PMEGP Scheme 2024: पंतप्रधान रोजगार निर्मिती योजना 2024

Table of Contents

PMEGP Scheme 2024: पंतप्रधान रोजगार निर्मिती योजना 2024

आपल्या देशातील बेरोजगार लोकांसाठी आपली शासन नवीन नवीन योजना घेऊन येत असते. जेणे करून त्यांच्या काम हाताला काहीतरी काम मिळेल व त्यांचा उपयोग आपल्या देशाच्या प्रगतीला होईल. जाणून घेऊयात अशाच एका योजनेबद्दल योजनेचे नाव आहे प्राईम मिनिस्टर एम्प्लॉय जनरेशन प्रोग्राम. हि योजना खादि ग्राम उद्योग आयोगाकडून चालवली जाते. आपल्या ग्रामीण भागातील बेरोजगारांना काम देण्याचे काम खादी ग्रामोद्योग करणार आहे. तसेच जिल्हास्तरीय बेरोजगारांना काम देण्यासाठी जिल्हा उद्योग केंद्र मदत करणार आहे. आपल्या देशातील तरुण वर्गाला स्वतःचा उद्योग धंदा चालू करण्यासाठी अत्यंत कमी व्याजारामध्ये कर्ज उपलब्ध करून देण्यासाठी ही योजना राबवली जात आहे.

दिलेल्या कर्ज परतफेड साठी तीन ते सात वर्षाचा कालखंड तरुणानं दिला जाणार आहे. यासाठी कर्ज मंजुरी नंतर किंवा कर्ज वाटण्याआधी तरुण वर्गाला प्रशिक्षण दिले जाणार आहे .जेव्हा अर्जदाराला कर्जाचा पहिला हप्ता मिळेल त्यानंतर बँक मार्जिन मनी अनुदान यासाठी अर्जदाराची केस पाठविली जाईल. त्यानंतर कर्ज अर्जदाराच्या बँक खात्यात जमा केले जाईल .यानंतर अर्जदाराला तीन वर्षाकरिता टर्न डिपॉझिट रिटेल मध्ये पाठविण्यात येईल व तीन वर्ष खात्री झाल्यानंतर अनुदानाची रक्कम अर्जदाराच्या बँक खात्यात जमा केली जाईल.

पंतप्रधान रोजगार निर्मिती योजना 2024 या योजनेबद्दल आम्ही तुम्हाला परिपूर्ण माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहे, यामध्ये या योजनेविषयी थोडक्यात माहिती, त्याचे ठळक मुद्दे, योजनेची पात्रता, योजनेचे फायदे, योजनेच्या अटी व शर्ती, योजनेसाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे, आणि ऑनलाईन अर्ज कसा करावा , असा हा परिपूर्ण लेख आम्ही तुमच्यासाठी सादर करत आहोत तो तुम्ही शेवटपर्यंत वाचवा हि मनापासून इच्छा व्यक्त करत आहोत. तर चला मग बघुयात योजनेविषयी परिपूर्ण अशी माहिती,

PMEGP Scheme 2024
PMEGP Scheme 2024

पंतप्रधान रोजगार निर्मिती योजना 2024 ची ठळक मुद्दे :- {Important Points of PMEGP Scheme 2024 }

पंतप्रधान रोजगार निर्मिती योजना 2024 ची ठळक मुद्दे :- {PMEGP Scheme 2024 } याची ठळक मुद्दे आम्ही तुम्हाला येथे देत आहोत या मुद्द्यांमुळे तुम्हाला या योजनेत काय महत्त्वाचं आहे ते समजणार आहे व तुम्हाला योग्य दिशा या योजनेचा लाभ घेण्यासाठी मिळेल अशी आशा करतो.

योजनेचे नावपंतप्रधान रोजगार निर्मिती योजना 2024:PMEGP Scheme 2024
योजना कोणा व्दारा सुरु झाली {Started By Whom}
आपले केंद्र सरकार
लाभार्थी {Beneficiary}आपल्या देशातील व्यवसाय करायची इच्छा असलेले नागरिक
योजने मार्फत काय लाभ होणार आहे
अधिकृत वेबसाईट {Authorized Website}पंतप्रधान रोजगार निर्मिती योजना 2024
अर्ज करण्याची पद्धत {Process of Application}ऑनलाईन / ऑफलाईन

पंतप्रधान रोजगार निर्मिती योजना 2024 या योजनेची उद्दिष्टे (Purpose of PMEGP Scheme 2024 ) :-

  • आपल्या देशातील बेरोजगार तरुणांना व्यवसायासाठी आर्थिक सहाय्य करणे हा या योजनेमागचा प्रमुख उद्देश आहे.
  • या योजनेमार्फत बेरोजगारांना व्यवसाय करण्यास कमी व्याजारामध्ये कर्ज उपलब्ध करून देणे आणि त्यांना प्रशिक्षण देणे जेणेकरून आपल्या देशाचे विकासाला या तरुणांचा हातभार लागेल.
  • या योजनेअंतर्गत अत्याधुनिक व्यवसायाचे प्रशिक्षण युवकांना दिले जाणार आहे त्यामुळे हे युवक आपले आर्थिक पाठबळ वाढवतील.

पंतप्रधान रोजगार निर्मिती योजना 2024 या योजनेच्या नोंदणीसाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे ( Documents for PMEGP Scheme 2024) :-

योजनेसाठी खालील कागदपत्रे आवश्यक आहेत-

  • आधार कार्ड (Aadhar Card)
  • रेशन कार्ड (Ration Card)
  • रहिवासी दाखला (Residence Proof)
  • अर्जदाराचे जमिनीचा सातबारा (7/12 Documents)
  • अर्जदाराच्या जमिनीचा अट अ (8 A)
  • मोबाईल नंबर (Mobile Number)
  • ई-मेल आयडी (Email ID)
  • पासपोर्ट साईजचेे दोन फोटो (2 Passport Size Photographs)
  • स्वयंघोषित प्रतिज्ञापत्र (Self Declartion Form)
  • जातीचा दाखला (Caste Certificate)
PMEGP Scheme 2024
PMEGP Scheme 2024

पंतप्रधान रोजगार निर्मिती योजना 2024 या योजनेची पात्रता (Eligibility for PMEGP Scheme 2024 ) :-

  1. अर्जदार हा भारतीय नागरिक असावा.
  2. अर्जदार जर विशेष गटातील. असेल तर त्याच्याकडे जातीचा दाखला, अपंगाचा दाखला ,माजी सैनिक असल्यास त्याचा दाखला असणे गरजेचे आहे,
  3. यासाठी सरकारने कुठली उत्पन्नाची अट ठेवलेली नाही.
  4. अर्जदाराची अठरा वर्षे पूर्ण हवेत.
  5. जर आपण पाच लाखापेक्षा जास्त गुंतवणूक करत असाल तरच शिक्षणाची अट ठेवण्यात आलेली आहे पाच लाखापेक्षा जास्त गुंतवणुकीसाठी आपल्याला आठवी पास असणे आवश्यक आहे.
  6. पाच लाखापेक्षा जर कमी कर्ज घ्यायचे असेल तर त्यासाठी कुठली शिक्षणाची अट नाही.

पंतप्रधान रोजगार निर्मिती योजना 2024 योजनेअंतर्गत आपला तरुण वर्ग कोणते कोणते व्यवसाय करू शकतो

  • कृषी आधारित असणाऱ्या अन्नप्रक्रिया उद्योग
  • वन आधारित असणारी उत्पादने निर्माण करणे
  • फायबर तयार करणे
  • पॉलीमार किंवा केमिकल आधारित उत्पादने तयार करणे
  • ग्रामीण अभियांत्रिकी किंवा बायोटेक मध्ये काहीतरी व्यवसाय सुरू करणे
  • वस्त्र तयार करणे

पंतप्रधान रोजगार निर्मिती योजना 2024 योजनेअंतर्गत कर्ज कसे वितरित केले जाणार आहे

  1. जर अर्जदार पंचवीस लाखा पर्यंतचे लोन घेत असेल किंवा दहा लाखा पर्यंतचे लोन घेत असेल तर 90 ते 95 टक्के कर्ज बँका प्रोफाइल करणार आहेत परंतु उर्वरित दहा टक्के रक्कम अर्जदाराला स्वतः गुंतवणे गरजेचे आहे.
  2. या योजनेअंतर्गत जो विशेष गट ठरवून दिला आहे तो जर शहरी भागातील असेल तर 25% आणि ग्रामीण भागातील असेल तर 35 टक्के मार्जिन मनी योजनेअंतर्गत अनुदान म्हणून दिला जाईल.
  3. विशेष गटामध्ये प्रामुख्याने अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती ,मागासवर्ग ,अल्पसंख्यांक, महिला, अपंग उमेदवार, माजी सैनिक यांचा समावेश करण्यात आलेला आहे.

पंतप्रधान रोजगार निर्मिती योजना 2024 या योजनेची अर्ज प्रक्रिया (How to apply for PMEGP Scheme 2024 ) :-

पंतप्रधान रोजगार निर्मिती योजना 2024 या योजनेची ऑनलाइन अर्ज प्रक्रिया खालील प्रमाणे :-

  • आपल्याला ऑनलाइन अर्ज करण्यासाठी खालील अधिकृत वेबसाईटवर जाणे गरजेचे आहे.

पंतप्रधान रोजगार निर्मिती योजना 2024

  • वेबसाईटला लॉगिन केल्यानंतर आपल्यासमोर एक होम ओपन होईल पीएमईजीपीचा अर्ज व्यवस्थित रित्या भरायचा आहे व वरती दिलेली सर्व कागदपत्रे त्यासोबत आहेत.

पंतप्रधान रोजगार निर्मिती योजना 2024 या योजनेची ऑफलाइन अर्ज प्रक्रिया खालील प्रमाणे :-

  • या योजनेचा आपल्याला ऑफलाइन पद्धतीने करता येईल त्यासाठी आपल्याला ऑनलाईन अर्ज डाऊनलोड करणे गरजेचे आहे.
  • अर्जामध्ये विचारलेली सर्व माहिती आपल्याला व्यवस्थित भरायची आहे.
  • अर्जाची प्रिंट आऊट आणि वरती दिलेली सर्व कागदपत्रे आपल्याला जवळील कार्यालयात जमा करायची आहेत.
  • तसेच बँकेमध्ये जाऊन देखील आपल्याला सर्व कागदपत्रांची प्रोसेस कम्प्लीट करायची आहे.
PMEGP Scheme 2024
PMEGP Scheme 2024

निष्कर्ष :-

मित्रांनो, तुम्हाला आम्ही दिलेली पंतप्रधान रोजगार निर्मिती योजना 2024 या योजनेबद्दलची माहिती कशी वाटली याबद्दल तुम्ही आम्हाला लेखाच्या खाली कमेंट करून कळवू शकता तसेच आमच्यासाठी काही सूचना असतील त्याही तुम्ही आम्हाला सुचवू शकता अशाच सरकारी योजना संबंधी अपडेटेड माहिती मिळवण्यासाठी आमच्या योजना गॅरंटी डॉट कॉम (yojnaguarantee.com) या संकेतस्थळाला भेट देत राहा धन्यवाद|

आशा आहे आपल्याला हा लेख आवडला असेल. हा लेख जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा जेणेकरून आपल्या देशात एक आदर्श व्यावसायिक घडतील व त्याचा उपयोग आपल्या देशाच्या विकासाला होईल.


FAQ :-


१. पंतप्रधान रोजगार निर्मिती योजना 2024 योजनेचा अर्ज कसा करावा ?

उत्तर-योजनेचा लाभ आपना ऑनलाइन लाभ अपना ऑनलाइन आणि आपले दोन्ही पद्धतीने घेऊ शकतो

२. पंतप्रधान रोजगार निर्मिती योजना 2024 या योजनेचा ऑनलाइन अर्ज करायचा असल्यास अधिकृत संकेतस्थळ कोणते?

उत्तर- https://www.kviconline.gov.in/pmegp.jsp या योजनेचा ऑनलाइन अर्ज करायचा असल्यास अधिकृत संकेतस्थळ आहे.

३. पंतप्रधान रोजगार निर्मिती योजना 2024 कोणत्या राज्यामध्ये लागू आहे?

उत्तर-ही योजना केंद्र सरकारची असल्यामुळे हे सर्व राज्यांसाठी लागू झालेली आहे.

४. पंतप्रधान रोजगार निर्मिती योजना 2024 चे लाभार्थी कोण आहेत ?

उत्तर-आपल्या देशातील सर्व सुज्ञ नागरिक व ज्यांना व्यवसाय करायचा आहे ते या योजनेचा लाभ घेऊ शकतात.

हे देखील वाचा :-


योजना प्रत्येक ज्येष्ठ नागरिकाला आपल्या उतरत्या वयात जीवन सुकर व्हाव म्हणून महाराष्ट्र सरकारने आणली आहे मुख्यमंत्री वयोश्री योजना. {Mukhyamantri Vayoshri Yojna}


शेतकऱ्यानच्या फायद्या साठी वाचा. किसान सन्मान निधी योजना | {Kisan Sanman Nidhi Yojna}


आपल्या लाडक्या लेकीच्या उज्वल भविष्यासाठी जाणून घ्या सुकन्या समृद्धी योजना। {Sukanya Samrudhi Yojna}


जर तुम्ही बेरोजगार असाल तर तुम्ही बेरोजगार भत्ता योजनेचा लाभ घेऊ शकता. अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी बेरोजगार भत्ता अर्ज कसा करावा हे वाचा.{Berojgar Bhatta yojna arj ksa karava}


महिलांना व्यवसाय स्थापन करण्यासाठी प्रोत्साहन पर योजना म्हणजेच महिला समृद्धी कर्ज योजना, अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी या योजनेवर क्लिक करा. {Pm pik vima yojna 2024}


आपल्याला आपल्या हक्काचे घर मिळणार रमाई आवास घरकुल योजना अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी या योजनेवर क्लिक करा. {Ramai Awas Gharkul Yojna}


मुलीच्या उज्ज्वल भविष्यासाठी शासन घेऊन आले आहे लेक लाडकी योजना. {LEK LADKI YOJNA}


गर्भवती महिलांना पोषक आहार मिळावा यासाठी सरकार देते रोख रक्कम त्याकरिता वाचा व अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी या योजनेवर क्लिक करा  जननी सुरक्षा योजना.


व्यवसाय सुरु करण्यासाठी सरकार देत आहे बिनव्याजी कर्ज वाचा व अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी या योजनेवर क्लिक करा अण्णासाहेब पाटील कर्ज योजना.