Savitribai Phule Scholarship Yojna (सावित्रीबाई फुले स्कॉलरशिप योजना) |क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले अर्थसहाय्य योजना
आर्थिक दृष्ट्या कमकुवत असलेल्या कुटुंबातील विद्यार्थिनींसाठी सावित्रीबाई फुले स्कॉलरशिप योजना सरकारने सुरू केली आहे या योजनेमधून ज्या विद्यार्थिनींची निवड होईल त्यांना या योजनेचे पासून आर्थिक मदत मिळेल ज्या विद्यार्थ्यांनी या योजनेच्या पात्रता पूर्ण करतील त्यांना अधिकृत संकेतस्थळावर जाऊन अर्ज करावा लागेल ही योजना पुणे विद्यापीठाने विद्यापीठा अंतर्गत येणारी महाविद्यालय आणि विद्यापीठ विभागांमध्ये अव्यावसायिक अभ्यासक्रमसाठी शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थिनींसाठी ही योजना सुरू केलेली आहे
शैक्षणिक गुणवत्ता असून देखील विद्यार्थीनी शिक्षणापासून वंचित राहू नये म्हणून विद्यापीठाने सावित्रीबाई फुले स्कॉलरशिप अर्थसहाय्य योजना चालू केली. सावित्रीबाई फुले स्कॉलरशिप योजनेअंतर्गत असलेल्या नियम आणि अटीनुसार अव्यावसायिक पदवी अभ्यासक्रमाच्या जास्तीत जास्त 10 व पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या जास्तीत जास्त 5 विद्यार्थीनींना गुणानुक्रमे प्रति रुपये 5,000/- अर्थसहाय्य देण्यात येते.
टीप:- कृपया नोंद घ्या ,कोणत्याही विद्यार्थिनींचे ऑफलाईन अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.
सावित्रीबाई फुले स्कॉलरशिप योजना Savitribai Phule Scholarship Yojna या योजनेची ठळक मुद्दे :-
योजनेचे नाव | सावित्रीबाई फुले स्कॉलरशिप योजना |
योजना कोणी आणली | महाराष्ट्र शासन |
Ministry | सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, महाराष्ट्र शासन. |
योजनेचा उद्देश | शिक्षण पूर्ण करण्यासाठी विद्यार्थिनींना आर्थिक मदद करणे. |
योजनेचा लाभ कुणाला | आपल्या राज्यातील गरीब कुटुंबातील विद्यार्थिनी. |
अर्ज प्रक्रिया | ऑनलाईन. |
अधिकृत संकेतस्थळ | https://bcud.unipune.ac.in/Scholorships/Applicant/Login.aspx |
योजनेच्या अंतर्गत आर्थिक मदतची रक्कम | 5,000/- रुपये आर्थिक सहाय्य. |
Email संपर्क | Email:- scholarship@pun.unipune.ac.in |
सावित्रीबाई फुले स्कॉलरशिप योजना Savitribai Phule Scholarship Yojna या योजनेची कागदपत्रे :-
- आधार कार्डची छायांकित प्रत
- रेशन कार्डची छायांकित प्रत
- रहिवाशी प्रमाणपत्रची छायांकित प्रत
- मोबाईल नंबर
- ई-मेल आयडी
- मार्कशीटची छायांकित प्रत
- राष्ट्रीयकृत बँकेच्या बचत खात्याच्या बँक पासबुकची छायांकित प्रत
- पासपोर्ट साईज फोटो
- तहसीलदाराने दिलेल्या वार्षिक उत्पनाच्या दाखल्याची छायांकित प्रत
- पुरग्रस्त किंवा दुष्काळग्रस्त प्रमाणपत्र
- विद्यार्थिनींची मागील लगतच्या अभ्यासक्रमाच्या गुणपत्रिकेची छायांकित प्रत
- शपथ पत्र
सदर योजनेच्या अंतर्गत शैक्षणिक वर्ष 2024 या कशामध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थिनींकडून संबंधित महाविद्यालय / विद्यापीठ विभाग यांच्याकडून ऑनलाईन (Online) पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
सावित्रीबाई फुले स्कॉलरशिप योजना Savitribai Phule Scholarship Yojna या योजनेची उद्दिष्टे :-
- सावित्रीबाई फुले स्कॉलरशिप योजना या योजनेच्या अंतर्गत राज्यातील गरीब कुटुंबातील विद्यार्थिनींना त्यांचे शिक्षण पूर्ण करण्यासाठी आर्थिक मदत करणे आहे.
- या योजनेद्वारे सरकारने दिलेल्या आर्थिक मदतीचा उद्देश आर्थिक दृष्ट्या दुर्बल जे कुटुंब आहेत आणि त्यामध्ये असणाऱ्या हुशार विद्यार्थिनींना प्रोत्साहन देणे आणि त्यांचे भविष्य घडवणे तसेच त्यांच्या सुरक्षित भविष्यासाठी पाया घालणे हे या योजनेचे उद्दिष्ट आहे.
- शिक्षणाचा खर्च करण्यास असमर्थ असलेल्या कुटुंबातील विद्यार्थिनींच्या शिष्यवृत्ती ची सोय या योजनेद्वारे सरकार करत आहे.
- राज्यातील गरीब कुटुंबातील विद्यार्थ्यांचा सामाजिक तसेच आर्थिक विकास व त्यांच्या जडणघडणेमध्ये आर्थिक सहाय्य या योजनेच्या माध्यमातून शासन घेऊन आले आहे.
- आपल्या राज्यातील गरीब कुटुंबातील विद्यार्थिनींना आत्मनिर्भर बनवणे त्याद्वारे एक सक्षम अशी स्त्री घडवणे, कारण एक सक्षम स्त्री एक सक्षम कुटुंब घडवते तसच एक सक्षम अस राष्ट्र ती घडवते त्यामुळे स्त्री शिक्षित करणे हे सरकारच ध्येय आहे या योजनेमार्फत सरकार ते राबवण्याचा प्रयत्न करत आहे.
- राज्यातील गरीब विद्यार्थिनींचे या योजनेच्या मदतीने त्यांच्या जीवनमानात सुधारणा घडवून आणणे.
- आपल्या राज्यातील गरीब कुटुंबातील विद्यार्थिनींना त्यांचे शिक्षण पूर्ण करण्यासाठी रुपये ५००० /- पर्यंत शिष्यवृत्ती देणे, जेणेकरून विद्यार्थिनी स्वतःचे शिक्षण पूर्ण करू शकतील.
सावित्रीबाई फुले स्कॉलरशिप योजना Savitribai Phule Scholarship Yojna या योजनेची वैशिष्ट्ये :-
- सावित्रीबाई फुले विद्यापिठाचा शैक्षणिक विभाग, पुणे यांच्याद्वारे सुरु करण्यात आलेली राज्यातील आर्थिक दृष्ट्या गरीब कुटुंबातील विद्यार्थिनींसाठी अत्यंत महत्वाची अशी योजना आहे.
- सावित्रीबाई फुले स्कॉलरशिप योजना या योजनेसाठी अर्ज करण्याची पद्धत ही ऑनलाईन असल्या कारणाने अर्जदार विद्यार्थिनींना कोणत्याच कार्यालयाच्या फेऱ्या मारण्याची गरज भासणार नाही जेणेकरून त्यांचा वेळ आणि पैसे दोघांची बचतच होईल.
- सावित्री बाई फुले स्कॉलरशिप योजना या योजनेअंतर्गत मिळणारी रक्कम विद्यार्थिनींच्या बँक खात्यातच DBT च्या माध्यमाने जमा केली जाईल.
- शैक्षणिक गुणवत्ता असून देखील विद्यार्थीनींना शिक्षणापासून वंचित राहता कामा नये यासाठी पुणे विद्यापीठाने महाविद्यालये/विद्यापीठ यांच्या विभागांमध्ये अव्यवसायिक अभ्यासक्रमात शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थीनींसाठी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले अर्थसहाय्य योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत पदवी व पदव्युत्तर अव्यवसायिक अभ्यासक्रमात प्रवेश घेतलेल्या आर्थिक दुर्बल कुटुंबातील, गुणवत्ताधारक, मागासवर्गीय विद्यार्थिनींना त्यांचे उच्च शिक्षण पूर्ण करण्यासाठी सावित्री बाई फुले स्कॉलरशिप योजना या योजनेच्या माध्यमातून आर्थिक मदद दिली जाते.
दिल्या जाणा-या लाभाचे स्वरुप :-
- शासनाच्या स्कॉलरशिपचा लाभ घेत असलेल्या विद्यार्थिनींनी अर्ज करू नये.
- पात्र अशा विद्यार्थिनींस रुपये ५०००/- आर्थिक सहाय्य देण्यात येणार आहे.
- शैक्षणिक गुणवत्ता असून देखील विद्यार्थीनी शिक्षणापासून वंचित राहू नये म्हणून विद्यापीठाकडून सावित्रीबाई फुले स्कॉलरशिप अर्थसहाय्य योजना चालू करण्यात आली आहे. सावित्री बाई फुले स्कॉलरशिप योजना या योजनेअंतर्गत सोबत जोडलेल्या नियम आणि अटीनुसार अव्यवसायिक पदवी अभ्यासक्रमाच्या जास्तीत जास्त 10 व पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या जास्तीत जास्त 5 विद्यार्थीनींना गुणानुक्रमे प्रति रुपये 5,000/- अर्थसहाय्य देण्यात येते.
अर्ज करण्याची पध्दत :-
सावित्री बाई फुले स्कॉलरशिप योजना या योजनेचे संगणकीकरण झालेले आहे त्यामुळे ऑनलाईन फॉर्म भरण्याची सुविधा उपलब्ध करुन दिलेली आहे. या संकेतस्थळावर जाऊन ऑनलाईन फॉर्म भरावा. https://bcud.unipune.ac.in/Scholorships/Applicant/Login.aspx
सावित्रीबाई फुले स्कॉलरशिप योजना Savitribai Phule Scholarship Yojna या योजनेचे फायदे :-
- सावित्रीबाई फुले स्कॉलरशिप योजना या योजनेच्या सहाय्याने विद्यार्थीनी आपले शिक्षण पूर्ण करू शकतील.
- विद्यार्थिनींना आपले शिक्षण पूर्ण करण्यासाठी कोणावर अवलंबून राहण्याची गरज नाही तसेच शिक्षणासाठी कोणाकडून जास्त व्याजाने कर्ज घेण्याची गरज भासू नये यासाठी सरकारचा हा पाऊल महत्वाचा असेल.
- सावित्रीबाई फुले स्कॉलरशिप योजना या योजनेमुळेआपल्या राज्यातील विद्यार्थिनी सशक्त तसेच आत्मनिर्भर बनतील. Savitribai Phule Scholarship
- सावित्रीबाई फुले स्कॉलरशिप योजना या योजनेमुळे राज्यातील विद्यार्थिनींचे जीवनमान सुधारेल.
- सावित्रीबाई फुले स्कॉलरशिप योजना या योजनेच्या मदतीने विद्यार्थीनी स्वतःचे शिक्षण पूर्ण करून स्वतःसाठी चांगली नोकरी मिळवतील व स्वतःचा उद्योग सुरु करून राज्यात बेरोजगार नागरिकांसाठी रोजगाराच्या नवीन संधी उपलब्ध करतील.
- सावित्रीबाई फुले स्कॉलरशिप योजना या योजनेच्या मदतीने विद्यार्थीनी स्वतःचे शिक्षण पूर्ण करून स्वतःचा सर्वांगीण विकास करून घेतील.
हे देखील वाचा :-
दोघांमिळून मिळेल रुपये १०,००० पेन्शन, मिटेल वृद्धापकाळाच टेन्शन त्यासाठी आत्ताच अर्ज करा अटल पेन्शन योजना APY SCHEME
आता प्रत्येक घरातील महिला होणार सक्षम, तिला मिळेल व्यवसाय करण्याची संधी त्यासाठी करा अर्ज महिला उद्योगिनी योजना २०२४. | Mahila Udyogini Yojna 2024.
अर्ज कोण करू शकते :-
१) सावित्री बाई फुले स्कॉलरशिप योजना हि शिष्यवृत्ती केवळ मुलींसाठी आहे.
२) सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ संलग्न विद्यालये / तसेच विद्यापीठाचे विद्यार्थी हे या योजनेसाठी अर्ज केरू शकतात.
सावित्रीबाई फुले स्कॉलरशिप योजना Savitribai Phule Scholarship Yojna अटी व शर्ती :-
Savitribai Phule Scholarship Eligibility
-: नियम, अटी व पात्रता :-
- उत्पन्न व गुणाची अट नाही.
- संबंधित शाळेच्या मुख्यध्यापकांनी विद्यार्थिनींचे अर्ज ऑनलाईन भरणे आवश्यक आहेत.
- ७५% हजेरी असल्यास शाळेने अर्ज विहीत कालावधीत सादर करावा.
- लाभधारक विद्यार्थिनी शासनमान्य शिक्षण संस्थेत नियमित शिकत असावी.
- सदर शिष्यवृत्तीची रक्कम त्या त्या मुलींच्या बँकेतील त्यांच्या खात्यामध्ये/ ऑनलाईन जमा करण्यात येते.
- विद्यार्थिनींनी दिलेल्या ग्रेड पॉइंटचा उल्लेख टाळून टक्केवारीचा उल्लेख करावा.
- पात्र गुणांपेक्षा कमी गुण व ATKT मिळालेल्या विद्यार्थ्यांनी कृपया अर्ज करू नयेत.
निष्कर्ष :-
या योजनेमध्ये आम्ही तुम्हाला परिपूर्ण माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे, यामध्ये या योजनेविषयी थोडक्यात माहिती, त्याचे ठळक मुद्दे, योजनेची पात्रता, योजनेचे फायदे, योजनेच्या अटी व शर्ती, योजनेसाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे, आणि ऑनलाईन अर्ज कसा करावा , असा हा परिपूर्ण लेख आम्ही तुमच्यासाठी सादर करत आहोत तो तुम्ही शेवटपर्यंत वाचल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद।
FAQ’S :-
1. सावित्रीबाई फुले स्कॉलरशिप योजना कुणासाठी आहे?
उत्तर- सावित्रीबाई फुले स्कॉलरशिप योजना हि शिष्यवृत्ती केवळ मुलींसाठी आहे व
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ संलग्न विद्यालये / तसेच विद्यापीठाचे विद्यार्थी.
२. सावित्रीबाई फुले स्कॉलरशिप योजना या योजनेसाठी आपण कसे अप्लाय करू शकतो ?
उत्तर- अर्ज ऑनलाईन भरून आपण या योजनेकरिता अप्लाय करू शकता.
३. सावित्रीबाई फुले स्कॉलरशिप योजना योजनेचा उद्देश काय आहे ?
उत्तर – राज्यातील आर्थिक दृष्ट्या गरीब कुटुंबातील विद्यार्थिनींचे पैशाअभावी शिक्षण अधुरे राहू नये हा उद्देश योजनेमागे सरकारचा आहे.
हे देखील वाचा :-
योजना प्रत्येक ज्येष्ठ नागरिकाला आपल्या उतरत्या वयात जीवन सुकर व्हाव म्हणून महाराष्ट्र सरकारने आणली आहे मुख्यमंत्री वयोश्री योजना.{Mukhyamantri Vayoshri Yojna}
शेतकऱ्यानच्या फायद्या साठी वाचा किसान सन्मान निधी योजना |Kisan Sanman Nidhi Yojna
आपल्या लाडक्या लेकीच्या उज्वल भविष्यासाठी जाणून घ्या सुकन्या समृद्धी योजना। Sukanya Samrudhi Yojna। Bharat Sarkar।Women Empowerment.
जर तुम्ही बेरोजगार असाल तर तुम्ही बेरोजगार भत्ता योजनेचा लाभ घेऊ शकता. अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी बेरोजगार भत्ता अर्ज कसा करावा हे वाचा.
महिलांना व्यवसाय स्थापन करण्यासाठी प्रोत्साहन पर योजना म्हणजेच महिला समृद्धी कर्ज योजना, अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी या योजनेवर क्लिक करा.
आपल्याला आपल्या हक्काचे घर मिळणार रमाई आवास घरकुल योजना अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी या योजनेवर क्लिक करा.
मुलीच्या उज्ज्वल भविष्यासाठी शासन घेऊन आले आहे लेक लाडकी योजना. { LEK LADKI YOJNA }