Sarpanch Upsarpanchachya Mandhanat duppat wadh.
सरपंच व उपसरपंचांच्या मानधनात दुप्पट वाढ / Sarpanch Upsarpanchachya Mandhanat duppat wadh, महाराष्ट्र शासनाने सरपंच आणि उपसरपंच यांचे मानधन दुप्पट करण्याचा निर्णय घेतला आहे. महागाई दरातील वाढ, वाढती जबाबदारी आणि सरपंच संघटनांनी वेळोवेळी केलेल्या मागण्यांमुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. आझाद मैदान येथे झालेल्या तीव्र अशा आंदोलनानंतर, ग्रामविकास मंत्री यांनी सरपंचांच्या मानधनात वाढ करण्याचे आश्वासन आपल्याला दिले होते, त्यानुसार हा निर्णय शासनाने मंजूर केला आहे.
ग्रामपंचायतीच्या लोकसंख्येनुसार सरपंच आणि उपसरपंचांचे मानधन खालीलप्रमाणे निश्चित करण्यात आले आहे,
साधारणतः 2000 लोकसंख्या असलेल्या ग्रामपंचायतींसाठी- सरपंचांचे मानधन 3000 रुपयांवरून 6000 रुपये करण्यात आले आहे, तर उपसरपंचांचे मानधन 1000 रुपयांवरून 2000 रुपये करण्यात आलेले आहे.
2000 ते 8000 लोकसंख्या असलेल्या ग्रामपंचायतींसाठी- सरपंचांचे मानधन 4000 रुपयांवरून 8000 रुपये करण्यात आले आहे, तर उपसरपंचांचे मानधन 1500 रुपयांवरून 3000 रुपये करण्यात आलेले आहे.
8000 पेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या ग्रामपंचायतींसाठी- सरपंचांचे मानधन 5000 रुपयांवरून 10,000 रुपये, तर उपसरपंचांचे मानधन 2000 रुपयांवरून 4000 रुपये करण्यात आलेले आहे.
शासनाने केलेल्या या मानधनवाढीमुळे राज्य शासनावर वार्षिक 116 कोटी रुपयांचा आर्थिक भार पडणार आहे.
ग्रामपंचायतींची लोकसंख्यानुसार वर्गवारी आणि सरपंच-उपसरपंचांचे मानधन- Sarpanch Upsarpanchachya Mandhanat duppat wadh
अ) ० ते २००० पर्यंत लोकसंख्या असलेल्या ग्रामपंचायती-
- सरपंचांचे दरमहा मानधन- ₹6,000
- उपसरपंचांचे दरमहा मानधन- ₹2,000
ब) २००१ ते ८००० पर्यंत लोकसंख्या असलेल्या ग्रामपंचायती-
- सरपंचांचे दरमहा मानधन- ₹8,000
- उपसरपंचांचे दरमहा मानधन- ₹3,000
क) ८००१ पेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या ग्रामपंचायती-
- सरपंचांचे दरमहा मानधन- ₹10,000
- उपसरपंचांचे दरमहा मानधन- ₹4,000
सरपंच व उपसरपंच यांच्या मानधनात वाढ का करण्यात आली हे जाणून घेऊयात –
- शासनाचा मानधन वाढीचा हेतू-
महागाई वाढ व ग्रामपंचायत कार्यक्षेत्रातील जबाबदाऱ्यांच्या वाढीमुळे सरपंच आणि उपसरपंचांच्या कामाचे मूल्य ओळखून मानधन वाढवण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. - शासनाचा आर्थिक भार-
या मानधनवाढीमुळे राज्य शासनावर वार्षिक अंदाजे ₹116 कोटींचा आर्थिक भार येणार आहे. - मानधन वितरणाचे स्वरूप-
या मानधनाच्या ७५% रक्कम राज्य शासनाकडून दिली जाईल, तर उर्वरित २५% रक्कम ग्रामपंचायतच्या स्वनिधीतून भागवली जाणार आहे. - लागू होण्याची तारीख-
शासन निर्णय निर्गमित झाल्यापासूनच ही योजना लागू असेल. - पुढील प्रक्रिया-
नवीन मानधन लागू करण्यासाठी ग्रामपंचायतींनी त्यांच्या संबंधित विभागाशी संपर्क साधावा. - इतर अटी कायम-
या योजनेसाठी यापूर्वीच्या शासन निर्णयातील इतर अटी आणि शर्ती पूर्ववतच राहतील.
ग्राम विकास विभाग शासन निर्णय – Sarpanch Upsarpanchachya Mandhanat duppat wadh
Sarpanch Upsarpanch Mandhan Baddalcha GR –
सरपंच आणि उपसरपंचांच्या मानधन वाढीसंदर्भात अधिक माहितीसाठी, शासन निर्णय बघण्यासाठी कृपया येथे क्लिक करा.
निष्कर्ष :-
मित्रांनो, तुम्हाला आम्ही दिलेली सरपंच व उपसरपंचांच्या मानधनात दुप्पट वाढ Sarpanch Upsarpanchachya Mandhanat duppat wadh या बद्दलची माहिती कशी वाटली याबद्दल तुम्ही आम्हाला लेखाच्या खाली कमेंट करून कळवू शकता तसेच आमच्यासाठी काही सूचना असतील त्याही तुम्ही आम्हाला सुचवू शकता अशाच सरकारी योजना संबंधी अपडेटेड माहिती मिळवण्यासाठी आमच्या योजना गॅरंटी डॉट कॉम (yojnaguarantee.com) या संकेतस्थळाला भेट देत राहा धन्यवाद|
हे देखील वाचा :-
योजना प्रत्येक ज्येष्ठ नागरिकाला आपल्या उतरत्या वयात जीवन सुकर व्हाव म्हणून महाराष्ट्र सरकारने आणली आहे मुख्यमंत्री वयोश्री योजना. {Mukhyamantri Vayoshri Yojna}
शेतकऱ्यानच्या फायद्या साठी वाचा. किसान सन्मान निधी योजना | {Kisan Sanman Nidhi Yojna}
आपल्या लाडक्या लेकीच्या उज्वल भविष्यासाठी जाणून घ्या सुकन्या समृद्धी योजना। {Sukanya Samrudhi Yojna}
जर तुम्ही बेरोजगार असाल तर तुम्ही बेरोजगार भत्ता योजनेचा लाभ घेऊ शकता. अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी बेरोजगार भत्ता अर्ज कसा करावा हे वाचा.{Berojgar Bhatta yojna arj ksa karava}
महिलांना व्यवसाय स्थापन करण्यासाठी प्रोत्साहन पर योजना म्हणजेच महिला समृद्धी कर्ज योजना, अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी या योजनेवर क्लिक करा. {Pm pik vima yojna 2024}
आपल्याला आपल्या हक्काचे घर मिळणार रमाई आवास घरकुल योजना अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी या योजनेवर क्लिक करा. {Ramai Awas Gharkul Yojna}
मुलीच्या उज्ज्वल भविष्यासाठी शासन घेऊन आले आहे लेक लाडकी योजना. {LEK LADKI YOJNA}
गर्भवती महिलांना पोषक आहार मिळावा यासाठी सरकार देते रोख रक्कम त्याकरिता वाचा व अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी या योजनेवर क्लिक करा जननी सुरक्षा योजना.
व्यवसाय सुरु करण्यासाठी सरकार देत आहे बिनव्याजी कर्ज वाचा व अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी या योजनेवर क्लिक करा अण्णासाहेब पाटील कर्ज योजना.