Site icon yojanaguarantee.com

PM KUSUM YOJNA|पी एम कुसुम योजना|PM Solar Scheme|PM Free Solar Panel Yojna

| ज्याच्या घरी सोलरची क्रांती, त्याला नाही विजेची भ्रांती |

| ज्याच्या घरी सोलरची क्रांती, त्याला नाही विजेची भ्रांती |

पी एम कुसुम योजनेद्वारे PM KUSUM YOJNA

सूर्यापासून प्राप्त होणाऱ्या सौरऊर्जेला विद्युत ऊर्जेमध्ये रूपांतरित केले जाते. सोलर पॅनल चा वापर करून वीज उत्पन्न करणे ही प्रक्रिया पूर्णतः पर्यावरणाला अनुकूल आहे, याचा अर्थ असा की यापासून कुठलेही प्रकारचे प्रदूषण उत्पन्न होत नाही, त्यामुळे आपले प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी घेऊन आले आहेत प्रधानमंत्री फ्री सोलर पॅनल योजना, पीएम सोलर पॅनल योजनेच्या साठी सरकारने 75 हजार करोड रुपये एवढे मोठे बजेट यासाठी तयार केले आहे

ही योजना सुरू करण्याचं मुख्य कारण म्हणजे केंद्र सरकार सौर ऊर्जेला जास्तीत जास्त महत्त्व देऊन सौर ऊर्जेचा वापर कसा वाढवता येईल यावर केंद्र सरकारचे पूर्णतः लक्ष आहे. ज्यामुळे पर्यावरणावर पडत असलेला प्रभाव कमी करता येईल तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावरती पर्यावरणासाठी चालू असलेल्या मोहीमेला पाठिंबा दर्शवता येईल आणि यातून वाढत असलेल्या ग्रीन हाऊस गॅस इफेक्ट ला कुठे तरी कमी करण्याकडे घेऊन जाता येईल.

आज जास्तीत जास्त शेतकरी शेताला पाणी देण्यासाठी पेट्रोल डिझेलच्या पंपाचा म्हणजेच जीवाश्म इंधनांचा वापर करतात जे की पर्यावरणासाठी तर चांगले नाहीच परंतु ते महागही आहेत. शेतकऱ्यांना आधुनिक प्रकारे तसेच जीवाश्म इंधनांचा वापर कमी करून शेताला पाणी देण्यासाठी ६०% सबसिडी व ३०% कर्ज योजनेच्या संपूर्ण खर्चावर सरकार देत आहे त्यासाठी सरकारने पीएम फ्री सोलर पॅनल योजना आणली आहे.

सौर ऊर्जेच्या या प्रयोगाने शेतकऱ्यांना पेट्रोल डिझेल तसेच ग्रिड पासून मिळणारी वीज यावरच अवलंबित्व कमी होणार आहे. सोलर पॅनल ने तयार झालेल्या वीजेचा उपयोग ते शेताला पाणी देण्यासाठी तसेच ज्यावेळी शेताला पाणी देण्याची गरज नाही त्यावेळी ते त्या विजेचा वापर पैसे कमावण्यासाठी सुद्धा करू शकतील, जसे की त्यांच्या जवळील वीज वितरक कंपनीला म्हणजे DISCOM ला ती तयार झालेली वीज ते विकू शकतील, या तयार झालेल्या विजेला वीज वितरण कंपनीला (DISCOM) विकून ते प्रत्येक महिन्याला जवळपास 6000/- रुपये प्रति महिना कमवू शकतील.

PM Kusum yojna

पी एम कुसुम योजना या योजनेची ठळक मुद्दे (PM KUSUM YOJNA )

PM Solar Scheme pm kusum yojna

योजनेचे नावpm kusum yojna|पी एम कुसुम योजना
योजनेचा उद्देशया योजनेचा उद्देश शेतकऱ्यांच्या उत्पन्नामध्ये वाढ करणे तसेच जीवाश्म इंधनांचा वापर कमी व्हावा या दृष्टीने पाऊल टाकणे.
लाभार्थी देशाचे नागरिक
Ministry Ministry of New and Renewable Energy
लाभ१०० % सबसिडी
अर्ज करण्याची पद्धतऑनलाईन
योजना कोणी आणली केंद्र सरकार
हेल्पलाइन नंबर 011-2436-0707, 011-2436-0404 
वर्ष 2024
email-idpmkusum-mnre@gov.in
अधिकृत संकेतस्थळ https://mnre.gov.in/
Central Portal of the PM-KUSUMhttps://pmkusum.mnre.gov.in/landing.html

पी एम कुसुम योजना (pm kusum yojna) या योजनेचा उद्देश :-

आपल्या देशातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आपले पंतप्रधान घेऊन आले आहेत, पंतप्रधान कुसुम योजना या योजनेचा (pm kusum yojna) मुख्य उद्देश आपल्या देशातील सर्व शेतकऱ्यांनी त्यांच्या जमिनीत सौरऊर्जेचे प्रकल्प बसवावेत आणि सिंचनासाठी लागणार पाणी तसेच या मार्फत विज ही निर्माण व्हावी या सर्व गोष्टी सौर ऊर्जेच्या माध्यमातून उपलब्ध व्हाव्यात हा आहे. सौर ऊर्जेच्या वापरामुळे डिझेलवर चालणारी पंप हे सौर ऊर्जेमध्ये रूपांतरित होतील व प्रदूषणाला आळा बसेल, यासाठी पीएम कुसुम योजनेच्या अंतर्गत केंद्र सरकारकडून 60 % अनुदान आणि 30 % कर्ज दिले जाते. त्यामुळे या योजनेच्या अंतर्गत शेतकऱ्यांना एकूण खर्चाच्या केवळ 10% खर्च लागणार आहे. तसेच या सौर ऊर्जेच्या प्रकल्पामुळे तयार होणारी वीज शेतकऱ्याच्या वापरासाठी लागणाऱ्या विजेला सोडून शेतकरी ती वीज वितरण कंपनीला विकू शकेल व त्यातून प्रत्येक महिन्याला काही इन्कम तो मिळवू शकेल. या योजनेच्या मदतीने सरकारला सौरऊर्जेद्वारे वीज निर्मिती करून विजेच्या टंचाईवर मात करायची आहे. प्रत्येक गावागावात आणि घराघरात वीज पोहोचवणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे.

पी एम कुसुम योजना (pm kusum yojna) या योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे :-

या योजनेमध्ये अर्ज करण्यासाठी आपल्याला लागणारी आवश्यक कागदपत्रे खाली देत आहोत काळजीपूर्वक अभ्यासा. PM Solar Scheme | pm kusum yojna

PM Kusum yojna

पी एम कुसुम योजना(pm kusum yojna)या योजनेचा लाभ :-

(pm kusum yojna) (PM Solar Scheme)

पंतप्रधान कुसुम योजना (pm kusum yojna) ही तीन भागांमध्ये विभागलेली आहे. PM Solar Scheme

पहिल्या भागात अ ज्यांची जमीन नापीक आहे अशा शेतकऱ्यांचा समावेश होतो. यामध्ये 5000 किलोवॅटपासून ते 2 मेगावॅटपर्यंतचे सौरऊर्जेचे प्रकल्प बसवण्यात येतील व तयार झालेली वीज DISCOM द्वारे खरेदी केली जाईल. ही योजना वैयक्तिक शेतकरी, शेतकऱ्यांचा समूह, शेतकरी उत्पादक कंपनी, सहकार समूह यांच्यासाठी आहे.

दुसऱ्या भागात ब मध्ये सौर 7.5 hp पेक्षा जास्त क्षमता असलेले पंप बसवले जातील.

तिसरा भागात ‘क’ मध्ये ज्या शेतकऱ्यांच्या शेतात विद्युत पंप आहेत ते त्याचे रूपांतर सौर पंपांमध्ये करू शकतील.

आजही अनेक गावांमध्ये २४ तास वीज नसते. त्यामुळे आपल्या पंतप्रधानांनी आणलेल्या या योजनेमुळे शेतकरी आपल्या शेतात सोलर प्लांट बसवून 24 तास वीज वापरू शकतील. त्यामुळे शेतात पाण्याची कमतरता भासणार नाही आणि जे डिझेल वापरतात त्यांचा डिझेलचा खर्चही वाचेल.

पी एम कुसुम योजना(pm kusum yojna)या योजनेची पात्रता :-

|pm kusum yojna|PM Solar Scheme|

पी एम कुसुम योजना (pm kusum yojna) या योजनेची ऑनलाइन अर्ज प्रक्रिया पुढे देत आहोत :-

पीएम कुसुम योजना २०२४ | PM Solar Scheme ची अर्ज प्रक्रियाखाली देत आहोत काळजीपूर्वक अभ्यासा –

  1. अर्जदाराने सर्वात प्रथम पीएम कुसुम योजनेच्या अधिकृत संकेतस्थळावर जावे
  2. त्यानंतर त्याच्या होम पेज (Home page) वर जाऊन पीएम कुसुम योजनेच्या पर्यायावर क्लिक करा त्यानंतर एक नवीन पेज उघडेल, यामध्ये तुम्हाला मेक न्यू अप्लिकेशन Make New Application वर क्लिक करायचे आहे त्यानंतर दुसरे नवीन पेज उघडेल.
  3. त्यात मोबाईल नंबर टाकून OTP submit करा त्यात अर्जदाराची संपुर्ण माहिती भरा व Next बटणावर क्लिक करा.
  4. आता इथे अजून माहिती तुम्हाला भरायची आहे जसे की शेतकऱ्याचे आधार ई-केवायसी, बँक खात्यासंबंधित माहिती, आणि जात प्रमाणपत्र, जमिनीची कागदपत्रे व सौर पंपाची माहिती.
  5. आता अर्जदाराला सेल्फ डिक्लेरेशनसाठी Self Declaration चेक बॉक्सवर क्लिक करा. अशा रितीने तुमचा अर्ज पूर्ण झाला. आता तुम्ही ऑनलाइन पेमेंट करू शकता, पैसे भरले गेल्यानंतर तुम्हाला अर्ज क्रमांक मिळेल आणि एसएमएस द्वारे ही तुम्हाला तसे कळवले जाईल, तुम्ही तुमच्या फॉर्म ची एक छायांकित प्रत डाऊनलोड करून ठेवा. गरज पडल्यास पुढील कार्यवाहीसाठी.

निष्कर्ष :-

पी एम कुसुम योजना(pm kusum yojna) या योजनेमध्ये आम्ही तुम्हाला परिपूर्ण माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे, यामध्ये या योजनेविषयी थोडक्यात माहिती, त्याचे ठळक मुद्दे, योजनेची पात्रता, योजनेचे फायदे, योजनेच्या अटी व शर्ती, योजनेसाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे, आणि ऑनलाईन अर्ज कसा करावा , असा हा परिपूर्ण लेख आम्ही तुमच्यासाठी सादर करत आहोत तो तुम्ही शेवटपर्यंत वाचल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद। PM Solar Scheme

FAQ’s :-

१. पी एम कुसुम योजना काय आहे ?

उत्तर – पी एम कुसुम योजना ही शेतकर्यांना सोलार ऊर्जेपासून सोलार पंप व त्यापासून वीज निर्मिती व्हावी व शेतकऱ्यांना या पासून फायदा व्हावा तसेच इंधनाची बचत व विजेची बचत व बढत व्हावी हा सरकारचा उद्देश .

२. पी एम कुसुम योजना या योजनेमध्ये शेतकर्यांना किती अनुदान मिळते ?

उत्तर – पीएम कुसुम योजनेच्या अंतर्गत केंद्र सरकारकडून 60 % अनुदान आणि 30 % कर्ज दिले जाते.

३. पी एम कुसुम योजना कोणासाठी आहे ?

उत्तर – पी एम कुसुम योजना ही ज्या शेतकर्यांनी आत्तापर्यंत कोणत्याही सोलर संबंधित योजनेचा लाभ घेतलेला नाही असे सर्व शेतकरी या योजनेसाठी पात्र ठरतील.


पुढील लेख देखील वाचावेत!

Home solar power generation new technology आता घरातच वीजनिर्मिती होणार ! नवीन सोलर सेल तंत्रज्ञान आले, जाणून घ्या तपशील.

SIP Mutual Fund Calculator 2024  केवळ 1000 रुपयांच्या मासिक TOP 10 SIP मध्ये गुंतवा व कमवा 3 कोटी - जाणून घ्या कसे.

शेतकऱ्यानच्या फायद्या साठी वाचा. किसान सन्मान निधी योजना

आपल्या लाडक्या लेकीच्या उज्वल भविष्यासाठी जाणून घ्या सुकन्या समृद्धी योजना

Drone Subsidy Scheme in 2024 केंद्र पुरस्कृत कृषी यांत्रिकीकरण उप अभियान: ड्रोन अनुदान योजना

महिलांना व्यवसाय स्थापन करण्यासाठी प्रोत्साहन पर योजना म्हणजेच महिला समृद्धी कर्ज योजना, अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी या योजनेवर क्लिक करा. 

आपल्याला आपल्या हक्काचे घर मिळणार रमाई आवास घरकुल योजना अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी या योजनेवर क्लिक करा.

मुलीच्या उज्ज्वल भविष्यासाठी शासन घेऊन आले आहे लेक लाडकी योजना. 

Best Home Insurance Policies in 2024 सर्वोत्तम होम इन्शुरन्स योजना निवडण्याबाबत संपूर्ण मार्गदर्शन

Tractor Anudan Yojana apply Online 2024 ट्रॅक्टर अनुदान योजना 2024 अर्ज प्रक्रिया – सविस्तर मार्गदर्शन

Exit mobile version