Maharashtra Kishori Shakti yojna 2024|महाराष्ट्र किशोरी शक्ती योजना २०२४

Maharashtra Kishori Shakti yojna 2024 (महाराष्ट्र किशोरी शक्ती योजना २०२४)

आपल्या देशामध्ये आजही अनेक मुलींना अर्धवट शिक्षण सोडावे लागते याला अनेक कारणे आहे जशी सामाजिक मानसिक किंवा अनेक ठिकाणी शिक्षणाच्या सोयी उपलब्ध नाही.आपल्या देशात आजही अनेक ठिकाणी बालविवाह केले जातात या सर्व गोष्टींना आळा घालण्यासाठी व मुलींच्या आरोग्याची काळजी घेता यावी यासाठी आपल्या भारत सरकारने किशोरी शक्ती योजनेची सुरुवात केली.

या योजनेअंतर्गत किशोरवयीन मुलींना विविध प्रकारे मदत सरकार करत आहे. किशोरी शक्ती योजनेची सुरुवात महिला व बालविकास विभाग यांच्यामार्फत केली गेली. या योजनेचा लाभ दारिद्र्य रेषेखालीलील मुलींना घेता येणार आहे. आपल्या केंद्र सरकारने या योजनेची सुरुवात ५ मे २००५ रोजी केली. त्यानंतर आपल्या महाराष्ट्र राज्याने या योजनेची सुरुवात केली.

मुलींचे उज्वल भविष्य घडविण्याकडे या योजनेअंतर्गत लक्ष दिले जाणार आहे.किशोरवयीन मुलींना कुठल्याही प्रकारचे कॅल्शियम किंवा इतर कमी कमतरता भासू नये यासाठी विविध प्रकार औषधे अंगणवाडी सेविकेकडून मुलींना पुरविली जाणार आहे. या योजनेअंतर्गत विविध प्रकारच्या डाळी, सुकळी, कडधान्य ,तांदूळ यांसारखी पौष्टिक अन्नपदार्थ मुलींच्या कुटुंबाला दिले जाणार आहे. जेणेकरून मुलगी आर्थिक दृष्ट्या तसेच शारीरिक दृष्ट्या सक्षम होईल.

या योजनेअंतर्गत मुलींना एक लाखापर्यंतची मदत देखील केली जाणार आहे. याचा वापर करून मुली आपल्या सुप्त गुणांना वाव देऊ शकतात जसे की मेहंदी काढणे, घर काम करणे, रांगोळी काढणे, विविध कलाकुसरीच्या वस्तू बनवणे या योजनेअंतर्गत मुलींना घरकाम शिकवण्यावर देखील भर दिला गेला आहे .या योजनेमुळे मुली स्वतःच्या आर्थिक दृष्ट सक्षम होऊ शकतात. याद्वारे मुलींना शिक्षण देणे व व्यवसायासाठी प्रवृत्त करणे हा देखील सरकारचा उद्देश आहे.

या योजनेचा लाभ आदिवासी मुली व दारिद्र्यरेषेत खालील कुटुंबातील अकरा ते अठरा वयोगटातील मुलींना मोठ्या प्रमाणात होणार आहे.आपले केंद्र सरकार एका प्रकल्पासाठी प्रति वर्षी एक लाख दहा हजार रुपये देते. अशाप्रकारे एकूण 330 प्रकल्प आपल्या राज्यात सुरू आहेत.

Maharashtra Kishori Shakti yojna 2024 | महाराष्ट्र किशोरी शक्ती योजना २०२४, या योजनेबद्दल आम्ही तुम्हाला परिपूर्ण माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहे, यामध्ये या योजनेविषयी थोडक्यात माहिती, त्याचे ठळक मुद्दे, योजनेची पात्रता, योजनेचे फायदे, योजनेच्या अटी व शर्ती, योजनेसाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे, आणि ऑनलाईन अर्ज कसा करावा , असा हा परिपूर्ण लेख आम्ही तुमच्यासाठी सादर करत आहोत तो तुम्ही शेवटपर्यंत वाचवा हि मनापासून इच्छा व्यक्त करत आहोत. तर चला मग बघुयात योजनेविषयी परिपूर्ण अशी माहिती.

Maharashtra Kishori Shakti yojna 2024
Maharashtra Kishori Shakti yojna 2024

महाराष्ट्र किशोरी शक्ती योजना २०२४ या योजनेची ठळक मुद्दे :- {Important points of Maharashtra Kishori Shakti yojna 2024 }

महाराष्ट्र किशोरी शक्ती योजना २०२४ ची ठळक मुद्दे :- { Maharashtra Kishori Shakti yojna 2024 } याची ठळक मुद्दे आम्ही तुम्हाला येथे देत आहोत या मुद्द्यांमुळे तुम्हाला या योजनेत काय महत्त्वाचं आहे ते समजणार आहे व तुम्हाला योग्य दिशा या योजनेचा लाभ घेण्यासाठी मिळेल अशी आशा करतो.

योजनेचे नावMaharashtra Kishori Shakti yojna 2024 (महाराष्ट्र किशोरी शक्ती योजना २०२४)
योजना कोणा व्दारा सुरु झाली {Started By Whom}
केंद्र सरकार
लाभार्थी {Beneficiary}आपल्या राज्यातील ११ ते १८ वयोगटातील मुली
योजने मार्फत काय लाभ होणार आहेमुली निरोगी राहतील व आर्थिकदृशीने सक्षम होतील
अधिकृत वेबसाईट {Authorized Website}Maharashtra Kishori Shakti yojna 2024 (महाराष्ट्र किशोरी शक्ती योजना २०२४)
अर्ज करण्याची पद्धत {Process of Application} ऑफलाईन

महाराष्ट्र किशोरी शक्ती योजना २०२४ या योजनेची उद्दिष्टे (Purpose of Maharashtra Kishori Shakti yojna 2024 ):-

  • योजने अंतर्गत किशोरवयीन मुलींना जंत नाशकाच्या गोळ्या आणि कॅलशीयम च्या गोळ्या दिल्या जाणार आहेत यामुळे त्यांची शारीरिक प्रकृती उत्तम राहील.
  • व्यावसायिक गोष्टींचे ज्ञान देऊन त्यांच्या अनेक लघुउद्योग सुरू करण्यावर सरकार भर देत आहे.
  • मुलींचे आरोग्य सुदृढ राहण्यासाठी हे किशोरवयीन मुलींना अनेक पौष्टिक अन्नपदार्थ देत आहे जेणेकरून कुपोषण कमी होईल.
  • व्यवसाय प्रशिक्षण दिल्यामुळे मुलींचे बालविवाह रोखण्यात देखील सरकारला या योजनेअंतर्गत यश मिळणार आहे.
  • या योजनेअंतर्गत मुलींना आरोग्यविषयक देखील अनेक प्रकारचे शिक्षण दिले जाणार आहे जशी की वैयक्तिक स्वच्छता कशी राखावी, मासिक पाळी म्हणजे काय,गर्भावस्था, बालविवाहाची वाईट परिणाम काय होतात यामुळे यामुळे मुलींची सक्षमीकरण होणार आहे.
Maharashtra Kishori Shakti yojna 2024
Maharashtra Kishori Shakti yojna 2024

महाराष्ट्र किशोरी शक्ती योजना २०२४ या योजनेच्या नोंदणीसाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे ( Documents for Maharashtra Kishori Shakti yojna 2024 ) :-

योजनेसाठी खालील कागदपत्रे आवश्यक आहेत-

  • आधार कार्ड (Aadhar Card)
  • शिधापत्र (Ration Card)
  • रहिवासी दाखला (Residence Proof)
  • जन्माचा दाखला (birth certificate)
  • मुलगी शिक्षण घेत असलेल्या शेवटच्या वर्षाची प्रमाण (last year marksheet)
  • शाळा सोडल्याचा दाखला (school leaving certificate)
  • मोबाईल नंबर (Mobile Number)
  • ई-मेल आयडी (Email ID)
  • पासपोर्ट साईजचेे दोन फोटो (passport size photos)
  • जातीचा दाखला (Caste Certificate)[Documents for Maharashtra Kishori Shakti yojna 2024 ]
Maharashtra Kishori Shakti yojna 2024
Maharashtra Kishori Shakti yojna 2024

महाराष्ट्र किशोरी शक्ती योजना २०२४ या योजनेची पात्रता(Maharashtra Kishori Shakti yojna 2024 Eligibility) :-

  1. या योजनेचा लाभ घेणारी मुलगी ही महाराष्ट्राची रहिवासी असावी.
  2. वय वर्ष 11 ते वय वर्ष अठरा या वयोगटातील मुलींना या योजनेचा लाभ घेता येणार आहे.
  3. ही योजना दारिद्र्यरेषेखालील कुटुंबातील मुलींसाठी आहे त्यामुळे अर्जदार मुलीकडे बीपीएल कार्ड असणे आवश्यक आहे.
  4. या योजनेचा लाभच्या मुलींनी शिक्षण अर्धवर सोडलेले आहे अशा मुलींना मिळणार आहे त्यामुळे अर्जदार मुलीकडे शाळा सोडल्याचा दाखला असणे आवश्यक आहे.

महाराष्ट्र किशोरी शक्ती योजना २०२४ या योजनेची अर्ज प्रक्रिया (How to apply for Maharashtra Kishori Shakti yojna 2024) :-

  • महिला व बालविकास विभागाकडून एक यादी पाठवली जाईल ज्यामध्ये किशोरवयीन मुलींचे नावे असतील.
  • त्यानंतर आपल्या परिसरातील अंगणवाडी सेविका प्रत्येक घराघरात जाऊन या मुलींची माहिती तपासून बघतील.
  • या योजनेची खरोखर गरज आहे अशा मुलींची यादी बनवून ती पुन्हा महिला व बालविकास विभागाकडेकडे पाठविली जाईल.
  • त्या नंतर या मुलीच्या नावे किशोरी कार्ड बनवले जाईल.
  • किशोरी कार्ड च्या आपल्या राज्यातील मुली या योजनेचा लाभ घेऊ शकतीलया राज्यातील मुली या योजनेचा लाभ घेऊ शकतील व स्वतः सक्षम बनू शकतील.[How to apply for Maharashtra Kishori Shakti yojna 2024]

 Maharashtra Kishori Shakti yojna 2024
Maharashtra Kishori Shakti yojna 2024

निष्कर्ष :-

मित्रांनो, तुम्हाला आम्ही दिलेली महाराष्ट्र किशोरी शक्ती योजना २०२४ {Maharashtra Kishori Shakti yojna 2024} या योजनेबद्दलची माहिती कशी वाटली याबद्दल तुम्ही आम्हाला लेखाच्या खाली कमेंट करून कळवू शकता तसेच आमच्यासाठी काही सूचना असतील त्याही तुम्ही आम्हाला सुचवू शकता अशाच सरकारी योजना संबंधी अपडेटेड माहिती मिळवण्यासाठी आमच्या योजना गॅरंटी डॉट कॉम (yojnaguarantee.com) या संकेतस्थळाला भेट देत राहा.

आशा आहे की आपल्याला हा लेख आवडला असेल मी वाचक अस विनंती करते की हा लेख जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा जेणेकरून या योजनेचा लाभ आपल्या राज्यातील किशोरी वयोगटातील मुलींना घेता येईल धन्यवाद|

FAQ’S (वारंवार विचारले जाणारे प्रश्न)-

१.योजनेअंतर्गत कुणाला लाभ होणार आहे?

उत्तर-किशोरी शक्ती योजनेअंतर्गत आपल्या राज्यातील वय वर्ष 11 ते वही वर्ष 18 या वयोगटातील किशोरवयीन मुलींना व ज्या मुली आदिवासी भागातून आहेत व ज्या दारिद्र्यरेषे खालील कुटुंबातील मुलीना या योजने चा लाभ होणार आहे.

२.योजनेद्वारे मुलींना काय लाभ होणार आहे?

उत्तर-या योजनेद्वारे मुलींची दर सहा महिन्याला तपासणी केली जाणार आहे व त्यांच्या शरीरातील कमतरता भरून काढण्यासाठी त्यांना कॅल्शियम गोळ्या दिल्या जाणार आहेत तसेच जंतु नाशकाच्या गोळ्या दिला जाणार आहेत.तसेच या योजनेअंतर्गत त्यांना वेगवेगळ्या व्यवसायिक प्रशिक्षण देखील दिले जाणार आहे जसे की मेंहदी काढणे, रांगोळी काढणे ज्यामुळे त्या सक्षम होतील व स्वतःच्या पायावर लवकरात लवकर उभे राहून आपल्या कुटुंबाची जबाबदारी घेऊ शकतील या द्वारे बालविवाह देखील रोखला जाणार आहे.

हे देखील वाचा :-


योजना प्रत्येक ज्येष्ठ नागरिकाला आपल्या उतरत्या वयात जीवन सुकर व्हाव म्हणून महाराष्ट्र सरकारने आणली आहे मुख्यमंत्री वयोश्री योजना. {Mukhyamantri Vayoshri Yojna}


शेतकऱ्यानच्या फायद्या साठी वाचा. किसान सन्मान निधी योजना | {Kisan Sanman Nidhi Yojna}


आपल्या लाडक्या लेकीच्या उज्वल भविष्यासाठी जाणून घ्या सुकन्या समृद्धी योजना। {Sukanya Samrudhi Yojna}


जर तुम्ही बेरोजगार असाल तर तुम्ही बेरोजगार भत्ता योजनेचा लाभ घेऊ शकता. अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी बेरोजगार भत्ता अर्ज कसा करावा हे वाचा.{Berojgar Bhatta yojna arj ksa karava}


महिलांना व्यवसाय स्थापन करण्यासाठी प्रोत्साहन पर योजना म्हणजेच महिला समृद्धी कर्ज योजना, अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी या योजनेवर क्लिक करा. {Pm pik vima yojna 2024}


आपल्याला आपल्या हक्काचे घर मिळणार रमाई आवास घरकुल योजना अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी या योजनेवर क्लिक करा. {Ramai Awas Gharkul Yojna}


मुलीच्या उज्ज्वल भविष्यासाठी शासन घेऊन आले आहे लेक लाडकी योजना. {LEK LADKI YOJNA}


गर्भवती महिलांना पोषक आहार मिळावा यासाठी सरकार देते रोख रक्कम त्याकरिता वाचा व अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी या योजनेवर क्लिक करा  जननी सुरक्षा योजना.


व्यवसाय सुरु करण्यासाठी सरकार देत आहे बिनव्याजी कर्ज वाचा व अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी या योजनेवर क्लिक करा अण्णासाहेब पाटील कर्ज योजना.