महिला समृद्धी कर्ज योजनेची थोडक्यात माहिती :-
Mahila Samrudhhi Karj Yojna
नमस्कार, मित्रांनो तुमचे आमच्या योजना गॅरंटी डॉट कॉम या वेबसाईट वर स्वागत आहे, आपल्या देशामध्ये केंद्र सरकार आणि राज्य सरकार वेगवेगळ्या योजना घेऊन येतात त्यातलीच अशी एक योजना जी महिलांसाठी सरकार घेऊन आले आहे. महिलांच्या आर्थिक उत्थानासाठी केंद्र सरकारच्या सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभाग मार्फत बचत गटांसाठी महिला समृद्धी कर्ज योजना सरकार घेऊन आले आहे. ही योजना महिला व्यावसायिकांना प्रोत्साहन देण्यासाठी आणि त्यांच्यातील व्यावसायिक गुणाला चालना देण्यासाठी भारत सरकार राबवत आहे.
महिला समृद्धी योजना योजना महिला केंद्रित आहे आजच्या धावपळीच्या जीवनामध्ये महिला या पुरुषांना खांद्याला खांदा लावून जीवन जगत आहेत म्हणजे त्या सामाजिक जीवनामध्ये स्वतःच्या कुटुंबाला वेळ देऊन स्वतःचे करिअर त्या घडवत आहेत आणि आपल्या कुटुंबाला आर्थिक हातभार सुद्धा लावत आहेत त्यातून त्यांचा स्वतःचा आर्थिक विकास करून घेत आहेत आणि विशेष म्हणजे महिला या पुरुषांच्या तुलनेत काटकसरी असतात.
आज अशा खूप महिला बघायला मिळतात ज्या नोकरी करण्यापेक्षा स्वतःचा व्यवसाय सुरू करत आहेत मात्र पैशांच्या अभावामुळे त्यांना आपल्या इच्छा पूर्ण करण्यामध्ये अडसर निर्माण होत आहे त्यातच महिला समृद्धी कर्ज योजनेसारख्या योजना सरकार घेऊन आले आहे त्यामुळे त्या स्वतःचा व्यवसाय आज आत्मविश्वासाने थाटू शकत आहेत.
आज अनेक महिला एकत्र येताना दिसतात आणि स्वतःचा मिळून बचत गट तयार करत आहेत व अनेक क्षेत्रांमध्ये व्यवसाय करून अनेक बचत गट नाव रूपाला येत आहेत तसेच त्यांचे तसेच त्यांचे प्रॉडक्ट ही नावारूपाला येत आहेत या सर्वाचा विचार करून सरकार महिला बचत गटांसाठी महिला बचत गट कर्ज योजना घेऊन येत आहे बहुतेक महिलांना किंवा बहुतेक महिला बचत गटांना योजनेंविषयी माहिती नसते त्यासाठी आम्ही या महिलांनी नेमका अर्ज कोठे करावा, अर्ज कसा करावा, या योजनेची पात्रता काय, लोन किती मिळणार, कोणत्या व्यवसायासाठी मिळणार ही सर्व माहिती आपण या लेखात बघणार आहोत म्हणून हा लेख तुम्ही शेवटपर्यंत वाचा व ज्या महिलांना महिला बचत गटांना या माहितीची गरज आहे त्यांना तुम्ही शेअर करा, धन्यवाद.
Table of Contents
महिला समृद्धी कर्ज योजनेची ठळक मुद्दे :-
योजनेचे नाव | महिला समृद्धी योजना |
शासनाचा कोणता विभाग | केंद्र सरकारच्या सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभाग मार्फत |
बचत गटासाठी कमीत कमी किती महिलांचा समूह असावा. | 20 महिलांचा समूह असणाऱ्या बचत गटांना कर्ज देते. |
हि योजना कोणासाठी आहे. | मागासवर्गीय जाती आणि अनुसूचित जाती व जमाती |
बचत गटातील एका सदस्याला जास्तीत जास्त किती रक्कम या योजनेमधून मिळेल. | बचत गटातील एका सदस्याला जास्तीत जास्त एक लाख 40 हजार (१,४०,०००) |
बचत गटाला किती कर्ज या योजनेमधून मिळेल. | प्रत्येक बचत गटाला जास्तीत जास्त 15 लाख (१५,००,०००) इतके कर्ज मंजूर होऊ शकते |
ऑनलाइन अर्ज प्रक्रियेसाठी काय करावे. | महिला समृद्धी योजनेमध्ये कर्ज मिळवण्यासाठीची अर्ज प्रक्रिया NBCFDC च्या वेबसाईटवर उपलब्ध आहे |
अधिकृत संकेतस्थळ. | https://nsfdc.nic.in/en/mahila-samriddhi-yojana |
Mahila Samrudhhi Karj Yojna महिला समृद्धी कर्ज योजनेचा फायदा घेण्यासाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे :- (Documentation need to be submit to get Benefits of Mahila Samrudhhi Karj Yojna) :-
बचत गट शासकीय योजना
- अर्ज.
- जातीचे प्रमाणपत्र.
- राष्ट्रीय बँकेत खाते. (अर्जदार महिलेचे बँकेचे खाते हे स्वतःचे असले पाहिजे कुटुंबातील दुसऱ्याचे चालणार नाही.)
- आधार कार्ड.
- उत्पन्नाचा दाखला.
- पासपोर्ट आकाराचा फोटो.
- बचत गट ओळखपत्र.
- रहिवासी दाखला. (विजेचे बिल / रेशन कार्ड)
- ओळख पुरावा. (मतदान ओळखपत्र).
- जन्म दाखला.
- मोबाईल नंबर.
- ई-मेल आयडी.
- व्यवसाय प्रकल्पाचा अंदाजित खर्च.
- बचत गट पॅन कार्ड.
- महिला बचत गटातील सर्व महिलांची यादी.
- व्यवसायासाठी वापरत असलेल्या जागेचा पुरावा.
- बचत गट करत असलेल्या व्यवसायातून मिळणाऱ्या उत्पन्नाचा तपशील.
- सक्षम अधिकाऱ्याकडून प्रमाणित केलेली कागदपत्रे अर्जासोबत जोडलेली असावीत.
- मासिक वर्गणी जमा करत असल्याचे पुरावे सादर करावेत.
- बचत गटाच्या बँक खात्याचा तपशील खाते सुरू झाल्यापासून ते आत्तापर्यंत.
- अर्जासोबत बचत गटाच्या पदाधिकाऱ्यांचे पासपोर्ट आकाराचे फोटो जोडावेत.
- महिला बचत गटाच्या बँक खात्यात दहा हजार शिल्लक असले पाहिजे अथवा कर्ज किंवा गुंतवणूक केली असल्यास तसे पुरावे सादर करावेत.
Mahila Samrudhhi Karj Yojna महिला समृद्धी कर्ज योजनेच्या अटी व शर्ती :-
- सर्वप्रथम अर्जदार हा मागासवर्गीय जातीचा आणि अनुसूचित जातीचा असला पाहिजे तरच या योजनेसाठी पात्र राहील.
- मागासवर्गीय समाजामधील आणि अनुसूचित जाती मधील महिला उद्योजक आणि बचत गट या कर्ज योजने साठी पात्र असतील.
- लाभार्थी हे दारिद्र्यरेषेखालील असावेत.
- महिला अर्जदाराचे किमान वय 18 वर्षे ते जास्तीत जास्त पन्नास वर्ष यामध्ये असावे.
- अर्जदार महिला बचत गटातील सदस्य आहे याचा पुरावा सादर करणे आवश्यक आहे.
- ज्या बचत गटाला स्थापन होऊन दोन वर्ष पूर्ण झाली असतील अशाच बचत गटांना या योजनेचा लाभ देण्यात येईल.
- अर्ज करणाऱ्याचे कौटुंबिक उत्पन्न मर्यादा तीन लाखापेक्षा जास्त असू नये.
- अर्जदार बचत गटाचा सदस्य असू शकतो आणि या योजनेचे लाभार्थी हे 60% अनुसूचित जाती-जमाती मधून व उर्वरित 40% जसे की अपंग महिला ,अल्पसंख्यांक यांमधून असावे.
- महिला समृद्धी योजनेसाठी अर्ज करणाऱ्या महिलेची गुन्हेगारी पार्श्वभूमी असू नये.
Mahila Samrudhhi Karj Yojna महिला समृद्धी योजना 2024 या योजनेचे लाभ :-
(Benefits of Mahila Samrudhhi Karj Yojna :-
महिला बचत गट कर्ज योजना
- ही योजना आल्यापासून या योजनेमुळे बहुतेक महिलांना व्यवसाय स्थापन करण्यासाठी मायक्रोफायनान्स या पद्धतीने मदत होत आहे. या योजनेचे वेगवेगळे लाभ आणि आणि या योजनेची असणारी विशेषता यामुळे ही योजना महिलांमध्ये जास्त आकर्षक बनली आहे.
- महिला समृद्धी योजना महिला व्यवसायिकांना आत्मनिर्भर बनण्याची संधी देत आहे.
- सामाजिक आणि आर्थिक परिस्थितीने मागासलेल्या कुटुंबांना आर्थिक सक्षम बनवण्यामध्ये मदत करते.
- कमीत कमी डॉक्युमेंटेशन आणि सोपी अर्ज प्रक्रिया यामुळे ही योजना अर्ज करण्यासाठी सोपी आहे.
- सामाजिक दृष्ट्या मागास समाजामधील महिलांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यात मदत करत आहे ही योजना.
- ही योजना 20 महिलांचा समूह असणाऱ्या बचत गटांना कर्ज देते.
- एका लाभार्थी महिलेला जास्तीत जास्त एक लाख 40 हजार कर्ज मिळते.
- महिला समृद्धी योजनेमुळे मिळणारे लाभ अशा प्रकारचे आहेत.
- या योजनेमुळे ग्रामीण भागातील महिलांची आर्थिक स्थिती सुधारण्यात मदत होत आहे.
- या योजनेमुळे बीपीएल म्हणजे आर्थिक दारिद्र्यरेषेखालील कुटुंबांचे या योजनेमुळे त्यांच्या आर्थिक परिस्थितीत सुधारणा होत आहेत.
- या योजनेमुळे महिलांमध्ये एकीची भावना वाढीस लागत आहे व मिळून काम करण्याची भावना वाढत आहे.
- ही एक सरळ सोपी आणि साधी अर्ज प्रक्रिया आहे.
Mahila Samrudhhi Karj Yojna
महिला समृद्धी योजनेमार्फत किती कर्ज मिळेल :-
या योजनेमार्फत महिलांना बचत गटाच्या माध्यमातून कर्ज दिले जाईल आणि प्रत्येक बचत गटाला जास्तीत जास्त 15 लाख (१५,००,०००) इतके कर्ज मंजूर होऊ शकते तसेच प्रत्येक लाभार्थ्याला म्हणजेच बचत गटातील एका सदस्याला जास्तीत जास्त एक लाख 40 हजार (१,४०,०००) ही रक्कम दिली जाईल व बचत गटांसाठी एक अट अशी आहे की बचत गटातील सदस्यांची संख्या 20 इतकी असावी.
Mahila Samrudhhi Karj Yojna
महिला समृद्धी योजनेसाठी ऑफलाइन अर्ज कसा करावा :-
- महिला समृद्धी योजनेमध्ये अर्ज करण्याची पद्धत फार साधी सरळ आणि सोपी आहे. लाभार्थ्यांनी अर्ज करताना अर्जासोबत लागणारी सर्व आवश्यक कागदपत्रे त्या अर्जाला जोडावीत आणि केंद्र सरकारच्या सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागाच्या जिल्हा कार्यालयात जाऊन तो अर्ज सादर करावा.
- सर्वप्रथम अर्जदाराने आपल्या नजीकच्या जिल्हा कार्यालयाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागात जाऊन महिला समृद्धी कर्ज योजनेचा अर्ज घ्यायचा आहे.
- त्यानंतर अर्जात विचारलेली सर्व माहिती योग्य रीतीने भरून लागणारी आवश्यक कागदपत्रे जोडून तो अर्ज तिथे जमा करायचा आहे व अर्ज जमा केल्याची पावती घ्यायची आहे, अशाप्रकारे ऑफलाईन अर्ज प्रक्रिया पूर्ण झालेली आहे.
Mahila Samrudhhi Karj Yojna
महिला समृद्धी योजनेसाठी ऑनलाइन अर्ज कसा करावा :-
- महिला समृद्धी योजनेमध्ये कर्ज मिळवण्यासाठीची अर्ज प्रक्रिया NBCFDC च्या वेबसाईटवर उपलब्ध आहे, योजनेमध्ये अर्ज करण्यासाठी लागणारा अर्ज तुम्ही राष्ट्रीयकृत बँक तसेच आर आर बी मधून प्राप्त करू शकता आणि तो भरून देऊन तिथेच तुम्हाला जमा करायचा आहे .
- अर्ज भरताना तुमचा व्यवसाय तसेच तुम्ही केलेल्या प्रशिक्षण यांचा सर्व तपशील भरून द्यावा, अर्जाची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी अर्जदाराला अर्जासोबत लागणारी सर्व आवश्यक कागदपत्रे जमा करावी लागतील.
- NBCFDC च्या वेबसाईटवर रजिस्टर करून ऑनलाईन अर्ज जमा करता येतो त्यानंतर तुमचा अर्ज तुम्ही राहत असलेल्या राज्य म्हणजे जिल्ह्या च्या संबंधित बँकेला ला पाठवला जाईल. त्यानंतर अधिक माहितीसाठी बँक तुम्हाला संपर्क करेल.
- महिला समृद्धी योजनेची ऑनलाईन अर्ज प्रक्रिया तुम्हाला खाली देत आहोत.
- महिला समृद्धी योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर जा.
- तिथे अर्ज डाऊनलोड करा.
- तो अर्ज काळजीपूर्वक भरा आणि लागणारे कागदपत्रे त्याला जोडा.
- पुढच्या प्रक्रियेसाठी तुमचा अर्ज ऑनलाईन जमा करा.
- तुमचा अर्ज जमा झाल्यानंतर तुम्हाला मेसेजच्या माध्यमाने तुमचा अर्ज ट्रॅक करता येईल.
FAQ’S :-
महिला बचत गट कर्ज योजना
१. महिला समृद्धी योजना काय आहे ?
उत्तर – महिला समृद्धी योजना योजना महिला केंद्रित आहे. या योजनेमार्फत मागासवर्गीय जाती आणि अनुसूचित जाती व जमाती महिलांना बचत गटाच्या माध्यमातून कर्ज दिले जाईल.
२. महिला समृद्धी योजनेमार्फत किती कर्ज मिळेल ?
उत्तर –प्रत्येक बचत गटाला जास्तीत जास्त 15 लाख व प्रत्येक लाभार्थ्याला म्हणजेच बचत गटातील एका सदस्याला जास्तीत जास्त एक लाख 40 हजार मिळतील .
३. महिला समृद्धी योजनेसाठी ऑनलाइन अर्ज कसा करावा ?
https://nsfdc.nic.in/en/mahila-samriddhi-yojana या संकेतस्थळावर जाऊन अर्ज पूर्ण भरून सादर करावा.
हे देखील वाचा :-
योजना प्रत्येक ज्येष्ठ नागरिकाला आपल्या उतरत्या वयात जीवन सुकर व्हाव म्हणून महाराष्ट्र सरकारने आणली आहे मुख्यमंत्री वयोश्री योजना. {Mukhyamantri Vayoshri Yojna}
शेतकऱ्यानच्या फायद्या साठी वाचा. किसान सन्मान निधी योजना | {Kisan Sanman Nidhi Yojna}
आपल्या लाडक्या लेकीच्या उज्वल भविष्यासाठी जाणून घ्या सुकन्या समृद्धी योजना। {Sukanya Samrudhi Yojna}
जर तुम्ही बेरोजगार असाल तर तुम्ही बेरोजगार भत्ता योजनेचा लाभ घेऊ शकता. अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी बेरोजगार भत्ता अर्ज कसा करावा हे वाचा.{Berojgar Bhatta yojna arj ksa karava}
महिलांना व्यवसाय स्थापन करण्यासाठी प्रोत्साहन पर योजना म्हणजेच महिला समृद्धी कर्ज योजना, अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी या योजनेवर क्लिक करा. {Pm pik vima yojna 2024}
आपल्याला आपल्या हक्काचे घर मिळणार रमाई आवास घरकुल योजना अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी या योजनेवर क्लिक करा. {Ramai Awas Gharkul Yojna}
मुलीच्या उज्ज्वल भविष्यासाठी शासन घेऊन आले आहे लेक लाडकी योजना. {LEK LADKI YOJNA}
गर्भवती महिलांना पोषक आहार मिळावा यासाठी सरकार देते रोख रक्कम त्याकरिता वाचा व अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी या योजनेवर क्लिक करा जननी सुरक्षा योजना.
व्यवसाय सुरु करण्यासाठी सरकार देत आहे बिनव्याजी कर्ज वाचा व अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी या योजनेवर क्लिक करा अण्णासाहेब पाटील कर्ज योजना.