pm kisan yojana 2024:पीएम किसान योजनेच मोबाईल नंबर घरबसल्या अपडेट करा…!

pm kisan yojana 2024:पीएम किसान योजना 2024

आपला भारत देश हा कृषिप्रधान देश म्हणून ओळखला जाणारा देश आहे.आपल्या देशात शेती व्यवसायाला मुख्य उद्योग-धंदा स्वरुपात बघितले जाते. आपल्या देशातील अंदाजे ५८% लोक उपजीवेकीसाठी शेती करतात.आपले भारत सरकार देशातील शेतकऱ्यासाठी नवनवीन योजना राबवत असते, या योजने अंतर्गत देशातील शेतकरी आर्थिकदृष्ट्या सक्षम होत आहेत.अशीच क्रांतीकारी किसान सन्मान निधी योजना(Kisan Sanman Nidhi Yojna) आपल्या देशात राबवली जात आहे.

शेतकऱ्यांना निश्चित उत्पन्न मिळावे त्याकरिता प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना या योजनेच्या अंतर्गत सर्व पात्र शेतकरी कुटुंबांना (पती, पत्नी व १८ वर्षाखालील अपत्ये ) २०००/- रुपये प्रती हप्ता या प्रमाणे ३ हप्त्यांमध्ये रूपये ६०००/- प्रती वर्ष लाभ त्यांच्या थेट बँक खात्यात (DBT) द्वारे जमा करण्यात येतात.
असे अजून आहेत ज्यांनी फॉर्म तर भरलेत पण त्यांना मेसेज येत नाही, काहींचे मोबाईल नंबर हे बंद झालेले आहेत किंवा त्यांनी नवीन नंबर घेतले आहेत, त्यांना प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचे मेसेज येत नाहीत किंवा योजने संदर्भात माहिती मिळत नाहीत ते आत्ताच्या आत्ता खाली दिलेल्या प्रोसेस नुसार पीएम किसान योजनेच्या खात्याचा मोबाईल नंबर (PM Kisan Mobile Number Update) अपडेट करू शकतील.

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेबद्दल – PM Kisan Yojana:

किसान सन्मान निधी योजना (Kisan Sanman Nidhi Yojna) अंतर्गत आर्थिकदृष्ट्या दुर्बल शेतकऱ्यांना वार्षिक ६०००/- मात्र मिळणार आहेत .हे पैसे शेतकर्यांना टप्याटप्याने मिळणार आहेत.प्रत्येकी ३ हफ्ते या योजने अंतर्गत बनवले आहेत.२०००/- मात्र इतके पैसे पैसे तीन वेगवेगळ्या टप्या मध्ये देशातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केली जाणार आहेत.
किसान सन्मान निधी योजने साठी हेक्टरी दोन इतके किंवा त्यापेक्षा कमी क्षेत्रफळ असणार शेतकरी या योजने चा फायदा घेऊ शकतात. किसान सन्मान निधी योजनेतून दर तीन ते चार महिन्याला आर्थिक मदत करण्याचा निर्णय या योजने अंतर्गत घेण्यात आला आहे.किसान सन्मान निधी योजनेतून आता पर्यंत १३ कोटींहून अधिक शेतकरी बांधवाना मदत झाली आहे.

पंतप्रधान किसान सन्मान निधी या योजनेच्या लाभार्थ्यांची यादीमध्ये आपले नाव बघायचे असल्यास, हप्त्याचे स्टेट्स काय आहे हे बघायचे असेल, तसेच e-KYC बद्दल माहिती घ्यायची असेल तर सरकारने आपल्यासाठी आता ह्या सुविधा ऑनलाईन आणल्या आहेत. त्याचबरोबर पीएम किसान योजनेच्या खात्याचा मोबाईल नंबर देखील अपडेट करण्याची सुविधा ऑनलाईन केली आहे.

pm kisan yojana 2024:पीएम किसान योजना 2024-प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना या योजनेच्या खात्याचा मोबाईल नंबर (PM Kisan Mobile Number Update) अपडेट कसा करावा.

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना या योजनेच्या खात्याचा मोबाईल नंबर (PM Kisan Mobile Number Update) अपडेट करण्यासाठी सर्वप्र सर्वात प्रथम खाली दिलेल्या केंद्र सरकारच्या PM Kisan या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या.

https://pmkisan.gov.in

PM Kisan या संकेतस्थळाला भेट दिल्यानंतर, खाली Farmers Corner या बॉक्समध्ये Update Mobile Number या पर्यायावर क्लिक करा.

P.M. Kisan पोर्टल वर जा.

Farmer’s Corner मध्ये लॉग इन करा.

मुख्यपृष्ठावर ‘Farmers Corner’ या बटनावर क्लीक केल्यावर तुम्हाला ‘Edit Aadhaar Details’ हा टॅब दिसेल तो पर्याय निवडा.

तिथे आपला आधार नंबर आणि कॅप्चा कोड टाका व Search वर क्लिक केल्यानंतर उघडलेल्या पेजवर तुम्हाला आपले नाव, आधार नंबर, मोबाईल नंबर आणि इतर माहिती दिसेल. आपला जुना मोबाईल नंबर जो बंद आहे तो बदलण्यासाठी Mobile Number च्या बाजूला असलेल्या फील्डमध्ये नवीन नंबर टाका.

अपडेट केलेला नंबर पुन्हा एकदा तपासा.योग्य असल्यास Save आणि Submit बटनावर क्लिक करा.
मोबाईल नंबर अपडेट झाल्याचा संदेश तुम्हाला स्क्रीनवर दिसेल, तो दिसला की समजून जा तुमचा मोबाईल नंबर अपडेट झालेला आहे,
अशाप्रकारे तुम्ही तुमचा मोबाईल नंबर सोप्या आणि सहजरित्या अपडेट केलेला आहे.

pm kisan yojana 2024
pm kisan yojana 2024

निष्कर्ष :-

मित्रांनो, तुम्हाला आम्ही दिलेली pm kisan yojana 2024:पीएम किसान योजना 2024 या योजनेबद्दलची माहिती कशी वाटली याबद्दल तुम्ही आम्हाला लेखाच्या खाली कमेंट करून कळवू शकता तसेच आमच्यासाठी काही सूचना असतील त्याही तुम्ही आम्हाला सुचवू शकता अशाच सरकारी योजना संबंधी अपडेटेड माहिती मिळवण्यासाठी आमच्या योजना गॅरंटी डॉट कॉम (yojnaguarantee.com) या संकेतस्थळाला भेट देत राहा धन्यवाद|


FAQ :-


१. पीएम किसान योजना 2024 योजनेचा अर्ज कसा करावा ?

उत्तर-या योजनेचा अर्ज ऑनलाईन प्रकारे भेटणार आहे.

२. पीएम किसान योजना 2024 या योजनेचा ऑनलाइन अर्ज करायचा असल्यास अधिकृत संकेतस्थळ कोणते?

उत्तर- https://pmkisan.gov.in

३. पीएम किसान योजना 2024 कोणत्या राज्यामध्ये लागू आहे?

उत्तर-हि योजना केंद्र सरकारची आहे त्यामुळे सर्व देशामध्ये लागू झाली आहे.

हे देखील वाचा :-


योजना प्रत्येक ज्येष्ठ नागरिकाला आपल्या उतरत्या वयात जीवन सुकर व्हाव म्हणून महाराष्ट्र सरकारने आणली आहे मुख्यमंत्री वयोश्री योजना. {Mukhyamantri Vayoshri Yojna}


शेतकऱ्यानच्या फायद्या साठी वाचा. किसान सन्मान निधी योजना | {Kisan Sanman Nidhi Yojna}


आपल्या लाडक्या लेकीच्या उज्वल भविष्यासाठी जाणून घ्या सुकन्या समृद्धी योजना। {Sukanya Samrudhi Yojna}


जर तुम्ही बेरोजगार असाल तर तुम्ही बेरोजगार भत्ता योजनेचा लाभ घेऊ शकता. अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी बेरोजगार भत्ता अर्ज कसा करावा हे वाचा.{Berojgar Bhatta yojna arj ksa karava}


महिलांना व्यवसाय स्थापन करण्यासाठी प्रोत्साहन पर योजना म्हणजेच महिला समृद्धी कर्ज योजना, अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी या योजनेवर क्लिक करा. {Pm pik vima yojna 2024}


आपल्याला आपल्या हक्काचे घर मिळणार रमाई आवास घरकुल योजना अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी या योजनेवर क्लिक करा. {Ramai Awas Gharkul Yojna}


मुलीच्या उज्ज्वल भविष्यासाठी शासन घेऊन आले आहे लेक लाडकी योजना. {LEK LADKI YOJNA}


गर्भवती महिलांना पोषक आहार मिळावा यासाठी सरकार देते रोख रक्कम त्याकरिता वाचा व अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी या योजनेवर क्लिक करा  जननी सुरक्षा योजना.


व्यवसाय सुरु करण्यासाठी सरकार देत आहे बिनव्याजी कर्ज वाचा व अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी या योजनेवर क्लिक करा अण्णासाहेब पाटील कर्ज योजना.