niradhar yojana maharashtra|niradhar yojana documents marathi
niradhar yojana maharashtra:संजय गांधी निराधार योजना ही महाराष्ट्र शासनाने 65 वर्षांच्या खालील निराधार पुरुष, महिला, अंध, अपंग, अनाथ मुले, मोठ्या आजाराने ग्रस्त असलेली व्यक्ती, घटस्फोटीत महिला, वेश्या व्यवसायापासून मुक्त झालेल्या महिला या सर्वांना दर महिन्याला दीड हजार रुपयांचे आर्थिक सहाय्य या योजनेमार्फत केले जाते, जेणेकरून त्यांची उपजीविका व दैनंदिन गरजा त्या भागवू शकतील व त्यासाठी त्यांचा स्वाभिमान त्यांना विकावा लागणार नाही.
संजय गांधी निराधार अनुदान योजना ही सरकारच्या सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागाची योजना आहे ही योजना शंभर टक्के शासनाकडून अनुदानित योजना आहे आणि या योजनेसाठी पात्र असलेले उमेदवार हे महाराष्ट्र राज्याचे कायमचे रहिवासी असलेले हवेत. या योजनेला पात्र ठरण्यासाठी कुटुंबाचे नाव हे बीपीएल कुटुंबाच्या यादीमध्ये असायला पाहिजे आणि कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न हे 21 हजारांपेक्षा कमी किंवा त्या समान असावे.
संजय गांधी निराधार योजना २०२४(niradhar yojana maharashtra) या योजनेची ठळक मुद्दे :-
योजनेचे नाव | संजय गांधी निराधार योजना २०२४ | Sanjay Gandhi Niradhar Yojna 2024 |
योजनेचा फायदा कुणाला होणार आहे. | समाजातील दुर्बल घटकांना आर्थिक मदत |
योजने अंतर्गत काय फायदा होणार आहे. | प्रत्येक महिन्याला दीड हजार रुपये आर्थिक सहाय्य { रुपये 1500/- } |
योजना कोणत्या विभागा अंतर्गत राबवली जाते. | महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागाद्वारे “संजय गांधी निराधार अनुदान योजना” राबवली जात आहे. |
योजनेचे अधिकृत संकेतस्थळ कोणते. | https://aaplesarkar.mahaonline.gov.in/ |
अर्जाची पद्धत | Online / Offline दोन्हीही |
संजय गांधी निराधार योजना २०२४ या योजनेची कागदपत्रे (Documents for sanjay Gandhi Niradhar Yojna 2024) niradhar yojana maharashtra
- आधार कार्ड
- दोन पासपोर्ट आकाराचे फोटो त्यावर वरती स्वाक्षरी केलेली असावी
- महाराष्ट्र राज्याचे रहिवासी प्रमाणपत्र
- बँक खात्याची सर्व माहिती जसे बँकेचे नाव, शाखेचे नाव, बँकेचा पत्ता, बँक अकाउंट नंबर व IFSC.
- वयाचा दाखला
- कौटुंबिक उत्पन्नाचे प्रमाणपत्र
- बीपीएल कार्ड
- ट्रान्स जेंडर असल्यास त्याचे प्रमाणपत्र
- वैद्यकीय दाखला म्हणजेच असमर्थता किंवा रोग असल्याचे प्रमाणपत्र सिव्हिल सर्जन किंवा सरकारी रुग्णालयाच्या
- वैद्यकीय अधीक्षकांनी दिलेले त्याबाबतचा दाखला
- अपंगत्व असल्यास त्याचे प्रमाणपत्र
- विधवा अर्जदारांच्या बाबतीत विवाहाचे प्रमाणपत्र आणि त्यांच्या पतीचा मृत्यू झाल्याचे प्रमाणपत्र
संजय गांधी निराधार योजना २०२४ (niradhar yojana maharashtra) या योजनेची अर्ज करण्याची पध्दत :-
संजय गांधी निराधार अनुदान योजनेअंतर्गत ऑनलाईन अर्ज करण्याची पद्धत
Step 1 – प्रथम पायरी अर्जदाराला सर्वात प्रथम शासनाच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन होमपेज वरील नवीन युजर येथे क्लिक करून पेज ओपन करावे लागेल.
आता तुम्हाला पर्याय एक आणि पर्याय दोन दिसतील या दोन ऑप्शन पैकी तुम्ही कोणत्याही ऑप्शनने अर्ज करू शकता.
पर्याय एक वर क्लिक केल्यावर तुम्हाला तुमचा जिल्हा निवडावा लागेल त्यानंतर मोबाईल नंबर त्यात टाकावा लागेल नंतर तुम्हाला तिथे ओटीपी जनरेट होईल व तुमच्या मोबाईल क्रमांकावर जो तुम्ही दिलेला आहे त्यावर तो ओटीपी येईल तो ओटीपी तुम्हाला तिथे टाकायचा आहे त्यानंतर तुमचा युजर आयडी आणि पासवर्ड बनवायचा आहे तो बनवल्यानंतर तुम्हाला लॉगिन करावे लागेल.
Step -2 आता तुम्हाला होमपेज वर जाऊन युजरनेम, पासवर्ड आणि कॅपचा टाकून लॉगिन करायचं आहे.
Step – 3 लॉगिन झाल्यावर तुमच्यासमोर एक पेज ओपन होईल त्यापेक्षा डाव्या बाजूला सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग नसेल त्यावर क्लिक तुम्हाला करायचा आहे. त्यानंतर पुन्हा तुमच्यासमोर एक पेज ओपन होईल त्यामध्ये विशेष सहाय्य योजना यावर क्लिक करायचं आहे आणि पुढे जा यावर देखील क्लिक करायचे आहे. आता त्यानंतर या योजनेत अंतर्गत आवश्यक कागदपत्रांची माहिती दिली असेल ती वाचायची आणि पुढे सुरू करा या बटणावर क्लिक करायचं आहे.
आता तुमच्या समोर संजय गांधी निराधार योजनेचा अर्ज दिसेल त्यात तुम्हाला विचारलेली सर्व माहिती तुम्ही भरायची आहे आणि आवश्यक कागदपत्र तिथे अपलोड करायचे आहेत व सबमिट या बटनावर क्लिक करून तुमच्या फॉर्म सबमिट करायचा आहे. अशा प्रकारे तुमची संजय गांधी राधा अनुदान योजनेअंतर्गत अर्ज प्रक्रिया पूर्ण झाली आहे.
अर्ज सबमिट झाल्यावर तुम्हाला रुपये 33 चे पेमेंट करायचे आहे आता तुमचा अर्ज 30 दिवसांसाठी मंजुरी करिता तहसील कार्यालयात जाईल जर 30 दिवसानंतर तुमचा अर्ज मंजूर न झाल्यास तुम्हाला तुमच्या सर्व कागदपत्रांसह तहसील कार्यालयात जाऊन सर्व कागदपत्रे जमा करायचे आहेत व अर्ज मंजूर करून घ्यायचा आहे.
संजय गांधी निराधार अनुदान योजनेअंतर्गत (niradhar yojana maharashtra) ऑफलाइन अर्ज करण्याची पद्धत
आता आपण ऑफलाईन अर्ज करण्याची पद्धत कशी आहे ते पाहणार आहोत ऑफलाईन अर्ज करताना अर्जदाराला तो राहत असलेल्या ठिकाणच्या जिल्हाधिकारी कार्यालय असेल तहसीलदार कार्यालय असेल तलाठी कार्यालय असेल या कार्यालयात जाऊन या योजनेचा अर्ज घ्यायचा आहे अर्जात विचारलेली सर्व माहिती योग्य प्रकारे भरायचे आहे आणि आवश्यक कागदपत्रांची छायांकित प्रती त्याला जोडून अर्ज कार्यालयास जमा करायचा आहे.
संजय गांधी निराधार योजना २०२४ (niradhar yojana maharashtra) या योजनेची पात्रता, नियम, अटी व शर्ती :-
पात्रतेची अहर्ता खाली देत आहोत काळजीपूर्वक अभ्यासा
- अर्जदार भारताचा नागरिक असावा तसेच महाराष्ट्राचा कायमचा रहिवासी देखील असावा.
अर्जदाराचे नाव दारिद्र्यरेषेखालील म्हणजे बीपीएल कुटुंबाच्या यादीत असायला पाहिजे म्हणजे कुटुंबाची वार्षिक उत्पन्न रुपये 21000 पेक्षा कमी किंवा त्या समान असावे.
अर्जदार खालीलपैकी एक असायला हवा. - 65 वर्षाखालील निराधार पुरुष किंवा महिला.
- अनाथ मुले.
अपंग व्यक्तींच्या सर्व श्रेणी म्हणजे पीडब्ल्यूडी.
क्षयरोग, कर्करोग, एड्स, कुष्ठरोग, यांसारखे आजारांमुळे स्वतःला सांभाळण्यात असमर्थ असलेले महिला व पुरुष. - निराधार विधवा म्हणजे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या विधवांसह.
- घटस्फोट प्रक्रियेत असलेल्या महिला आणि घटस्फोटीत परंतु पोटगी नाही अशी व्यक्ती.
ज्या महिलांची वेश्या व्यवसायातून छळ होऊन सुटका झाली आहे अशा महिला . - ट्रांसजेंडर.
- देवदासी.niradhar yojana maharashtra|niradhar yojana documents marathi
- 35 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या अविवाहित महिला.
- तुरुंगात शिक्षा भोगत असलेल्या कैद्यांच्या पत्नी.
- सिकलसेल रोगानेग्रस्त असलेल्या महिला किंवा पुरुष.
- अपंगातील अस्थिभंग, अंध, मूकबधिर, कर्णबधिर, मतिमंद, इत्यादी या प्रवर्गातील स्त्री आणि पुरुष. niradhar yojana maharashtra|niradhar yojana documents marathi
- क्षयरोग पक्षाघात प्रमस्तिष्क घात कर्करोग एड्स म्हणजे एचआयव्ही पॉझिटिव्ह कुष्ठरोग यासारख्या आजारांमुळे स्वतःचा चरितार्थ चालवू न शकणारे स्त्री आणि पुरुष.
- निराधार महिला निराधार विधवा घटस्फोट प्रक्रियेतील व घटस्फोट झालेल्या परंतु पोटगी न मिळणाऱ्या अशा विधवा किंवा या योजनेखाली विहित केलेल्या उत्पन्न मर्यादेपेक्षा कमी पोटगी मिळणाऱ्या महिला अत्याचारित महिला व तसेच वेश्या व्यवसायातून मुक्त झालेल्या किंवा मुक्त केलेल्या महिला.
- शेतमजूर महिला. niradhar yojana maharashtra|niradhar yojana documents marathi
- आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न या योजनेखालील विहित उत्पन्नापेक्षा कमी असल्यास ते कुटुंब पण ग्राह्य धरले जाईल.
- अनाथ मुले पण अठरा वर्षाखालील असायला हवेत.
- वयाचा दाखला – त्यामध्ये ग्रामपंचायतच्या नगरपालिकेच्या किंवा महानगरपालिकेच्या जन्म नोंदविहीतीतील उताऱ्यांची साक्षांकित प्रत तसेच शाळा सोडल्याचा दाखला शिधापत्रिकेमध्ये अथवा निवडणूक मतदार यादीत नमूद केलेल्या वयाचा उतारा किंवा ग्रामीण किंवा नागरी रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक यांचा किंवा त्यापेक्षा वरील दर्जाच्या शासकीय वैद्यकीय अधिकाऱ्याने दिलेला वयाचा दाखला लागेल.
- उत्पन्नाचा दाखला – त्यामध्ये तहसीलदार किंवा उपविभागीय अधिकारी यांनी दिलेला दाखला किंवा दारिद्र्यरेषेखालील म्हणजेच बीपीएल यादी मध्ये त्या व्यक्ती किंवा कुटुंबाचा समावेश असायला पाहिजे असल्यास त्याबद्दलचा साक्षांकित उतारा पाहिजे.
- अपंगाचे प्रमाणपत्र – अस्थिभंग मूकबधिर अंध कर्णबधिर मतिमंद अशांचे अपंगत्व बाबतचे अपंग व्यक्ती अधिनियम 1995 मधील तरतुदीनुसार जिल्हा शल्य चिकित्सक म्हणजे सिव्हिल सर्जन त्यांचे प्रमाणपत्र लागेल. niradhar yojana maharashtra|niradhar yojana documents marathi
- रहिवाशी दाखला- ग्रामसेवक असेल तलाठी असेल मंडळ निरीक्षक असेल नायब तहसीलदार असेल किंवा तहसीलदार यांनी दिलेल्या रहिवासी असल्याबाबतचा दाखला.
- असमर्थतेचा किंवा रोगाचा दाखला – जिल्हा शल्य चिकित्सक म्हणजे सिव्हिल सर्जन, शासकीय रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक यांनी दिलेला दाखला येथे लागेल.
- कोणत्या सरकारी किंवा निमसरकारी किंवा निवास गृहाचा अंतर्वासी नसल्याबाबतचा दाखला – तो तहसीलदार किंवा ग्रामसेवक / तलाठी यांच्या शीफारशीवरून दिलेला दाखला व महिला व बालकल्याण अधिकारी यांनी दिलेला दाखला.
- अनाथ असल्याचा दाखला- त्यामध्ये ग्रामसेवक / मुख्याधिकारी / प्रभाग अधिकारी यांनी दिलेला व गटविकास अधिकारी / प्रकल्प अधिकारी, एकात्मिक बाल विकास सेवा योजना यांनी साक्षांकित केलेला दाखला येथे लागेल.
निष्कर्ष :-
संजय गांधी निराधार योजना २०२४ niradhar yojana maharashtra आम्ही तुम्हाला परिपूर्ण माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे, यामध्ये या योजनेविषयी थोडक्यात माहिती, त्याचे ठळक मुद्दे, योजनेची पात्रता, योजनेचे फायदे, योजनेच्या अटी व शर्ती, योजनेसाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे, आणि ऑनलाईन अर्ज कसा करावा , असा हा परिपूर्ण लेख आम्ही तुमच्यासाठी सादर करत आहोत तो तुम्ही शेवटपर्यंत वाचल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद।
niradhar yojana maharashtra|niradhar yojana documents marathi
FAQ:-
१. योजनेचा अर्ज कसा करावा ?
उत्तर- Online / Offline दोन्हीही प्रकारे
२.संजय गांधी निराधार योजना २०२४ या योजनेचा ऑनलाइन अर्ज करायचा असल्यास अधिकृत संकेतस्थळ कोणते ?
उत्तर- .https://aaplesarkar.mahaonline.gov.in/
३. संजय गांधी निराधार योजना २०२४ कोणत्या राज्यामध्ये लागू आहे?
उत्तर- महाराष्ट्र
४. संजय गांधी निराधार योजना २०२४ चे लाभार्थी कोण आहेत ?
उत्तर- समाजातील दुर्बल घटकांना आर्थिक मदत
5. संजय गांधी निराधार योजना २०२४ अंतर्गत दिले जाणारे लाभ ?
उत्तर- समाजातील दुर्बल घटकांना आर्थिक मदत महिन्याला दीड हजार रुपयांचे आर्थिक सहाय्य
6. संजय गांधी निराधार योजना २०२४ चा उद्देश काय आहे ?
उत्तर- निराधारांना आधार
हे देखील वाचा :-
योजना प्रत्येक ज्येष्ठ नागरिकाला आपल्या उतरत्या वयात जीवन सुकर व्हाव म्हणून महाराष्ट्र सरकारने आणली आहे मुख्यमंत्री वयोश्री योजना.{Mukhyamantri Vayoshri Yojna} niradhar yojana maharashtra
शेतकऱ्यानच्या फायद्या साठी वाचा किसान सन्मान निधी योजना |Kisan Sanman Nidhi Yojna
आपल्या लाडक्या लेकीच्या उज्वल भविष्यासाठी जाणून घ्या सुकन्या समृद्धी योजना। Sukanya Samrudhi Yojna। Bharat Sarkar।Women Empowerment.
जर तुम्ही बेरोजगार असाल तर तुम्ही बेरोजगार भत्ता योजनेचा लाभ घेऊ शकता. अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी बेरोजगार भत्ता अर्ज कसा करावा हे वाचा. niradhar yojana maharashtra|niradhar yojana documents marathi
महिलांना व्यवसाय स्थापन करण्यासाठी प्रोत्साहन पर योजना म्हणजेच महिला समृद्धी कर्ज योजना, अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी या योजनेवर क्लिक करा.
आपल्याला आपल्या हक्काचे घर मिळणार रमाई आवास घरकुल योजना अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी या योजनेवर क्लिक करा.
मुलीच्या उज्ज्वल भविष्यासाठी शासन घेऊन आले आहे लेक लाडकी योजना. { LEK LADKI YOJNA}
गर्भवती महिलांना पोषक आहार मिळावा यासाठी सरकार देते रोख रक्कम त्याकरिता वाचा व अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी या योजनेवर क्लिक करा जननी सुरक्षा योजना.
व्यवसाय सुरु करण्यासाठी सरकार देत आहे बिनव्याजी कर्ज वाचा व अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी या योजनेवर क्लिक करा अण्णासाहेब पाटील कर्ज योजना niradhar yojana maharashtra|niradhar yojana documents marathi