असावा.
- अर्जदार व्यक्तीकडे स्वतःचे आधार कार्ड असावी जे बँक खात्याशी जोडलेले असावे.
- अर्जदार व्यक्तीच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 2 लाख किंवा त्यापेक्षा कमी असावे.
- या योजनेअंतर्गत 30 टक्के महिलांना राखीव जागा ठेवण्यात येणार आहेत.
- या योजनेअंतर्गत जमा होणारी पैसे अर्जदाराने मनशक्ती केंद्र किंवा आपल्याला आवश्यक असणाऱ्या वस्तू खरेदी करण्यासाठी वापरले आहेत याची पावती 30 दिवसाच्या आत अधिकृत पोर्टलवर जमा करणे गरजेचे आहे.
How to apply for vayoshri yojana 2024(योजनेचा अर्ज कसा करावा)-
- या योजनेचा अर्ज करण्यासाठी आपल्याला या मोबाईल ॲप्लिकेशनचा इन्स्टॉल करणे गरजेचे आहे.
- त्यासाठी आपल्याला प्ले स्टोर वर जायचे आहे व प्ले स्टोर वर “ALIMCO Mitra” असे टाईप करायचे आहे.
- आता एप्लीकेशन इन्स्टॉल झाल्यानंतर आपल्याला न्यू रजिस्ट्रेशन बटन वर क्लिक करायचे आहे.
- आता आपल्यासमोर एक रजिस्ट्रेशन फॉर्म ओपन होईल त्यात आपल्याला आपली सर्व इन्फॉर्मेशन व्यवस्थित भरायची आहे जसे की आपले नाव, वडिलांचे नाव, आधार कार्ड नंबर, मोबाईल नंबर, राज्य, जिल्हा, पत्ता.
- आता आपल्याला रजिस्टर या बटनवर क्लिक करायचे आहे.
- वरती दिलेली सर्व कागदपत्रे आपल्याला याबरोबर अपलोड करायचे आहेत.
- खाली एक कॅपचा असेल त्यावर आपल्याला क्लिक करायचे आहे.
- अशाप्रकारे आपले रजिस्ट्रेशन पूर्ण होईल आता आपल्याला सबमिट बटन वर क्लिक करायचे आहे.
- अतिशय सोप्या पद्धतीने घरबसल्या आपण या योजनेचा लाभ घेऊ शकता.
निष्कर्ष :-
मित्रांनो, तुम्हाला आम्ही दिलेली वयोश्री योजना या योजनेबद्दलची माहिती कशी वाटली याबद्दल तुम्ही आम्हाला लेखाच्या खाली कमेंट करून कळवू शकता तसेच आमच्यासाठी काही सूचना असतील त्याही तुम्ही आम्हाला सुचवू शकता अशाच सरकारी योजना संबंधी अपडेटेड माहिती मिळवण्यासाठी आमच्या योजना गॅरंटी डॉट कॉम (yojnaguarantee.com) या संकेतस्थळाला भेट देत राहा धन्यवाद|
FAQ :-
१. वयोश्री योजना योजनेचा अर्ज कसा करावा ?
उत्तर-ALIMCO Mitra या एप्लीकेशन वर जाऊन आपल्याला आपल्या योजनेचा अर्ज करायचा आहे.
२. वयोश्री योजना या योजनेचा ऑनलाइन अर्ज करायचा असल्यास अधिकृत संकेतस्थळ कोणते?
उत्तर- https://www.india.gov.in/spotlight/rashtriya-vayoshri-yojana
३.वयोश्री योजना कोणत्या राज्यामध्ये लागू आहे?
उत्तर-या योजनेचा लाभ आपल्या महाराष्ट्र राज्यातील वयोवृद्ध घेऊ शकतात.
४. वयोश्री योजनाचे लाभार्थी कोण आहेत ?
उत्तर-आपल्या घरात किंवा आसपास जी 65 वर्षापेक्षा जास्त वयोवृद्ध नागरिक आहेत ते या योजनेचा लाभ घेऊ शकतात.
हे देखील वाचा :-
योजना प्रत्येक ज्येष्ठ नागरिकाला आपल्या उतरत्या वयात जीवन सुकर व्हाव म्हणून महाराष्ट्र सरकारने आणली आहे मुख्यमंत्री वयोश्री योजना. {Mukhyamantri Vayoshri Yojna}
शेतकऱ्यानच्या फायद्या साठी वाचा. किसान सन्मान निधी योजना | {Kisan Sanman Nidhi Yojna}
आपल्या लाडक्या लेकीच्या उज्वल भविष्यासाठी जाणून घ्या सुकन्या समृद्धी योजना। {Sukanya Samrudhi Yojna}
जर तुम्ही बेरोजगार असाल तर तुम्ही बेरोजगार भत्ता योजनेचा लाभ घेऊ शकता. अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी बेरोजगार भत्ता अर्ज कसा करावा हे वाचा.{Berojgar Bhatta yojna arj ksa karava}
महिलांना व्यवसाय स्थापन करण्यासाठी प्रोत्साहन पर योजना म्हणजेच महिला समृद्धी कर्ज योजना, अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी या योजनेवर क्लिक करा. {Pm pik vima yojna 2024}
आपल्याला आपल्या हक्काचे घर मिळणार रमाई आवास घरकुल योजना अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी या योजनेवर क्लिक करा. {Ramai Awas Gharkul Yojna}
मुलीच्या उज्ज्वल भविष्यासाठी शासन घेऊन आले आहे लेक लाडकी योजना. {LEK LADKI YOJNA}
गर्भवती महिलांना पोषक आहार मिळावा यासाठी सरकार देते रोख रक्कम त्याकरिता वाचा व अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी या योजनेवर क्लिक करा जननी सुरक्षा योजना.
व्यवसाय सुरु करण्यासाठी सरकार देत आहे बिनव्याजी कर्ज वाचा व अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी या योजनेवर क्लिक करा अण्णासाहेब पाटील कर्ज योजना.