Rashtriya Bachat Mudat Thev Yojna 2024 | (राष्ट्रीय बचत मुदत ठेव योजना २०२४)
आपण जाणून घेऊया राष्ट्रीय बचत मुदत ठेव योजना. या योजनेबद्दल प्रामुख्याने ही योजना भारतीय रिझर्व बँकनेे सुरु केली. ही योजना भारतीय पोस्ट खात्या द्वारे राबविली जाते. कमीत कमी एक हजार रुपये टाकून आपण या योजनेचे खाते उघडू शकतो. तुम्ही किती वर्षासाठी गुंतवणूक करत आहात यावर या योजनेचा व्याजदर अवलंबून आहे.कमी वेळेत चांगला व्याजदर उपलब्ध करून देणारी सरकारी योजना म्हणून या योजनेकडे बघितले जाते. या योजनेमध्ये आपण एक वर्ष ,दोन वर्ष ,तीन वर्ष किंवा पाच वर्ष अशा वर्षांसाठी गुंतवणूक करू शकतो.
आपले पैसे सुरक्षिते ठेवायचे असतील तर आपण पोस्टाच्या या योजनेमध्ये आपले पैसे गुंतवू शकतो व या गुंतवणुकीच्या बदल्यात चांगला व्याजदर मिळू शकतो.
राष्ट्रीय बचत मुदत ठेव योजना २०२४ या योजनेबद्दल आम्ही तुम्हाला परिपूर्ण माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहे, यामध्ये या योजनेविषयी थोडक्यात माहिती, त्याचे ठळक मुद्दे, योजनेची पात्रता, योजनेचे फायदे, योजनेच्या अटी व शर्ती, योजनेसाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे, आणि ऑनलाईन अर्ज कसा करावा , असा हा परिपूर्ण लेख आम्ही तुमच्यासाठी सादर करत आहोत तो तुम्ही शेवटपर्यंत वाचवा हि मनापासून इच्छा व्यक्त करत आहोत. तर चला मग बघुयात योजनेविषयी परिपूर्ण अशी माहिती,
राष्ट्रीय बचत मुदत ठेव योजना २०२४ ची ठळक मुद्दे :- {Important Points of Rashtriya Bachat Mudat Thev Yojna 2024}
एल.आय.सी. आत्मनिर्भर महिला अभियान २०२४ ची ठळक मुद्दे :- { L. I. C. Atma Nirbhar Mahila Abhiyaan 2024 } याची ठळक मुद्दे आम्ही तुम्हाला येथे देत आहोत या मुद्द्यांमुळे तुम्हाला या योजनेत काय महत्त्वाचं आहे ते समजणार आहे व तुम्हाला योग्य दिशा या योजनेचा लाभ घेण्यासाठी मिळेल अशी आशा करतो.
योजनेचे नाव | Rashtriya Bachat Mudat Thev Yojna 2024 | (राष्ट्रीय बचत मुदत ठेव योजना २०२४) |
योजना कोणा व्दारा सुरु झाली {Started By Whom} | भारतीय पोस्ट ऑफिस |
लाभार्थी {Beneficiary} | आपल्या देशातील नागरिक |
योजने मार्फत काय लाभ होणार आहे | कमी वेळेत जास्त व्याजदर गुंतवणूक देणारी योजना |
अधिकृत वेबसाईट {Authorized Website} | Rashtriya Bachat Mudat Thev Yojna 2024 | (राष्ट्रीय बचत मुदत ठेव योजना २०२४) |
अर्ज करण्याची पद्धत {Process of Application} | ऑनलाईन / ऑफलाईन |
राष्ट्रीय बचत मुदत ठेव योजना २०२४ या योजनेची उद्दिष्टे (Purpose of Rashtriya Bachat Mudat Thev Yojna 2024 ):-
- आपल्या देशातील नागरिकांना बचतीची सवय लागावी या उद्देशाने सरकारने ही योजना राबवली आहे.
- सुरक्षित गुंतवणूक हे उद्दिष्ट समोर ठेवून केंद्र सरकारने ही योजना राबवली आहे.
- बचत करणाऱ्या अर्जदाराला जास्तीत जास्त व्याजदर कसा उपलब्ध करून देता येईल व त्यांचे आर्थिक सक्षमीकरण करणे हे या योजनेचे उद्देश आहे.
- या योजने अंतर्गत एक वर्ष ,दोन वर्ष, तीन वर्ष, किंवा पाच वर्ष अशी आपण गुंतवणूक करू शकतो त्यामुळे या योजने अंतर्गत गुंतवणूकदारांना पैसे मिळविण्यासाठी खूप दिवस वाट बघण्याची आवश्यकता नाही.
- या योजने द्वारे गुंतवणूकदार आपले पैसे गुंतवतील व त्याचा योग्य मोबदला मिळवतील या द्वारे आपल्या देशाच्या प्रगतीला देखील गुंतवणूकदारांची मदत होणार आहे.
राष्ट्रीय बचत मुदत ठेव योजना २०२४ या योजनेचा व्याजदर(Rate of interest for Rashtriya Bachat Mudat Thev Yojna 2024):
गुंतवणुकीचे वर्ष (years) | व्याजदर(Rate of interest) |
1 वर्ष | ६.९ % |
२ वर्ष | 7.0 % |
3 वर्ष | 7.1 % |
5 वर्ष | 7.5 % |
राष्ट्रीय बचत मुदत ठेव योजना २०२४ या योजनेच्या नोंदणीसाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे ( Documents for Rashtriya Bachat Mudat Thev Yojna 2024 ) :-
योजनेसाठी खालील कागदपत्रे आवश्यक आहेत-
- आधार कार्ड (Aadhar Card)
- रेशन कार्ड (Ration Card)
- रहिवासी दाखला (Residence Proof))
- मोबाईल नंबर (Mobile Number)
- ई-मेल आयडी (Email ID)
- पासपोर्ट साईजचेे दोन फोटो (2 Passport Size Photographs)
- स्वयंघोषित प्रतिज्ञापत्र (Self Declartion Form)
राष्ट्रीय बचत मुदत ठेव योजना २०२४या योजनेची पात्रता (Eligibility for Rashtriya Bachat Mudat Thev Yojna 2024 ) :-
- अर्जदाराकडे खाते उघडण्यासाठी कमीत कमी हजार रुपये उपलब्ध असावेत अर्जदार जास्तीत जास्त कितीही रक्कम या योजनेत गुंतवू शकतो.
- अर्ज करणारे व्यक्ती भारताचा नागरिक असावा.
- या योजने अंतर्गत तुम्ही एकापेक्षा जास्त खाते ओपन करू शकता.
- या योजनेचा अर्जदार हा अठरा वर्षापेक्षा जास्त असावा.
- अठरा वर्षा पेक्षा कमी वयाच्या अर्जदारांचे या योजने अंतर्गत खाते उघडायचे असेल तर ते त्याच्या पालकाला उघडावे लागेल.
राष्ट्रीय बचत मुदत ठेव योजना २०२४ या योजनेची अर्ज प्रक्रिया (How to apply for Rashtriya Bachat Mudat Thev Yojna 2024 ) :-
- खाली दिलेल्या अधिकृत वेबसाईटवर क्लिक करा.
Rashtriya Bachat Mudat Thev Yojna 2024 | (राष्ट्रीय बचत मुदत ठेव योजना २०२४)
- आपल्याला अर्ज मिळेल.
- दिलेला अर्ज आपल्याला व्यवस्थित रित्या वाचून त्यात विचारलेल्या सर्व प्रश्नांची उत्तरे व्यवस्थित भरायची आहेत.
- वरती दिलेली सर्व कागदपत्रे आपल्याला अर्जा सोबत जोडायची आहेत.
- पोस्ट ऑफिस मध्ये हा अर्ज जमा करायचा आहे.
राष्ट्रीय बचत मुदत ठेव योजना २०२४ या योजनेचे खाते बंद करत असाल तर ???
- राष्ट्रीय बचत ठेव खाते अंतर्गत आपण अर्ज करत असाल तर या गोष्टी जाणून घेणे महत्त्वाचे आहे की आपल्याला जर अचानक काही कारण असतं खाते बंद करायची वेळ आली तर आपण सहा महिन्यानंतर आपली गुंतवणूक काढू शकतो.
- सहा महिन्यानंतर आपण आपले गुंतवणुकीचे पैसे काढणार असाल तर एक वर्षापर्यंतचा जो व्याजदर आहे तो आपल्या रकमेवर लागू केला जाईल.
- आपण मुदतीपूर्व गुंतवणुकीतील पैसे काढणार असाल तर २ % कमी व्याजदर आपल्या गुंतवणुकीवर आकारला जाईल.
- यासाठी आपल्याला ऑफिशियल अर्ज करून आपले खाते बंद करणे गरजेचे आहे.
निष्कर्ष :-
मित्रांनो, तुम्हाला आम्ही दिलेली राष्ट्रीय बचत मुदत ठेव योजना २०२४ या योजनेबद्दलची माहिती कशी वाटली याबद्दल तुम्ही आम्हाला लेखाच्या खाली कमेंट करून कळवू शकता तसेच आमच्यासाठी काही सूचना असतील त्याही तुम्ही आम्हाला सुचवू शकता अशाच सरकारी योजना संबंधी अपडेटेड माहिती मिळवण्यासाठी आमच्या योजना गॅरंटी डॉट कॉम (yojnaguarantee.com) या संकेतस्थळाला भेट देत राहा धन्यवाद|
पोस्ट खात्याची अत्यंत चांगली योजना म्हणून या योजनेला ओळखले जाते. आशा आहे की, आपल्याला हा लेख आवडला असेल हा लेख जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा. जेणेकरून तो योग्य व्यक्तीपर्यंत पोहोचेल व अर्जदार गुंतवणूक करू शकेल.
FAQ :-
१. राष्ट्रीय बचत मुदत ठेव योजना २०२४ योजनेचा अर्ज कसा करावा ?
उत्तर-या योजनेचा अर्ज करण्यासाठी आपण ज्या क्षेत्रात राहतो तेथील जवळील पोस्ट खात्यात जाणे गरजेचे आहे तेथून आपल्याला राष्ट्रीय बचत मुदत ठेव योजना या योजनेचा अर्ज घेऊन तो व्यवस्थित रित्या भरून त्याच्याबरोबर वरती दिलेली सर्व कागदपत्रे जोडायची आहेत अशाप्रकारे आपण हा या योजनेचा लाभ घेऊ शकतो.
२. राष्ट्रीय बचत मुदत ठेव योजना २०२४ या योजनेचा ऑनलाइन अर्ज करायचा असल्यास अधिकृत संकेतस्थळ कोणते?
उत्तर- https://www.indiapost.gov.in/Financial/pages/content/post-office-saving-schemes.aspx
३. राष्ट्रीय बचत मुदत ठेव योजना २०२४ कोणत्या राज्यामध्ये लागू आहे?
उत्तर-योजना केंद्र सरकारची असल्या कारणास्तव ही आपल्या देशातील सर्व राज्यांमध्ये लागू झाली आहे.
४.राष्ट्रीय बचत मुदत ठेव योजना २०२४ चे लाभार्थी कोण आहेत ?
उत्तर-आपल्या देशातील सर्व सुज्ञ नागरिक या योजनेचा लाभ घेऊ शकतात.
5.राष्ट्रीय बचत मुदत ठेव योजना २०२४ या योजने अंतर्गत दिले जाणारे लाभ ?
उत्तर-या योजनेअंतर्गत आपण एक वर्ष दोन वर्षात तीन वर्ष किंवा पाच वर्ष अशा कालावधीसाठी रक्कम गुंतवू शकतो व चांगल्या व्याजदराने आपली गुंतवलेली रक्कम वाढवू शकतो.
हे देखील वाचा :-
योजना प्रत्येक ज्येष्ठ नागरिकाला आपल्या उतरत्या वयात जीवन सुकर व्हाव म्हणून महाराष्ट्र सरकारने आणली आहे मुख्यमंत्री वयोश्री योजना. {Mukhyamantri Vayoshri Yojna}
शेतकऱ्यानच्या फायद्या साठी वाचा. किसान सन्मान निधी योजना | {Kisan Sanman Nidhi Yojna}
आपल्या लाडक्या लेकीच्या उज्वल भविष्यासाठी जाणून घ्या सुकन्या समृद्धी योजना। {Sukanya Samrudhi Yojna}
जर तुम्ही बेरोजगार असाल तर तुम्ही बेरोजगार भत्ता योजनेचा लाभ घेऊ शकता. अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी बेरोजगार भत्ता अर्ज कसा करावा हे वाचा.{Berojgar Bhatta yojna arj ksa karava}
महिलांना व्यवसाय स्थापन करण्यासाठी प्रोत्साहन पर योजना म्हणजेच महिला समृद्धी कर्ज योजना, अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी या योजनेवर क्लिक करा. {Pm pik vima yojna 2024}
आपल्याला आपल्या हक्काचे घर मिळणार रमाई आवास घरकुल योजना अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी या योजनेवर क्लिक करा. {Ramai Awas Gharkul Yojna}
मुलीच्या उज्ज्वल भविष्यासाठी शासन घेऊन आले आहे लेक लाडकी योजना. {LEK LADKI YOJNA}
गर्भवती महिलांना पोषक आहार मिळावा यासाठी सरकार देते रोख रक्कम त्याकरिता वाचा व अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी या योजनेवर क्लिक करा जननी सुरक्षा योजना.
व्यवसाय सुरु करण्यासाठी सरकार देत आहे बिनव्याजी कर्ज वाचा व अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी या योजनेवर क्लिक करा अण्णासाहेब पाटील कर्ज योजना.