Ramai Awas Gharkul Yojana 2024:
आजही आपला देश आर्थिक दृष्ट्या दारिद्र रेषेखालील देश म्हणून ओळखला जातो.आजही आपण रस्त्याच्या साईडला आपले कुटुंब चालवणारे विविध लोक झोपडी करून राहता येथे बघतो. या सर्व लोकांची मदत म्हणून सरकारने रमाई घरकुल योजना आपल्या देशात राबवली आहे या योजनेद्वारे अनेक लोकांना आपली हक्काचे घर मिळणार आहे.
अन्न वस्त्र निवारा या माणसाच्या मूलभूत गरजा आहेत त्यातील निवारा ही गरज पूर्ण करण्यासाठी रमाई घरकुल योजना शहरी भागात तसेच ग्रामीण भागात राबवली जाते.
या योजनेद्वारे पडक्या घरांमध्ये राहणारी कच्च्या घरांमध्ये राहणारी झोपडी मध्ये राहणारे अशा अनेक गरीब लोकांना आपल्या हक्काची घरी मिळणार आहेत. या योजनेचा लाभ घेणारी व्यक्ती ही महाराष्ट्र राज्यात पंधरा वर्षापासून वास्तव्य करणाऱ्याा असावी घरातील एकाच व्यक्तीला या योजनेचा लाभ घेता येणार आहे तसेच लाभार्थीनावावर कुठली घर नसावी.
घरकुल योजना प्रामुख्याने अनुसूचित जाती अनुसूचित जमाती वन व बौद्ध यांच्यासाठी 2009 2010 मध्ये सुरू करण्यात आली या सर्वांचे जीवनमान चांगली व्हावी म्हणून सरकारने ही योजना सुरू केली या योजनेअंतर्गत 269 चौरस मीटरचे स्वतःचे हक्काचे घर बांधण्यासाठी सरकार मदत करत आहे.प्रामुख्याने रमाई घरकुल योजना नितीन भागांमध्ये विभागली गेली आहे ज्यात नगरपालिका/ महानगरपालिका, ग्रामीण, आणि महानगरपालिका प्राधिकरण क्षेत्र.हे अनुदान जिल्हा समाज कल्याण अधिकारी यांच्या मदतीने दिले जाणार आहे.
Table of Contents
रमाई आवास योजना विधवा महिलांचा महिलांसाठी देखील आहे ही योजना रमाई घरकुल योजना या नावाने ओळखली जाते.योजनेमध्ये ज्या क्रमाने अर्ज केला आहे त्या क्रमाने तुमच्या घराची निवड केली जाते.
रमाई आवास योजनेअंतर्गत सर्वसाधारण क्षेत्रांमध्ये जर तुम्ही घर बांधत असाल तर तुम्हाला १३२०००/- इतके अनुदान दिले जाते.या योजनेअंतर्गत जर तुमचे घर शहरी भागात असेल तर घर बांधण्यासाठी तुम्हाला २५००००/- इतकी मदत केली जाते.जर डोंगराळ भागात तुम्ही घर बांधत असाल तर १४२०००/- इतक्या अनुदान देऊन तुम्हाला आर्थिक मदत केली जाते.
रमाई आवास योजना अंतर्गत तुम्हाला शौचालय बांधण्यासाठी देखील मदत केली जाते ही मदत शौचालय अनुदान योजना या अंतर्गत केली जाते 12000 रुपये इतकी रक्कम देऊन तुम्हाला शौचालय बांधण्यासाठी मदत केली जाते जेणेकरून आपल्या महाराष्ट्र स्वच्छ महाराष्ट्र म्हणून ओळखला जाईल.
योजनेअंतर्गत तुम्हाला 90 दिवसाचा रोजगार देखील उपलब्ध करून दिला जातो लाभार्थींना ९० दिवसाच्या लाभ म्हणून तुम्हाला 18000 रुपये दिले जातात.अतिशय सोप्या पद्धतीने आपण ऑनलाइन किंवा ऑफलाइन पद्धतीने या योजनेचा लाभ घेऊ शकता.लॉटरी पद्धतीने घर रमाई घरकुल योजना राबवली जाते.जातीय दंगली झालेली असेल व्यक्ती पीडित अनुसूचित जातीतील असेल किंवा घराची नुकसान भूकंपामध्ये झालेली असेल अथवा घरात कोणी कमवणार नाही परंतु घरात विधवा बाई आहे, अशा सर्व लोकांना या योजनेअंतर्गत प्राधान्य दिले जाते तसेच अपंगांना देखील या योजनेअंतर्गत प्राधान्य दिले गेले आहे.
रमाई आवास घरकुल योजना ठळक मुद्दे(Ramai Awas Gharkul Yojana 2024 important points)-
योजनेचे नाव | रमाई आवास घरकुल योजना(Ramai Awas Gharkul Yojana) |
योजना कोणी सुरु केली | महाराष्ट्र राज्य सरकार |
योजनेचा फायदा कुणाला होणार आहे | अनुसूचीत जाती, अनुसूचीत जमाती,नाव बौद्ध |
योजना कोणत विभाग राबवत आहे | ग्रामविकास व गृहनिर्माण विभाग |
योजनेसाठी अर्ज करायची पद्धत | ऑनलाईन/ ऑफलाईन |
योजनेचा अर्ज कुठे करावा | रमाई आवास घरकुल योजना |
रमाई आवास घरकुल योजना उद्दिस्त (Ramai Awas Gharkul Yojana 2024 purpose)
- रमाई आवास योजनेचे मुख्य उद्दिष्ट हे आहे की जे लोकांच्या घरात राहतात किंवा झोपडींमध्ये राहतात त्यांना हक्काचे पक्के घरे सरकारद्वारे दिली जावीत व त्यांना याद्वारे आर्थिक सहाय्यता मिळावी म्हणून योजना सुरू करण्यात आली.
- रमाई आवास योजना द्वारे महाराष्ट्रातील अनुसूचित जाती अनुसूचित जमाती आणि नव बौद्ध यांना हक्काचे घर मिळावे यासाठी ही योजना सुरू करण्यात आली.
- प्रामुख्याने रमाई आवास योजनेद्वारे महाराष्ट्र मध्ये कोणीही बेघर राहू नये सर्वांना आपली हक्काची घरे मिळावी हा आहे.
- आपल्या महाराष्ट्रात खूप लोक झोपडपट्टीत राहतात या योजनेअंतर्गत झोपडपट्टी मुक्त महाराष्ट्र बनून ही सरकारचे प्रमुख उद्दिष्ट आहे.
रमाई आवास घरकुल योजनेसाठी अर्ज करायचा असल्यास आवशक कागदपत्रे (Required Documents For Ramai Awas Gharkul Yojana 2024 )
- आधार कार्ड
- पॅन कार्ड
- मतदान कार्ड
- जात प्रमाणपत्र
- बीपीएल प्रमाणपत्र
- लाभार्थी विधवा असल्यास पतीचे मृत्यू प्रमाणपत्र
- टॅक्स पावती
- मूल्यांकन पावती
- पासपोर्ट फोटो
- घर बांधायचे असल्यास जर त्यात कोणी हिस्सेदार असेल तर त्याची संमती पत्र
- जन्म दाखला किंवा शाळा सोडल्याचा दाखला
- लाभार्थीने शासनाकडून घर बांधण्यासाठी कोणत्याही प्रकारच्या योजनेचा लाभ घेतला नाही अशी त्याची हमीपत्र
- लाभार्थी जर पूरग्रस्त असेल तर पूरग्रस्त असल्याचा दाखला
- जातीय हिंसेत जर लाभार्थी पीडित असेल तर त्याचा दाखला
- उत्पन्नाचा दाखला
- लाभार्थी पंधरा वर्षापासून महाराष्ट्राचा रहिवासी आहे. असा रहिवासी दाखला
- प्रतिज्ञापत्र
- लाभार्थ्याचे कोणतेही राष्ट्रकृत बँकेमध्ये पती पत्नीचे जॉईंट अकाउंट असणे आवश्यक.
रमाई आवास घरकुल योजनेसाठी पात्रता(Eiligibility for Ramai Awas Gharkul Yojana 2024)
- अर्जदार महाराष्ट्राचा रहिवासी असावा.
- अर्जदार अनुसूचित जाती अनुसूचित जमाती नव बौद्ध याप्रवर्गातील असावा.
- अर्जदाराच्या नावावर कुठेही पक्के घर नसावे.
- अर्जदारांनी यापूर्वी महाराष्ट्र सरकारच्या कोणत्याही घरकुल योजनेचा लाभ घेतलेला नसावा.
- अर्जदारा कुठेही केंद्र शासन किंवा महाराष्ट्र शासनामध्ये सरकारीनोकरीस नसावा.
रमाई आवास घरकुल योजनेसाठीचे अनुदान कसे मिळेल. (How)
तर आता बघूयात रमाई घरकुल योजने अंतर्गत अनुदान आपल्याला कसे मिळेल :-
- पहिला हप्ता :-या योजनेचा लाभ झाल्यानंतर 50% टक्के इतक्या अनुदान घराचे बांधकाम सुरू करण्याच्या वेळी अर्जदाराच्या बँक खात्यात जमा करण्यात येईल.
- दुसरा हप्ता:-पहिला हप्ता मिळाल्यानंतर 50% टक्के निधी बांधकाम करण्यासाठी वापरला आहे हे हे दर्शवणारी प्रमाणपत्र सादर केल्यानंतर 40% अनुदान अर्जदाराच्या बँक खात्यात जमा करण्यात येईल.
- तिसरा हप्ता:- लाभार्थीचे घर पूर्ण झाल्यानंतर अधिकारी येऊन तपासणी करतात त्या तपासणीमध्ये एक दाखला दिला जातो तो दाखला जमा केल्यानंतर उर्वरित १०% टक्के अनुदान अर्जदाराच्या बँक खात्यात जमा केले जाते.
रमाई आवास घरकुल योजनेसाठी अर्ज कसा करावा(How to apply for Ramai Awas Gharkul Yojana 2024)
आपण रमाई आवास योजनेचा अर्ज दोन पद्धतीने करू शकतो एक ऑनलाईन आणि ऑफलाईन
१.ऑनलाइन
- ऑनलाइन अर्ज करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करावे.
- आपल्या समोर एक पेज ओपन होईल त्या पेजवर आपल्याला नगरपलिका
- त्यानंतर समोर रमाई घरकुल योजना दिसेल त्यावर क्लिक करा
- : आपणा सर्वांसमोर एक फॉर्म ओपन होईल त्यात तुम्ही तुमची सर्व इन्फॉर्मेशन भरा जसे की जन्मतारीख लिंग नाव पत्ता इत्यादी
- सर्व माहिती भरून झाल्यानंतर सबमिट बटन वर क्लिक करा
- त्यानंतर तुमचे युजरनेम आणि पासवर्ड क्रिएट होईल ते युजरनेम आणि पासवर्ड टाकून आपण आपल्याला सर्व अर्ज भरायचा आहे व सर्व कागदपत्रे अपलोड करायचे आहेत
- अशाप्रकारे तुमच्या ऑनलाईन पद्धतीने हा फॉर्म भरला जाईल.
२.ऑफलाइन
आता बघुयात ऑफलाइन पद्धतीने का रमाई घरकुल योजनेसाठी अर्ज कसा भरता येईल
- आपण ज्या क्षेत्रात राहतात जसे की ग्रामपंचायत परिसरात राहत असाल तर ग्रामपंचायत मध्ये किंवा नगर पालिका किंवा महानगरपालिका आपला अर्ज वरील दिलेले कागदपत्रे जोडून जमा करावा.
निष्कर्ष :-
तर आपण बघितले की रमाई आवास योजना ही आपल्या देशातील आर्थिक दृष्ट्या मागास असणारे लोक अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि नव बौद्ध लोकांसाठी कच्च्या घरापासून ते पक्क्या घरापर्यंत चा प्रवास कसा करता येईल हे यात लेखाद्वारे मी आपणा सर्वांना सांगितले या योजनेअंतर्गत आपल्याला आपली हक्काची पक्की घरी मिळणार आहेत तसेच शौचालय बांधण्यासाठी देखील पैसेे मिळणार आहेत. ही योजना खरोखर गरीब लोकांना घरी उपलब्ध करून देणार आहे. या योजनेअंतर्गत विधवा महिलांसाठी देखील घरी उपलब्ध होणार आहेत या योजनेद्वारे कोणीही बेघर राहणार नाही .
राज्य सरकार राबवत असलेल्या योजनेंपैकी ही एक चांगली योजना आहे आशा आहे तुम्हाला हा लेख आवडला असेल तर वाचकांना विनंती आहे हा लेख जास्तीत जास्त सर्वांपर्यंत पोहोचवा जेणेकरून या योजनेचा लाभ लाभार्थीला योग्य वेळेत मिळेल धन्यवाद..!
FAQ’s-
१. रमाई आवास घरकुल योजना हि कोणासाठी आहे ?
उत्तर – घरकुल योजना प्रामुख्याने अनुसूचित जाती अनुसूचित जमाती वन व बौद्ध यांच्यासाठी
२. महाराष्ट्र शासनाचा कोणता विभाग हि योजना राबवत आहे ?
उत्तर – ग्रामविकास व गृहनिर्माण विभाग, महाराष्ट्र शासन.
३. रमाई आवास घरकुल योजनेसाठीचे अनुदान कसे मिळेल
उत्तर – रमाई आवास योजनेचे अनुदान ३ हफ्त्यात मिळेल.
वाचा–
मुलीच्या उज्ज्वल भविष्यासाठी शासन घेऊन आले आहे लेक लाडकी योजना. { LEK LADKI YOJNA }
योजना प्रत्येक ज्येष्ठ नागरिकाला आपल्या उतरत्या वयात जीवन सुकर व्हाव म्हणून महाराष्ट्र सरकारने आणली आहे मुख्यमंत्री वयोश्री योजना.{Mukhyamantri Vayoshri Yojna}
शेतकऱ्यानच्या फायद्या साठी वाचा किसान सन्मान निधी योजना |Kisan Sanman Nidhi Yojna
आपल्या लाडक्या लेकीच्या उज्वल भविष्यासाठी जाणून घ्या सुकन्या समृद्धी योजना। Sukanya Samrudhi Yojna। Bharat Sarkar।Women Empowerment.
जर तुम्ही बेरोजगार असाल तर तुम्ही बेरोजगार भत्ता योजनेचा लाभ घेऊ शकता. अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी बेरोजगार भत्ता अर्ज कसा करावा हे वाचा.
महिलांना व्यवसाय स्थापन करण्यासाठी प्रोत्साहन पर योजना म्हणजेच महिला समृद्धी कर्ज योजना, अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी या योजनेवर क्लिक करा.