Site icon yojanaguarantee.com

सुकन्या समृद्धी योजना। Sukanya Samrudhi Yojna। Bharat Sarkar।Women Empowerment.

Sukanya Samrudhi Yojna

।। श्री जन्म तुझी कहाणी
हृदयी पान्हा नयनी पाणी ।।

आजच्या आधुनिक काळात महिला सक्षमीकरण हा विशेष चर्चेचा विषय बनला आहे. आपल्या जुन्या ग्रंथांमध्ये सुद्धा स्त्रियांचे महत्त्व सांगण्यात आले आहे ते एका श्लोकात मी तुम्हाला सांगू इच्छितो “यत्र नार्यस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र देवता:” अर्थात जिथे स्त्रियांची पूजा केली जाते, तिथे देवता वास करतात.

सुकन्या समृद्धी योजना का आणली गेली :

स्री ही सृष्टीची शक्ती आहे असे आपण पूर्वी पासून मानत आलो आहोत , म्हणजेच मानव जातीचे अस्तित्व स्त्रीपासून आहे असे मानले जाते. महिला सक्षमीकरणाचा अर्थ या शक्तीचा विकास करणे आणि तिला सामाजिक, आर्थिक, राजकीय न्याय, विचार स्वातंत्र्य, श्रद्धा, धर्म आणि उपासना, यात संधीची समानता प्रदान करणे आहे होय.

महिला सक्षमीकरण म्हणजे महिलांची सामाजिक आणि आर्थिक स्थिती सुधारणे. त्यातून त्यांना रोजगार, शिक्षण आणि आर्थिक प्रगतीच्या समान संधी मिळतील, त्यांना सामाजिक स्वातंत्र्य मिळेल आणि त्यांची उत्तरोत्तर प्रगती होत जाईल. हाच मार्ग आहे ज्याच्याद्वारे स्त्रिया पुरुषांप्रमाणे त्यांच्या प्रत्येक इच्छा व आकांक्षा पूर्ण करू शकतील.

शिक्षणाच्या बाबतीतही भारतातील महिला पुरुषांपेक्षा खूप मागे आहेत. तशी आता आपण काही आकडेवारी बघूयात, भारतातील पुरुषांचा शिक्षणाचा दर 81.3 टक्के आहे, तर महिलांचा शिक्षणाचा दर फक्त 60.6 टक्के आहे, जो पुरुषांच्या प्रमाणात फार कमी आहे.

भारत सरकार महिलांच्या सक्षमीकरणासाठी विविध योजना घेऊन येत असते जसे की बेटी पढाव बेटी बचाओ, माझी कन्या भाग्यश्री, मनोधैर्य योजना इत्यादी. अशा अनेक प्रकारच्या योजना सरकार घेऊन येत असते या सर्व गोष्टींचा विचार करून भारत सरकार नवजात कन्येच्या पालकांसाठी ही योजना घेऊन आले आहे. ही योजना नवजात कन्येच्या पालकांना त्यांच्या मुलीच्या लग्न व शिक्षण या दोन गोष्टींसाठी पैसे जमा करण्याचे प्रोत्साहन देते.

सुकन्या समृद्धी योजना केव्हा आणली गेली :

सुकन्या समृद्धी योजना ही वित्त मंत्रालयाद्वारे सुरू केली गेलेली महत्त्वाच्या योजनांपैकी एक अशी विशेष योजना आहे, जी नवजात कन्येच्यासाठी सुरू केली गेलेली छोटी गुंतवणुनिकीची योजना आहे.

या योजनेचे पंतप्रधान नरेंद्र मोदींद्वारे दि. २२ जानेवारी २०१५ ला उद्घाटन केले गेले. सध्या या योजनेवर मिळणारे व्याज हे ८.६% इतके आहे. या योजनेत करलाभ देखील मिळतो. हे खाते कोणत्याही डाक कार्यालयात किंवा कोणत्याही अधिकृत बँकेच्या शाखेत उघडता येते.

भारतीय टपाल कार्यालय व 25 राष्ट्रीयकृत बँकांना भारतात सुकन्या समृद्धी योजनेचे खाते उघडण्याची परवानगी देण्यात आली. सुकन्या समृद्धी योजनेचे खाते उघडण्याची प्रक्रिया अगदी सोपी आणि सरळ आहे.

सुकन्या समृद्धी योजनेची सविस्तर माहिती :

मुलींना ओझे समजू नका आणि त्यांच्या जन्मावर निराश ही होऊ नका, कारण कुटुंब नावाची संस्था ही मुलींशिवाय अस्तित्वात असू शकत नाही आणि ती निर्माण ही होऊ शकत नाही, हा संदेश देऊन आपल्या देशाचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी बेटी बचाव बेटी पढाओ अभियानांतर्गत सुकन्या समृद्धी योजना पारित केली, हि योजना मुलींचे शिक्षण व त्यांचे लग्न यांना येणारा खर्च, त्यांचे पालक सहजासहजी उपलब्ध करू शकतील हा उद्देश ठेवून पारित केली गेली.या आगळ्या वेगळ्या अशा योजनेमध्ये खाते उघडणे आणि त्याचे फायदे घेणे हे खूप सोपे आहे.

या जाणून घेऊ आपण कसे उघडू शकतो आपल्या मुलीचे खाते या योजनेमध्ये,सुकन्या समृद्धी योजनेचे खाते हे कोणत्याही पोस्ट विभागात किंवा अधिकृत बँकेच्या शाखेमध्ये उघडू शकतो.

मुलीच्या जन्माच्यावेळी किंवा मुलगी दहा वर्षाची होईपर्यंत हे खाते आपण उघडू शकतो हे खाते उघडण्याच्या वेळी कमीत कमी एक हजार रुपये आणि एका वित्तीय वर्षामध्ये जास्तीत जास्त दीड लाख रुपये जमा करू शकता जर तुमच्या मुलीने ही योजना सुरू होण्यापूर्वी एक वर्ष अगोदर दहा वर्षाचे वय पूर्ण केले असेल तरी तुम्ही तुमच्या मुलीच्या नावे सुकन्या समृद्धी योजनेचे खाते सुरू करू शकता.

एका मुलीच्या नावे एकच खाते तुम्ही उघडू शकता. तुमच्या कुटुंबामध्ये जर दोन मुली असतील तर दोघींसाठी हे खाते तुम्ही उघडू शकता, एका कुटुंबामध्ये दोन पेक्षा अधिक खाते तुम्ही उघडू शकत नाही पण एका विपरीत स्थितीमध्ये जसे की तुमच्या घरी जुळी जुळींचा जन्म झाला असेल तर तसे प्रमाणपत्र बनवून घेऊन तुम्ही तिसरे खाते एका कुटुंबामध्ये उघडू शकता. मुलगी दहा वर्षाची होपर्यंत तुम्ही ते खाते संचलित करू शकता त्यानंतर खातेधारक स्वतः त्याचे संचलन करू शकते,

तुम्ही हे खाते देशभरातील कुठल्याही बँकेमध्ये किंवा देशभरातील कुठल्याही पोस्टामध्ये स्थानांतरित करू शकता त्यासाठी कोणतीही बंधने असणार नाहीत.
तुम्ही खाते उघडल्यानंतर 14 वर्षापर्यंत तुम्हाला या खात्यामध्ये कमीत कमी रक्कम करावी लागेल जर कमीत कमी रक्कम जमा करण्यामध्ये तुम्ही अयशस्वी राहिलात तर कमीत कमी रक्कमेसह पन्नास रुपये दंड आकारला जाईल.

सुकन्या समृद्धी योजनेचे खाते हे लाभार्थीचे वय 21 वर्षे पूर्ण झाल्यानंतर हे खाते परिपक्व होईल.
मुलीचे वय 18 वर्षे पूर्ण झाल्यानंतर जमा झालेल्या रकमेतून 50 टक्के रक्कम मुलीच्या शिक्षणासाठी तुम्ही काढू शकता असे याच्यासाठी केले आहे की मुलीचे लग्न अठरा वर्षाच्या अगोदर होऊ नये हेच या योजनेचे उद्दिष्ट आहे.
या खात्यामध्ये जमा झालेली संपूर्ण रक्कम आणि व्याजाची रक्कम खात्याला 21 वर्षे पूर्ण झाल्यानंतरच आपण काढू शकता.

जर मुलीचा विवाह 21 वर्षाच्या अगोदर झाला असेल तर मुलीच्या विवाहनंतर हे खाते चालू ठेवण्याची परवानगी असणार नाही.तेच, जर मुलीचा विवाह होण्यापूर्वी 21 वर्षाच्या अगोदर मुलीचा मृत्यू झाला असेल तर हे खाते बंद केले जाईल व जमा झालेली रक्कम व व्याज तुम्हाला काढता येईल. सुकन्या समृद्धी योजना ही याच्यासाठी महत्त्वपूर्ण आहे यामध्ये सरकारने चांगल्या व्याजदराची घोषणा केलेली आहे.

सुकन्या समृद्धी योजनेचे फायदे : Benefits

यात चांगली गोष्ट ही आहे की मुलगी 21 वर्षे पूर्ण होण्याअगोदर या योजनेच्या खात्यातून पैसे काढता येऊ शकत नाहीत पण मुलीच्या शिक्षणासाठी गरज असेल तर अठरा वर्षानंतर काही रक्कम काढता येऊ शकते या रकमेवरती आयकर नियम 80 सीनुसार कर लागत नाही .

सुकन्या समृद्धी योजनेसाठी लागणारी आवश्यक कागदपतत्रे: Required necessary documents for Sukanya Samriddhi Yojana :

योजनेसाठी अर्ज कसा करावा:

तुम्ही सुकन्या समृद्धी योजनेसाठी कोणत्याही अधिकृत बँक शाखेमध्ये जाऊन किंवा कुठल्याही पोस्टात जाऊन सुकन्या समृद्धी योजनेत खाते उघडू शकता तसेच तुम्ही तुमची नेट बँकिंग सुविधा वापरून सुद्धा ऑनलाईन सुकन्या समृद्धी योजनेचे खाते उघडू शकता, हे खाते उघडण्यासाठी तुम्हाला आवश्यक आहे सुकन्या समृद्धी योजनेचा अर्ज आणि त्या अर्जाची लिंक मी तुम्हाला इथे खाली देत आहे.

online अर्जा साठी या लिंक वर क्लिक करा “सुकन्या समृद्धी योजना

सुकन्या समृद्धी योजनेसाठीची पात्रता ,अटी व शर्ती :

सुकन्या समृद्धी योजनेमुळे स्त्रियांच्या जीवनामध्ये सामाजिक आर्थिक व शैक्षणिक काय बदल होऊ शकतात :

सामाजिक बदलांमुळे समाजात स्त्रियांकडे बघण्याची मानसिकता बदलेल कारण स्त्री सक्षम असेल आणि सक्षम अशी स्त्री सामाजिक जडणघडणीमध्ये खूप महत्त्वाची भूमिका निभावेल.

आर्थिक बदलांमुळे स्त्री ही स्वतःच्या पायावर उभा असेल, व तिची निर्णय क्षमता स्वतःच्या पायावर उभा असल्यामुळे भक्कम असेल त्यामुळे ती एक चांगलं कुटुंब, चांगले राज्य, आणि चांगला देश घडवू शकते.

शैक्षणिक बदलामुळे स्त्रीला पुरुषांच्या बरोबरीने ज्ञान ग्रहण करता येईल व जीवनाच्या विविध स्तरांमध्ये अग्रेसर राहता येईल.

FAQ’S :

  1. सुकन्या समृद्धी योजना काय आहे?

Answer : सुकन्या समृद्धी योजना ही नवजात कन्येच्या पालकांसाठी भारत सरकारने सुरू केलेली योजना आहे.

  1. सुकन्या समृद्धी योजनेसाठी अर्ज कुठे करावा?

Answer : सुकन्या समृद्धी योजनेसाठी जवळच्या कुठल्याही अधिकृत बँकेच्या शाखेत व पोस्टामध्ये जाऊन तुम्ही अर्ज करू शकता व तुमच्या नेट बँकिंग चा उपयोग करून ऑनलाईन सुद्धा अर्ज करू शकता.

  1. सुकन्या समृद्धी योजनेसाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे कोणती?

Answer :
मुलीच्या जन्माचा दाखला
रहिवासी दाखला
ओळखपत्र

  1. सुकन्या समृद्धी योजनेची सुरुवात करताना किती पैसे भरावे लागतात?

Answer : सुकन्या समृद्धी योजनेत खाते उघडण्याच्या वेळी कमीत कमी एक हजार रुपये आणि एका वित्तीय वर्षामध्ये जास्तीत जास्त दीड लाख रुपये जमा करू शकता.

  1. सुकन्या समृद्धी योजनेत एकूण किती रक्कम आणि ती किती वर्षे भरावी लागते?

Answer : सुकन्या समृद्धी योजनेत खाते उघडण्याच्या वेळी कमीत कमी एक हजार रुपये आणि एका वित्तीय वर्षामध्ये जास्तीत जास्त दीड लाख रुपये जमा करू शकता. व ती रक्कम पंधरा वर्षे तुम्हाला भरावी लागणार अशी प्रत्येक वर्षाला दीड लाख पेक्षा जास्त असू नये एवढी रक्कम प्रत्येक वर्षी तुम्हाला जमा करावी लागणार.

हे देखील वाचा :-


योजना प्रत्येक ज्येष्ठ नागरिकाला आपल्या उतरत्या वयात जीवन सुकर व्हाव म्हणून महाराष्ट्र सरकारने आणली आहे मुख्यमंत्री वयोश्री योजना. {Mukhyamantri Vayoshri Yojna}


शेतकऱ्यानच्या फायद्या साठी वाचा. किसान सन्मान निधी योजना | {Kisan Sanman Nidhi Yojna}


आपल्या लाडक्या लेकीच्या उज्वल भविष्यासाठी जाणून घ्या सुकन्या समृद्धी योजना। {Sukanya Samrudhi Yojna}


जर तुम्ही बेरोजगार असाल तर तुम्ही बेरोजगार भत्ता योजनेचा लाभ घेऊ शकता. अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी बेरोजगार भत्ता अर्ज कसा करावा हे वाचा.{Berojgar Bhatta yojna arj ksa karava}


महिलांना व्यवसाय स्थापन करण्यासाठी प्रोत्साहन पर योजना म्हणजेच महिला समृद्धी कर्ज योजना, अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी या योजनेवर क्लिक करा. {Pm pik vima yojna 2024}


आपल्याला आपल्या हक्काचे घर मिळणार रमाई आवास घरकुल योजना अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी या योजनेवर क्लिक करा. {Ramai Awas Gharkul Yojna}


मुलीच्या उज्ज्वल भविष्यासाठी शासन घेऊन आले आहे लेक लाडकी योजना. {LEK LADKI YOJNA}


गर्भवती महिलांना पोषक आहार मिळावा यासाठी सरकार देते रोख रक्कम त्याकरिता वाचा व अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी या योजनेवर क्लिक करा  जननी सुरक्षा योजना. {Sukanya Samrudhi Yojna}


व्यवसाय सुरु करण्यासाठी सरकार देत आहे बिनव्याजी कर्ज वाचा व अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी या योजनेवर क्लिक करा अण्णासाहेब पाटील कर्ज योजना. {Sukanya Samrudhi Yojna}

Exit mobile version