Madhmashi Kendra Yojna 2024( मधमाशी पालन योजना २०२४)
आपला भारत देशाप्रधान देश आहे .आपल्या भारतीय लोक आता शेतीबरोबर जोडधंदा देखील करू लागले आहेत. जसे की पशुपालन,शेळीपालन त्याचप्रमाणे आता मधुमक्षिका पालन देखील केले जाते. आपल्या केंद्रशासन आणि राज्य शासनाने शेतकऱ्यांसाठी ज्या विविध योजना आणल्या आहेत त्यातील एक महत्त्वाची योजना म्हणजेच मधमाशी पालन योजना.
या योजनेअंतर्गत लाभ घेण्यासाठी अर्जदाराला दहा दिवसाचे मधमाशी पालनाचे प्रशिक्षण घेणे आवश्यक आहे.
या प्रशिक्षणांअंतर्गत अर्जदाराला मधुमक्षिका पालन कसे करावे, त्याचे प्रजनन, मध उत्पादन कसे करावे याचे प्रशिक्षण दिले जाते तसेच या सर्व बाबींची क्षमता चांगल्या दर्जाची कशी असावी यासाठी देखील प्रशिक्षण दिले जाते.
योजनेअंतर्गत 50% अनुदान शेतकऱ्यांना मिळणार आहे व 50 टक्के रक्कम शेतकऱ्यांना स्वखर्चाने गुंतवायची आहे.आपल्या राज्याची राज्य खादी ग्रामोद्योग मंडळ या विभागामार्फत ही योजना राबवली जाते. महाबळेश्वर येथे मध संचालन केंद्र आपल्या महाराष्ट्र राज्याने सुरू केले आहे. त्या संचलना अंतर्गत आपल्या ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना विविध प्रशिक्षण दिले जाते जसे की मधमाशीच्या पेट्या व त्याचे इतर साहित्य कसे वापरावे त्याची वाटप करणे तसेच मध संकलन कसे करणे याची विक्री कशी करणे इत्यादी गोष्टींचे प्रशिक्षण आपल्या शेतकरी बांधवांना दिले जाते.
मधुमक्षिपालन केंद्र सुरू करणे म्हणजे वेगळ्या प्रकारच्या करिअरची संधी उपलब्ध करण्यासारखे आहे .जसे कि मध एक्स्पोर्ट देखील करू शकतो व चांगला पैसा कमवू शकतो.मधमाशी पालन योजनेअंतर्गतत मध विक्रीचा व्यवसाय आपली शेतकरी बांधव करू शकतात तसेच मधमाशांपासून मिळणारे मेण त्याचा देखील शेतकरी विक्रीसाठी उपयोग करू शकतात.
मधमाशी पालन योजनेसाठी कोणत्याही जात, धर्म, प्रांत याची अट आपल्या राज्य सरकारने ठेवली नाही. तसेच या योजनेचा फॉर्म ऑफलाइन पद्धतीने भरता येणार आ.हे त्यामुळे अत्यंत सुटसुटीत व सोप्या पद्धतीने आपल्याला या योजनेचा फायदा घेता येणार आहे. आपल्या तरुण वर्गाला व्यवसायाच्या नवीन संधी या योजनेद्वारे उपलब्ध होणार आहेत. शेतीबरोबरच जोडधंदा सुरू झाल्यामुळे आपल्या तरुण वर्गाच्या आर्थिक उत्पन्नामध्ये देखील वाढ होणार आहे.
Madhmashi Kendra Yojna 20244 |मधमाशी पालन योजना २०२४, या योजनेबद्दल आम्ही तुम्हाला परिपूर्ण माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहे, यामध्ये या योजनेविषयी थोडक्यात माहिती, त्याचे ठळक मुद्दे, योजनेची पात्रता, योजनेचे फायदे, योजनेच्या अटी व शर्ती, योजनेसाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे, आणि ऑनलाईन अर्ज कसा करावा , असा हा परिपूर्ण लेख आम्ही तुमच्यासाठी सादर करत आहोत तो तुम्ही शेवटपर्यंत वाचवा हि मनापासून इच्छा व्यक्त करत आहोत. तर चला मग बघुयात योजनेविषयी परिपूर्ण अशी माहिती,
मधमाशी पालन योजना २०२४ ची ठळक मुद्दे :- {Important Points of Madhmashi Kendra Yojna 202 }
योजना २०२४ ची ठळक मुद्दे :- { Yojna Maharastra 2024 } याची ठळक मुद्दे आम्ही तुम्हाला येथे देत आहोत या मुद्द्यांमुळे तुम्हाला या योजनेत काय महत्त्वाचं आहे ते समजणार आहे व तुम्हाला योग्य दिशा या योजनेचा लाभ घेण्यासाठी मिळेल अशी आशा करतो.
योजनेचे नाव | Madhmashi Kendra Yojna 2024( मधमाशी पालन योजना २०२४) |
योजना कोणा व्दारा सुरु झाली {Started By Whom} | राज्य सरकार |
लाभार्थी {Beneficiary} | आपल्या राज्यातील शेतकरी |
योजने मार्फत काय लाभ होणार आहे | मधमाशी पालन करण्यासाठी ५०% अनुदान |
अधिकृत gr {Authorized GR} | Madhmashi Kendra Yojna 2024( मधमाशी पालन योजना २०२४) |
अर्ज करण्याची पद्धत {Process of Application} | ऑफलाईन |
मधमाशी पालन योजना २०२४ या योजनेची उद्दिष्टे (Purpose of Madhmashi Kendra Yojna 2024 ):-
- आपल्या राज्यातील शेतकऱ्यांना जोडधंदा करण्यासाठी प्रोत्साहन देणेहा या योजनेमागचा प्रमुख उद्देश आपले महाराष्ट्र सरकारचा आहे.
- याद्वारे आपल्या राज्यातील शेतकऱ्यांना आर्थिक नफा होणार आहे.
- मधमाशी पालन योजनेअंतर्गत मध एक्सपोर्ट करणे हा देखील प्रमुख उद्देश आपल्या राज्य सरकारचा आहे.
- मधमाशी पालन योजनेअंतर्गत मध विक्रीचा व्यवसाय आपली शेतकरी बांधव करू शकतात तसेच मधमाशांपासून मिळणारी मेण आहे त्याचा देखील शेतकरी विक्रीसाठी उपयोग करू शकतात.
मधमाशी पालन योजना २०२४ या योजनेच्या नोंदणीसाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे ( Documents of Madhmashi Kendra Yojna 2024) :-
योजनेसाठी खालील कागदपत्रे आवश्यक आहेत-
- आधार कार्ड (Aadhar Card)
- रेशन कार्ड (Ration Card)
- रहिवासी दाखला (Residence Proof)
- मधुमक्षिपालन प्रशिक्षणाचे प्रमाणपत्र
- दहावी पास झालेले प्रमाणपत्र
- मोबाईल नंबर (Mobile Number)
- ई-मेल आयडी (Email ID)
- पासपोर्ट साईजचेे दोन फोटो (2 Passport Size Photographs)
- स्वयंघोषित प्रतिज्ञापत्र (Self Declartion Form)
- जातीचा दाखला (Caste Certificate)
मधमाशी पालन योजना २०२४ या योजनेची पात्रता (Eligibility for Madhmashi Kendra Yojna 2024 ) :-
- अर्मजदार हा महाराष्ट्राचा रहिवासी असावा.
- मधुमक्षिपालनासाठी शिक्षणाची अट देखील आहे. अर्जदार हा दहावी पास असावा कारण या योजनेअंतर्गत विविध प्रशिक्षण देखील दिले जाणार आहे.
- मधुमक्षिका पालन योजनेसाठी अर्जदाराचे वय 21 वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त असावे.
- ज्या व्यक्तीला मधुमक्षिपालन अर्ज करायचा आहे त्या व्यक्तीकडे कमीत कमी स्वतःचे एक एकर किंवा त्यापेक्षा जास्त शेतजमीन असावी किंवा भाडेतत्त्वावर अर्जदाराकडे जमीन असावी.
- या योजनेचा फायदा कुटुंबातील कोणत्याही एकाच व्यक्तीला घेता येणार आहे..
- या योजनेअंतर्गत लाभ घेण्यासाठी अर्जदाराला दहा दिवसाचे मधमाशी पालनाचे प्रशिक्षण घेणे आवश्यक आहे.
मधमाशी पालन योजना २०२४ या योजनेची अर्ज प्रक्रिया (How to apply for Madhmashi Kendra Yojna 2024) :-
मधमाशी पालन योजना २०२४ चा अर्ज ऑफलाइन पद्धतीने करावा लागेल ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायची
कुठलीही अधिकृत वेबसाईट उपलब्ध नाही.
मधमाशी पालन योजना २०२४ या योजनेची ऑफलाइन अर्ज प्रक्रिया खालील प्रमाणे :-
- मधमाशी पालन योजना २०२४ या योजनेचा अर्ज करण्यासाठी आपल्याला ऑफलाइन पद्धतीने अर्ज करावा लागेल. यासाठी कुठले ऑनलाईन पोर्टल उपलब्ध नसल्यामुळे आपल्याला आपण ज्या ठिकाणी राहतो, तेथील जिल्हा कार्यालयात जावे लागेल. तिथून आपल्याला खादी व ग्राम उद्योग विभागात जाऊन मधमाशी पालन योजना २०२४ चा अर्ज घ्यावा लागेल.
- अर्ज आपल्याला व्यवस्थित भरायचा आहे व वरती दिलेली सर्व कागदपत्रे आपल्याला या अर्जासोबत जमा करायचे आहेत.
- आपल्या अर्जाची योग्य पद्धतीने तपासणी केल्यानंतर अधिकारी आपल्याला एक पोच पावती देतील ती आपल्याला जपून ठेवायची आहे.
मधमाशी पालन योजना २०२४ या योजनेची ऑनलाइन अर्ज प्रक्रिया खालील प्रमाणे :-
मधमाशी पालन योजना २०२४ चा अर्ज ऑफलाइन पद्धतीने करावा लागेल ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायची
कुठलीही अधिकृत वेबसाईट उपलब्ध नाही.
निष्कर्ष :-
मित्रांनो, तुम्हाला आम्ही दिलेली मधमाशी पालन योजना २०२४ या योजनेबद्दलची माहिती कशी वाटली याबद्दल तुम्ही आम्हाला लेखाच्या खाली कमेंट करून कळवू शकता तसेच आमच्यासाठी काही सूचना असतील त्याही तुम्ही आम्हाला सुचवू शकता अशाच सरकारी योजना संबंधी अपडेटेड माहिती मिळवण्यासाठी आमच्या योजना गॅरंटी डॉट कॉम (yojnaguarantee.com) या संकेतस्थळाला भेट देत राहा धन्यवाद|
FAQ :-
१. वरील योजनेचा अर्ज कसा करावा ?
उत्तर-मधमाशी पालन योजना २०२४ चा अर्ज ऑफलाइन पद्धतीने करावा लागेल ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायची कुठलीही अधिकृत वेबसाईट उपलब्ध नाही.आपण ज्या ठिकाणी राहतो, तेथील जिल्हा कार्यालयात जावे लागेल. तिथून आपल्याला खादी व ग्राम उद्योग विभागात जाऊन मधमाशी पालन योजना २०२४ चा अर्ज घ्यावा लागेल.
२. योजना कोणत्या राज्यामध्ये लागू आहे?
उत्तर-मधमाशी पालन योजना २०२४ योजना महाराष्ट्र राज्यामध्ये लागू आहे.
३. योजने चे लाभार्थी कोण आहेत ?
उत्तर-मधमाशी पालन योजना २०२४ योजनेचा लाभ आपल्या राज्यातील शेतकरी घेऊ शकतात.
४. योजना २०२४ अंतर्गत दिले जाणारे लाभ ?
उत्तर-योजनेंतर्गत अंतर्गत अर्जदारास ५०% अनुदान दिले जाणार आहे.
५. मधमाशी पालन योजना २०२४ चा उद्देश काय आहे ?
उत्तर-या योजने अंतर्गत शेतकर्यांना शेती सोबत जोडधंदा करण्यास प्रोत्साहन देणे हा प्रमुख उद्देश आपल्या राज्य सरकारचा आहे.
हे देखील वाचा :-
योजना प्रत्येक ज्येष्ठ नागरिकाला आपल्या उतरत्या वयात जीवन सुकर व्हाव म्हणून महाराष्ट्र सरकारने आणली आहे मुख्यमंत्री वयोश्री योजना. {Mukhyamantri Vayoshri Yojna}
शेतकऱ्यानच्या फायद्या साठी वाचा. किसान सन्मान निधी योजना | {Kisan Sanman Nidhi Yojna}
आपल्या लाडक्या लेकीच्या उज्वल भविष्यासाठी जाणून घ्या सुकन्या समृद्धी योजना। {Sukanya Samrudhi Yojna}
जर तुम्ही बेरोजगार असाल तर तुम्ही बेरोजगार भत्ता योजनेचा लाभ घेऊ शकता. अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी बेरोजगार भत्ता अर्ज कसा करावा हे वाचा.{Berojgar Bhatta yojna arj ksa karava}
महिलांना व्यवसाय स्थापन करण्यासाठी प्रोत्साहन पर योजना म्हणजेच महिला समृद्धी कर्ज योजना, अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी या योजनेवर क्लिक करा. {Pm pik vima yojna 2024}
आपल्याला आपल्या हक्काचे घर मिळणार रमाई आवास घरकुल योजना अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी या योजनेवर क्लिक करा. {Ramai Awas Gharkul Yojna}
मुलीच्या उज्ज्वल भविष्यासाठी शासन घेऊन आले आहे लेक लाडकी योजना. {LEK LADKI YOJNA}
गर्भवती महिलांना पोषक आहार मिळावा यासाठी सरकार देते रोख रक्कम त्याकरिता वाचा व अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी या योजनेवर क्लिक करा जननी सुरक्षा योजना.
व्यवसाय सुरु करण्यासाठी सरकार देत आहे बिनव्याजी कर्ज वाचा व अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी या योजनेवर क्लिक करा अण्णासाहेब पाटील कर्ज योजना.