Ph.D Scholarship Scheme 2024:परदेश शिष्यवृत्ती योजना २०२४

Table of Contents

Ph.D Scholarship Scheme 2024:परदेश शिष्यवृत्ती योजना २०२४

आपल्या देशामध्ये अल्पसंख्यांक लोकांच्या शिक्षणाचे प्रमाण अत्यंत कमी आहे. त्यांना मुख्य प्रवाहामध्ये आणण्यासाठी आपले सरकार नेहमी नवीन नवीन योजना घेऊन येत असतात. आज त्यातीलच एक महत्त्वाचे योजनेबद्दल जाणून घेऊयात योजनेचे नाव आहे परदेश शिष्यवृत्ती योजना २०२४. या योजनेअंतर्गत पी.एच.डी. करण्यासाठी किंवा पदवी नंतर चे इतर शिक्षण करण्यासाठी आपले सरकार विद्यार्थ्यांना आर्थिक मदत करत आहे .या योजनेसाठी आपल्या सरकारने 120 कोटी रुपयांची तरतूद केली आहे.

या योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना अतिशय चांगल्या विद्यापीठांमध्ये आपले पीएचडी चे शिक्षण पूर्ण करता येणार आहे.
अल्पसंख्यांक समुदायातील लोकांना 27 जणांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे. ते आपले पीएचडीचे शिक्षणातील चांगल्या विद्यापीठांमध्ये पूर्ण करू शकतील.पीएचडी साठीचा अभ्यासक्रमासाठी सरकारने ठरवून दिलेल्या नियमानुसार चार वर्ष किंवा त्यापेक्षा कमी जास्त वर्ष अर्जदार घेऊ शकतो.तसेच मास्टर साठी अप्लाय करत असल्यास तीन वर्षापेक्षा कालावधी जास्त नसावा

परदेश शिष्यवृत्ती योजना २०२४ या योजनेबद्दल आम्ही तुम्हाला परिपूर्ण माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहे, यामध्ये या योजनेविषयी थोडक्यात माहिती, त्याचे ठळक मुद्दे, योजनेची पात्रता, योजनेचे फायदे, योजनेच्या अटी व शर्ती, योजनेसाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे, आणि ऑनलाईन अर्ज कसा करावा , असा हा परिपूर्ण लेख आम्ही तुमच्यासाठी सादर करत आहोत तो तुम्ही शेवटपर्यंत वाचवा हि मनापासून इच्छा व्यक्त करत आहोत. तर चला मग बघुयात योजनेविषयी परिपूर्ण अशी माहिती,

Ph.D Scholarship Scheme 2024
Ph.D Scholarship Scheme 2024

परदेश शिष्यवृत्ती योजना २०२४ ची ठळक मुद्दे :- {Important Points of Ph.D Scholarship Scheme 2024 }

परदेश शिष्यवृत्ती योजना २०२४ची ठळक मुद्दे :- { Ph.D Scholarship Scheme 2024 } याची ठळक मुद्दे आम्ही तुम्हाला येथे देत आहोत या मुद्द्यांमुळे तुम्हाला या योजनेत काय महत्त्वाचं आहे ते समजणार आहे व तुम्हाला योग्य दिशा या योजनेचा लाभ घेण्यासाठी मिळेल अशी आशा करतो.

योजनेचे नावपरदेश शिष्यवृत्ती योजना २०२४:Ph.D Scholarship Scheme 2024
योजना कोणा व्दारा सुरु झाली {Started By Whom}
आपले केंद्र सरकार
लाभार्थी {Beneficiary}आपल्या देशातील ज्या विद्यार्थ्यांना मास्टर व पीएचडी बाहेरच्या देशात जाऊन करायचे आहे ते नागरिक योजनेचा फायदा घेऊ शकतात.
योजने मार्फत काय लाभ होणार आहे बाहेर च्या देशात जाऊन मास्टर किंवा पीएचडी करणाऱ्या विद्यार्थ्यांना अनुदान दिले जाईल.
अधिकृत वेबसाईट {Authorized Website}/grPh.D Scholarship Scheme 2024
अर्ज करण्याची पद्धत {Process of Application}ऑनलाईन / ऑफलाईन

परदेश शिष्यवृत्ती योजना २०२४ या योजनेची उद्दिष्टे (Purpose of Ph.D Scholarship Scheme 2024 ) :-

  • आर्थिक उपलब्धता-ही योजना अल्पसंख्यांक विद्यार्थ्यांना आर्थिक दृष्ट्या मदत करते जेणेकरून ते त्यांच्या स्वप्नांना साकार करू शकतील.
  • शैक्षणिक संधींची उपलब्धता-या योजनेद्वारे अल्पसंख्यांक विद्यार्थ्यांना आर्थिक दर्जा असलेल्या शिक्षणाचे द्वारे खुले होतील, यामुळे ती सर्व समाजाबरोबर कॉम्पिटिशन ला उतरू शकतील आणि स्वतःचे भविष्य उज्वल करू शकतील.
  • समाजाच्या प्रगतीला गती मिळेल-अल्पसंख्यांक समाजातील विद्यार्थी चांगले शिकल्यामुळे ते त्यांच्या समाजातील प्रगती ला त्यांचा हातभार लागेल आणि त्यांच्यातील गरीब विद्यार्थ्यांना मदत करण्यासाठी ते सक्षम होतील.
  • समान संधीची उपलब्धता-या योजनेमुळे अल्पसंख्यांक विद्यार्थ्यांना बाकीच्या सर्व समाजाच्या बरोबरीने स्वतःला घडवण्याची संधी मिळेल.
  • व्यावसायिक कौशल्य वाढवणे- अल्पसंख्यांक विद्यार्थ्यांनी परदेशात शिक्षण घेतल्यामुळे त्यांच्यातील कौशल्य वाढीस लागतील व ते त्याचा उपयोग आपल्या देशात चांगला करू शकतील.
  • आंतरराष्ट्रीय संबंध- परदेशात शिक्षण घेतल्यामुळे अनुभवांद्वारे आपल्या देशाचे संबंध आंतरराष्ट्रीय स्तरावर चांगल्या पद्धतीने निर्माण करू शकतील.

परदेश शिष्यवृत्ती योजना २०२४ या योजनेच्या नोंदणीसाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे ( Documents for Ph.D Scholarship Scheme 2024) :

योजनेसाठी खालील कागदपत्रे आवश्यक आहेत-

  • आधार कार्ड (Aadhar Card)
  • रेशन कार्ड (Ration Card)
  • रहिवासी दाखला (Residence Proof)
  • अर्ज
  • अर्जदार अल्पसंख्याक असल्याचा दाखला
  • परदेशामध्ये जाण्यासाठी झालेली परीक्षेमध्ये 200 च्या आतील नंबर असल्याचे प्रमाणपत्र
  • ज्या विद्यापीठात प्रवेश करायचा आहे त्याची संपूर्ण माहिती
  • हमीपत्र
  • मोबाईल नंबर (Mobile Number)
  • ई-मेल आयडी (Email ID)
  • पासपोर्ट साईजचेे दोन फोटो (2 Passport Size Photographs)
  • स्वयंघोषित प्रतिज्ञापत्र (Self Declartion Form)
  • जातीचा दाखला (Caste Certificate)
Ph.D Scholarship Scheme 2024
Ph.D Scholarship Scheme 2024

परदेश शिष्यवृत्ती योजना २०२४ या योजनेची पात्रता (Eligibility for Ph.D Scholarship Scheme 2024) :-

  • महाराष्ट्राचा रहिवासी असून त्याच्याकडे अल्पसंख्यांक असल्याचा पुरावा असावा.
  • या योजनेच्या अर्जदाराला वर्ल्ड बँकिंग मध्ये 200 च्या आतीने आहे.
  • अर्जदाराला जे युनिव्हर्सिटी मध्ये ऍडमिशन घ्यायचे आहे तेथील अनकंडिशनल ऑफर लेटर अर्जदाराकडे उपलब्ध असावे.
  • अर्जदाराने यापूर्वी परदेशात जाण्यासाठी कुठलेही प्रकारची शिष्यवृत्तीती घेतली नसावी.
  • अर्जदाराला पदव्युत्तर शिक्षणात मध्ये कमीत कमी ५५ टक्के गुण असणे गरजेचे आहे.
  • अर्जदाराला पदव्युत्तर शिक्षण घेण्यासाठी 35 वर्षे व पीएचडी करायची असल्यास ४० वर्ष वयोमर्यादा सरकारने ठरवून दिली आहे.
  • अर्जदाराच्या कुटुंबाची वार्षिक उत्पन्न 8 लाख किंवा त्यापेक्षा कमी असावे.
  • योजनेअंतर्गत कुटुंबातील एकाच व्यक्तीला फायदा घेता येणार आहे.

परदेश शिष्यवृत्ती योजना २०२४ या योजनेची अर्ज करायचा असल्यास किती जागा राखीव ठेवण्यात आलेले आहेत?

अल्पसंख्याक प्रकारMasterPhDtotal
1.मुस्लीम०८०२१०
२.बौद्ध०४०२०६
3.
ख्रिचन
०४०२०६
4.जैन०२०१०३
5.पारशी०२०२
एकूण20०७२७

परदेश शिष्यवृत्ती योजना २०२४ या योजनेची अर्ज प्रक्रिया (How to apply for Ph.D Scholarship Scheme 2024 ) :-

परदेश शिष्यवृत्ती योजना २०२४ या योजनेची ऑफलाइन अर्ज प्रक्रिया खालील प्रमाणे :-

  • या योजनेची माहिती अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करून दिली जाईल त्यानंतर आपल्याला हा फॉर्म भरायचा आहे. त्यासाठी जीआर मध्ये देखील फॉर्म दिलेला आहे त्यासाठी अधिकृत वेबसाईटवर क्लिक करा आणि जीआर डाऊनलोड करून आपण हा फॉर्म डाउनलोड करू शकतो.
  • सदर जाहिरात प्रसिद्ध झालेली आहेत ती तारीख म्हणजे 1 मे आणि आपल्याला 1 जुलै पूर्वी या योजनेसाठी अर्ज करायचा आहे.
  • १५ जुलैला विद्यार्थ्यांना कळविण्यात येईलअपात्र आहेत की पात्र आहेत.
  • त्यानंतर विद्यार्थ्यांच्या डॉक्युमेंटची व गृह चौकशी केली जाईल.
  • त्यानंतर मेरिट लिस्टनुसार या योजनेचा लाभ आपल्या अर्जदार घेऊ शकतात.

निष्कर्ष :-

मित्रांनो, तुम्हाला आम्ही दिलेली परदेश शिष्यवृत्ती योजना २०२४ या योजनेबद्दलची माहिती कशी वाटली याबद्दल तुम्ही आम्हाला लेखाच्या खाली कमेंट करून कळवू शकता तसेच आमच्यासाठी काही सूचना असतील त्याही तुम्ही आम्हाला सुचवू शकता अशाच सरकारी योजना संबंधी अपडेटेड माहिती मिळवण्यासाठी आमच्या योजना गॅरंटी डॉट कॉम (yojnaguarantee.com) या संकेतस्थळाला भेट देत राहा धन्यवाद|

आशा आहे आपल्याला हा लेख आवडला असेल आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा जेणेण करून ज्या विद्यार्थी मित्र पीएचडी किंवा मास्टर करू इच्छिता परंतु परिस्थिती अभावी त्यांनाही शक्य होत नाही. त्या विद्यार्थ्यांना मदत होईल आणि त्यांच्या उज्वल भविष्यासाठी आपण देखील हातभार लावू शकतो.


FAQ :-


१. परदेश शिष्यवृत्ती योजना २०२४ योजनेचा अर्ज कसा करावा ?

उत्तर-

२. परदेश शिष्यवृत्ती योजना २०२४ या योजनेचा ऑनलाइन अर्ज करायचा असल्यास अधिकृत संकेतस्थळ कोणते?

उत्तर- https://gr.maharashtra.gov.in/Site/Upload/Government%20Resolutions/Marathi/202311231521469114.pdf

३.परदेश शिष्यवृत्ती योजना २०२४ कोणत्या राज्यामध्ये लागू आहे?

उत्तर-ही योजना केंद्र सरकारच्या असल्या कारणामुळे ती सर्व राज्यांमध्ये लागू झालेली आहे मिरीटनुसार विद्यार्थ्यांची निवड या योजनेसाठी केली जाईल.

४. परदेश शिष्यवृत्ती योजना २०२४चे लाभार्थी कोण आहेत ?

उत्तर-आपल्या देशातील ज्यांना मास्टर्स किंवा पीएचडी बाहेरच्या देशात करायची आहे अशी विद्यार्थी या योजनेचा लाभ घेऊ शकतात.

5.परदेश शिष्यवृत्ती योजना २०२४ या योजने अंतर्गत दिले जाणारे लाभ ?

उत्तर-योजनेअंतर्गत परदेशात शिकण्याची इच्छा असणाऱ्या विद्यार्थ्यांना मास्टर व एचडी करण्यासाठी सरकारकडून अनुदान दिले जाणार आहे

6. परदेश शिष्यवृत्ती योजना २०२४ या योजनेचा उद्देश काय आहे ?

उत्तर-अल्पसंख्यांक प्रवर्ग आपल्या मूळ प्रवर्गामध्ये येण्यासाठी सरकारने या योजनेचा सुरुवात केली आहे.

हे देखील वाचा :-


योजना प्रत्येक ज्येष्ठ नागरिकाला आपल्या उतरत्या वयात जीवन सुकर व्हाव म्हणून महाराष्ट्र सरकारने आणली आहे मुख्यमंत्री वयोश्री योजना. {Mukhyamantri Vayoshri Yojna}


शेतकऱ्यानच्या फायद्या साठी वाचा. किसान सन्मान निधी योजना | {Kisan Sanman Nidhi Yojna}


आपल्या लाडक्या लेकीच्या उज्वल भविष्यासाठी जाणून घ्या सुकन्या समृद्धी योजना। {Sukanya Samrudhi Yojna}


जर तुम्ही बेरोजगार असाल तर तुम्ही बेरोजगार भत्ता योजनेचा लाभ घेऊ शकता. अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी बेरोजगार भत्ता अर्ज कसा करावा हे वाचा.{Berojgar Bhatta yojna arj ksa karava}


महिलांना व्यवसाय स्थापन करण्यासाठी प्रोत्साहन पर योजना म्हणजेच महिला समृद्धी कर्ज योजना, अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी या योजनेवर क्लिक करा. {Pm pik vima yojna 2024}


आपल्याला आपल्या हक्काचे घर मिळणार रमाई आवास घरकुल योजना अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी या योजनेवर क्लिक करा. {Ramai Awas Gharkul Yojna}


मुलीच्या उज्ज्वल भविष्यासाठी शासन घेऊन आले आहे लेक लाडकी योजना. {LEK LADKI YOJNA}


गर्भवती महिलांना पोषक आहार मिळावा यासाठी सरकार देते रोख रक्कम त्याकरिता वाचा व अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी या योजनेवर क्लिक करा  जननी सुरक्षा योजना.


व्यवसाय सुरु करण्यासाठी सरकार देत आहे बिनव्याजी कर्ज वाचा व अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी या योजनेवर क्लिक करा अण्णासाहेब पाटील कर्ज योजना.