Pradhan Mantri Krishi Sinchan Yojna 2024(PMKSY 2024) |प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना महाराष्ट्र 2024
आपला भारत देशा कृषी प्रधान देश आहे .आपल्या देशात पारंपरिक रीतीने शेती केली जाते. वाढत्या प्रदूषणामुळे व वृक्षतोडीमुळे पाण्याचा साठा कमी होत चाललेला आहे. तसेच पावसाचे प्रमाण देखील दिवसेन दिवस कमी होत चालले आहे. पाण्या अभावी शेती करणे शेतकऱ्यांसाठी खूप अवघड होत आहे.
आपले केंद्र सरकार व राज्य सरकार आपल्या देशातील शेतकऱ्यांसाठी विविध योजना राबवत असतो त्यातीलच एक महत्त्वाची योजना म्हणजे पंतप्रधान कृषी सिंचन योजना.या योजनेअंतर्गत सिंचन करण्यासाठी आपल्या शेतकऱ्यांना अनुदान दिले जाणार आहे.या योजने अंतर्गत सिंचन उभारण्यासाठी ५५ टक्के पर्यंतचे अनुदान आपल्या शेतकरी बांधवांना सरकार देत आहे. या योजनेअंतर्गत अल्प व अत्यल्प भूधारक शेतकर्यांना 55% पर्यंत अनुदान तसेच इतर शेतकऱ्यांसाठी 45% पर्यंतचे अनुदान आपल्या सरकारने जाहीर केले आहे. सिंचन योजनेअंतर्गत पाण्याच्या प्रत्येक थेंबाचा उपयोग आपल्या शेतातील पिकांना होणार आहे.
आतापर्यंतच्या अहवालानुसार महाराष्ट्र राज्यामध्ये सर्वात जास्त कृषी सिंचन केले गेले आहे. आपल्या भारत देशाच्या एकूण कृषी सिंचन संख्येच्या 60% कृषी सिंचन आपल्या महाराष्ट्रात केली गेले आहे.
प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना महाराष्ट्र 2024 या योजनेबद्दल आम्ही तुम्हाला परिपूर्ण माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहे, यामध्ये या योजनेविषयी थोडक्यात माहिती, त्याचे ठळक मुद्दे, योजनेची पात्रता, योजनेचे फायदे, योजनेच्या अटी व शर्ती, योजनेसाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे, आणि ऑनलाईन अर्ज कसा करावा , असा हा परिपूर्ण लेख आम्ही तुमच्यासाठी सादर करत आहोत तो तुम्ही शेवटपर्यंत वाचवा हि मनापासून इच्छा व्यक्त करत आहोत. तर चला मग बघुयात योजनेविषयी परिपूर्ण अशी माहिती,
प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना महाराष्ट्र 2024 ची ठळक मुद्दे :- {Important Points of Pradhan Mantri Krishi Sinchan Yojna 2024 }
प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना महाराष्ट्र 2024 ची ठळक मुद्दे :- { Pradhan Mantri Krishi Sinchan Yojna 2024(PMKSY 2024) } याची ठळक मुद्दे आम्ही तुम्हाला येथे देत आहोत या मुद्द्यांमुळे तुम्हाला या योजनेत काय महत्त्वाचं आहे ते समजणार आहे व तुम्हाला योग्य दिशा या योजनेचा लाभ घेण्यासाठी मिळेल अशी आशा करतो.
योजनेचे नाव | Pradhan Mantri Krishi Sinchan Yojna 2024(PMKSY 2024) |प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना महाराष्ट्र 2024 |
योजना कोणा व्दारा सुरु झाली {Started By Whom} | केंद्र सरकार |
लाभार्थी {Beneficiary} | आपल्या देशातील शेतकरी |
योजने मार्फत काय लाभ होणार आहे | कृषी सिंचनासाठी अनुदान मिळणार आहे |
अधिकृत वेबसाईट {Authorized Website} | Pradhan Mantri Krishi Sinchan Yojna 2024(PMKSY 2024) |प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना महाराष्ट्र 2024 |
अर्ज करण्याची पद्धत {Process of Application} | ऑनलाईन |
योजनेचा हेल्पलाईन नंबर | 022-61316429 |
प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना महाराष्ट्र 2024 या योजनेची उद्दिष्टे (Purpose of Pradhan Mantri Krishi Sinchan Yojna 2024 ):-
- पाण्याचा थेंब न थेंब आपल्या शेतीसाठी उपयोगात यावा यासाठी कृषी सिंचन योजनेमार्फत अनुदान दिले जात आहे.
- वाढत्या पाणी टंचाईचा विचार करून अतिशय कमीत कमी पाण्यामध्ये उपयुक्त शेती करणे हे प्रमुख उद्दिष्टे आपल्या राज्य सरकारचे या योजनेमार्फत आहे.
- पाण्याअभावी पिकांचे होणारी नुकसान टाळण्यासाठी या योजनेची सुरुवात केली गेली.
- आपल्या देशातील तरुण वर्गाला कृषी व्यवसायाकडे वळण्यासाठी प्रोत्साहित करून नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून शेती व्यवसायावर भर देण्यासाठी योजना राबवली जात आहे.
- पाण्याचा अति वापर टाळणे व थोड्या पाण्यात योग्य प्रकारे शेती करणे ज्यामुळे पाण्याची कार्यक्षमता वाढेल व पीक देखील चांगल्या प्रमाणात उत्पादित होईल.
- आधुनिक तंत्रज्ञान आपल्या शेतीमध्ये आणून आपल्या महाराष्ट्रामध्ये सूक्ष्म सिंचनाखालील क्षेत्राची वाढ करणे हा प्रमुख उद्देश योजनेअंतर्गत आपले राज्य सरकार राबवत आहे.
- या योजनेद्वारे बेरोजगार तरुण वर्गाला देखील रोजगाराच्या विविध संधी उपलब्ध होणार आहेत.
प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना महाराष्ट्र 2024 या योजनेच्या नोंदणीसाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे ( Documents of Pradhan Mantri Krishi Sinchan Yojna 2024) :-
योजनेसाठी खालील कागदपत्रे आवश्यक आहेत-
- आधार कार्ड (Aadhar Card)
- रेशन कार्ड (Ration Card)
- रहिवासी दाखला (Residence Proof)
- अर्जदाराचे जमिनीचा सातबारा (7/12 Documents)
- अर्जदाराच्या जमिनीचा अट अ (8 A)
- मोबाईल नंबर (Mobile Number)
- ई-मेल आयडी (Email ID)
- पासपोर्ट साईजचेे दोन फोटो (2 Passport Size Photographs)
- स्वयंघोषित प्रतिज्ञापत्र (Self Declartion Form)
- जातीचा दाखला (Caste Certificate)
- लाईट बिल
- कृषी सिंचन खरेदी केल्याची बिल
प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना महाराष्ट्र 2024 या योजनेची पात्रता (Eligibility for Pradhan Mantri Krishi Sinchan Yojna 2024 ) :-
- अर्जदार महाराष्ट्राचा रहिवासी असल्यास आवश्यक आहे.
- ही योजना प्रामुख्याने आपल्या देशातील शेतकरी वर्गासाठी आहे त्यामुळे अर्जदार शेतकऱ्याकडे स्वतःच्या जमिनीचा ७/१२ व ८ अ प्रमाणपत्र असावे.
- कुटुंबातील एकाच अर्जदाराला या योजनेअंतर्गत लाभ मिळणार आहे.
- अर्जदार जर अनुसूचित जाती,अनुसूचित जमातीचा असेल तर त्याच्याकडे जातीचा दाखलाच नाही आवश्यक आहे.
- 2016- 17 मध्ये जर योजनेअंतर्गत सर्वे नंबरसाठी लाभ घेत असेल तर पुढच्या दहा वर्ष या योजनेचा लाभ घेता येणार नाही.तसेच 2017- 2018 नंतर या योजनेचा लाभ विशिष्ट सर्वे नंबरसाठी घेतलेला असेल पुढील सात वर्ष या योजने अंतर्गत लाभ घेता येणार नाही.
- या योजनेसाठी विजेची गरज असल्या कारणाने अर्जदार शेतकऱ्यांकडे वीज भरण्याची पुरावा असावा.
- शेतकऱ्याला पाच हेक्टर जमिनीसाठी या योजनेचा लाभ दिला जाईल.
- शेतकऱ्याला जेव्हा योजनेचा लाभ मंजूर होईल त्यानंतर तीस दिवसाच्या आत शेतकऱ्याला हा संच विकत घेऊन बिल अर्जासोबत अपलोड करणे गरजेचे आहे.
- योजनेचा अर्ज ऑनलाईन भरणे अनिवार्य आहे.
- अर्ज न करता शेतकरी बांधवांनी सिंचनाचा संच विकत घेतला असल्यास शेतकऱ्यांचा अर्ज फेटाळला जाईल.
- शेतकरी कोणत्याही साधना द्वारे आपल्या शेतीला पाणी देत असेल तर त्याची नोंद शेतकऱ्याच्या सातबारावर उपलब्ध असावी नसल्यास ज्यांना संपादा विभागाच्या अधिकाऱ्यांकडून प्रमाणपत्र घेणे गरजेचे आहे.
- या योजनेत अर्ज करणार्या शेतकऱ्याकडे आधार कार्ड असणे गरजेचे आहे.
- या योजनेअंतर्गत मिळालेल्या सिंचन शेतकरी विक्रीसाठी ठेवणार नाही असे आढळल्यास अर्जदारावर कायदेशीर कारवाई होईल.
प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना महाराष्ट्र 2024 या योजनेची अर्ज प्रक्रिया (How to apply for Pradhan Mantri Krishi Sinchan Yojna 2024) :-
प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना महाराष्ट्र 2024 या योजनेची ऑनलाइन अर्ज प्रक्रिया खालील प्रमाणे :-
- कृषी सिंचन योजनेसाठी अर्ज करण्यासाठी खाली दिलेल्या अधिकृत वेबसाईट वर जावे लागेल.
Pradhan Mantri Krishi Sinchan Yojna 2024(PMKSY 2024) |प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना महाराष्ट्र 2024
- आता आपल्या समोर होम पेज ओपन होईल.
- आता आपल्याला शेतकरी योजनेवर क्लिक करायचे आहे.
- आपल्यासमोर ओपन झालेले पेजवर आपल्याला रजिस्ट्रेशन करायचे आहे.
- आता तयार झालेला यूजर नेम आणि पासवर्ड टाकून आपल्याला लॉगिन करायचे आहे.
- आपल्याला सिंचन साधने व सुविधा यावर क्लिक करायचे आहे.
- आता आपल्यासमोर एक नवीन पेज ओपन होईल त्यामध्ये आपल्याला सिंचन स्रोत याविषयी विचारलेली सर्व माहिती व्यवस्थित रित्या उभरायची आहे व जोडा बटन वर क्लिक करायचे आहे.
- आता आपल्यासमोर अर्ज ओपन होईल त्यात विचारलेली माहिती आपल्याला व्यवस्थित रित्या भरायची आहे व वरती दिलेली सर्व कागदपत्रे अपलोड करायची आहेत.
- आता आपल्यासमोर पेमेंटचा एक ऑप्शन ओपन होईल त्यात आपल्याला 23 /-रुपये पेमेंट करायचे आहे.
- अशाप्रकारे अत्यंत सोप्या पद्धतीने आपण घर बसल्या पंतप्रधान कृषी सिंचन योजनेचा लाभ घेऊ शकतो.
निष्कर्ष :-
मित्रांनो, तुम्हाला आम्ही दिलेली प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना महाराष्ट्र 2024 या योजनेबद्दलची माहिती कशी वाटली याबद्दल तुम्ही आम्हाला लेखाच्या खाली कमेंट करून कळवू शकता तसेच आमच्यासाठी काही सूचना असतील त्याही तुम्ही आम्हाला सुचवू शकता अशाच सरकारी योजना संबंधी अपडेटेड माहिती मिळवण्यासाठी आमच्या योजना गॅरंटी डॉट कॉम (yojnaguarantee.com) या संकेतस्थळाला भेट देत राहा धन्यवाद|
FAQ :-
१. प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना महाराष्ट्र 2024 योजनेचा अर्ज कसा करावा ?
उत्तर-आपण या योजनेचा लाभ ऑनलाईन अर्ज करून घेऊ शकतो.
२. प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना महाराष्ट्र 2024 या योजनेचा ऑनलाइन अर्ज करायचा असल्यास अधिकृत संकेतस्थळ कोणते?
उत्तर- https://mahadbt.maharashtra.gov.in/Farmer/SchemeData/SchemeData?str=E9DDFA703C38E51AC7B56240D6D84F28
३.प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना महाराष्ट्र 2024 कोणत्या राज्यामध्ये लागू आहे?
उत्तर-हि योजना केंरा सरकारची आहे त्यामुळे हि योजना सर्व राज्यांसाठी लागू झाली आहे.
४.प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना महाराष्ट्र 2024 चे लाभार्थी कोण आहेत ?
उत्तर-आपल्या देशातील शेतकरी या योजनेचा लाभ घेऊ शकतात.
5.प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना महाराष्ट्र 2024 या योजने अंतर्गत दिले जाणारे लाभ ?
उत्तर-सिंचन योजनेसाठी अनुदान दिले जाईल.
हे देखील वाचा :-
योजना प्रत्येक ज्येष्ठ नागरिकाला आपल्या उतरत्या वयात जीवन सुकर व्हाव म्हणून महाराष्ट्र सरकारने आणली आहे मुख्यमंत्री वयोश्री योजना. {Mukhyamantri Vayoshri Yojna}
शेतकऱ्यानच्या फायद्या साठी वाचा. किसान सन्मान निधी योजना | {Kisan Sanman Nidhi Yojna}
आपल्या लाडक्या लेकीच्या उज्वल भविष्यासाठी जाणून घ्या सुकन्या समृद्धी योजना। {Sukanya Samrudhi Yojna}
जर तुम्ही बेरोजगार असाल तर तुम्ही बेरोजगार भत्ता योजनेचा लाभ घेऊ शकता. अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी बेरोजगार भत्ता अर्ज कसा करावा हे वाचा.{Berojgar Bhatta yojna arj ksa karava}
महिलांना व्यवसाय स्थापन करण्यासाठी प्रोत्साहन पर योजना म्हणजेच महिला समृद्धी कर्ज योजना, अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी या योजनेवर क्लिक करा. {Pm pik vima yojna 2024}
आपल्याला आपल्या हक्काचे घर मिळणार रमाई आवास घरकुल योजना अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी या योजनेवर क्लिक करा. {Ramai Awas Gharkul Yojna}
मुलीच्या उज्ज्वल भविष्यासाठी शासन घेऊन आले आहे लेक लाडकी योजना. {LEK LADKI YOJNA}
गर्भवती महिलांना पोषक आहार मिळावा यासाठी सरकार देते रोख रक्कम त्याकरिता वाचा व अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी या योजनेवर क्लिक करा जननी सुरक्षा योजना.
व्यवसाय सुरु करण्यासाठी सरकार देत आहे बिनव्याजी कर्ज वाचा व अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी या योजनेवर क्लिक करा अण्णासाहेब पाटील कर्ज योजना.