Pandit Dindayal Upadhyay Swaym Yojana 2024|पंडित दीनदयाल उपाध्याय स्वयंम् योजना २०२४

Pandit Dindayal Upadhyay Swaym Yojana 2024

नमस्कार वाचकांनो आज आपण बघणार आहोत एक आगळीवेगळी योजना जी योजना आपले राज्य सरकार घेऊन आले आहे योजनेचे नाव आहे “पंडित दीनदयाल उपाध्याय स्वयंम् योजना” या योजनेअंतर्गत उच्च शिक्षणासाठी विद्यार्थ्यांना आर्थिक सहाय्य केले जाणार आहे . तर जाणून घेऊयात या योजनेबद्दल सविस्तर माहिती आपण बघतो की एखादा विद्यार्थी उच्च शिक्षणासाठी बाहेरगावी राहण्यासाठी जातो परंतु आर्थिक परिस्थिती चांगली नसल्यामुळे वस्तीगृहात राहणे किंवा जेवणाचा खर्च भागवणे हे देखील अवघड होऊन जाते.

अशा परिस्थितीत आपल्या देशातील काही विद्यार्थ्यांना आपले शिक्षण अर्धवट सोडावे लागते यावर पर्याय म्हणून आपल्या राज्य सरकारने पंडित दीनदयाल उपाध्याय स्वयं योजना सुरू केली आहे.या योजनेअंतर्गत उच्च शिक्षणासाठी विद्यार्थ्यांना 60,000/- मात्र इतकी वार्षिक रक्कम दिली जाणार आहे. या रकमेतून विद्यार्थी आपले शिक्षण व निवास खर्च भागू शकतो .ही योजना प्रामुख्याने बारावी उत्तीर्ण झाल्यानंतर उच्च शिक्षण घेण्या साठी शहरी भागात जाणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सुरू करण्यात आली आहे.

या योजनेचा फायदा अनुसूचित जाती ,अनुसूचित जमाती ,अल्पसंख्यांक व मागासवर्गातील विद्यार्थी यांना होणार आहे. जर आपल्याला आपला भारत सशक्त करायचा असेल तर विद्यार्थी घडविणे हे महत्त्वाचे कार्य आहे याचा विचार करून आपल्या सरकारने ही योजना सुरू केली. या योजनेमुळे उच्च शिक्षण घेणारा विद्यार्थी आर्थिक गरजाअभावी मागे राहणार नाही.या योजनेसाठी पात्र असणाऱ्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबाचे आर्थिक उत्पन्न हे 2 लाख 50 हजार किंवा त्यापेक्षा कमी असावे .

नोकरी करणाऱ्या व्यक्तीला या योजनेचा लाभ घेता येणार नाही उच्चशिक्षण म्हणजेच वैद्यकीय शिक्षण, अभियांत्रिकी शिक्षण, तंत्रनिकेतन किंवा कुठल्याही कौशल्यावर आधारित अभ्यासक्रम यासाठी आपण या योजनेचा फायदा घेऊ शकता. ही योजना आपल्या राज्य सरकारची आहे त्यामुळे फक्त महाराष्ट्रातील विद्यार्थी या योजनेचा फायदा घेऊ शकतात .या योजनेअंतर्गत ज्या विद्यार्थ्यांना शासकीय वस्तीगृहात प्रवेश मिळालेला नाही आहे ते विद्यार्थी या योजनेसाठी पात्र आहेत आपल्या गुणनिकशावर या योजनेची यादी जाहीर होणार आहे.अपंग विद्यार्थ्यांना या योजनेसाठी प्राधान्य दिले जाईल.

आदिवासी विकास विभागाकडून अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांसाठी महाराष्ट्र राज्यात एकूण 495 वसतिगृह मंजूर आहेत व त्यांची एकूण प्रवेश क्षमता 6170 आहे, तसेच 495 वसतिगृहांपैकी 491 वसतिगृहे कार्यरत आहेत, त्या पैकी 283 वसतिगृहे मुलांची आहेत तर २००८ वसतिगृहे ही मुलींची आहेत या दोन्ही वसतिगृहांची विद्यार्थी क्षमता 58 हजार 495 एवढी आहे.

Table of Contents

Table of Contents

पंडित दीनदयाल उपाध्याय स्वयंम् योजना २०२४ ठळक मुद्दे (Pandit Dindayal Upadhyay Swaym Yojana 2024 important points)

योजनेचे नावपंडित दीनदयाळ उपाध्याय स्वयं योजना (Pandit Dindayal Upadhyay Swaym Yojana )
योजनेची सुरुवात कोणी केलीराज्य सरकार
योजनेचा फायदा कुणाला होणार आहेअनुसूचित जाती ,अनुसूचित जमाती ,अल्पसंख्यांक व मागासवर्गा मागासवर्गातील विद्यार्थी
योजना चौकशी साठी टोल फ्री क्रमांक१८००२६७०००७
योजना कोणत्या विभागा अंतर्गत आहे सामाजिक न्याय व कल्याण विभाग
योजनेची अर्ज प्रकिया कशी आहेऑन लाईन

पंडित दीनदयाल उपाध्याय स्वयंम् योजना २०२४ अर्ज करण्यासाठी लागणारी कागदपत्रे (Pandit Dindayal Upadhyay Swaym Yojana 2024 important documents)

पंडित दीनदयाळ उपाध्याय योजना या अर्ज कराचा असल्यास खालील कागदपत्रे आवशक आहेत.

  • आधार कार्ड (aadhar card)
  • रेसन कार्ड(ration card)
  • १२ वी उत्तीर्ण प्रमाणपत्र(8th pass certificate)
  • 10 वी उत्तीर्ण प्रमाणपत्र(10th pass certificate)
  • ई – मेल आयडी(email-id)
  • फोन नंबर(phone no)
  • उत्पन्न प्रमाणपत्र(income certificate)
  • कास्ट सर्टिफिकेट (cast certificate).
  • रहिवासी दाखला
  • जन्माचा दाखला
  • कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न दाखला
  • फोटो
  • लाभार्थी अपंग असल्यास अपंगत्वाचा दाखला
  • बँक पासबुक
  • बोनाफाईड

पंडित दीनदयाल उपाध्याय स्वयंम् योजना २०२४ अर्ज करण्यासाठी कुठे करावा(How to apply forPandit Dindayal Upadhyay Swaym Yojana 2024 )

योजनेसाठी अर्ज करावयाचा असेल तर खालील लिंक वर क्लिक करा.

पंडित दीनदयाल उपाध्याय स्वयंम् योजना २०२४

Pandit Dindayal Upadhyay Swayam Yojana

पंडित दीनदयाळ उपाध्याय योजना ची वैशिष्ट्ये :-

  • पंडित दीनदयाळ उपाध्याय स्वयं योजनेची सुरुवात महाराष्ट्र शासनाच्या आदिवासी विकास विभागामार्फत सुरू करण्यात आलेले आहे या योजनेची सुरुवात करून शासनाने आदिवासी समाजाच्या विद्यार्थ्यांची शैक्षणिक व निवासी खर्चाची रक्कम आधार नंबरशी संलग्न करून थेट लाभ देणारी ही प्रथम योजना आहे.
  • आदिवासी विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी जे शासकीय वसतिगृहात आहेत त्यामध्ये प्रवेश न मिळाल्यास तो विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये, यासाठी महाराष्ट्र शासनाने पंडित दीनदयाल उपाध्याय स्वयंम् योजना सुरू केली आहे.
  • राज्यातील आदिवासी विद्यार्थ्यांचा सामाजिक आर्थिक विकास करणे
  • या योजनेअंतर्गत राज्यातील आदिवासी तसेच मागासवर्गीय विद्यार्थ्यांचे जीवनमान सुधरवणे तसेच त्यांना आत्मनिर्भर करणे हे या योजनेचे उद्दिष्ट आहे.
  • राज्यातील आदिवासी विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये व आदिवासी लोकांच्या सामाजिक – आर्थिक दृष्ट्या मजबूत करणे.
  • आदिवासी विद्यार्थ्यांला शिक्षणाच्यासाठी शासकीय वसतिगृहातमध्ये प्रवेश मिळाला नसल्यास तरी त्या विद्यार्थ्याला पुढचे शिक्षण घेता यावे म्हणजेच तो विद्यार्थी शिक्षणापासून दूर होऊ नये यासाठी सरकारने पंडित दीनदयाल उपाध्याय स्वयंम् योजना सुरू केलेली आहे. च्याअनुसार शहरामध्ये शिक्षण घेत असलेल्या आदिवासी विद्यार्थ्यांला शासकीय वसतिगृहात प्रवेश मिळाला नाही, तर अशा आदिवासी विद्यार्थ्यांना या योजनेतून रोख रक्कम देण्यात येते. व मिळालेल्या त्या रोख रक्कमेतून विद्यार्थ्यांना त्याच शहरात त्यांची निवासाची सोय करता यावी, हा या योजनेमागील मुख्य उद्देश आहे.
  • पंडित दीनदयाल उपाध्याय स्वयं योजनेअंतर्गत लाभार्थीला मिळणारी रोख रक्कम ही त्याच्या डायरेक्ट बँक खात्यामध्ये जमा होईल (डीबीटी अंतर्गत)
  • या योजनेत अर्ज करण्यासाठी विद्यार्थ्याला आपला वेळ वाया घालवण्याची जरुरी नाही कारण यासाठी सरकारने तशी सोयच केली आहे विद्यार्थी आपला अर्ज घरबसल्या आपल्या मोबाईलद्वारे भरू शकतो त्यासाठी त्याला कुठेही जाण्याची सरकारी कार्यालयात रांगेत उभे राहण्याची गरज नाही विद्यार्थी वेळोवेळी आपल्या अर्जाची काय स्थिती आहे हे पाहू शकतील, ज्यामुळे विद्यार्थ्यांचा वेळ आणि पैसा दोघेही वाचतील व त्यांना खऱ्या अर्थाने आपण ज्याला मदत म्हणतो ती मदतच सरकार करत आहे.

पंडित दिनदयाळ उपाध्याय स्वयं योजना या योजनेचे लाभार्थी Pandit Dindayal Upadhyay Yojna :-

राज्यातील मुख्यत्वेकरून आदिवासी समाज व अनुसूचित जाती जमाती व अल्पसंख्यांक तसेच मागासवर्गातील विद्यार्थी या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी पात्र आहेत.

Pandit Dindayal Yojana Scholarship

पंडित दिनदयाळ उपाध्याय स्वयं योजना विद्यार्थ्यांना होणारा फायदा :-

  • Pandit Dindayal Yojana Scholarship या योजनेअंतर्गत राज्यातील आदिवासी समाजाचे विद्यार्थी, राज्यातील अनुसूचित जातीचे विद्यार्थी, तसेच अल्पसंख्यांक व मागासवर्गातील विद्यार्थी यांचे शिक्षण पूर्ण करण्यासाठी सरकारकडून मदत होते.
  • पंडित दीनदयाळ उपाध्याय स्वयं योजनेअंतर्गत आदिवासी, अल्पसंख्यांक तसेच मागासवर्गीय विद्यार्थी आपले शिक्षण पूर्ण करून समाजामध्ये आपले चांगले स्थान निर्माण करतील व स्वतःचे व्यवसाय निर्माण करून व्यावसायिक बनतील त्याचबरोबर राज्यातील बेरोजगार युवकांना रोजगार देण्याचे पुण्याचे असे काम त्यांच्या हातून होईल त्यासाठी त्यांनी या योजनेचा जास्तीत जास्त चांगल्या पद्धतीने उपयोग करून समाजापुढे एक चांगला आदर्श घालून द्यावा अशी मी आशा करतो.
  • राज्यातील आदिवासी समाज, मागासवर्गीय समाज तसेच अल्पसंख्यांक समाज या समाजामध्ये शिक्षणाचे प्रमाण तसे बघायला गेले तर फारच कमी आहे पण या योजनेमुळे त्यांच्यातील शिक्षणाचे प्रमाण वाढून त्या समाजातील अनुषंगाने राज्यातील शैक्षणिक गुणवत्तेत वाढ होईल. तसेच राज्यात साक्षरतेचे प्रमाण वाढेल त्या अनुषंगाने राज्याचा सामाजिक व आर्थिक विकास घडून येईल.

Pandit Dindayal Yojana Maharashtra च्या अंतर्गत समाविष्ट असलेल्या शैक्षणिक अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांच्या राहण्याची व खाण्याची सोय:-

राज्यात विविध ठिकाणी असलेले

  • महाविद्यालये
  • उच्च महाविद्यालये
  • तंत्रनिकेतन
  • वैद्यकीय महाविद्यालये
  • आयटीआय
  • कौशल्यावर आधारित अभ्यासक्रमे

भ्यासक्रम करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी या वसतीगृहांची सोय करण्यात आलेली आहे.

Pandit Dindayal Yojana | पंडित दिनदयाळ उपाध्याय योजना

पंडित दिनदयाळ उपाध्याय स्वयं योजना या योजनेअंतर्गत शासकीय वसतिगृहात प्रवेश घेतलेल्या किंवा घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी काय काळजी घ्यावी :-

  • विद्यार्थ्यांनी लागणारी जी आवश्यक कागदपत्रे आहेत त्यांची छायांकित प्रत ही स्पष्ट दिसेल अशी वेबसाईट वर अपलोड करावी.
  • अर्ज भरताना विद्यार्थ्यांनी स्वतःचाच ध्वनी क्रमांक त्यात टाकावा कारण पुढच्या सर्व पायऱ्या त्यावर अवलंबून आहेत.
  • विद्यार्थ्यांनी अर्जामध्ये दिलेला स्वतःचा फोन नंबर हा आधार क्रमांकाशी जोडला गेलेला असावा कारण आधारशी संलग्न असलेला फोन नंबर चा वापर केल्यामुळे त्यांना पडताळणी करणे सोपे होईल.
  • ऑनलाइन अर्ज भरताना त्या अर्जामध्ये स्वतःचे नाव हे आधार कार्ड वर ज्याप्रमाणे आहे त्याप्रमाणेच असावे.
  • विद्यार्थ्यांनी त्यांचा बँक खाते नंबर सादर करण्यापूर्वी आपले बँक खाते चालू आहे की नाही याची खात्री करावी जर बँक खाते चालू नसल्यास योजनेचा लाभ घेताना अडचणीचा सामना करावा लागू शकतो तसेच आपले बँक खाते आधार नंबरशी संलग्न केलेले असावे जर आपले बँक खाते आधार नंबरशी संलग्न नसल्यास संबंधित बँकेच्या शाखेत जाऊन आपले आधार बँक खात्याशी संलग्न करून घ्यावे.
  • विद्यार्थ्यांनी अर्ज करताना अर्जामध्ये काही चुकीची माहिती दिली असल्यास अर्ज रद्द झाला किंवा त्यांना लाभ मिळण्यास विलंब झाला किंवा लाभच रद्द झाल्यास या सर्व गोष्टीसाठी सर्वस्वी जबाबदार अर्जदार राहील.

थोडक्यात पण महत्त्वाची टीप :-

विद्यार्थ्याला मिळणाऱ्या वरील रकमेव्यतिरिक्त वैद्यकीय व अभियांत्रिकी शाखेमधील विद्यार्थ्यांसाठी दरवर्षी पाच हजार रुपये व अन्य शाखेमधील विद्यार्थ्यांना दरवर्षी दोन हजार रुपये एवढी रक्कम शैक्षणिक साहित्य साठी रोख स्वरूपात दिली जाईल.


निष्कर्ष

आपल्या राज्यातील कोणत्याही गरीब मुलाला आपल्या शिक्षणापासून वंचित रहावे लागणार नाही यासाठी सरकार घेऊन आले आहे पंडित दीनदयाळ उपाध्याय स्वयं योजना या योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना भोजन भत्ता निवास भत्ता निर्वाह भत्ता अशा स्वरूपात ६०००/- मात्र मिळणार आहेत. याचा उपयोग करून विद्यार्थी आपले शिक्षण पूर्ण करू शकतात. अशा आहे आपल्या सर्वांना हा लेख आवडला असेल हा लेख जास्तीत जास्त सर्वांपर्यंत पोहोचा जेणेकरून आपल्या देशातील व राज्यातील कोणताही विद्यार्थी पैशा अभावी शिक्षणापासून वंचित राहणार नाही.

पंडित दिनदयाळ उपाध्याय योजना

FAQ’s :-

१. नोकरी करणारा विद्यार्थी या योजनेचा फायदा घेऊ शकतो का?

उत्तर – नाही, नोकरी करणारा विद्यार्थी या योजनेचा फायदा घेऊ शकत नाही.

२. पंडित दीनदयाळ उपाध्याय स्वयं योजना ही कोणासाठी आहे?

उत्तर – ही योजना आदिवासी समाजातील विद्यार्थ्यांसाठी म्हणजेच अनुसूचित जाती तसेच अनुसूचित जमाती अल्पसंख्यांक व मागासवर्गीय विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणा मध्ये आर्थिक दृष्ट्या मदत व्हावी त्यासाठी आहे.

३. पंडित दीनदयाल उपाध्याय स्वयंम् योजना २०२४ अर्ज करण्यासाठी कुठे करावा ?

उत्तर – swayam.mahaonline.gov.in

अधिक माहितीसाठी हे वाचा-

मुलीच्या उज्ज्वल भविष्यासाठी शासन घेऊन आले आहे लेक लाडकी योजना. { LEK LADKI YOJNA }


योजना प्रत्येक ज्येष्ठ नागरिकाला आपल्या उतरत्या वयात जीवन सुकर व्हाव म्हणून महाराष्ट्र सरकारने आणली आहे मुख्यमंत्री वयोश्री योजना.{Mukhyamantri Vayoshri Yojna}


शेतकऱ्यानच्या फायद्या साठी वाचा किसान सन्मान निधी योजना |Kisan Sanman Nidhi Yojna


आपल्या लाडक्या लेकीच्या उज्वल भविष्यासाठी जाणून घ्या सुकन्या समृद्धी योजना। Sukanya Samrudhi Yojna। Bharat Sarkar।Women Empowerment.


जर तुम्ही बेरोजगार असाल तर तुम्ही बेरोजगार भत्ता योजनेचा लाभ घेऊ शकता. अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी बेरोजगार भत्ता अर्ज कसा करावा हे वाचा.


महिलांना व्यवसाय स्थापन करण्यासाठी प्रोत्साहन पर योजना म्हणजेच महिला समृद्धी कर्ज योजना, अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी या योजनेवर क्लिक करा. महिला समृद्धी कर्ज योजना.