PMFME Scheme(Pradhan Mantri Formalization of Micro Food Processing Enterprise Scheme 2024) | प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना २०२४

Table of Contents

Pradhan Mantri Formalization of Micro Food Processing Enterprise Scheme 2024 (PMFME Scheme) | (प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना २०२४)

आपले राज्य सरकार व केंद्र सरकार मिळून चालत असणाऱ्या योजनेंपैकी आज एक महत्त्वाची योजनेबद्दल आपण जाणून घेऊयात योजनेचे नाव आहे प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना. आपल्या राज्यातील तरुणाईला एक नवीन दिशा दाखविणारा हि योजना आहे. या उद्योगांतर्गत अन्नप्रक्रिया हा व्यवसाय उभारण्यासाठी आपले राज्य सरकार 35 टक्के अनुदान देत आहे. ही ३५% अनुदान म्हणजे दहा लाख ते तीन कोटी इतके अर्थ सहाय्य आहे.कृषी, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय विभाग मार्फत हि योजना चालवली जात आहे.

या योजनेअंतर्गत ६० टक्के आपले राज्य सरकार व 40% आपले केंद्र सरकार मिळून मदत करणार आहे.या योजनेअंतर्गत याद्वारे आपल्या शेतकऱ्यांनी शेतात पिकवलेल्या अन्नधान्यांना चांगला भाव मिळणार आहे.एक जिल्हा एक उत्पादन या अनुषंगाने ही योजना सुरू करण्यात आली आहे.या योजनेअंतर्गत ज्या अर्जदारांना कर्ज मंजूर झाले आहे त्यांच्यासाठी देखील आपले सरकार मोफत प्रशिक्षण देत आहे. त्या प्रशिक्षणाच्या स्वरूपामध्ये 50 तासांची प्रशिक्षण अर्जदारास व अर्जदाराने सुरू केलेल्या व्यवसायामध्ये जे कामगार काम करत आहे, त्यांना 24 तासाचे प्रशिक्षण दिले जाते .हे प्रशिक्षण प्रत्येक जिल्हास्तरीय शाखेत देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.

प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना २०२४ या योजनेबद्दल आम्ही तुम्हाला परिपूर्ण माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहे, यामध्ये या योजनेविषयी थोडक्यात माहिती, त्याचे ठळक मुद्दे, योजनेची पात्रता, योजनेचे फायदे, योजनेच्या अटी व शर्ती, योजनेसाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे, आणि ऑनलाईन अर्ज कसा करावा , असा हा परिपूर्ण लेख आम्ही तुमच्यासाठी सादर करत आहोत तो तुम्ही शेवटपर्यंत वाचवा हि मनापासून इच्छा व्यक्त करत आहोत. तर चला मग बघुयात योजनेविषयी परिपूर्ण अशी माहिती,

प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना २०२४ ची ठळक मुद्दे :- {Important Points of Pradhan Mantri Formalization of Micro Food Processing Enterprise Scheme 2024(PMFME Scheme)}

प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना २०२४ ची ठळक मुद्दे :- { Pradhan Mantri Formalization of Micro Food Processing Enterprise Scheme 2024} याची ठळक मुद्दे आम्ही तुम्हाला येथे देत आहोत या मुद्द्यांमुळे तुम्हाला या योजनेत काय महत्त्वाचं आहे ते समजणार आहे व तुम्हाला योग्य दिशा या योजनेचा लाभ घेण्यासाठी मिळेल अशी आशा करतो.

योजनेचे नावPradhan Mantri Formalization of Micro Food Processing Enterprise Scheme 2024 (PMFME Scheme) | (प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना २०२४)
योजना कोणा व्दारा सुरु झाली {Started By Whom}
आपले राज्य सरकार
लाभार्थी {Beneficiary}आपल्या देशातील नागरिक
योजने मार्फत काय लाभ होणार आहे
१० लाख ते ३ कोटी पर्यंत अनुदान
अधिकृत वेबसाईट {Authorized Website}Pradhan Mantri Formalization of Micro Food Processing Enterprise Scheme 2024 (PMFME Scheme) | (प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना २०२४)
अर्ज करण्याची पद्धत {Process of Application}ऑनलाईन
योजनेचा हेल्पलाईन नंबर02112-255227
PMFME Scheme
PMFME Scheme

प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना २०२४ या योजनेची उद्दिष्टे (Purpose of Pradhan Mantri Formalization of Micro Food Processing Enterprise Scheme 2024(PMFME Scheme)):-

  • शेतकऱ्यांच्या शेतमालाला योग्य तो भाव मिळून देणे हा प्रमुख उद्देश शासनाने समोर ठेवून या योजनेची सुरुवात केली.
  • तरुण वर्ग व्यवसायाकडे वळावा यासाठी या योजनेची सुरुवात केली गेली.
  • आपल्या देशाचे औद्योगिक विकास व्हावा हा हेतू या योजनेअंतर्गत राबविला जात आहे.
  • उत्पादन निर्मिती करणे, त्याची साठवणूक करणे ,त्याची ग्राइंडिंग करणे व बाजारात योग्य बाजार भाव मिळवून देणे हे हेतू समोर ठेवून या योजनेची सुरुवात झाली.

प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना २०२४ या योजनेच्या नोंदणीसाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे (Documents for Pradhan Mantri Formalization of Micro Food Processing Enterprise Scheme 2024(PMFME Scheme)) :-

योजनेसाठी खालील कागदपत्रे आवश्यक आहेत-

  • आधार कार्ड (Aadhar Card)
  • रेशन कार्ड (Ration Card)
  • रहिवासी दाखला (Residence Proof)
  • जागेचे विज बिल
  • करारनामा
  • मोबाईल नंबर (Mobile Number)
  • ई-मेल आयडी (Email ID)
  • पासपोर्ट साईजचेे दोन फोटो (2 Passport Size Photographs)
  • स्वयंघोषित प्रतिज्ञापत्र (Self Declartion Form)
  • जातीचा दाखला (Caste Certificate)
PMFME Scheme
PMFME Scheme

प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना २०२४ या योजनेची पात्रता (Eligibility for Pradhan Mantri Formalization of Micro Food Processing Enterprise Scheme 2024 (PMFME Scheme)) :-

  1. अर्जदारा महाराष्ट्राचा रहिवासी असावा.
  2. अर्जदाराला जो व्यवसाय उभारायचा आहे तो महाराष्ट्रातच उभारणे गरजेचे आहे.
  3. अर्जदारावर कुठल्याही बँकेचे कर्ज असू नये.
  4. अर्जदाराने यापूर्वी पंतप्रधान सूक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योगाद्वारे अनुदान घेतलेले नसावे.
  5. या योजनेअंतर्गत आपल्या राज्यातील बेरोजगार युवक शेतकरी ,स्त्रिया लाभ घेऊ शकतात.
  6. या योजनेचा लाभ घेणारा व्यक्ती वय वर्ष १८ पूर्ण असावी.
  7. या योजनेअंतर्गत लाभ घ्यायचा असेल तर अर्जदाराकडे कमीत कमी दहा टक्के भांडवल उपलब्ध असावे बाकीचे उर्वरित 90%टक्के भांडवल बँक कर्जाद्वारे उपलब्ध करून घेण्याची तयारी अर्जदाराची असावी.
  8. जर अर्जदार हा कंपनी किंवा स्वयंसहायता गटाचा असेल तर त्याच्या कंपनी चे टर्न ओव्हर एक कोटी असणे आवश्यक आहे.
  9. व्यवसाय करणाऱ्या दारास कमीत कमी तीन वर्षाचा अनुभव असावा.[PMFME scheme eligibility]

प्रधानमंत्री सूक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योग या योजनेअंतर्गत कोणत्या व्यवसाय करावीला अनुदान दिले जाते[PMFME scheme list]

  1. कृषी उत्पादन
  2. मत्स्य पालन
  3. कुक्कुटपालन
  4. मधुमक्षिका पालन
  5. मसाले बनवणे
  6. दूध व दूध डेयुक्त पदार्थ बनवणे
  7. पालेभाज्या व फळांवर प्रक्रिया करणे
  8. तेलाच्या घानांचा व्यवसाय सुरू करणे
  9. मसाले पदार्थांची पावडर तयार करणे
  10. पशुखाद्य निर्मिती करणे
  11. बेकरीचे प्रॉडक्टट बनवणे

प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना २०२४ या योजनेची अर्ज प्रक्रिया (How to apply for Pradhan Mantri Formalization of Micro Food Processing Enterprise Scheme 2024(PMFME Scheme)) :-

या योजनेचा अर्ज आपण ऑनलाइन पद्धतीने अत्यंत सोप्या पद्धतीने करू शकतो परंतु अर्ज केल्यानंतर बँकेत पैसे जमा होईपर्यंत या अर्जाला तीन टप्प्यांमध्ये विभागले गेले आहे.

टप्पा १-Online Apply

आपल्याला खालील अधिकृत वेबसाईट वर जाऊन अर्ज भरायचा आहे व अर्ज बरोबर सर्व कागदपत्रे जोडायची आहेत.

Pradhan Mantri Formalization of Micro Food Processing Enterprise Scheme 2024 (PMFME Scheme) | (प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना २०२४)

टप्पा २- Resource Person (RP)

जिल्हास्तरीय रिसर्च्च पर्सन कडे अर्ज सादर केला जाईल यामध्ये आपण जो व्यवसाय करणार आहे त्याचा आराखडा तयार करणे ,बँकेचे कर्ज उपलब्ध करून देणे,परवाना मिळून देणे इत्त्यादी कामे कली जातात.

टप्पा ३-राज्य नोडल एजन्सी (SNA)

यानंतर आपला अर्ज राज्य नोएडा एजन्सी एजन्सीकडे दिला जातो एजन्सी द्वारे आपण जो व्यवसाय करत आहोत त्याची संख्यास्तरीय मूल्यमापन केले जाते व राज्यस्तरीय समिती कडे हा अर्ज पोहोचवला जातो.

टप्पा ४-राज्यस्तरीय प्रकल्प मंजूरी समितीकडे (SLAC) 

आता शेवटचा टप्पा म्हणजे राज्य समिती आपल्या व्यवसायाला मान्यता देऊन बँकेला कर्ज उपलब्ध करून देण्याचे आदेश देते.

PMFME Scheme
PMFME Scheme

निष्कर्ष :-

मित्रांनो, तुम्हाला आम्ही दिलेली प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना २०२४ या योजनेबद्दलची माहिती कशी वाटली याबद्दल तुम्ही आम्हाला लेखाच्या खाली कमेंट करून कळवू शकता तसेच आमच्यासाठी काही सूचना असतील त्याही तुम्ही आम्हाला सुचवू शकता अशाच सरकारी योजना संबंधी अपडेटेड माहिती मिळवण्यासाठी आमच्या योजना गॅरंटी डॉट कॉम (yojnaguarantee.com) या संकेतस्थळाला भेट देत राहा धन्यवाद|


FAQ :-


१. PMFME Scheme २०२४ योजनेचा अर्ज कसा करावा ?

उत्तर-या योजनेचा लाभ घेण्यासाठी आपण ऑनलाईन स्वरुपात अर्ज करू शकतो.

२. PMFME Scheme २०२४ या योजनेचा ऑनलाइन अर्ज करायचा असल्यास अधिकृत संकेतस्थळ कोणते?

उत्तर- pmfme.mofpi.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर आपण ऑनलाईन स्वरुपात अर्ज करू शकतो.

३. PMFME Scheme २०२४ कोणत्या राज्यामध्ये लागू आहे?

उत्तर-हि योजना केंद्र सरकारची आहे त्यामुळे हि योजना सर्व राज्यामध्ये लागू झाली आहे.

४. PMFME Scheme २०२४ चे लाभार्थी कोण आहेत ?

उत्तर- आपल्या देशातील वैयक्तिक मालकी भागीदारी कंपन्या,शेतकरी बचतगट,स्वयंसहायता गट,महिला शेतकरी,शेतकरी उत्पादक संस्था,स्वयंसहायता गट आणि त्यांचे फेडरेशन,शेतकरी उत्पादक कंपनी,कार्यकारी संस्था,सहकारी संस्था,खासगी कंपनी इत्यादी या योजनेचा लाभ घेऊ शकतात.

5. PMFME Scheme २०२४ या योजने अंतर्गत दिले जाणारे लाभ ?

उत्तर-या योजने अंतर्गत १० लाख ते ३ कोटी पर्यंत अनुदान दिले जाणार आहे.

हे देखील वाचा :-


योजना प्रत्येक ज्येष्ठ नागरिकाला आपल्या उतरत्या वयात जीवन सुकर व्हाव म्हणून महाराष्ट्र सरकारने आणली आहे मुख्यमंत्री वयोश्री योजना. {Mukhyamantri Vayoshri Yojna}


शेतकऱ्यानच्या फायद्या साठी वाचा. किसान सन्मान निधी योजना | {Kisan Sanman Nidhi Yojna}


आपल्या लाडक्या लेकीच्या उज्वल भविष्यासाठी जाणून घ्या सुकन्या समृद्धी योजना। {Sukanya Samrudhi Yojna}


जर तुम्ही बेरोजगार असाल तर तुम्ही बेरोजगार भत्ता योजनेचा लाभ घेऊ शकता. अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी बेरोजगार भत्ता अर्ज कसा करावा हे वाचा.{Berojgar Bhatta yojna arj ksa karava}


महिलांना व्यवसाय स्थापन करण्यासाठी प्रोत्साहन पर योजना म्हणजेच महिला समृद्धी कर्ज योजना, अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी या योजनेवर क्लिक करा. {Pm pik vima yojna 2024}


आपल्याला आपल्या हक्काचे घर मिळणार रमाई आवास घरकुल योजना अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी या योजनेवर क्लिक करा. {Ramai Awas Gharkul Yojna}


मुलीच्या उज्ज्वल भविष्यासाठी शासन घेऊन आले आहे लेक लाडकी योजना. {LEK LADKI YOJNA}


गर्भवती महिलांना पोषक आहार मिळावा यासाठी सरकार देते रोख रक्कम त्याकरिता वाचा व अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी या योजनेवर क्लिक करा  जननी सुरक्षा योजना.


व्यवसाय सुरु करण्यासाठी सरकार देत आहे बिनव्याजी कर्ज वाचा व अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी या योजनेवर क्लिक करा अण्णासाहेब पाटील कर्ज योजना.