महाराष्ट्र कुक्कुटपालन कर्ज योजना |Maharashtra Kukkutpalan Karj Yojana in 2024.

Table of Contents

Maharashtra Kukkutpalan Karj Yojana in 2024

महाराष्ट्र कुक्कुटपालन कर्ज योजना

योजनेचे नावमहाराष्ट्र कुक्कुटपालन कर्ज योजना
कोणी सुरू केलीमहाराष्ट्र शासनाच्या कृषी, दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय विभाग मंत्रालयातर्फे
कोणत्या विभागाने सुरुवात केलीकृषी विभाग, महाराष्ट्र राज्य सरकार
लाभार्थी कोण आहेराज्यातील नागरिक
ही योजना चालू करण्यामागे सरकारचा उद्देशस्वयं रोजगार निर्मिती करणे.
या योजनेचा लाभ५० हजार ते १० लाख पर्यंत कर्ज व ते हि कमी व्याज दरात
राज्यमहाराष्ट्र राज्य
वर्ष२०२४
अर्ज प्रक्रियाऑफलाइन {OFFLINE}
अधिकृत संकेतस्थळhttps://ahd.maharashtra.gov.in/mr/poultry-development

शासनाच्या विविध योजना : महाराष्ट्र कुक्कुटपालन कर्ज योजना २०२४.

प्रशिक्षणाची आवश्यकता :-

कुक्कुटपालन हा व्यवसाय अति जखमेचा आहे त्यामुळे या व्यवसायाची सुरुवात करताना प्रशिक्षण असणं अत्यंत गरजेचं आणि आवश्यक ठरतं. कोंबड्यांची निगा कशी ठेवावी व त्यांना होणारे रोग यापासून त्यांना कसे दूर ठेवावे त्यांना खायला काय द्यावं व काय देऊ नये ही सर्व माहिती आपल्याला असणे आवश्यक आहे त्यामुळे येथे प्रशिक्षणाची गरज आहे.


महाराष्ट्र कुक्कुटपालन कर्ज योजने अंतर्गत सबसिडी देणाऱ्या बँका :-

जर तुम्ही महाराष्ट्र कुक्कुटपालन कर्ज योजनेअंतर्गत कुक्कुटपालन व्यवसायासाठी लोन घेऊ इच्छित असाल तर आपण या बँकांमधून कर्ज घेऊ शकता त्याखाली क्रमाने देत आहोत.

अर्ज कुठे कराल :-

१. सहकारी बँका
२. क्षेत्रीय ग्रामीण बँका
३. वाणिज्य बँका
४. राज्य सहकारी कृषी आणि विकास बँका
५. व्यावसायिक बँका

सिबिल स्कोर चांगला असण का गरजेच आहे ?

हो, कारण या योजनेच्या अंतर्गत कर्ज प्राप्त करायचे असल्यास तुमचा सिबिल स्कोर चांगला असणं गरजेचं आहे तो चांगला असेल तरच बँका तुम्हाला कर्ज देतील.

अर्ज कसा करावा :-

  • या योजनेचा लाभ घेण्यासाठी सर्वात प्रथम तुम्हाला जवळच्या बँकेच्या शाखेत जाऊन अर्ज करावा लागणार आहे.
  • अर्ज भरताना आपली सगळी कागदपत्रं व्यवस्थित असावीत ही काळजी घ्या. तसेच किती कर्ज पाहिजे आहे हे, अर्ज करताना त्यात नमूद करावे.
  • तुमचा प्रकल्प अहवाल हा खुप महत्त्वाचा आहे.ज्यात तुम्हाला किती कोंबड्या पाळायच्या आहेत व त्यांच्या पालनासाठी, खाद्या साठी किती खर्च येणार आहे, हे सर्व व्यवस्थित नमूद करून घ्या यात दिलेली सर्व माहिती ही खरी असावी.
  • पडताळणी दरम्यान दिलेली कोणतीही माहिती खोटी किंवा संशयास्पद आढळली तर केलेला अर्ज रद्द होऊ शकतो याची नोंद घ्यावी.

महाराष्ट्र कुक्कुटपालन कर्ज योजना २०२४.

देशामधील बेरोजगारी कमी करणे आणि देशातील नागरिकांच्या कल्याणा हेतू केंद्र सरकार तसेच राज्य सरकार यांच्याद्वारे विविध योजना आणल्या जातात जेणेकरून देशातील नागरिकांना याचा फायदा होईल . त्याच उद्देशाने महाराष्ट्र सरकारने आपल्या राज्यातील लोकांसाठी स्वयंरोजगार तसेच करत असलेल्या व्यवसायात वाढ करण्यासाठी एक नवीन योजना लोकांसाठी घेऊन येत आहे ज्याचे नाव महाराष्ट्र कुक्कुटपालन कर्ज योजना आहे या योजनेमार्फत राज्य सरकारकडून कर्ज आणि सबसिडी च्या माध्यमाने आर्थिक सहाय्य देण्यात येईल.

त्यायोगे राज्यामध्ये कुक्कुटपालनाला प्रोत्साहन देता येईल जर तुम्हीही कुक्कुटपालन हा व्यवसाय म्हणून करू इच्छिता किंवा तुम्ही करत असलेल्या कुक्कुटपालन व्यवसायाची वाढ करू इच्छिता तर तुम्ही या योजनेच्या अंतर्गत अर्ज करू शकता आणि या योजनेचा फायदा घेऊ शकता , आम्ही तुम्हाला आज या माध्यमातून महाराष्ट्र कुक्कुटपालन कर्ज योजना संबंधी सर्व माहिती उपलब्ध करून देत आहोत.

ही योजना मुख्यतः उद्योजकता विकासाला बळ देणारी आहे आणि महाराष्ट्रामध्ये कुक्कुटपालनाच्या जात सुधारनेवर केंद्रित आहे. देशामधील बेरोजगारी कमी करणे आणि देशातील नागरिकांच्या कल्याणा हेतू केंद्र सरकार तसेच राज्य सरकार यांच्याद्वारे विविध योजना आणल्या जातात जेणेकरून देशातील नागरिकांना याचा फायदा होईल .

त्याच उद्देशाने महाराष्ट्र सरकारने आपल्या राज्यातील लोकांसाठी स्वयंरोजगार तसेच करत असलेल्या व्यवसायात वाढ करण्यासाठी एक नवीन योजना लोकांसाठी घेऊन येत आहे ज्याचे नाव महाराष्ट्र कुक्कुटपालन कर्ज योजना आहे या योजनेमार्फत राज्य सरकारकडून कर्ज आणि सबसिडी च्या माध्यमाने आर्थिक सहाय्य देण्यात येईल. त्यायोगे राज्यामध्ये कुक्कुटपालनाला प्रोत्साहन देता येईल जर तुम्हीही कुक्कुटपालन हा व्यवसाय म्हणून करू इच्छिता किंवा तुम्ही करत असलेल्या कुक्कुटपालन व्यवसायाची वाढ करू इच्छिता तर तुम्ही या योजनेच्या अंतर्गत अर्ज करू शकता आणि या योजनेचा फायदा घेऊ शकता , आम्ही तुम्हाला आज या माध्यमातून महाराष्ट्र कुक्कुटपालन कर्ज योजना संबंधी सर्व माहिती उपलब्ध करून देत आहोत. ही योजना मुख्यतः उद्योजकता विकासाला बळ देणारी आहे आणि महाराष्ट्रामध्ये कुक्कुटपालनाच्या जात सुधारनेवर केंद्रित आहे.

महाराष्ट्र सरकार कडून महाराष्ट्र कुक्कुटपालन कर्ज योजना सुरू केलेली आहे. या योजनेच्या माध्यमातून कुक्कुट पालन या व्यवसायाला आर्थिक सहाय्यता देऊन व्यवसाय वाढीसाठी प्रोत्साहन सरकार देत आहे महाराष्ट्र कुक्कुट पालन कर्ज योजने अंतर्गत लोकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे आणि स्वतःचा व्यवसाय उभा करून देणे जेणेकरून ते स्वतःच्या पायावर भक्कमपणे उभे राहतील व आपल्या देशाला सुजलाम सुफलाम बनवण्यास मदत होईल. या योजनेच्या माध्यमातून सरकार बँकांद्वारा रुपये 50 हजार ते दहा लाख रुपयांपर्यंतचे कर्ज या योजनेअंतर्गत उपलब्ध करून देऊ शकते. आणि ते कर्ज फेडण्याची मुदत पाच वर्ष ते दहा वर्ष अशी असेल. जे कोणी या योजनेचा लाभ घेण्यासाठी इच्छुक आहेत त्यांनी आपल्या जवळच्या बँकेच्या शाखेत जाऊन तुम्हाला अर्ज करावा लागेल.

आता कोणीही सहजपणे महाराष्ट्र राज्याचा नागरिक महाराष्ट्र कुक्कुट पालन कर्ज योजनेच्या अंतर्गत अर्ज करून हा व्यवसाय करू शकतो व आपले उद्योजकतेचे स्वप्न साकार करू शकतो आणि आपल्या कुटुंबाला आणि स्वतःला आर्थिक सक्षम आणि सशक्त बनवू शकतो.

शासनाच्या विविध योजना : महाराष्ट्र कुक्कुटपालन कर्ज योजना २०२४.


कुक्कुटपालन योजनेसाठी लागणारी आवश्यक अशी कागदपत्रे :

  • आधार कार्ड.
  • मतदान कार्ड.
  • रहिवासी दाखला.
  • ७/१२ व ८ अ उतारा / ग्रामपंचायत नमूना ४.
  • पासपोर्ट आकाराचा फोटो.
  • बँक पासबुकची छायांकित प्रत.
  • मोबाईल नंबर.
  • जात प्रमाणपत्र.
  • रेशन कार्ड (एका कुटुंबातील एकच व्यक्ती लाभ घेऊ शकतो.)
  • प्रशिक्षनार्थी असल्यास प्रमाणपत्राची छायांकित प्रत.
  • दिव्यांग असल्यास प्रमाणपत्र.

शासनाच्या विविध योजना : महाराष्ट्र कुक्कुटपालन कर्ज योजना २०२४.

राष्ट्रीय पशुधन योजना : महाराष्ट्र कुक्कुटपालन कर्ज योजना २०२४.

राष्ट्रीय पशुधन अभियान हे केंद्र सरकार द्वारे चालवलं जाणार महत्त्वकांक्षी असे अभियान आहे, जे कुक्कुटपालनासह विविध पशुधन विकासाला चालना देण्याचे काम करते, शेतकरी या योजनेद्वारे कुक्कुटपालनासाठी कर्ज तसेच त्यासंबंधी लागणारे इतर साहित्य यासाठी अनुदान मिळवू शकतो.

महाराष्ट्र कुक्कुटपालन विकास योजना : महाराष्ट्र कुक्कुटपालन कर्ज योजना २०२४.

महाराष्ट्र कुक्कुटपालन विकास योजने अंतर्गत लाभार्थी असणारे व्यक्ती, स्वयं-सहाय्यता गट, तसेच सहकारी संस्था इत्यादींना आर्थिक सहाय्य प्रदान करते. त्याच्या मार्फत पिल्ले, तलंग, खाद्य, उपकरणे तसेच इतर वस्तूंच्या खरेदीसाठी अर्थ सहाय्य व त्यांच्या खरेदीवर सबसिडी देते.


महाराष्ट्र कुक्कुटपालन कर्ज योजनेचा उद्देश :- {Purpose of Maharashtra Government to Start Maharashtra Kukkut Palan Karj Yojana in 2024.}

महाराष्ट्र सरकार द्वारा कुक्कुटपालन कर्ज योजना सुरू करण्याचे मुख्य कारण म्हणजे शेतकऱ्यांची उत्पन्न दुप्पट करण्याच्या हेतूने आणि बेरोजगार तरुणांना रोजगार निर्मिती आणि नवीन संधी उपलब्ध करून देण्यासाठी महाराष्ट्र सरकारन महाराष्ट्र कुक्कुटपालन कर्ज योजना घेऊन आली आहे त्यायोगे महाराष्ट्रामध्ये कुक्कुटपालन व्यवसायाला चालना देता येईल तसेच यासंबंधी रोग नियंत्रण प्रशिक्षण तसेच यासाठी लागणारी नवीन टेक्नॉलॉजी ची उपकरणे कशी वापरावीत याचं शिक्षण देता येईल.

Maharashtra Kukkutpalan Karj Yojana in 2024 :- या योजनेच्या माध्यमातून राज्यातील गरीब शेतकरी, श्रमिक वर्ग, बेरोजगार तरुण तसेच महिलांना कोंबडी पालन या व्यवसायासाठी लागणारे शेड तसेच लागणारी आर्थिक सहाय्यता दिली जाईल, असे नागरिक जे बेरोजगारी आणि आर्थिक कमकुवतपणामुळे आपला स्वतःचा व्यवसाय उभा करू शकत नाहीत त्यांनाही सुवर्णसंधी आहे ते या योजनेअंतर्गत फार सहजतेने स्वतःचा कुक्कुटपालनाचा व्यवसाय उभारू शकतात जेणेकरून त्यांना कमीत कमी व्याज दराने लोन प्राप्त होऊ शकते. या संधीचे सोने करून ते आपली आर्थिक परिस्थिती सुधारू शकतात व आपल्या कौटुंबिक जीवनाला एक वेगळी दिशा देऊ शकतात.

महाराष्ट्र कुक्कुटपालन कर्ज योजनेचे अनुदान :-

महाराष्ट्र शासन कुक्कुटपालन योजने अंतर्गत 50 टक्के अनुदान दिले जाते व अनुसूचित जाती व जमातींसाठी 75 टक्के अनुदान दिले जाते.

महाराष्ट्र कुक्कुटपालन योजनेसाठी असणारी पात्रता :-

  • महाराष्ट्र कुक्कुटपालन कर्ज योजनेसाठी अर्ज करण्यासाठी अर्जदार महाराष्ट्राचा रहिवासी असावा.
  • अर्जदार हा अल्पभूधारक शेतकरी, बेरोजगार शिक्षित तरुण पाहिजे.
  • अर्जदार व्यक्ती आधीपासून शेळीपालन मत्स्यपालन यासारखे व्यवसाय करत असेल असा व्यक्ती सुद्धा या योजनेसाठी पात्र ठरू शकतो.
  • संघटित व असंघटित क्षेत्रांमध्ये काम करणारा मजूर वर्ग सुद्धा या योजनेसाठी अर्ज करू शकतो.
  • अर्जदाराला कोंबडी पालनाचा अनुभव असावा.
  • जी व्यक्ती अर्ज करू इच्छित आहे त्याचे वय 18 वर्षे ते 60 वर्ष यादरम्यान असावे.
  • कुक्कुटपालनाचा व्यवसाय करू इच्छिणाऱ्या व्यक्तीजवळ स्वतःची कमीत कमी एक एकर जमीन असावी, किंवा ती भाडेतत्त्वावर घेतलेली असावी.
  • अर्जदार हा बँकेत डिफॉल्टर नसावा.

वाचा-

मुलीच्या उज्ज्वल भविष्यासाठी शासन घेऊन आले आहे लेक लाडकी योजना. { LEK LADKI YOJNA }


योजना प्रत्येक ज्येष्ठ नागरिकाला आपल्या उतरत्या वयात जीवन सुकर व्हाव म्हणून महाराष्ट्र सरकारने आणली आहे मुख्यमंत्री वयोश्री योजना.{Mukhyamantri Vayoshri Yojna}


शेतकऱ्यानच्या फायद्या साठी वाचा किसान सन्मान निधी योजना |Kisan Sanman Nidhi Yojna


आपल्या लाडक्या लेकीच्या उज्वल भविष्यासाठी जाणून घ्या सुकन्या समृद्धी योजना। Sukanya Samrudhi Yojna। Bharat Sarkar।Women Empowerment.


जर तुम्ही बेरोजगार असाल तर तुम्ही बेरोजगार भत्ता योजनेचा लाभ घेऊ शकता. अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी बेरोजगार भत्ता अर्ज कसा करावा हे वाचा.


FAQ’S :

१. महाराष्ट्र कुक्कुटपालन योजना काय आहे?
महाराष्ट्र सरकार द्वारे या योजनेच्या माध्यमातून कुक्कुटपालन हा व्यवसाय सुरू करण्यासाठी आणि त्याच्या विस्तारासाठी राज्यातील नागरिकांना कर्ज आणि सबसिडी या रूपामध्ये वित्त सहायता दिली जाते.

२. महाराष्ट्र कुक्कुटपालन कर्ज योजनेच्या माध्यमातून किती कर्ज मिळू शकते?

महाराष्ट्र कुक्कुटपालन कर्ज योजनेच्या माध्यमातून पन्नास हजार ते दहा लाख रुपयांपर्यंत तेही खूप कमी व्याजदरामध्ये कर्ज मिळू शकेल.

३. महाराष्ट्र कुक्कुटपालन कर्ज योजने च्या अंतर्गत तुम्ही कशाप्रकारे अर्ज करू शकता?

महाराष्ट्र कुक्कुटपालन कर्ज योजनेच्या अंतर्गत तुम्हाला ऑफलाइन प्रक्रियेद्वारे अर्ज करावा लागेल.

४. महाराष्ट्र कुक्कुटपालन कर्ज योजनेमध्ये अर्ज करण्यासाठी काही वयोमर्यादा आहे का?

या योजनेच्या अंतर्गत अर्ज करताना अर्जदाराचे वय कमीत कमी 18 वर्ष ते जास्तीत जास्त 60 वर्षे या दरम्यान असावे.