Shabari Awas Yojana २०२४ | शबरी घरकुल योजना २०२४
आपले केंद्र सरकार व राज्य सरकार मिळून आपल्या देशातील नागरिकांना हक्काचे घर मिळावे यासाठी विविध योजना राबवत असतात. आज त्यातीलच एका महत्त्वाच्या योजनेबद्दल जाणून घेऊयात योजनेचे नाव आहे शबरी घरकुल योजना. या योजनेअंतर्गत दारिद्र्य रेषेखालील व्यक्ती ज्यांना स्वतःचे घर उपलब्ध नाही व जे अनुसूचित जाती अनुसूचित जमाती या प्रवर्गात येतात त्यांना आपल्या हक्काचे घर या योजने अंतर्गत मिळणार आहे.या योजनेद्वारे ग्रामीण भागातील व शहरी भागातील लोकांना घर बांधण्यासाठी 269 चौरस फूटामध्ये स्वतःचे घर उभारण्यासाठी दोन लाखापर्यंत आर्थिक मदत केली जाणार आहे.
या योजनेअंतर्गत 185४९ घरे बांधण्याचा संकल्प आपल्या राज्य सरकारने घेतला आहे.
या योजनेमुळे त्यांना घर नाही त्या लोकांचे ऊन वारापासून संरक्षण होणार आहे व स्वतःच्या हक्काच्याा घरात ही लोक वास्तव्य करणार आहेत खरोखर निवारा हि गरज पूर्ण करण्यासाठी आपले सरकार धडपडत आहे.शबरी आवास योजनेमुळे सर्वांना हक्काचे घर मिळणार आहे.लवकरच या योजनेची यादी जाहीर होणार आहे यादी जाहीर झाल्यानंतर आम्ही आपल्याला या पेज द्वारी सुचित करू.
शबरी घरकुल योजना २०२४ या योजनेबद्दल आम्ही तुम्हाला परिपूर्ण माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहे, यामध्ये या योजनेविषयी थोडक्यात माहिती, त्याचे ठळक मुद्दे, योजनेची पात्रता, योजनेचे फायदे, योजनेच्या अटी व शर्ती, योजनेसाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे, आणि ऑनलाईन अर्ज कसा करावा , असा हा परिपूर्ण लेख आम्ही तुमच्यासाठी सादर करत आहोत तो तुम्ही शेवटपर्यंत वाचवा हि मनापासून इच्छा व्यक्त करत आहोत. तर चला मग बघुयात योजनेविषयी परिपूर्ण अशी माहिती,
शबरी घरकुल योजना २०२४ ची ठळक मुद्दे :- {Important Points of Shabari Awas Yojana २०२४ }
शबरी घरकुल योजना २०२४ ची ठळक मुद्दे :- {Shabari Awas Yojana २०२४ } याची ठळक मुद्दे आम्ही तुम्हाला येथे देत आहोत या मुद्द्यांमुळे तुम्हाला या योजनेत काय महत्त्वाचं आहे ते समजणार आहे व तुम्हाला योग्य दिशा या योजनेचा लाभ घेण्यासाठी मिळेल अशी आशा करतो.
योजनेचे नाव | Shabari Awas Yojana २०२४ | शबरी घरकुल योजना २०२४ |
योजना कोणा व्दारा सुरु झाली {Started By Whom} | आपले राज्य शासन |
लाभार्थी {Beneficiary} | आपल्या राज्यातील ज्यांना राहायला घरे नाही असे अनुसूचित जाती,अनुसूचित जमातीतील नागरिक |
योजने मार्फत काय लाभ होणार आहे | घर बंधायला २ लाख ची अर्थिक मदत |
अधिकृत वेबसाईट {Authorized Website} | Shabari Awas Yojana २०२४ | शबरी घरकुल योजना २०२४ |
अर्ज करण्याची पद्धत {Process of Application} | ऑनलाईन / ऑफलाईन |
शबरी घरकुल योजना २०२४ या योजनेची उद्दिष्टे (Purpose of Shabari Awas Yojana २०२४ ):-
- आपल्या देशातील सर्व नागरिकांना हक्काचे घर मिळवून देणे यासाठी या योजनेची सुरुवात केली गेली.
- योजनेअंतर्गत मनरेगाच्या माध्यमातून वेगवेगळे उपलब्ध करून दिला जाणार आहे त्यामुळे प्रामुख्याने ग्रामीण भागातील होतकरू लोकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहे.
- आपल्या देशावर शौचालय बांधणीसाठी स्वच्छ भारत मिशनशन अंतर्गत योजना राबविली जाते त्या योजनेचा उपयोग शबरी आवास योजनेमध्ये देखील होणार आहे म्हणजेच आपला देश स्वच्छ होण्यासाठी देखील मदत होणार आहे.
शबरी घरकुल योजना २०२४ या योजनेच्या नोंदणीसाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे ( Documents for Shabari Awas Yojana २०२४) :-
योजनेसाठी खालील कागदपत्रे आवश्यक आहेत-
- आधार कार्ड (Aadhar Card)
- रेशन कार्ड (Ration Card)
- रहिवासी दाखला (Residence Proof)
- अर्जदाराचे जमिनीचा सातबारा (7/12 Documents)
- अर्जदाराच्या जमिनीचा अट अ (8 A)
- मोबाईल नंबर (Mobile Number)
- ई-मेल आयडी (Email ID)
- पासपोर्ट साईजचेे दोन फोटो (2 Passport Size Photographs)
- स्वयंघोषित प्रतिज्ञापत्र (Self Declartion Form)
- जातीचा दाखला (Caste Certificate)
- अर्जदार जर दिव्यांग असेल तर त्याचे दिव्यांग असल्याचे प्रमाणपत्र
- अर्जदार महिला विधवा असेल तर तिला पतीच्या मृत्यूचे प्रमाणपत्र देणे गरजेचे आहे
- अर्जदार महिला घटस्फोटीत असेल तर घटस्फोट झाल्याचा दाखला सादर करावा
शबरी घरकुल योजना २०२४ या योजनेची पात्रता (Eligibility for Shabari Awas Yojana २०२४ ) :-
- अर्ज करणारा व्यक्ती हा महाराष्ट्राचा रहिवासी असणे गरजेचे आहे.
- या योजनेचा लाभ फक्त अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीच्याच कुटुंबांना घेता येणार आहे त्यामुळे जर या योजनेचा अर्ज करायचा असेल तर आपल्याकडे जातीचे प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.
- अर्ज करणार्या व्यक्तीकडे स्वतःच्या जमिनीचे कागदपत्रे असावे किंवा सरकारद्वारे जर जमीन भेटली असेल तर त्या जमिनीचा सात बारा अथवा आठ अ उपलब्ध असावा.
- योजनेचा लाभ घेणाऱ्या व्यक्तीच्या कुटुंबातील कोणी सरकारी कर्मचारीा नसावे.
- अर्जदाराच्या नावावर यापूर्वी कोणतेही पक्के घर बांधलेले नसावे.
- शहरी वस्तीकरणातील अर्जदाराच्या कुटुंबाचे उत्पन्न एक लाख वीस हजार किंवा त्यापेक्षा कमी असावे.
- ग्रामीण भागातील अर्जदाराच्या कुटुंबाचे उत्पन्न एक लाख किंवा त्यापेक्षा कमी असावे.
- यापूर्वी अर्जदाराने शासनाकडून कोणत्याही घरकुल योजनेचा लाभ घेतलेला नसावा.
शबरी घरकुल योजना २०२४ या योजनेची अर्ज प्रक्रिया (How to apply for Shabari Awas Yojana २०२४) :-
या योजनेचा अर्ज करण्यासाठी आपल्याला ऑफलाइन पद्धतीचा वापर करावा लागणार आहे कारण ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्यासाठी कुठले पोर्टल सरकारद्वारे उपलब्ध करून दिले गेलेले नाही.
शबरी घरकुल योजना २०२४ या योजनेची ऑफलाइन अर्ज प्रक्रिया खालील प्रमाणे :-
- प्रामुख्याने अर्जदार हा ग्रामीण भागातील असेल तर तो ज्या क्षेत्रात राहतो त्या क्षेत्रातील ग्रामपंचायत कार्यालय किंवा जिल्हा कार्यालयांमध्ये जाऊन शबरी घरकुल योजनेचा अर्ज घेणे गरजेचे आहे.
- अर्ज व्यवस्थित रित्या वाचून भरायचा आहे व वरती दिलेली सर्व कागदपत्रे अर्जाबरोबर जोडायची आहेत आपल्याला हा अर्ज ग्रामपंचायत कार्यालय किंवा जिल्हा कार्यालयात जमा करायचा आहे.
- तसेच अर्जदार जर शहरी भागात राहत असेल तर तो ज्या क्षेत्रात राहतो तेथील नगरपरिषद किंवा महानगर परिषदेमध्ये जाऊन या योजनेचा फॉर्म घेणे आवश्यक आहे.
- अर्ज व्यवस्थित भरून त्याबरोबर वरती दिलेली सर्व कागदपत्रे जोडून आपल्याला हा भरलेला अर्ज नगरपरिषद किंवा महानगर परिषदेमध्ये जमा करायचा आहे.
निष्कर्ष :-
मित्रांनो, तुम्हाला आम्ही दिलेली शबरी घरकुल योजना २०२४ या योजनेबद्दलची माहिती कशी वाटली याबद्दल तुम्ही आम्हाला लेखाच्या खाली कमेंट करून कळवू शकता तसेच आमच्यासाठी काही सूचना असतील त्याही तुम्ही आम्हाला सुचवू शकता अशाच सरकारी योजना संबंधी अपडेटेड माहिती मिळवण्यासाठी आमच्या योजना गॅरंटी डॉट कॉम (yojnaguarantee.com) या संकेतस्थळाला भेट देत राहा धन्यवाद|
आशा आहे असा लेख सर्वांना आवडला असेल कृपया हल्ली जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा जेणेकरून शबरी घरकुल योजनेसाठी असं करतील बापला हक्काच्या घरात वास्तव्य करतील.
FAQ :-
१.शबरी घरकुल योजना २०२४ योजनेचा अर्ज कसा करावा ?
उत्तर-या योजनेचा अर्ज करण्यासाठी आपल्याला ऑफलाइन पद्धतीचा वापर करावा लागणार आहे कारण ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्यासाठी कुठले पोर्टल सरकारद्वारे उपलब्ध करून दिले गेलेले नाही.
२. शबरी घरकुल योजना २०२४ या योजनेचा ऑनलाइन अर्ज करायचा असल्यास अधिकृत संकेतस्थळ कोणते?
उत्तर- https://sjsa.maharashtra.gov.in/ या योजनेचा ऑनलाइन अर्ज करायचा असल्यास अधिकृत संकेतस्थळ आहे.
३. शबरी घरकुल योजना २०२४ कोणत्या राज्यामध्ये लागू आहे?
उत्तर-या योजनेचा लाभ आपल्या राज्यातील नागरिक घेऊ शकतात.
४. शबरी घरकुल योजना २०२४ चे लाभार्थी कोण आहेत ?
उत्तर-आपल्या राज्यातील अस नागरिक ज्यांना राहायला घरे नाही आहेत व ते अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीचे आहेत ते या योजनेचा फायदा घेऊ शकतात.
5.शबरी घरकुल योजना २०२४ या योजने अंतर्गत दिले जाणारे लाभ ?
उत्तर-आपले हक्काचे घर बांधण्यासाठी २ लाखाची मदत सरकार करत आहे.
6. शबरी घरकुल योजना २०२४ या योजनेचा उद्देश काय आहे ?
उत्तर-आपल्या राज्यातील कोणीही बेघर राहू नये हा प्रमुख उद्देश या योजनेचा आहे.
हे देखील वाचा :-
योजना प्रत्येक ज्येष्ठ नागरिकाला आपल्या उतरत्या वयात जीवन सुकर व्हाव म्हणून महाराष्ट्र सरकारने आणली आहे मुख्यमंत्री वयोश्री योजना. {Mukhyamantri Vayoshri Yojna}
शेतकऱ्यानच्या फायद्या साठी वाचा. किसान सन्मान निधी योजना | {Kisan Sanman Nidhi Yojna}
आपल्या लाडक्या लेकीच्या उज्वल भविष्यासाठी जाणून घ्या सुकन्या समृद्धी योजना। {Sukanya Samrudhi Yojna}
जर तुम्ही बेरोजगार असाल तर तुम्ही बेरोजगार भत्ता योजनेचा लाभ घेऊ शकता. अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी बेरोजगार भत्ता अर्ज कसा करावा हे वाचा.{Berojgar Bhatta yojna arj ksa karava}
महिलांना व्यवसाय स्थापन करण्यासाठी प्रोत्साहन पर योजना म्हणजेच महिला समृद्धी कर्ज योजना, अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी या योजनेवर क्लिक करा. {Pm pik vima yojna 2024}
आपल्याला आपल्या हक्काचे घर मिळणार रमाई आवास घरकुल योजना अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी या योजनेवर क्लिक करा. {Ramai Awas Gharkul Yojna}
मुलीच्या उज्ज्वल भविष्यासाठी शासन घेऊन आले आहे लेक लाडकी योजना. {LEK LADKI YOJNA}
गर्भवती महिलांना पोषक आहार मिळावा यासाठी सरकार देते रोख रक्कम त्याकरिता वाचा व अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी या योजनेवर क्लिक करा जननी सुरक्षा योजना.
व्यवसाय सुरु करण्यासाठी सरकार देत आहे बिनव्याजी कर्ज वाचा व अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी या योजनेवर क्लिक करा अण्णासाहेब पाटील कर्ज योजना.