MahaDBT Scheme for Farmer कृषि विभागाच्या महा-डीबीटी या पोर्टलवर बियाणे आणि खते यांच्या वाटपाच्या अनुदानासाठीची अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे. 2007-08 पासून राज्यात केंद्र सरकारच्या मदतीने राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान चालवले जात आहे. अकराव्या पंचवार्षिक योजनेचा आढावा घेऊन 12 व्या पंचवार्षिक योजनेत भात, गहू, कडधान्ये आणि भरडधान्ये यासारख्या पिकांचा समावेश करण्यात आला आहे. 2014-15 पासून बाराव्या पंचवार्षिक योजनेच्या मार्गदर्शक सूचनांवरून या योजनांची अंमलबजावणी केली जात आहे.
बियाणे व खते वाटप योजना
बियाणे आणि खते वाटपाच्या अनुदानासाठी ऑनलाईन अर्ज करण्याची सुवर्ण संधी ! MahaDBT Farmer Scheme of Seed & Fertilizer)
केंद्र सरकारने २०१८-१९ पासून राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानात बदल करून दोन वेगवेगळी अभियाने सुरू केली आहेत. यामध्ये भरडधान्यांसाठी राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानाच्या अंतर्गत मका या पिकाचा समावेश केला आहे, तर पौष्टिक तृणधान्ये योजनेत ज्वारी, बाजरी आणि रागी यासाठी स्वतंत्र अभियान राबवले जात आहे. या दोन्ही योजनांसाठी वेगवेगळा निधी देखील निश्चित करण्यात आला आहे.
बियाणे व खते वाटप योजना
राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान – महाडीबीटी अनुदान. (MahaDBT Scheme for Farmer.)
या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना विविध प्रकारच्या सहाय्यसाठी अनुदान दिले जाईल. यात बियाणे (seed) वितरण, एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापनासाठी सूक्ष्म मूलद्रव्ये, तसेच एकात्मिक कीड व्यवस्थापनासाठी पिक संरक्षण औषधे, जैविक घटक, आणि तणनाशकांचा समावेश आहे. या सर्व घटकांमधून शेतकऱ्यांच्या उत्पादन क्षमतेत वाढ करण्याचे उद्दिष्ट आहे.
पात्रता (MahaDBT Scheme for Farmer.)
१. पीकनिहाय निवडलेले जिल्हे –
- भातासाठी (राअसुअ भात)- नाशिक, पुणे, सातारा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली असे एकूण 8 जिल्हे.
- गहूसाठी (राअसुअ गहू)- सोलापूर, बीड, नागपूर असे एकूण 3 जिल्हे.
- कडधान्यासाठी (राअसुअ कडधान्य)- सर्व जिल्हे.
- मक्यासाठी (राअसुअ भरडधान्य)- सांगली, अहमदनगर, औरंगाबाद, जालना, नाशिक, धुळे, जळगाव असे एकूण 7 जिल्हे
- पौष्टिक तृणधान्यांसाठी (राअसुअ न्युट्री सिरीयल)-
अ.) ज्वारी- 23 जिल्हे.
ब.) बाजरी- 11 जिल्हे.
क.) रागी- 7 जिल्हे.
ड.) कापूस- अमरावती व नागपूर विभागातील जिल्हे.
ई.) ऊस- औरंगाबाद व लातूर विभागातील जिल्हे.
- फक्त एकाच योजनेतून अनुदान- शेतकऱ्यांना एकाच योजनेतून लाभ मिळेल, त्यामुळे एकाच बाबीसाठी एकाच योजनेंतर्गत अर्ज करता येणार आहे.
- जात प्रमाणपत्र- अनुसूचित जाती आणि जमाती वर्गातील शेतकऱ्यांना जात प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक असणार आहे.
- पीकाची अट- गळीतधान्य तसेच तेलबिया पिकासाठी अर्ज करणाऱ्या शेतकऱ्यांच्या शेतात संबंधित ती पिके असणे अनिवार्य असणार आहे.
- 7/12 आणि 8/अ उतारा- अर्ज करणाऱ्या शेतकऱ्याच्या नावावर त्या संबंधित शेताचा 7/12 आणि 8/अ उतारा असणे आवश्यक.
अर्ज करण्याअगोदर, संबंधित अटींची पूर्तता केल्याची खात्री करून घ्यावी.
आवश्यक कागदपत्रे MahaDBT Scheme for Farmer
- ७/१२ उतारा.
- ८-अ.
- अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीच्या लाभार्थ्यांसाठी जात प्रमाणपत्र तशी गरज पडल्यास.
- हमीपत्र व पूर्वसंमती पत्र.
Maha DBT Farmer Scheme (Seed/Fertilizer) साठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया.
- आधार कार्ड मोबाईल बरोबर लिंक करणे- महाडीबीटी या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी आपला मोबाईल क्रमांक आधार कार्डशी लिंक करणे आवश्यक असेल.
- संकेतस्थळाला भेट द्या- https://mahadbt.maharashtra.gov.in/farmer/login/login या संकेतस्थळावर जाऊन आपला आधार क्रमांकाचा उपयोग करून MahaDBT या पोर्टलवर लॉगिन करावे.
- अर्ज करण्यासाठीचे पर्याय तुम्हाला खाली देत आहोत, शेतकरी त्यांच्या मोबाईल, डेस्कटॉप, लॅपटॉप, टॅबलेट किंवा CSC केंद्र आणि तसेच ग्रामपंचायतीतील आपले सरकार केंद्रातून देखील अर्ज करू शकतात.
- लॉगिन केल्यानंतर, वैयक्तिक माहिती भरावी आणि अर्ज करा या बटणावर क्लिक करावे.
- योजनाची निवड-
फॉर्मर लॉगिनमध्ये/Farmer Login मध्ये विविध योजना उपलब्ध आहेत पण बियाणे आणि खते वाटपासाठीच्या “बियाणे, औषधे आणि खते” हा पर्याय निवडा आणि “बाबी निवडा” या बटनावर क्लिक करावे. - तपशील भरणे- अर्जदाराने आवश्यक माहिती भरून जतन करा या बटणावर क्लिक करावे.
- अर्ज सादर करणे- सबमिट अप्लिकेशन या बटणावर क्लिक केल्यास खात्री करण्यासाठीचा पॉप-अप येईल. ओके वर क्लिक केल्यानंतर अर्जदार पेमेंट पेजवर जाईल.
- पेमेंट प्रक्रिया-मेक पेमेंट या बटणावर क्लिक केल्यास पेमेंट गेटवे उघडेल, जिथे अर्जदार पेमेंट करू शकतो. पेमेंटनंतर पावतीची प्रिंट आउट काढून घेता येईल.
ही प्रक्रिया शेतकऱ्यांसाठी साधी व सोपी असून, आवश्यक असणाऱ्या सर्व माहितीची पूर्तता करून सहज अर्ज सादर करता येईल.
बियाणे व खते वाटप योजना
महाडीबीटी शेतकरी मोबाईल अॅप- महाडीबीटी शेतकरी अॅप मोबाईल मध्ये डाउनलोड करण्यासाठी येथे दिलेल्या लिंकवर क्लिक करावे.
https://play.google.com/store/apps/details?id=com.mahadbtagri
ऑनलाईन अर्ज प्रक्रियेसाठीच्या सूचना- ऑनलाईन अर्ज प्रक्रियेसाठीच्या सूचनेची PDF फाईल डाउनलोड करण्यासाठीयेथे क्लिक करावे. https://mahadbt.maharashtra.gov.in/Farmer/PDF/Aaple_Sarkar_DBT_Portal_User_Manual_Marathi.pdf
हेल्पलाइन क्रमांक- 022-49150800
शेतकऱ्यांना कृषि विषयक येणाऱ्या अडचणी, तक्रारी आणि मार्गदर्शनासाठी कृषि विभागाच्या टोल फ्री क्रमांक- 1800 233 4000 संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आलेले आहे. शेतकऱ्यांनी त्यांच्या तक्रारी प्रत्यक्ष, फोन द्वारे, ईमेल किंवा एसएमएसद्वारे नोंदवून शासनाच्या गुणनियंत्रण अभियानामध्ये सहभाग नोंदवावा. त्यांच्या तक्रारींचे निवारण त्वरित आणि प्रभावीपणे करण्यात येईल.
निष्कर्ष :-
मित्रांनो, तुम्हाला आम्ही दिलेली MahaDBT Scheme for Farmer बियाणे – खते यांच्या वाटपाच्या अनुदानासाठी ऑनलाईन अर्ज करा ! या योजनेबद्दलची माहिती कशी वाटली याबद्दल तुम्ही आम्हाला लेखाच्या खाली कमेंट करून कळवू शकता तसेच आमच्यासाठी काही सूचना असतील त्याही तुम्ही आम्हाला सुचवू शकता अशाच सरकारी योजना संबंधी अपडेटेड माहिती मिळवण्यासाठी आमच्या योजना गॅरंटी डॉट कॉम (yojnaguarantee.com) या संकेतस्थळाला भेट देत राहा धन्यवाद|
हे देखील वाचा :-
योजना प्रत्येक ज्येष्ठ नागरिकाला आपल्या उतरत्या वयात जीवन सुकर व्हाव म्हणून महाराष्ट्र सरकारने आणली आहे मुख्यमंत्री वयोश्री योजना. {Mukhyamantri Vayoshri Yojna}
शेतकऱ्यानच्या फायद्या साठी वाचा. किसान सन्मान निधी योजना | {Kisan Sanman Nidhi Yojna}
आपल्या लाडक्या लेकीच्या उज्वल भविष्यासाठी जाणून घ्या सुकन्या समृद्धी योजना। {Sukanya Samrudhi Yojna}
जर तुम्ही बेरोजगार असाल तर तुम्ही बेरोजगार भत्ता योजनेचा लाभ घेऊ शकता. अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी बेरोजगार भत्ता अर्ज कसा करावा हे वाचा.{Berojgar Bhatta yojna arj ksa karava}
महिलांना व्यवसाय स्थापन करण्यासाठी प्रोत्साहन पर योजना म्हणजेच महिला समृद्धी कर्ज योजना, अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी या योजनेवर क्लिक करा. {Pm pik vima yojna 2024}
आपल्याला आपल्या हक्काचे घर मिळणार रमाई आवास घरकुल योजना अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी या योजनेवर क्लिक करा. {Ramai Awas Gharkul Yojna}
मुलीच्या उज्ज्वल भविष्यासाठी शासन घेऊन आले आहे लेक लाडकी योजना. {LEK LADKI YOJNA}
गर्भवती महिलांना पोषक आहार मिळावा यासाठी सरकार देते रोख रक्कम त्याकरिता वाचा व अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी या योजनेवर क्लिक करा जननी सुरक्षा योजना.
व्यवसाय सुरु करण्यासाठी सरकार देत आहे बिनव्याजी कर्ज वाचा व अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी या योजनेवर क्लिक करा अण्णासाहेब पाटील कर्ज योजना.