Shasan Aplya Dari Yojna 2024|शासन आपल्या दारी योजना २०२४

Shasan Aplya Dari Yojna 2024 (शासन आपल्या दारी योजना २०२४)

Shasan Aplya Dari Yojna 2024 | शासन आपल्या दारी योजना २०२४, या योजनेबद्दल आम्ही तुम्हाला परिपूर्ण माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहे, यामध्ये या योजनेविषयी थोडक्यात माहिती, त्याचे ठळक मुद्दे, योजनेची पात्रता, योजनेचे फायदे, योजनेच्या अटी व शर्ती, योजनेसाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे, आणि ऑनलाईन अर्ज कसा करावा , असा हा परिपूर्ण लेख आम्ही तुमच्यासाठी सादर करत आहोत तो तुम्ही शेवटपर्यंत वाचवा हि मनापासून इच्छा व्यक्त करत आहोत. तर चला मग बघुयात योजनेविषयी परिपूर्ण अशी माहिती,

शासन आपल्या दारी आणि माहिती देई सारी…
या उक्तीप्रमाणे या योजनेचे महत्त्व आहे महाराष्ट्र सरकार महाराष्ट्रातील जनतेसाठी घेऊन आले आहे शासन आपल्या दारी हा उपक्रम.
शासनाच्या योजना लोकांसमोर ठेवणे आणि त्याची अंमलबजावणी कशी लवकरात लवकर करता येईल या दृष्टीने राज्याचे मुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे आणि उपमुख्यमंत्री जी देवेंद्रजी फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण महाराष्ट्रात शासन आपल्या दारी हे अभियान राबवण्याचे काम सुरू आहे.
या उपक्रमाचा उद्देश हा समाजातील शेवटच्या घटकापर्यंत शासनाच्या योजना पोहोचवणे आणि त्याची अंमलबजावणी लगेच करणे हा आहे.

Shasan Aplya Dari
Shasan Aplya Dari

शासकीय यंत्रणा शासकीय योजनांची माहिती लोकांना करून देऊन या योजनांची नियमितपणे अंमलबजावणी करत असतात, मात्र त्याकरिता नागरिकांना शासकीय कार्यालय मध्ये जावे लागते योजनांची माहिती घ्यावी लागते योजनेसाठी आवश्यक असलेली कागदपत्रे विविध कार्यालयात जाऊन जमा करावे लागतात जमा केलेले कागदपत्र प्रत्येक कार्यालयात जाऊन द्यावे लागतात अशी सर्व कार्य प्रणाली ही शासन स्तरावर चालते, तसेच तिथे सादर केलेली काही कागदपत्रे यामध्ये थोडी आढळल्यास त्या कार्यालयामध्ये वारंवार जावे लागते तरीसुद्धा ती कामे पूर्ण होत नाही व लागणारी कागदपत्रे वेळेवर मिळत नाहीत आणि योजनेचा लाभ घेणे दुरापास्त राहून जाते.
या सर्व गोष्टीचा विचार करून शासन आपल्या दारी या अभियानाची सुरुवात सरकार करत आहे.

शासन आपल्या दारी म्हणजे काय ते आता आपण समजून घेऊ.


स्थानिक नागरिकांना सरकारच्या योजनांची योग्य ती माहिती मिळावी आणि या योजनेचा लाभ कसा घ्यावा हे देखील त्यांना कळावे यासाठी शासन स्वतः लोकांच्या दारात येत आहे म्हणजे शासन आपल्या दारी होय. या योजनेचा लाभ घेता यासाठी सरकारने महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील प्रशासनांना दोन दिवसीय शिबिर आयोजन करण्याचे निर्देश दिले गेले आहेत शासन आपल्या दारी या उपक्रमाचा उद्घाटन सोहळा खुद्द मुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्यात म्हणजे सातारा जिल्ह्यामध्ये झाला आहे.


आत्तापर्यंत जवळपास अहमदनगर, नाशिक, धुळे, जळगाव, नांदेड, गडचिरोली, शिर्डी, परभणी, बुलढाणा, छत्रपती संभाजी नगर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, पालघर, जेजुरी, या ठिकाणी शासन आपल्या दारी हा उपक्रम राबवलेला गेलेला आहे,या दोन दिवसीय शासन आपल्या दारी या उपक्रमाचे आयोजन केल्यामुळे जवळपास 75000 स्थानिक नागरिकांना या उपक्रमाचा फायदा झालेला आहे,आतापर्यंत जवळजवळ 75 लाख नागरिकांना या योजनेचा लाभ मिळालेला आहे.
शासन आपल्या दारी या अभियानाच्या अंतर्गत 75 हजार स्थानिक नागरिकांना लाभ देण्याच्या सूचना खुद्द मुख्यमंत्र्यांकडून देण्यात आलेले आहेत.

शासन आपल्या दारी योजना २०२४ ची ठळक मुद्दे :- { Important points of Shasan Aplya Dari Yojna 2024 }

योजना २०२४ ची ठळक मुद्दे :- {Shasan Aplya Dari Yojna 2024} याची ठळक मुद्दे आम्ही तुम्हाला येथे देत आहोत या मुद्द्यांमुळे तुम्हाला या योजनेत काय महत्त्वाचं आहे ते समजणार आहे व तुम्हाला योग्य दिशा या योजनेचा लाभ घेण्यासाठी मिळेल अशी आशा करतो.

योजनेचे नाव शासन आपल्या दारी योजना २०२४ (Shasan Aplya Dari Yojna 2024)
योजना कोणा व्दारा सुरु झाली.
{Started By Whom}
महाराष्ट्र शासन
लाभार्थी {Beneficiary}महाराष्ट्रातील नागरिक
योजने मार्फत काय लाभ होणार आहेया उपक्रमाचा उद्देश हा समाजातील शेवटच्या घटकापर्यंत शासनाच्या योजना पोहोचवणे आणि त्याची अंमलबजावणी लगेच करणे हा आहे.
अधिकृत वेबसाईट {Authorized Website}https://shasanaplyadari.com/
अर्ज करण्याची पद्धत {Process of Application}ऑनलाईन / ऑफलाईन
योजनेचा हेल्पलाईन नंबर
GR /PDF https://marathiutsav.com/wp-content/uploads/2023/06/shasan-aplya-dari-GR-1-1.pdf

शासन आपल्या दारी योजना २०२४ या योजनेची उद्दिष्टे (Purpose of Shasan Aplya Dari Yojna 2024 ):-

केंद्र व राज्य शासनाकडून राबवण्यात येत असलेल्या विविध कल्याणकारी योजनांचा नागरिकांना जलद गतीने व कोणत्याही अडथळ्याशिवाय लाभ घेता यावा या दृष्टीने शासनाकडून शासन आपल्या दारी हा अभिनव असा उपक्रम शासनाकडून राबवला जातोय. या उपक्रमाच्या माध्यमातून कमीत कमी कागदपत्र व जलद गतीने मंजुरी या सूत्रानुसार सर्वसामान्य नागरिकांना शासनाच्या योजनांचा फायदा मिळवून देण्यात येईल.

सर्व शासकीय विभागांना या कार्यक्रमाची जाहिरात करण्याच्या सूचना वरिष्ठ पातळीवरून देण्यात आलेल्या असल्याने महसूल विभाग, ग्रामविकास विभाग, आरोग्य विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग, पुरवठा विभाग व इतर सर्व विभागाचे अधिकारी-कर्मचारी यासाठी कामाला लागलेले दिसून येत आहेत.

शासन आपल्या दारी योजना २०२४ या योजनेचे फायदे (Benefit’s of Shasan Aplya Dari Yojna 2024 ) :-

  • नागरिकांना त्यांच्या दारामध्ये विविध योजनांचा लाभ मिळावा यासाठी उपक्रम राबवला जात आहे.
  • सर्व शासकीय योजनांचा लाभ एका छताखाली या माध्यमातून या उपक्रमाद्वारे नागरिकांना मिळेल.
  • योजनेच्या साठी लागणाऱ्या कागदपत्रांची पूर्तता ही या उपक्रमाद्वारे करून दिली जाणार आहे त्यामुळे कोणत्याही योजनेचा लाभ घेणे सोयीचे होईल.
  • तळघळातील नागरिकांपर्यंत सरकारी योजनांचा लाभ मिळावा या दृष्टीने ही योजना महत्त्वाची आहे.
  • या अभियानामुळे लोकांना शासकीय योजनांची माहिती त्यांच्या दारामध्ये मिळेल.
  • कमीत कमी वेळेमध्ये योजनेचा लाभ कसा देता येईल हा या उपक्रमाचा उद्देश आहे.
  • जिल्हा तालुकास्तरावर शासनाकडून स्वतंत्र कक्षांची स्थापना या योजने च्या अंतर्गत करण्यातच्या अंतर्गत करण्यात येत आहे.
  • आपल्या जिल्ह्यामध्ये जवळपास हजार 457 कोटी निधीच्या वस्तूंचे वाटप या उपक्रमाद्वारे शासन करणार आहे.
  • शासन या उपक्रमाच्या माध्यमातून थेट सर्वसामान्य नागरिकांच्या दारी येत आहे.
  • सरकारी कार्यालयात हेलपाटे मारावे लागणार नाहीत आणि कागदपत्रांची जमवाजमव करण्याची डोकेदुखी राहणार नाही.
  • प्रत्येक जिल्ह्यामध्ये किमान 75,000 नागरिकांना एकाच छताखाली लाभ दिला जाईल.
  • शासनाने निर्धारित केलेल्या शुल्कात 200 पेक्षा जास्त अधिक योजनांचा लाभ घेता येणार आहे.

शासन आपल्या दारी योजना २०२४ {Shasan Aplya Dari Yojna 2024} या योजनेच्या नोंदणीसाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे (Documents for Shasan Aplya Dari Yojna 2024) :-

योजनेसाठी खालील कागदपत्रे आवश्यक आहेत-

  • आधार कार्ड (Aadhar Card)
  • रेशन कार्ड (Ration Card)
  • रहिवासी दाखला (Residence Proof)
  • अर्जदाराचे जमिनीचा सातबारा (7/12 Documents)
  • अर्जदाराच्या जमिनीचा अट अ (8 A)
  • मोबाईल नंबर (Mobile Number)
  • ई-मेल आयडी (Email ID)
  • पासपोर्ट साईजचेे दोन फोटो (2 Passport Size Photographs)
  • स्वयंघोषित प्रतिज्ञापत्र (Self Declartion Form)
  • जातीचा दाखला (Caste Certificate)

तुम्हाला ज्या संबंधित योजनेसाठी अर्ज करायचा आहे त्या संबंधित लागणारी कागदपत्रे त्यानुसार लागतील.

Shasan-Aplya-Dari
Shasan-Aplya-Dari

शासन आपल्या दारी हे उपक्रम घेऊन येत आहे “शासन आपल्या दारी योजना २०२४” {Shasan Aplya Dari Yojna 2024} या योजनेच्या अंतर्गत :-

  • शेतकरी ते ग्राहक बाजारपेठ
  • मनरेगा
  • दिव्यांग साहित्य वाटप
  • सेवानिवृत्ती लाभ
  • मुलींना सायकल वाटप
  • आधार कार्ड
  • पॅन कार्ड
  • कृषी सेवा केंद्र परवाने
  • पासपोर्ट
  • ई-श्रम कार्ड
  • भरती मेळावा
  • पीएम किसान
  • विवाह नोंदणी
  • पी.एफ घरकुल योजना
  • जॉब कार्ड
  • नवीन मतदार नोंदणी
  • डिजिटल इंडिया
  • कृषी प्रदर्शन
  • कन्यासमृद्धी योजना नोंदणी
  • जमीन मोजणी करणे
  • कृषी अवजारांची वाटप करणे
  • जनावरांची तपासणी शिबिरे
  • किसान क्रेडिट कार्ड
  • कुपोषित बालकांची तपासणी
  • जन्म मृत्यू प्रमाणपत्र
  • प्रधानमंत्री मातृत्व योजना
  • संजय गांधी निराधार योजना नोंदणी
  • नॉन क्रिमीलेअर दाखला
  • जातीचा दाखला
  • वयाचा दाख
  • शिधापत्रक वाटणे
  • कुटुंब कल्याण योजना
  • सलोखा योजना
  • बियाणे औषधे वाटप

या सोबतच आरोग्य शिबिर, रक्तदान शिबिर अशी वेगवेगळी शिबिरे आयोजित केली जातात.

या सोबतच “नवीन मतदारांची नोंदणीही” या उपक्रमाच्या अंतर्गत केली जाणार आहे, यासाठी आपण आपल्या जवळच्या सरकारी कार्यालयाशी संपर्क साधून, कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मोठ्या प्रमाणात सहभागी व्हावे. मुख्यमंत्र्यांनी आवाहन केले आहे कि, हे अभियान सर्वांना घेऊन यशस्वी करायचे  आहे.

शासन आपल्या दारी योजना २०२४ या योजनेची अर्ज प्रक्रिया (How to apply for Shasan Aplya Dari Yojna 2024) :-

Shasan-Aplya-Dari
Shasan-Aplya-Dari
शासन आपल्या दारी योजना २०२४ या योजनेची ऑनलाइन अर्ज प्रक्रिया खालील प्रमाणे :-

शासन आपल्या दारी या योजनेची नोंदणीसाठी आपण सीएससी (CSC), एमएससीआयटी (MSCIT) कॉम्प्युटर ट्रेनिंग सेंटरमधील स्वयंसेवकांच्या मदतीने नागरिकांना नोंदणी करता येणार आहे.

निष्कर्ष :-

मित्रांनो, तुम्हाला आम्ही दिलेली शासन आपल्या दारी योजना २०२४ {Shasan Aplya Dari Yojna 2024} या योजनेबद्दलची माहिती कशी वाटली याबद्दल तुम्ही आम्हाला लेखाच्या खाली कमेंट करून कळवू शकता तसेच आमच्यासाठी काही सूचना असतील त्याही तुम्ही आम्हाला सुचवू शकता अशाच सरकारी योजना संबंधी अपडेटेड माहिती मिळवण्यासाठी आमच्या योजना गॅरंटी डॉट कॉम (yojnaguarantee.com) या संकेतस्थळाला भेट देत राहा, धन्यवाद|

FAQ :-

१. शासन आपल्या दारी या योजनेचा शुभारंभ कधी झाला?

उत्तर – या योजनेचा शुभारंभ नुकताच सातारा जिल्हातील पाटण तालुक्यात 14 मे 2023 रोजी करण्यात आला होता.

२. शासन आपल्या दारी या योजनेची नोंदणी करण्यासाठी पोर्टल कोणते ?

उत्तर – महालाभार्थी या पोर्टलवर नोंदणी करून नागरिकांना शासन आपल्या दारी या योजनेचा लाभ घेता येईल.

३. शासन आपल्या दारी योजना 2024|Shasan Aplya Dari Yojna 2024 या योजनेची नोंदणी करण्यासाठी कुठे जावे लागेल?

उत्तर – शासन आपल्या दारी या योजनेची नोंदणीसाठी आपण सीएससी (CSC), एमएससीआयटी (MSCIT) कॉम्प्युटर ट्रेनिंग सेंटरमधील स्वयंसेवकांच्या मदतीने नागरिकांना नोंदणी करता येणार आहे.

४. शासन आपल्या दारी २०२४ |Shasan Aplya Dari Yojna 2024 या योजनेची नोंदणी प्रक्रिया कशी असणार आहे ?

उत्तर – नागरिकांना ऑफलाइन आणि ऑनलाईन या दोन्ही पद्धतीने शासन आपल्या दारी या योजने माध्यमातून शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळवून दिला जाईल.

हे देखील वाचा :-


योजना प्रत्येक ज्येष्ठ नागरिकाला आपल्या उतरत्या वयात जीवन सुकर व्हाव म्हणून महाराष्ट्र सरकारने आणली आहे मुख्यमंत्री वयोश्री योजना. {Mukhyamantri Vayoshri Yojna}


शेतकऱ्यानच्या फायद्या साठी वाचा. किसान सन्मान निधी योजना | {Kisan Sanman Nidhi Yojna}


आपल्या लाडक्या लेकीच्या उज्वल भविष्यासाठी जाणून घ्या सुकन्या समृद्धी योजना। {Sukanya Samrudhi Yojna}


जर तुम्ही बेरोजगार असाल तर तुम्ही बेरोजगार भत्ता योजनेचा लाभ घेऊ शकता. अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी बेरोजगार भत्ता अर्ज कसा करावा हे वाचा.{Berojgar Bhatta yojna arj ksa karava}


महिलांना व्यवसाय स्थापन करण्यासाठी प्रोत्साहन पर योजना म्हणजेच महिला समृद्धी कर्ज योजना, अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी या योजनेवर क्लिक करा. {Pm pik vima yojna 2024}


आपल्याला आपल्या हक्काचे घर मिळणार रमाई आवास घरकुल योजना अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी या योजनेवर क्लिक करा. {Ramai Awas Gharkul Yojna}


मुलीच्या उज्ज्वल भविष्यासाठी शासन घेऊन आले आहे लेक लाडकी योजना. {LEK LADKI YOJNA}


गर्भवती महिलांना पोषक आहार मिळावा यासाठी सरकार देते रोख रक्कम त्याकरिता वाचा व अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी या योजनेवर क्लिक करा  जननी सुरक्षा योजना.


व्यवसाय सुरु करण्यासाठी सरकार देत आहे बिनव्याजी कर्ज वाचा व अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी या योजनेवर क्लिक करा अण्णासाहेब पाटील कर्ज योजना.