Sugarcane Harvester Yojna 2024|ऊस तोडणी यंत्र अनुदान योजना २०२४-अर्ज चालू.

Sugarcane Harvester Yojna 2024 (ऊस तोडणी यंत्र अनुदान योजना २०२४)

आपला भारत देशा कृषी प्रधान देश आहे. आपल्या देशात अनेक शेतकरी हे शेतीवर अवलंबून आहेत. त्यात ऊस प्रामुख्याने घेतले जाणारे पीक आहे.आपल्या देशात सहकारी क्षेत्रात तसेच खाजगी क्षेत्रात देखील अनेक कारखाने आहेत आणि उसाचे पीक देखील मोठ्या प्रमाणात घेतले जाते ऊस तोडीच्या वेळेस अनेकदा असे होते की ऊस तोडी कामगार वाढीव भाव मागत आहे या कारणामुळे ऊस शेतात बरेच दिवस राहतो त्यामुळे उसाचे वजन कमी होऊन शेतकऱ्यांची नुकसान होते यावर पर्याय म्हणून आपल्या राज्य सरकारने ऊस तोडणी यंत्र अनुदान योजना सुरू केली आहे.

आपल्या महाराष्ट्र राज्यात अहमदनगर जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त ऊस लावला जातो अहमदनगर जिल्ह्यातच ऊस कारखाने सर्वात जास्त प्रमाणात आढळून येतात, परंतु ऐन ऊस तोडणी च्या काळात शेतकऱ्यांना अनेक संकटांना सामोरे जावे लागते. यावर पर्याय म्हणून आपले राज्य सरकार ऊस तोडणी यंत्रावर अनुदान देत आहे.पस्तीस लाख रुपये ऊस तोडणी यंत्रावर अनुदान दिले जात आहे .म्हणजेच एकूण रकमेच्या 40% अनुदान शेतकऱ्यांना आपले राज्य सरकार देत आहे.ऊस तोडणी यंत्र ही आपल्या राज्य सरकारच्या कृषी विभागाकडून राबविण्यात येणार आहे तसेच योग्य वेळी ऊस तुटल्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक जड बसणार नाही शेतकऱ्यांच्या उसाला योग्य प्रमाणात वजन असल्यामुळे त्यांच्या आर्थिक उत्पन्नात वाढ होणार आहे तसेच शेतकऱ्यांचा माल देखील योग्य वेळेत कारखान्यापर्यंत पोहोचणार आहे.

-Sugarcane Harvester Yojna 2024 |ऊस तोडणी यंत्र अनुदान योजना २०२४ , या योजनेबद्दल आम्ही तुम्हाला परिपूर्ण माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहे, यामध्ये या योजनेविषयी थोडक्यात माहिती, त्याचे ठळक मुद्दे, योजनेची पात्रता, योजनेचे फायदे, योजनेच्या अटी व शर्ती, योजनेसाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे, आणि ऑनलाईन अर्ज कसा करावा , असा हा परिपूर्ण लेख आम्ही तुमच्यासाठी सादर करत आहोत तो तुम्ही शेवटपर्यंत वाचवा हि मनापासून इच्छा व्यक्त करत आहोत. तर चला मग बघुयात योजनेविषयी परिपूर्ण अशी माहिती,

ऊस तोडणी यंत्र अनुदानयोजना २०२४ ची ठळक मुद्दे :- {Important Points of Sugarcane Harvester Yojna 2024 }

योजना २०२४ ची ठळक मुद्दे :- { Yojna Maharastra 2024 } याची ठळक मुद्दे आम्ही तुम्हाला येथे देत आहोत या मुद्द्यांमुळे तुम्हाला या योजनेत काय महत्त्वाचं आहे ते समजणार आहे व तुम्हाला योग्य दिशा या योजनेचा लाभ घेण्यासाठी मिळेल अशी आशा करतो.

योजनेचे नावSugarcane Harvester Yojna 2024 (ऊस तोडणी यंत्र अनुदान योजना २०२४)
योजना कोणा व्दारा सुरु झाली {Started By Whom}
आपले राज्य सरकार
लाभार्थी {Beneficiary}आपल्या राज्यातील शेतकरी
योजने मार्फत काय लाभ होणार आहेऊस तोडणी यंत्र घेण्यासाठी ४०% अनुदान
अधिकृत वेबसाईट {Authorized Website}Sugarcane Harvester Yojna 2024 (ऊस तोडणी यंत्र अनुदान योजना २०२४)
अर्ज करण्याची पद्धत {Process of Application}ऑनलाईन / ऑफलाईन
योजनेचा हेल्पलाईन नंबर
022-61316429
Sugarcane Harvester Yojna 2024
Sugarcane Harvester Yojna 2024

ऊस तोडणी यंत्र अनुदान योजना २०२४ या योजनेची उद्दिष्टे (Purpose of Sugarcane Harvester Yojna 2024 ):-

  • ऊस तोडणी यंत्र घेऊ इच्छित असणाऱ्या शेतकऱ्यांना आर्थिक मदत करणे आपल्या सरकारचा प्रमुख उद्दिष्टे योजनेमध्ये आहे.
  • ऊस तोडणी यंत्रामुळे वेळेची बचत होणार आहे व योग्यवेळी ऊस तुटल्यामुळे शेतकऱ्यांच्या आर्थिक नुकसान होण्यापासूनन वाचणार आहे.
  • अतिशय कमी खर्चामध्ये ऊस तोडणी झाल्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक झळ बसणार नाही.
  • शेतीबरोबरच आपल्या राज्याचे औद्योगिक विकास करणे हा देखील या योजनेचा उद्देश आहे.
  • ऊस तोडणी वेळेवर झाल्यामुळे शेतकरी ऊस लागवडीवर भर देणार आहेत जेणेकरून साखर उत्पन्नामध्ये लक्षणीय वाढ होणार आहे.

ऊस तोडणी यंत्र अनुदान योजना २०२४ या योजनेच्या नोंदणीसाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे (Sugarcane Harvester Yojna 2024 Documents) :-

योजनेसाठी खालील कागदपत्रे आवश्यक आहेत-

  • आधार कार्ड (Aadhar Card)
  • रेशन कार्ड (Ration Card)
  • रहिवासी दाखला (Residence Proof)
  • अर्जदाराचे जमिनीचा सातबारा (7/12 Documents)
  • अर्जदाराच्या जमिनीचा अट अ (8 A)
  • मोबाईल नंबर (Mobile Number)
  • ई-मेल आयडी (Email ID)
  • पासपोर्ट साईजचेे दोन फोटो (2 Passport Size Photographs)
  • स्वयंघोषित प्रतिज्ञापत्र (Self Declartion Form)
  • जातीचा दाखला (Caste Certificate)

ऊस तोडणी यंत्र अनुदान योजना २०२४ या योजनेची पात्रता (Eligibility for Sugarcane Harvester Yojna 2024 ) :-

  1. अर्जदार महाराष्ट्राचा रहिवासी असावा.
  2. योजनेसाठी अर्ज शेतकरी करू शकतो किंवा उद्योजक करू शकतो अशा अर्जदारांना त्यांच्या कुटुंबातील एका सदस्याला या योजनेचा फायदा घेता येणार आहे.
  3. अर्जदाराच्या कुटुंबातील कोणताही व्यक्ती हा केंद्र शासन किंवा राज्य शासनाच्या नोकरीत नसावा.
  4. खाजगी कारखाने किंवा सहकारी क्षेत्रातील कारखाने यांना जास्तीत जास्त तीन अर्ज या योजनेद्वारे करता येणार आहेत.
  5. योजनेसाठी 40% अनुदान आपल्या राज्य सरकार देणार आहे. तर 20 % अर्जदाराकडे उपलब्ध निधी असावा उरलेल्या 40% अर्जदारास कर्ज स्वरूपात प्राप्त होईल.
  6. अर्जदार अनुसूचित जाती अनुसूचित जमाती प्रवर्गातील असेल तर जातीचा दाखला सादर करणे गरजेचे आहे.
  7. अर्जदारस यंत्र नमूद केलेल्या कंपनीपैकी घ्यायचे नसेल तर अशा वेळी सहसंचालकाची लेखी संमती घेणे आवश्यक आहे.
  8. योजनेची सोडत ही लॉटरी पद्धतीने केली जाईल.
  9. लॉटरी पद्धतीने असल्यामुळे एसएमएस द्वारे अर्जदाराला सर्व माहिती कळविण्यात येईल.
  10. प्रतीक्षा यादी देखील दर्शविली जाईल त्यामुळे शेतकऱ्यांचा चालू मोबाईल नंबर देणे आवश्यक आहे.
Sugarcane Harvester Yojna 2024
Sugarcane Harvester Yojna 2024

ऊस तोडणी यंत्र अनुदान योजना २०२४ या योजनेची अर्ज प्रक्रिया (How to apply for Sugarcane Harvester Yojna 2024) :-

ऊस तोडणी यंत्र अनुदान योजना २०२४ या योजनेचे अर्ज ऑनलाईन स्वरुपात भारता येईल.

ऊस तोडणी यंत्र अनुदान योजना २०२४ या योजनेची ऑनलाइन अर्ज प्रक्रिया खालील प्रमाणे :-

आता बघूया ऑनलाईन अर्ज कसा करता येईल-

  • ऊस तोडणी यंत्राचा अर्ज करायचा असल्यास आपल्याला खाली दिलेल्या अधिकृत वेबसाईटवर जाणे गरजेचे आहे
  • आता आपल्याला स्वतःला रजिस्टर करायचे आहे.

Sugarcane Harvester Yojna 2024 (ऊस तोडणी यंत्र अनुदान योजना २०२४)

  • यानंतर आपला एक युजरनेम आणि पासवर्ड क्रिएट होईल.
  • आपल्याला आता युजरनेम आणि पासवर्ड टाकून लॉगिन करायची आहे.
  • आपल्यासमोर एक नवीन पेज ओपन होईल.
  • कृषी यांत्रिकीकरण या ऑप्शन वर जाऊन आपल्याला विचारलेल्या सर्व प्रश्नांची व्यवस्थित उत्तरे भरायचे आहे वरती दिलेली सर्व कागदपत्रे त्यासोबत अपलोड करायची आहेत.
  • आता आपल्याला सबमिट बटन वर क्लिक करून आपला अर्ज पूर्ण भरलेला आहे हे तपासून बघायचे आहे.

निष्कर्ष :-

मित्रांनो, तुम्हाला आम्ही दिलेली ऊस तोडणी यंत्र अनुदान योजना २०२४ या योजनेबद्दलची माहिती कशी वाटली याबद्दल तुम्ही आम्हाला लेखाच्या खाली कमेंट करून कळवू शकता तसेच आमच्यासाठी काही सूचना असतील त्याही तुम्ही आम्हाला सुचवू शकता अशाच सरकारी योजना संबंधी अपडेटेड माहिती मिळवण्यासाठी आमच्या योजना गॅरंटी डॉट कॉम (yojnaguarantee.com) या संकेतस्थळाला भेट देत राहा धन्यवाद|


FAQ :-


१. ऊस तोडणी यंत्र अनुदान योजना २०२४ योजनेचा अर्ज कसा करावा ?

उत्तर-https://mahadbt.maharashtra.gov.in/farmer/login/login या अधिकृत संकेतस्थळी जाऊन आपल्याला अर्ज करता येईल.

२.ऊस तोडणी यंत्र योजना २०२४ या योजनेचा ऑनलाइन अर्ज करायचा असल्यास अधिकृत संकेतस्थळ कोणते?

उत्तर-https://mahadbt.maharashtra.gov.in/farmer/login/login

३. ऊस तोडणी यंत्र योजना २०२४ कोणत्या राज्यामध्ये लागू आहे?

उत्तर-ऊस तोडणी यंत्र २०२४ महाराष्ट्र राज्यामध्ये लागू आहे.

४. ऊस तोडणी यंत्र योजना २०२४ चे लाभार्थी कोण आहेत ?

उत्तर-आपल्या राज्यातील शेतकरी आणि उद्योजक ऊस तोडणी यंत्र योजना २०२४ चा लाभ घेऊ शकतात,.

5. ऊस तोडणी यंत्र योजना २०२४ अंतर्गत दिले जाणारे लाभ ?

उत्तर-ऊस तोडणी यंत्र खरेदीसाठी ४०% अनुदान किंवा ३५ लाख रुपये आर्थिक मदत अशा स्वरुपात लाभार्थीस योजनेचा लाभ होणार आहे.

6.उस तोडणी यंत्राची किंमत काय आहे?

उत्तर-आता उपलब्ध असणाऱ्या ऊस तोडणी यंत्राची किंमत एच पी नुसार आकारली जाते ती 35 लाख ते 75 लाख पर्यंत आहे.

हे देखील वाचा :-


योजना प्रत्येक ज्येष्ठ नागरिकाला आपल्या उतरत्या वयात जीवन सुकर व्हाव म्हणून महाराष्ट्र सरकारने आणली आहे मुख्यमंत्री वयोश्री योजना. {Mukhyamantri Vayoshri Yojna}


शेतकऱ्यानच्या फायद्या साठी वाचा. किसान सन्मान निधी योजना | {Kisan Sanman Nidhi Yojna}


आपल्या लाडक्या लेकीच्या उज्वल भविष्यासाठी जाणून घ्या सुकन्या समृद्धी योजना। {Sukanya Samrudhi Yojna}


जर तुम्ही बेरोजगार असाल तर तुम्ही बेरोजगार भत्ता योजनेचा लाभ घेऊ शकता. अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी बेरोजगार भत्ता अर्ज कसा करावा हे वाचा.{Berojgar Bhatta yojna arj ksa karava}


महिलांना व्यवसाय स्थापन करण्यासाठी प्रोत्साहन पर योजना म्हणजेच महिला समृद्धी कर्ज योजना, अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी या योजनेवर क्लिक करा. {Pm pik vima yojna 2024}


आपल्याला आपल्या हक्काचे घर मिळणार रमाई आवास घरकुल योजना अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी या योजनेवर क्लिक करा. {Ramai Awas Gharkul Yojna}


मुलीच्या उज्ज्वल भविष्यासाठी शासन घेऊन आले आहे लेक लाडकी योजना. {LEK LADKI YOJNA}


गर्भवती महिलांना पोषक आहार मिळावा यासाठी सरकार देते रोख रक्कम त्याकरिता वाचा व अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी या योजनेवर क्लिक करा  जननी सुरक्षा योजना.


व्यवसाय सुरु करण्यासाठी सरकार देत आहे बिनव्याजी कर्ज वाचा व अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी या योजनेवर क्लिक करा अण्णासाहेब पाटील कर्ज योजना.