SBIF Asha Scholarship 2024 | एसबीआयएफ आशा शिष्यवृत्ती हे नाव भारतीय स्टेट बँक फाउंडेशन (SBI Foundation) आणि आशा या संकल्पनेवर आधारित आहे. “एसबीआयएफ” म्हणजे एसबीआय फाउंडेशन, जी बँकेची सामाजिक जबाबदारी (CSR) पूर्ण करण्यासाठी कार्य करत आहे. “आशा” म्हणजे आशा किंवा आशेचा किरण, ज्याचा उद्देश आर्थिकदृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांसाठीत्यांच्या शिक्षणासाठी मदत करून त्यांना उज्ज्वल भविष्याची संधी प्राप्त करून देणे हा आहे. या नावामधुन विद्यार्थ्यांसाठी आर्थिक सहाय्य तसेच आशावादी दृष्टिकोन यांचे प्रतीक दर्शवले जाते.
एसबीआयएफ आशा शिष्यवृत्ती कार्यक्रम 2024 हा SBI फाऊंडेशनच्या शैक्षणिक व्हर्टिकल, इंटिग्रेटेड लर्निंग मिशन (ILM) यांच्या अंतर्गत राबवला जाणारा एक महत्त्वपूर्ण असा उपक्रम आहे, जो भारतातील सर्वात मोठ्या शिष्यवृत्ती योजनांपैकी एक आहे असा मानला जातो.
या कार्यक्रमाचा उद्देश कमी उत्पन्न गटातील विद्यार्थ्यांना आर्थिक मदत करून त्यांच्या शिक्षणामध्ये खंड पडू न देणे हा आहे. एसबीआयएफ आशा शिष्यवृत्ती इयत्ता ही 6 ते 12 वीच्या विद्यार्थ्यांसाठी तसेच NIRF मध्ये पहिल्या 100 मध्ये असलेल्या विद्यापीठे/महाविद्यालये आणि IITs, IIMs मधून MBA/PGDM अभ्यासक्रम करणाऱ्या पदवी आणि पदव्युत्तर विद्यार्थ्यांकरिता उपलब्ध असणार आहे. निवड झालेल्या विद्यार्थ्यांना त्यांच्या शैक्षणिक जीवनासाठी INR 7.5 लाखांपर्यंतची शिष्यवृत्ती दिली जाऊ शकणार आहे.
एस.बी.आय.एफ. आशा शिष्यवृत्ती – SBIF Asha Scholarship
पात्रता
- इयत्ता 6 वी ते 12 वी चे विद्यार्थी अर्ज करण्यास पात्र असणार आहेत.
- अर्जदाराने मागील शैक्षणिक वर्षामध्ये किमान 75% गुण प्राप्त केलेले असणे आवश्यक आहे.
- अर्जदाराचे वार्षिक कौटुंबिक उत्पन्न घरातील सर्व स्त्रोतांकडून 3,00,000/- पेक्षा जास्त नसावे.
हा शिष्यवृत्ती कार्यक्रम संपूर्ण भारतातील विद्यार्थ्यांसाठी खुला केलेला आहे.
विशेष टीप
50% शिष्यवृत्ती स्लॉट महिला विद्यार्थ्यांसाठी राखीव असणार आहेत.
अनुसूचित जाती / (SC) आणि अनुसूचित जमाती / (ST) प्रवर्गातील विद्यार्थ्यांना प्राधान्य दिले जाईल.
शिष्यवृत्ती रक्कम रुपये – ₹15,000/-
आवश्यक कागदपत्रे
- मागील शैक्षणिक वर्षातील गुणपत्रिका (10वी, 12वी, पदवी किंवा पदव्युत्तर प्रमाणपत्र, जसे लागू असेल तसे).
- आधार कार्ड.
- चालू शैक्षणिक वर्षाच्या भरलेल्या फीच्या पावत्या.
- चालू वर्षाच्या प्रवेशाचा पुरावा (प्रवेश पत्र, संस्थेचे ओळखपत्र/बोनाफाईड सर्टिफिकेट).
- अर्जदाराचे किंवा अर्जदाराचे नसल्यास पालकाचे बँक खाते तपशील.
- उत्पन्नाचा पुरावा (FORM 16A, सरकारी प्राधिकरणाचे उत्पन्न प्रमाणपत्र, पगाराच्या स्लिप्स इ.).
- अर्जदाराचे छायाचित्र.
- जातीचे प्रमाणपत्र (आवश्यक असल्यास).
ऑनलाइन अर्जाची अंतिम तारीख- 31 ऑक्टोबर 2024
SBIF आशा शिष्यवृत्ती ऑनलाईन अर्ज प्रक्रिया | Apply Online for SBIF Asha Scholarship
इच्छुक विद्यार्थी खालील लिंकद्वारे एसबीआयएफ आशा शिष्यवृत्तीसाठी ऑनलाईन अर्ज करू शकतात.
तशी खाली लिंक देत आहोत,
एस.बी.आय. आशा शिष्यवृत्ती अर्ज लिंक
https://www.buddy4study.com/page/sbi-asha-scholarship-program
अर्ज करण्याची पद्धत
- प्रथम दिलेल्या लिंकवर क्लिक करून पोर्टल ओपन करावे आणि ‘Apply Now‘ या बटणावर क्लिक करा.
- नोंदणीकृत ID वापरून Buddy4Study मध्ये लॉग इन करावे.
- जर Buddy4Study वर नोंदणी नसेल, तर तुमच्या ईमेल/मोबाईल/फेसबुक/जीमेलने खात्याद्वारे नोंदणी करावी.
- नोंदणी झाल्यानंतर SBIF Asha Scholarship Program 2024 च्या अर्ज करण्याच्या पेजवर जावे.
- Start Application या बटणावर क्लिक करून अर्ज भरण्यास सुरुवात करावी.
- यात आवश्यक माहिती भरावी आणि कागदपत्रे अपलोड करावीत.
- Terms and Conditions स्वीकारून Preview या बटणावर क्लिक करावे.
- सर्व तपशील योग्य असल्यास, Submit या बटणावर क्लिक करून अर्ज सबमिट करावा.
इतर शिष्यवृत्ती कार्यक्रम
एस.बी.आय.एफ. आशा शिष्यवृत्ती व्यतिरिक्त,
शालेय विद्यार्थ्यांसह इतर विद्यार्थ्यांसाठीही खालील शिष्यवृत्तीसाठी अर्ज करता येणार.
पदवीपूर्व विद्यार्थ्यांसाठी – ₹50,000 शिष्यवृत्ती.
पदव्युत्तर विद्यार्थ्यांसाठी – ₹70,000 शिष्यवृत्ती.
IIT विद्यार्थ्यांसाठी – ₹2,00,000 शिष्यवृत्ती.
IIM विद्यार्थ्यांसाठी – ₹7,50,000 शिष्यवृत्ती.
अधिक माहितीसाठी संपर्क
फोन: 011-430-92248 | (Ext: 303)
(सोमवार ते शुक्रवार, सकाळी 10:00 ते संध्याकाळी 06:00)
ईमेल: sbiashascholarship@buddy4study.com
अधिकृत वेबसाईट: अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाइटला भेट द्या.
LINK – https://www.sbifashascholarship.org/
निष्कर्ष | SBIF Asha Scholarship 2024
मित्रांनो, तुम्हाला आम्ही दिलेली SBIF Asha Scholarship 2024\एस.बी.आय.एफ. आशा शिष्यवृत्ती- 6 वी ते 12 वी च्या विद्यार्थ्यांसाठी रु. 15,000/- शिष्यवृत्ती, अर्ज करण्यासाठी ऑनलाईन प्रक्रिया सुरू ! याबद्दलची माहिती कशी वाटली याबद्दल तुम्ही आम्हाला लेखाच्या खाली कमेंट करून कळवू शकता तसेच आमच्यासाठी काही सूचना असतील त्याही तुम्ही आम्हाला सुचवू शकता अशाच सरकारी योजना संबंधी अपडेटेड माहिती मिळवण्यासाठी आमच्या योजना गॅरंटी डॉट कॉम (yojnaguarantee.com) या संकेतस्थळाला भेट देत राहा धन्यवाद|
हे देखील वाचा :-
योजना प्रत्येक ज्येष्ठ नागरिकाला आपल्या उतरत्या वयात जीवन सुकर व्हाव म्हणून महाराष्ट्र सरकारने आणली आहे मुख्यमंत्री वयोश्री योजना. {Mukhyamantri Vayoshri Yojna}
शेतकऱ्यानच्या फायद्या साठी वाचा. किसान सन्मान निधी योजना | {Kisan Sanman Nidhi Yojna}
आपल्या लाडक्या लेकीच्या उज्वल भविष्यासाठी जाणून घ्या सुकन्या समृद्धी योजना। {Sukanya Samrudhi Yojna}
जर तुम्ही बेरोजगार असाल तर तुम्ही बेरोजगार भत्ता योजनेचा लाभ घेऊ शकता. अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी बेरोजगार भत्ता अर्ज कसा करावा हे वाचा.{Berojgar Bhatta yojna arj ksa karava}
महिलांना व्यवसाय स्थापन करण्यासाठी प्रोत्साहन पर योजना म्हणजेच महिला समृद्धी कर्ज योजना, अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी या योजनेवर क्लिक करा. {Pm pik vima yojna 2024}
आपल्याला आपल्या हक्काचे घर मिळणार रमाई आवास घरकुल योजना अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी या योजनेवर क्लिक करा. {Ramai Awas Gharkul Yojna}
मुलीच्या उज्ज्वल भविष्यासाठी शासन घेऊन आले आहे लेक लाडकी योजना. {LEK LADKI YOJNA}
गर्भवती महिलांना पोषक आहार मिळावा यासाठी सरकार देते रोख रक्कम त्याकरिता वाचा व अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी या योजनेवर क्लिक करा जननी सुरक्षा योजना.
व्यवसाय सुरु करण्यासाठी सरकार देत आहे बिनव्याजी कर्ज वाचा व अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी या योजनेवर क्लिक करा अण्णासाहेब पाटील कर्ज योजना. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना