Tractor Anudan Yojana 2024 ( ट्रॅक्टर अनुदान योजना २०२४)
आपला भारत देश कृषी प्रधान देश म्हणून ओळखला जातो.आता आपल्या देशात आधुनिक पद्धतीने शेती केली जाते पूर्वीच्या काळी नांगरण्यासाठी बैलांचा वापर केला जायचा .आता बैलांचे हे कष्ट वाचविण्यासाठी आधुनिक पद्धतीने शेतकरी ट्रॅक्टरचा वापर करतात .सर्व शेतकऱ्यांना ट्रॅक्टरचा खर्च परवडत नाही यावर पर्याय म्हणून आपले राज्य सरकार ट्रॅक्टर योजना घेऊन आली आहे .या योजनेअंतर्गत आपल्या शेतकरी बांधवांना 1.25 लाख रुपयांचे अनुदान दिले जाते.
या ट्रॅक्टरचा वापर करून शेतकरी अत्यंत कमी वेळेत आपली नांगरणी ,पेरणी करू शकतात. यामुळे शेतकऱ्यांचे कष्ट देखील वाचणार आहेत. या योजने अंतर्गत 8 hp ते 70 ट्रॅक्टरटर साठी 50 % अनुदान दिले जाते. या योजनेचा उपयोग आपल्या राज्यातील सर्व शेतकरी बांधवांना होणार आहे. या योजनेअंतर्गत शेती व्यवसाय करायला प्रोत्साहन देणे हा आपल्या शासनाचा उद्देश आहे या योजनेअंतर्गत 60% केंद्र सरकार तर 40% राज्य सरकार मदत करते. ट्रॅक्टर योजनेअंतर्गत मिळणारा लाभ शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केला जातो .ट्रॅक्टरच्या वापरामुळे अतिशय गतीने शेती नांगरून होणार आहेत. या योजनेसाठी आपण ऑनलाइन आणि ऑफलाईन दोन्ही पद्धतीने अर्ज करू शकतो,
माझी वाचकास विनंती आहे की हा लेख आपण शेवटपर्यंत वाचावा जेणेकरून आपल्याला या योजनेची उद्दिष्टे ,यासाठी लागणारी कागदपत्रे व अर्ज कसा करावा या सर्व गोष्टींची सविस्तर माहिती मिळेल.
ट्रॅक्टर अनुदान योजना २०२४ ची ठळक मुद्दे :- {Tractor Anudan Yojana 2024 }
ट्रॅक्टर अनुदान योजना २०२४ ची ठळक मुद्दे :- {Tractor Anudan Yojana 2024 } याची ठळक मुद्दे आम्ही तुम्हाला येथे देत आहोत या मुद्द्यांमुळे तुम्हाला या योजनेत काय महत्त्वाचं आहे ते समजणार आहे व तुम्हाला योग्य दिशा या योजनेचा लाभ घेण्यासाठी मिळेल अशी आशा करतो.
योजनेचे नाव | Tractor Anudan Yojana 2024 ( ट्रॅक्टर अनुदान योजना २०२४) |
योजना कोणा व्दारा सुरु झाली {Started By Whom} | महाराष्ट्र सरकार {Government of maharashtra} |
लाभार्थी {Beneficiary} | आपले शेतकरी बांधव |
योजने अंतर्गत काय फायदा होणार आहे | राज्यातील शेतकर्यांना ट्रॅक्टर खरेदीसाठी १.२५ लाखाचे अनुदान मिळणार |
अधिकृत वेबसाईट {Authorized Website} | Tractor Anudan Yojana 2024 ( ट्रॅक्टर अनुदान योजना २०२४) |
अर्ज करण्याची पद्धत {Process of Application} | ऑनलाईन / ऑफलाईन |
योजनेसाठीचा हेल्प लाईन नंबर | 1800-120-8040 |
ट्रॅक्टर अनुदान योजना २०२४ या योजनेची उद्दिष्टे(Purpose of Tractor Anudan Yojana Maharastra 2024 ):-
- सरकारच्या ट्रॅक्टर योजना या योजनेमुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्नामध्ये वाढ होणार आहे.
- अंग मेहनत कमी लागल्यामुळे शेतकरी आपले आरोग्य सुधारण्याकडे कल देऊ शकतात.
- या योजनेअंतर्गत आधुनिक पद्धतीने शेती करण्यासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहन मिळणार आहे.
- 1.25 लाख इतक्या अनुदानामुळे शेतकऱ्याचे आर्थिक सक्षमीकरण होण्यास मदत होणार आहे.
- शेती व्यवसायाकडे प्रमुख धंदा म्हणून बघण्याचा तरुणाईचा कल या योजनेअंतर्गत वाढणार आहे.
- शेतकऱ्यांच्या कामाला जलद गती ट्रॅक्टर अनुदान योजना या योजनेअंतर्गत मिळणार आहे.
ट्रॅक्टर अनुदान योजना २०२४ या योजनेच्या नोंदणीसाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे (Tractor Anudan Scheme 2024 Documents) :-
ट्रॅक्टर अनुदान योजनेसाठी खालील कागदपत्रे आवश्यक आहेत-
- आधार कार्ड (Aadhar card)
- रेशन कार्ड (Ration card)
- रहिवासी दाखला (Domicile certificate)
- अर्जदाराचे जमिनीचा सात बारा (7/12)
- अर्जदाराच्या जमिनीचा अट अ (8A)
- मोबाईल नंबर (Mobile no)
- ई-मेल आयडी (Email-id)
- पासपोर्ट साईजचेे दोन फोटो (passport size photos)
- स्वयंघोषित प्रतिज्ञापत्र (Affidavit)
- जातीचा दाखला (cast certificate)
ट्रॅक्टर अनुदान योजना २०२४ या योजनेची पात्रता(Eligibility of Tractor Anudan Yojana Maharastra 2024 ):-
- अर्जदार महाराष्ट्राचा रहिवासने असणे आवश्यक आहे.
- कुटुंबातील एकाच सदस्याला या योजनेचा लाभ घेता येईल.
- अर्जदाराने केंद्र सरकार किंवा राज्य सरकारकडून ट्रॅक्टर साठी अनुदान घेतलेले असेल तर या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना लाभ घेता येणार नाही.
- शेतकरी बांधवाकडे आपल्या जमिनीचा ७/१२ व ८ अ असणे आवश्यक आहे.
ट्रॅक्टर अनुदान योजना २०२४ योजनेअंतर्गत कसे अनुदान दिले जाईल:-
ट्रॅक्टर ची कॅपीसीटी | किती टक्के अनुदान मिळणार | किती रुपये अनुदान मिळणार |
8 HP ते 20 HP | 40 % अनुदान | 75,000 /- रुपये |
20 HP ते 40 HP | 45 % अनुदान | 1,00,000 /- रुपये |
40 HP ते 70 HP | 50 % अनुदान | 1,25,000 /- रुपये |
ट्रॅक्टर अनुदान योजना २०२४ या योजनेची अर्ज प्रक्रिया (How to apply for Tractor Anudan Yojana Maharastra 2024) :-
आपल्या ज्या शेतकरी बांधवांना ट्रॅक्टर योजनेचा अर्ज भरायचा आहे त्यांना ऑनलाईन व ऑफलाइन या दोन्ही पद्धतीने अर्ज भरता येईल व या योजनेचा लाभ घेता येईल.
- ऑनलाईन
आता बघुयात ऑनलाईन पद्धतीने आपण अर्ज कसा भरू शकतो.
- अर्जदाराला खाली लिंक वर क्लिक करायचे आहे.
- आपल्यासमोर आता एक नवीन पेज ओपन झालेली असेल तेथे आपल्याला नवीन अर्जदार नोंदणी यावर क्लिक करायचे आहे.
- आता आपल्यासमोर एक नवीन पेज ओपन होईल.
- आपल्याला आपली सर्व माहिती भरायची आहे व आपल्याला रजिस्टर करायच आहे या प्रक्रियेद्वारे आपल्याला आपले युजरनेम व पासवर्ड मिळेल.
- आता आपल्याला युजरनेम व पासवर्ड टाकून लॉगिन वर क्लिक करायचे आहे.
- आता आपल्याला अधिकृत वेबसाईटवर जाऊन कृषी विभाग या विभागात जायचे आहे.
- आता आपल्याला ट्रॅक्टर अनुदान योजने यावर क्लिक करायचे आहे.
- आता इथे आपल्याला आपली सर्व माहिती भरायची आहे जसे की नाव, पत्ता, ई-मेल आयडी अन खात्याचा नंबर आता आपल्याला सर्व कागदपत्रे अपलोड करायची आहेत.
अशाप्रकारे आपण आपला ऑनलाइन फॉर्म भरू शकतो व या योजनेचा लाभ घेऊ शकतो.
- ऑफलाईन
आता बघूया ऑफलाइन फॉर्म कसा भरता येईल.
- या योजनेचा ऑफलाईन फायदा घेण्यासाठी आपल्याला आपल्या जिल्ह्यातील जिल्हा कार्यालयातील कृषी विभागात जायचे आहे.
- कृषी विभागातून आपल्याला ट्रॅक्टर अनुदान साठी मिळणारा अर्ज घ्यायचा आहे.
- आता आपल्याला या अर्जाची प्रत व वरती दिलेली सर्व कागदपत्रे जोडायची आहेत.
- व्यवस्थित भरलेला अर्ज व कागदपत्रे आपल्याला कृषी विभागात जमा करायची आहेत.
- आता आपल्याला इथून संबंधित अधिकाऱ्याकडून एक पोहोच पावती घ्यायची आहे ज्याचा वापर आपल्याला भविष्यात होणार आहे.
अशाप्रकारे आपण आपला ट्रॅक्टर अनुदानासाठी ऑफलाइन अर्ज करू शकतो.
निष्कर्ष :-
Tractor Anudan Yojana 2024 , आम्ही तुम्हाला परिपूर्ण माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे, यामध्ये या योजनेविषयी थोडक्यात माहिती, त्याचे ठळक मुद्दे, योजनेची पात्रता, योजनेचे फायदे, योजनेच्या अटी व शर्ती, योजनेसाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे, आणि ऑनलाईन अर्ज कसा करावा , असा हा परिपूर्ण लेख आम्ही तुमच्यासाठी सादर करत आहोत तो तुम्ही शेवटपर्यंत वाचल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद।
मित्रांनो तुम्हाला आम्ही दिलेल्या मनोधैर्य योजना २०२४ योजनेबद्दल ची माहिती कशी वाटली याबद्दल तुम्ही आम्हाला लेखाच्या खाली कमेंट करून कळवू शकता तसेच आमच्यासाठी काही सूचना असतील त्याही तुम्ही आम्हाला सुचवू शकता अशाच सरकारी योजना संबंधी अपडेटेड माहिती मिळवण्यासाठी आमच्या योजना गॅरंटी डॉट कॉम (yojnaguarantee.com)या संकेतस्थळाला भेट देत राहा धन्यवाद.
FAQ-
१. ट्रॅक्टर अनुदान योजना या ओजाने अंतर्गत किती अनुदान मिळते?
उत्तर-या योजने अंतर्गत आपल्या शेतकरी बांधवाना १.२५ लाख रुपये अनुदान मिळते.
हे देखील वाचा :-
योजना प्रत्येक ज्येष्ठ नागरिकाला आपल्या उतरत्या वयात जीवन सुकर व्हाव म्हणून महाराष्ट्र सरकारने आणली आहे मुख्यमंत्री वयोश्री योजना. {Mukhyamantri Vayoshri Yojna}
शेतकऱ्यानच्या फायद्या साठी वाचा. किसान सन्मान निधी योजना | {Kisan Sanman Nidhi Yojna}
आपल्या लाडक्या लेकीच्या उज्वल भविष्यासाठी जाणून घ्या सुकन्या समृद्धी योजना। {Sukanya Samrudhi Yojna}
जर तुम्ही बेरोजगार असाल तर तुम्ही बेरोजगार भत्ता योजनेचा लाभ घेऊ शकता. अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी बेरोजगार भत्ता अर्ज कसा करावा हे वाचा.{Berojgar Bhatta yojna arj ksa karava}
महिलांना व्यवसाय स्थापन करण्यासाठी प्रोत्साहन पर योजना म्हणजेच महिला समृद्धी कर्ज योजना, अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी या योजनेवर क्लिक करा. {Pm pik vima yojna 2024}
आपल्याला आपल्या हक्काचे घर मिळणार रमाई आवास घरकुल योजना अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी या योजनेवर क्लिक करा. {Ramai Awas Gharkul Yojna}
मुलीच्या उज्ज्वल भविष्यासाठी शासन घेऊन आले आहे लेक लाडकी योजना. {LEK LADKI YOJNA}
गर्भवती महिलांना पोषक आहार मिळावा यासाठी सरकार देते रोख रक्कम त्याकरिता वाचा व अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी या योजनेवर क्लिक करा जननी सुरक्षा योजना. {Pm pik vima yojna 2024}
व्यवसाय सुरु करण्यासाठी सरकार देत आहे बिनव्याजी कर्ज वाचा व अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी या योजनेवर क्लिक करा अण्णासाहेब पाटील कर्ज योजना. {Pm pik vima yojna 2024}