महात्मा गांधी रोजगार हमी योजना(mahatma gandhi rojgar hami yojna MGNREGA)
आपल्या देशातील वाढती बेरोजगारी बघून शासनाने आपल्या देशातील तरुणांना रोजगार उपलब्ध करून देण्याची नवीन संधी आणली आहे.देशातील बेरोजगारी संपवण्यासाठी महाराष्ट्र सरकार घेऊन आले आहे रोजगार हमी योजना.या योजनेअंतर्गत अर्ज करणाऱ्या व्यक्तीला वर्षातील शंभर दिवस रोजगार उपलब्ध करून दिला जाणार आहे. अतिशय सोप्या पद्धतीने आपण या योजनेसाठी अर्ज करू शकता ,या योजनेची उद्दिस्ते काय आहेत हे जाणून घेणार आहोत.
रोजगार हमी योजना प्रामुख्याने महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील तरुणांसाठी आहे.आपले महाराष्ट्र सरकारने 2005 पासून हि योजना राबवत आहे. त्यानंतर केंद्र सरकारने 2008 पासून महात्मा गांधी रोजगार हमी योजना आपल्या पूर्ण भारतात राबविण्याचेे ठरवले.या योजनेअंतर्गत तुम्ही अर्ज केल्यानंतर पंधरा दिवसानंतर तुम्हाला रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या जातील.या संधी तुमच्या भागातील आसपासच्या खेडेगावात असेल.
योजनेद्वारे आपल्या खेड्यातील तरुणांना आर्थिक दृष्ट सक्षम होण्यास मदत होणार आहे व स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी देखील मदत होणार आहे.या योजनेअंतर्गत जर अर्ज करून पंधरा दिवसानंतर देखील तुम्हाला रोजगार उपलब्ध झाली नाही तर बेरोजगारीचा भत्ता दिला जाणार आहे.
रोजगार हमी योजना अंतर्गत कामगारांना बाकीच्या सुविधा देखील दिल्या जाणार आहे जसे काही दुखापत झाली तर त्यासाठी उपचार, लहान मुले असतील तर त्यांना सावलीची सुविधा ,पिण्याचे पाणी इत्यादी यासारख्या सुविधा देखील सरकारने उपलब्ध करून दिल्या आहेत.
या योजनेअंतर्गत अर्जदारांना 5 km पर्यंत काम दिले जाईल आणि जर पाच किलोमीटरच्या बाहेर काम दिले तर प्रवासाचा पत्ता देखील दिला जाईल.
Table of Contents
महात्मा गांधी रोजगार हमी योजना उद्देश (Purpose of mahatma gandhi rojgar hami yojna):-
महात्मा गांधी रोजगार हमी योजनेची उद्दिष्टे खालील प्रमाणे आहेत-
- आपण आपण बघतो की भारत देशामध्ये बेरोजगारांची प्रमाण खूप जास्त आहे यासाठी ग्रामीण भागातील युवा पिढीला रोजगार मिळावा हे महात्मा गांधी रोजगार हमी योजना यामागील प्रमुख उद्दिष्टे आहे.
- ग्रामीण भागातील लोकांना आर्थिक दृश्य्या सक्षम बनवणे.
- आपल्या ग्रामीण भागातील लोकांच्या जीवनमान सुधारले तर त्यांचे जीवनमान चांगले होईल.
- या योजनेद्वारे रोजगाराच्या नवनवीन संधी उपलब्ध होतील.
- या योजनेमार्फत केंद्र सरकार द्वारे 100 दिवस रोजगार उपलब्ध करून दिला जातो व राज्य सरकार मार्फत 100 दिवस रोजगार उपलब्ध करून दिला जातो त्यामुळे ग्रामीण भागातील लोकांना आर्थिक दृष्ट्या काम मिळत राहते व पैसा मिळत राहतो.
- ग्रामीण भागातील लोकांना रोजगाराबरोबरच इतर अनेक सुविधांचा देखील या योजनेअंतर्गत लाभ घेता येणार आहे.
- प्रामुख्याने प्रगतशील देशाला प्रगतीपथावर नेण्यासाठी ही महात्मा गांधी रोजगार हमी योजना राबवली जातात आहे.
- आपल्या ग्रामीण भागातील शेतकरी शेतीवर अवलंबून आहेत परंतु पाण्याच्या अभावी खूप शेतकऱ्यांना शेती करता येत नाही. याप्रसंगी लोकांना रोजगार उपलब्ध करून दिला जात आहे जेणेकरून त्यांचा आर्थिक दृष्ट्या ते सक्षम होतील.
महात्मा गांधी रोजगार हमी योजना ठळक मुद्दे (Important Points of mahatma gandhi rojgar hami yojna ):-
योजनेचे नाव | महात्मा गांधी रोजगार हमी योजना ( mahatma gandhi rojgar hami yojna) |
योजना कोणी सुरु केली | भारत सरकार |
योजना कधी सुरु झाली | २ ऑक्टोबर२००९ |
योजना कोणत्या विभागामार्फत राबवली जाते | भारतीय ग्रामीण विकास मंत्रालय |
योजनेचा लाभ कुणाला होणार आहे | आपल्या देशातील ग्रामीण भागातील नागरिक |
योजनेचा मजुरीचा प्रती दिवस दर | २७३/- मात्र |
योजनेचे उद्दिष्ट काय आहे | रोजगार उपलब्ध करून दिला जाणार |
योजनेसाठी अर्ज करण्याची पद्धत | ऑफलाईन |
योजनेची अधिकृत वेबसाईट | महात्मा गांधी रोजगार हमी योजना |
महात्मा गांधी रोजगार हमी योजना कागदपत्रे(Documents for mahatma gandhi rojgar hami yojna):-
योजनेसाठी अर्जदाराला खालील कागदपत्रे असणे आवश्यक आहे
- आधार कार्ड
- जन्म प्रमाणपत्र
- शिधापत्रिका
- पासपोर्ट साईज फोटोज
- रहिवासी दाखला
- बारावी उत्तीर्णचेे मार्कशीट
- मोबाईल नंबर
- ई-मेल आयडी
- कोणते राष्ट्रकृत बँकेचे पासबुक
- ज्या कामासाठी अर्ज करू इच्छिता त्याचे नोंदणी प्रमाणपत्र
हे देखील वाचा :-
दोघांमिळून मिळेल रुपये १०,००० पेन्शन, मिटेल वृद्धापकाळाच टेन्शन त्यासाठी आत्ताच अर्ज करा अटल पेन्शन योजना APY SCHEME
आता प्रत्येक घरातील महिला होणार सक्षम, तिला मिळेल व्यवसाय करण्याची संधी त्यासाठी करा अर्ज महिला उद्योगिनी योजना २०२४. | Mahila Udyogini Yojna 2024.
महात्मा गांधी रोजगार हमी योजना पात्रता (Eligibility of mahatma gandhi rojgar hami yojna):-
- लाभार्थी भारत देशाचा रहिवासी असणे आवश्यक आहे.
- अर्ज करणाऱ्या व्यक्ती हा ग्रामीण भागातील असावी.
- वयाची 18 वर्षे पूर्ण झालेल्या व्यक्ती या योजनेसाठी पात्र आहे.
- या योजनेअंतर्गत कुठलेही काम करण्यासाठी तिची तयारी असावी.
महात्मा गांधी रोजगार हमी योजना अटी व शर्ती :-
- महात्मा रोजगार हमी योजनेसाठी अर्ज करायचा असल्यास आपल्याकडे जॉब कार्ड असणे आवश्यक आहे.
- या योजनेत सहभागी होण्यासाठी तुम्हाला 24 दिवस काम करणे गरजेचे आहे जर 24 दिवसाच्या आत तुम्ही काम सोडले तर तुम्हाला केलेल्या कामाचा मोबदला दिला जाणार नाही ही एक मोठी अट या रोजगार हमी योजनेच्या अंतर्गत सरकारने ठेवली आहे.
- या योजनेचा लाभ घेणाऱ्या लाभार्थी या शरीराने मजबूत असला पाहिजे कारण को शारीरिक दृष्ट्या कोणत्याही काम करण्यासाठी सक्षम पाहिजे.
- या योजनेचा सहभाग घेण्यासाठी लाभार्थीला नोंदणी करणे अत्यंत गरजेचे आहे नोंदणी शिवाय कुठलेही काम लाभार्थीला मिळणार नाही.
- लाभार्थी आपल्या देशाचा नागरिक असणे आवश्यक आहे.
महात्मा गांधी रोजगार हमी योजनेचे नोकरी कार्ड कसे काढावे?
महात्मा गांधी रोजगार हमी योजनेची कार्ड काढण्याची पद्धत अतिशय सोपी आहे आपण तीन प्रकारे महात्मा गांधी रोजगार हमीचे कार्ड काढू शकतो-
- आपल्याला जर नवीन कार्ड काढायचे असेल तर आपण आपल्या राज्याच्या पोर्टल वर जाऊन तेथे रजिस्ट्रेशन करून नवीन कार्ड काढू शकतो त्यासाठी अतिशय सोपी पद्धत आहे अधिकृत वेबसाईटवर जाऊन आपल्याला आपले राज्य निवडायचे आहे व तिथून आपल्याला ऑनलाइन अर्ज करून आपले जॉब कार्ड काढता येईल.
- आपण राहता त्याच्या आसपास महात्मा गांधी रोजगार हमीचे कार्यालय असेल त्या कार्यालयात जाऊन देखील आपण नोंदणी करू शकतो व आपले जॉब कार्ड काढू शकतो.
- किंवा जिल्ह्याच्या ठिकाणी जाऊन आपण आपल्या महात्मा गांधी रोजगार हमी कार्ड साठी अर्ज देऊ शकतो.
निष्कर्ष :-
महात्मा गांधी रोजगार हमी योजनेद्वारे आपल्याला ग्रामीण भागातील युवा वर्गाला १०० दिवस केंद्र सरकार व १०० दिवस राज्य सरकार अशा प्रकारे रोजगार उपलब्ध करून देत आहे. जेणेकरून आपल्या ग्रामीण भागातील लोकांचे जीवनमान उंचावल व आर्थिक दृष्ट्या ते सक्षम होतील. आपल्या देशाला प्रगतीपथावर नेण्यासाठी महात्मा गांधी रोजगार हमी योजना क्रांतिकारी योजना ठरणार आहे .या योजनेअंतर्गत रोजगार उपलब्ध होणार आहे. तर आपण या लेखा द्वारे बघितले की महात्मा गांधी रोजगार हमी योजनेची पात्रता काय आहे ,उद्दिष्टे काय आहेत ,अटी काय आहेत, त्यासाठी आवश्यक कागदपत्रे कोणती आहेत ,आपण याची जॉब कार्ड कसे काढू शकतो याची स्टेट आपल्या जॉब कार्ड चे स्टेटस काय आहे हे सर्व गोष्टींची माहिती आपण या लेखाद्वारे घेतली.
आशा आहे आपल्याला हा लेख आवडला असेल आली जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा जेणेकरून महात्मा गांधी रोजगार हमीद्वारे रोजगार मिळवण्याची क्षमता आपल्या ग्रामीण भागातील प्रत्येक नागरिकांमध्ये निर्माण होईल धन्यवाद..!
FAQ’S :-
1.महात्मा गांधी रोजगार हमी योजना कुणासाठी आहे?
उत्तर-आपल्या देशातील ग्रामीण भागातील होतकरू तरुणांसाठी महात्मा गांधी रोजगार हमी योजना सरकारने सुरु केली आहे.
२.महात्मा गांधी रोजगार हमी योजनेसाठीचे जॉब कार्ड आपण कसे काढू शकतो?
उत्तर-महात्मा गांधी रोजगार हमी जॉब कार्ड काढायचे असेल तर ऑन लाईन पद्धतीने किंवा महात्मा गांधी रोजगार हमी च्या कार्यालयात जाऊन काढू शकतो.
हे देखील वाचा :-
योजना प्रत्येक ज्येष्ठ नागरिकाला आपल्या उतरत्या वयात जीवन सुकर व्हाव म्हणून महाराष्ट्र सरकारने आणली आहे मुख्यमंत्री वयोश्री योजना.{Mukhyamantri Vayoshri Yojna}
शेतकऱ्यानच्या फायद्या साठी वाचा किसान सन्मान निधी योजना |Kisan Sanman Nidhi Yojna
आपल्या लाडक्या लेकीच्या उज्वल भविष्यासाठी जाणून घ्या सुकन्या समृद्धी योजना। Sukanya Samrudhi Yojna। Bharat Sarkar।Women Empowerment.
जर तुम्ही बेरोजगार असाल तर तुम्ही बेरोजगार भत्ता योजनेचा लाभ घेऊ शकता. अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी बेरोजगार भत्ता अर्ज कसा करावा हे वाचा.
महिलांना व्यवसाय स्थापन करण्यासाठी प्रोत्साहन पर योजना म्हणजेच महिला समृद्धी कर्ज योजना, अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी या योजनेवर क्लिक करा.
आपल्याला आपल्या हक्काचे घर मिळणार रमाई आवास घरकुल योजना अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी या योजनेवर क्लिक करा.
मुलीच्या उज्ज्वल भविष्यासाठी शासन घेऊन आले आहे लेक लाडकी योजना. { LEK LADKI YOJNA }