shauchalay anudan yojana 2024 (शौचालय अनुदान योजना २०२४)
आपले केंद्र सरकार मानवाच्या मूलभूत गरजा पूर्ण होण्यासाठी विविध योजना राबवत आहे स्वच्छ भारत मिशन ही त्या योजनेचा एक भाग आहे. आता आपल्या देशात सुलभ शौचालय योजना राबवली जात आहे. या योजनेअंतर्गत माणसाला स्वच्छतेचे धडे दिले जाणार आहेत .आपला देश हा आर्थिक दृष्ट्या मागास म्हणून ओळखला जाणारा देश आहे. आपल्या देशात आजही बहुतांश कुटुंब हे दारिद्र्यरेषेखालील कुटुंबे आहेत .अशा कुटुंबांना आपला अन्न, वस्त्र ,निवारा या गरजा वेळेवर पूर्ण करता येत नाही,अशा अनेक कुटुंबातील सदस्य उघड्यावर सौचेसाठी जातात ग्रामीण भागात हा प्रकार सर्रास बघायला मिळतो. यामुळे अतिशय अस्वच्छता आपल्या देशात पसरत आहे. यावर पर्याय म्हणून आपले केंद्र सरकार शौचालय अनुदान योजना घेऊन आली आहे.
या योजनेअंतर्गत आर्थिक दृष्ट्या शौचालय बांधण्यास अक्षम कुटुंबांना सरकार आर्थिक मदत करणार आहे.
या योजनेअंतर्गत आपल्या केंद्र सरकार 75 टक्के अनुदान देणार आहे म्हणजेच केंद्र सरकारकडून 9,000र रुपये /-मिळणार आहेत. तसेच राज्य सरकार 25 टक्के अर्थ सहाय्य करणार आहे, म्हणजेच 3 हजार रुपये राज्य सरकार अर्जदारास देणार आहे असा एकूण 12 हजाराच्या आर्थिक सहाय्य आपले सरकार शौचालय बांधण्यासाठी करत आहे.
या योजनेअंतर्गत मिळणारी रक्कम दोन टप्प्यांमध्ये अर्जदाराला मिळणार आहे.या योजनेअंतर्गत आपला देश स्वच्छ होईल.तसेच प्रत्येक घरामध्ये एक शौचालय उभे राहील याचा उपयोग करून महिला आपली स्वच्छता ठेवू शकतात. जेणेकरून रोगराई आपल्या देशात पसरणार नाही.या योजने अंतर्गत विधवा महिला दारिद्र रेषेखालील कुटुंब ,अनुसूचित जाती, अनुसूचित जमातीचे, अल्प व अत्यल्प भूधारक शेतकरी ,अपंग व्यक्ती यांना फायदा होणार आहे.योजनेचा फायदा ग्रामीण भागातील लोकांना तसेच शहरी भागातील लोकांना देखील घेता येणार आहे ज्याद्वारे आपण एक शौचालयाचे बांधकाम करू शकतो व आपल्या कुटुंबाची स्वच्छतेची काळजी घेऊ शकतो.
माझी वाचकास विनंती की या लेखाद्वारे आम्ही आपणास शौचालय अनुदान योजनेची वैशिष्ट्ये ,योजनेसाठी का लागणारी कागदपत्रे ,शौचालय अनुदान योजनेची पात्रता काय आहेत हे सांगण्याचा प्रयत्न केला आहे, तरी आपण हा लेख शेवटपर्यंत वाचावा हि विनंती.
Table of Contents
शौचालय अनुदान योजना या योजनेची ठळक मुद्दे (Important Points Of shauchalay anudan yojana):-
योजनेचे नाव | shauchalay anudan yojana 2024(शौचालय अनुदान योजना २०२४) |
योजना कोणी सुरु केली | केंद्र सरकार आणि राज्य सरकार |
योजनेचा फायदा कुणाला होणार आहे | विधवा महिला, दारिद्र रेषेखालील कुटुंब ,अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, अल्प व अत्यल्प भूधारक शेतकरी ,अपंग व्यक्ती |
योजने अंतर्गत काय फायदा होणार आहे | शौचालय बांधण्यासाठी १२०००/ रुपये आर्थिक मदत |
योजना कोणत्या विभागा मार्फत चालवली जाते | सामाजिक सुरक्षा विभाग |
योजनेचा अर्ज कसा करावा | ऑफ लाईन /ऑन लाईन |
योजनेसाठी अधिकृत वेबसाईट कोणती आहे | shauchalay anudan yojana 2024(शौचालय अनुदान योजना २०२४) |
शौचालय अनुदान योजना २०२४ या योजनेची कागदपत्रे( Documents for shauchalay anudan yojana 2024 ):-
shauchalay anudan yojana 2024(शौचालय अनुदान योजना २०२४) योजनेसाठी खालील कागदपत्रे आवश्यक आहेत-
- आधार कार्ड (Aadhar card)
- रहिवासी दाखला (Residence Proof)
- विधवा असल्यास मृत्यूचा दाखला (Death Certificate)
- उत्पन्नाचा दाखला (Income Certificate)
- दारिद्र रेषेखालील असल्याचा दाखला (Below Poverty Line Cetificate)
- कुठले राष्ट्रकृत बँकेचे पासबुक(Bank Passbook)
- शौचालय स्वंय घोषणापत्र[Documents for shauchalay anudan yojana 2024]
शौचालय अनुदान योजना २०२४ या योजनेची उद्दिष्टे(Purpose of shauchalay anudan yojana 2024):-
- स्वच्छ कुटुंब तर स्वच्छ राज्य हा आपल्या सरकारचा प्रमुख उद्देश आहे.
- या योजनेअंतर्गत होणाऱ्या आर्थिक लाभांमुळे ग्रामीण भागातील स्वच्छता प्रमुख हेतू बनेल.
- बाहेरचा शौचालय बसल्यामुळे पसरणारी दुर्गंधी व त्यामुळे होणारे आजार यावर आळा बसेल.
- या योजने मुळे ग्रामीण भागातील लोकांचे जीवनमान चांगले होईल.
- ग्रामीण भागात वन्य प्राण्यांचे जे हल्ले होतात त्यावर त्यावर आळा बसेल.
- या योजनेसाठी कुठल्याही जात पात ची अट नसल्या मुळे प्रत्येक घरात शौचालय उभे राहील व या योजनेचा फायदा तळागाळातील जनता येऊ शकेल.
- या योजनेद्वारे केंद्र सरकारच्या स्वच्छ भारत मिशन अभियानाला वाव मिळेल.
शौचालय अनुदान योजना २०२४ या योजनेची पात्रता(Eligibility shauchalay anudan yojana 2024) :-
- योजनेसाठी अर्ज करणारा व्यक्ती हा महाराष्ट्राचा कायमचा रहिवासी असावा.
- या योजनेसाठी जात-पात धर्म याचा कुठलाही कुठली अट नाही.
- ज्यांच्या घरात शौचालय नाही अशी सर्व कुटुंब या योजनेचा फायदा घेऊ शकतात.
शौचालय अनुदान योजना २०२४ या या योजनेचा अर्ज करायचा (How to apply for shauchalay anudan yojana 2024 )
शौचालय अनुदान योजनेसाठी आपण अत्यंत सोप्या पद्धतीने व घरी बसल्या या योजनेचा अर्ज करू शकतो या योजनेसाठी अर्ज करण्याच्या दोन पद्धती आहेत ऑनलाईन आणि ऑफलाईन
- ऑनलाईन:
- लाभार्थीला या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा तेथे अधिकृत वेबसाईट ओपन होईल.
- shauchalay anudan yojana 2024(शौचालय अनुदान योजना २०२४)
- आपल्यासमोर एक पेज ओपन होईल त्यामध्ये आपल्याला आपला मोबाईल नंबर, नाव, लिंग ,राष्ट्र टाकायचे आहेत.
- सबमिट बटन वर क्लिक करावे.
- अशाप्रकारे आपला एक युजरनेम आणि पासवर्ड क्रिएट होईल.
- आतालेल्या वेबसाईटवर आपल्याला आपला युजरनेम आणि पासवर्ड टाकून लॉगिन करायचे आहे.
- त्यानंतर आपल्यासमोर एक नवीन विंडो ओपन होईल त्यावर आपल्याला new application वर क्लिक करायचे आहे.
- समोर आपल्या एक अर्ज ओपन होईल त्या अर्जामध्ये आपल्याला आपली सर्व वैयक्तिक माहिती भरायची आहे जसे की नाव बँकेचे नाव, पत्ता इत्यादी
- अशाप्रकारे आपला अर्ज पूर्ण होईल.
- अतिशय सोप्या पद्धतीने आपण या योजनेसाठी अर्ज करू शकतो व या योजनेचा फायदा घेऊ शकतो.
- तसेच आपल्याला या अधिकृत वेबसाईटवरच आपल्या अर्जाची स्थिती काय आहे हे देखील जाणून घेता येईल.
- त्यासाठी आपल्याला अधिकृत वेबसाईटवर जाऊन युजरनेम आणि पासवर्ड टाकून view application वर क्लिक करायचे आहे.
- अशा प्रकारे आपल्याला आपल्या अर्जाची स्तिती समजेल.
- ऑफलाईन:
- आपण ज्या क्षेत्रात राहतो तेथील जवळील ग्रामपंचायत कार्यालय मध्ये जाऊन अर्ज भरवायचा आहे.
- वरती दिलेली सर्व कागदपत्रे त्यासोबत जमा करायची आहेत.
निष्कर्ष :-
शौचालय अनुदान योजना आम्ही तुम्हाला परिपूर्ण माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे, यामध्ये या योजनेविषयी थोडक्यात माहिती, त्याचे ठळक मुद्दे, योजनेची पात्रता, योजनेचे फायदे, योजनेच्या अटी व शर्ती, योजनेसाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे, आणि ऑनलाईन अर्ज कसा करावा.या योजने अंतर्गत आपण आपलेले स्वच्छ भारत कडे वाटचाल करणार आहोत. आपले सरकारने स्वच्छतेच्या दृष्टीने आपल्या देशात राबवलेली ही सर्वात उत्तम योजना आहे योजनेद्वारे प्रत्येक घरात स्वतःचे एक वैयक्तिक शौचालय उपलब्ध होणार आहेअसा हा परिपूर्ण लेख आम्ही तुमच्यासाठी सादर करत आहोत तो तुम्ही शेवटपर्यंत वाचल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद।
FAQ–
१.शौचालय अनुदान योजनेचा फायदा कोणाला होणार आहे?
उत्तर-शौचालय अनुदान योजनेसाठी कुठल्याही जात धर्मपात याची अट सरकारने ठेवली नाही आपल्या देशातील कोणी दारिद्र्य रेषेखालील कुटुंब या योजनेचा फायदा घेऊ शकतात विधवा महिलाेषेखालील कुटुंब अल्प व अत्यल्प भूधारक शेतकरी ,अपंग व्यक्ती या योजनेचा फायदा घेऊ शकतात.
२.शौचालय अनुदान योजनेचा अर्ज कसा व कुठे करावा ?
उत्तर- लाभार्थीला योजनेचा फायदा घ्यायचा असेल तर त्यांनी ऑफलाइन व ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकता,
सविस्तर माहितीसाठी वरील लेख पूर्ण वाचावा त्यात ऑनलाइन व ऑफलाइन अर्ज कसा करावा हे नमूद केले आहे.
३.शौचालय अनुदान योजनेची जानेवारी महिन्यातील यादी कशी पहावी?
उत्तर- या योजनेची यादी बघण्यासाठी आपल्याला युजरनेम आणि पासवर्ड टाकून लॉगिन करायचे आहे.
त्यानंतर view application वर क्लिक केल्यानंतर आपल्याला आपल्या अर्जाची स्थिती कळेल.
हे देखील वाचा :-
योजना प्रत्येक ज्येष्ठ नागरिकाला आपल्या उतरत्या वयात जीवन सुकर व्हाव म्हणून महाराष्ट्र सरकारने आणली आहे मुख्यमंत्री वयोश्री योजना.{Mukhyamantri Vayoshri Yojna}
शेतकऱ्यानच्या फायद्या साठी वाचा किसान सन्मान निधी योजना |Kisan Sanman Nidhi Yojna
आपल्या लाडक्या लेकीच्या उज्वल भविष्यासाठी जाणून घ्या सुकन्या समृद्धी योजना। Sukanya Samrudhi Yojna। Bharat Sarkar।Women Empowerment.
जर तुम्ही बेरोजगार असाल तर तुम्ही बेरोजगार भत्ता योजनेचा लाभ घेऊ शकता. अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी बेरोजगार भत्ता अर्ज कसा करावा हे वाचा. niradhar yojana maharashtra|niradhar yojana documents marathi
महिलांना व्यवसाय स्थापन करण्यासाठी प्रोत्साहन पर योजना म्हणजेच महिला समृद्धी कर्ज योजना, अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी या योजनेवर क्लिक करा.
आपल्याला आपल्या हक्काचे घर मिळणार रमाई आवास घरकुल योजना अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी या योजनेवर क्लिक करा.
मुलीच्या उज्ज्वल भविष्यासाठी शासन घेऊन आले आहे लेक लाडकी योजना. { LEK LADKI YOJNA}
गर्भवती महिलांना पोषक आहार मिळावा यासाठी सरकार देते रोख रक्कम त्याकरिता वाचा व अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी या योजनेवर क्लिक करा जननी सुरक्षा योजना.
व्यवसाय सुरु करण्यासाठी सरकार देत आहे बिनव्याजी कर्ज वाचा व अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी या योजनेवर क्लिक करा अण्णासाहेब पाटील कर्ज योजना niradhar yojana maharashtra|niradhar yojana documents marathi