Lic Vima Sakhi Yojana
केंद्रातील मोदी सरकारने विमा सखी योजना लागू केली आहे. त्यांना या योजनेच्या माध्यमातून महिलांना आर्थिक स्ववलंबी करायचे आहे. या योजनेसाठी महिला ऑनलाईन पद्धतीने देखील अर्ज करू शकणार आहेत.
केंद्र सरकारकडून महिलांच्या सक्षमीकरणासाठी अनेक योजना राबवल्या जात आहेत. या योजना तळागाळातील महिलांपर्यंत पोहोचाव्यात यासाठी कृतीकार्यक्रमही सरकारकडून राबवला जातोय. दरम्यान, सरकारने महिलांच्या आर्थिक स्वावलंबना करिता विमा सखी (Vima Sakhi Yojana) नावाची योजना आणली आहे. या योजनेच्या माध्यमातून महिलांना रोजगार मिळणार आहे. महिलांना प्रत्येक महिन्याला 7000 रुपये सोबतच कमीशन देखील मिळेल. याच पार्श्वभूमीवर ही योजना नेमकी काय आहे? या योजनेतून महिलांना नेमके किती रुपये मिळू शकतात? हे जाणून घेऊयात.
विमा सखी ही एलआयसीची एक महत्वाकांक्षी अशी योजना आहे. फक्त महिलाच या योजनेसाठी अर्ज करू शकतात. या योजनेअंतर्गत तीन वर्षे महिलांना स्टायपेंड मिळणार आहे. या योजनेच्या अंतर्गत पात्र महिलांना एकूण तीन वर्षे ट्रेनिंग दिलं जाईल. आणि या काळात महिला एलआयसी एजंट म्हणून देखील काम करू शकतील. ज्या महिलांनी पदवीपर्यंतचे शिक्षण घेतलेले आहे. त्यांना एलआयसीमध्ये डेव्हलपमेंट ऑफिसर म्हणूनही काम करता येईल.
विमा सखी योजनेचा लाभ घेण्यासाठी अटी काय आहेत?
महिलांना या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर संबंधित महिलेचे कमीत कमी इयत्ता 10 वी पर्यंतचे शिक्षण पूर्ण झालेले असायला हवे. तसेच महिलेचे वय कमीत कमी 17 आणि जास्तीत जास्त 70 वर्षे असायला हवे. तीन वर्षांचं ट्रेनिंग पूर्ण झाल्यांनंतर महिलांना विमा एजंट म्हणून काम करता येईल.
विमा सखींना नेमके किती पैसे दिले जातील? LIC Vima Sakhi Yojana
या योजनेच्या माध्यमातून ट्रेनिंग घेणाऱ्या महिलांना सरकारकडून स्टायपेंड दिले जाणार आहेत. या तीन वर्षाच्या काळात महिलांना एकूण दोन लाख रुपये दिले जातील. ट्रेनिंग घेणार्या महिलांना पहिल्या वर्षी प्रत्येक महिन्याला 7000 रुपये दिले जातील. तर दुसऱ्या वर्षी 6000 आणि तिसऱ्या वर्षी 5000 रुपये दिले जातील. विशेष म्हणजे यामध्ये कमीशनचा समावेश नाही. कमीशनच्या रुपात तुम्हाला मिळणारे पैसे हे वेगळे असणार आहेत.
नेमकी अट काय आहे? LIC Vima Sakhi Yojana
पण तुम्हाला दुसऱ्या आणि तिसऱ्या वर्षी मिळणारे 6000 आणि 5000 रुपये मिळवण्यासाठी एक अट ठेवण्यात आली आहे. पहिल्या वर्षी तुम्ही जेवढ्या पॉलीसी काढून दिल्यात त्यापैकी साधारण 65 टक्के योजना या दुसऱ्या वर्षीही चालूच असायला हव्यात. तसे असेल तरच तुम्हाला दुसऱ्या आणि तिसऱ्या वर्षाचे पैसे मिळतील. तुम्हाला येथे खाली दिलेल्या लिंक वर एल.आय.सी. विमा सखी योजनेची सर्व माहिती मिळेल.
LIC Vima Sakhi Yojana साठी अर्ज प्रक्रिया खालीलप्रमाणे आहे.
Step-by-Step अर्ज प्रक्रिया:
योजनेची माहिती गोळा करावी.
- LIC च्या अधिकृत वेबसाईटला भेट द्या किंवा जवळच्या LIC शाखेत जाऊन माहिती मिळवा.
- योजनेची पात्रता व फायदे समजून घ्या.
अर्ज मिळवा.
- तुमच्या जवळच्या LIC शाखेतून अर्ज मिळवा.
- काही शाखांमध्ये अर्ज ऑनलाइन उपलब्ध होतो, हे LIC च्या वेबसाईटवर जाऊन तपासून पहा.
आवश्यक कागदपत्रे जमा करा.
अर्ज करताना खालील कागदपत्रे लागतील.
- ओळखपत्र- आधार कार्ड, पॅन कार्ड
- निवास पुरावा -विज बिल, रेशन कार्ड किंवा निवडणूक ओळखपत्र
- शैक्षणिक पात्रता- 10वी/12वीची मार्कशीट
- पासपोर्ट साइज फोटो
- बँक खाते डिटेल्स
अर्ज भरा.
- अर्ज व्यवस्थित भरा.
- तुमची वैयक्तिक माहिती, संपर्क माहिती व कागदपत्रे त्याला जोडा.
- अर्ज पूर्ण भरण्यापूर्वी तपासून घ्या.
अर्ज सादर करा.
- भरलेला अर्ज आणि कागदपत्रे LIC शाखेत सबमिट करा.
- कागदपत्रांची एकदा पडताळणी करून घ्या.
प्रशिक्षण आणि परीक्षा
- अर्ज स्वीकारल्यानंतर LIC कडून तुम्हाला विमा प्रतिनिधी म्हणून प्रशिक्षण दिले जाईल.
- प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर IRDAI (Insurance Regulatory and Development Authority of India) परीक्षा देण्यास सांगितले जाईल.
परीक्षेचे प्रमाणपत्र–
- परीक्षा यशस्वीरित्या उत्तीर्ण झाल्यास तुम्हाला प्रमाणपत्र दिले जाईल.
- प्रमाणपत्रानंतर LIC च्या अधिकृत विमा प्रतिनिधी (Vima Sakhi) म्हणून काम करता येईल.
प्रतिनिधी कोड मिळवा:
LIC कडून अधिकृत प्रतिनिधी कोड मिळाल्यानंतर तुम्ही योजनेत काम करू शकता.
काम सुरू करा.
- तुमच्या भागातील लोकांना विम्याबद्दल माहिती द्या व पॉलिसी विक्री सुरू करा.
- तुमच्या कामाच्या आधारावर कमिशन मिळेल.
महत्त्वाची सूचना:
योजनेबद्दल अधिक माहितीसाठी किंवा अर्ज प्रक्रियेतील अडचणींसाठी, LIC च्या शाखेत किंवा त्यांच्या हेल्पलाइन क्रमांकावर संपर्क साधा.
निष्कर्ष | LIC Vima Sakhi Yojana
मित्रांनो, तुम्हाला आम्ही दिलेली Lic Vima Sakhi Yojana | LIC ची विमा सखी योजना प्रत्येक महिन्याला देईल, 7000 रुपये, जाणून घ्या आमच्या सोबत योजनेविषयी संपूर्ण माहिती? , या योजनेबद्दलची माहिती कशी वाटली याबद्दल तुम्ही आम्हाला लेखाच्या खाली कमेंट करून कळवू शकता तसेच आमच्यासाठी काही सूचना असतील त्याही तुम्ही आम्हाला सुचवू शकता अशाच सरकारी योजना संबंधी अपडेटेड माहिती मिळवण्यासाठी आमच्या योजना गॅरंटी डॉट कॉम (yojnaguarantee.com) या संकेतस्थळाला भेट देत राहा धन्यवाद|
FAQ | LIC Vima Sakhi Yojana
१. LIC Vima Sakhi Yojana म्हणजे काय?
उत्तर -या योजनेच्या अंतर्गत पात्र महिलांना एकूण तीन वर्षे ट्रेनिंग दिलं जाईल. आणि या काळात महिला एलआयसी एजंट म्हणून देखील काम करू शकतील. ज्या महिलांनी पदवीपर्यंतचे शिक्षण घेतलेले आहे. त्यांना एलआयसीमध्ये डेव्हलपमेंट ऑफिसर म्हणूनही काम करता येईल.
२. LIC Vima Sakhi Yojana याचा फायदा महिला कसा घेऊ शकतात?
उत्तर- या योजनेच्या माध्यमातून ट्रेनिंग घेणाऱ्या महिलांना सरकारकडून स्टायपेंड दिले जाणार आहेत. या तीन वर्षाच्या काळात महिलांना एकूण दोन लाख रुपये दिले जातील.
३. LIC Vima Sakhi Yojana साठी कुठे अर्ज करता येईल वेबसाईट सांगावी?
उत्तर- एल.आय.सी. विमा सखी योजना लिंक
हे देखील वाचा
योजना प्रत्येक ज्येष्ठ नागरिकाला आपल्या उतरत्या वयात जीवन सुकर व्हाव म्हणून महाराष्ट्र सरकारने आणली आहे मुख्यमंत्री वयोश्री योजना. {Mukhyamantri Vayoshri Yojna}
शेतकऱ्यानच्या फायद्या साठी वाचा. किसान सन्मान निधी योजना | {Kisan Sanman Nidhi Yojna}
आपल्या लाडक्या लेकीच्या उज्वल भविष्यासाठी जाणून घ्या सुकन्या समृद्धी योजना। {Sukanya Samrudhi Yojna}
जर तुम्ही बेरोजगार असाल तर तुम्ही बेरोजगार भत्ता योजनेचा लाभ घेऊ शकता. अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी बेरोजगार भत्ता अर्ज कसा करावा हे वाचा.{Berojgar Bhatta yojna arj ksa karava}
महिलांना व्यवसाय स्थापन करण्यासाठी प्रोत्साहन पर योजना म्हणजेच महिला समृद्धी कर्ज योजना, अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी या योजनेवर क्लिक करा. {Pm pik vima yojna 2024}
आपल्याला आपल्या हक्काचे घर मिळणार रमाई आवास घरकुल योजना अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी या योजनेवर क्लिक करा. {Ramai Awas Gharkul Yojna}
मुलीच्या उज्ज्वल भविष्यासाठी शासन घेऊन आले आहे लेक लाडकी योजना. {LEK LADKI YOJNA}
गर्भवती महिलांना पोषक आहार मिळावा यासाठी सरकार देते रोख रक्कम त्याकरिता वाचा व अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी या योजनेवर क्लिक करा जननी सुरक्षा योजना.
व्यवसाय सुरु करण्यासाठी सरकार देत आहे बिनव्याजी कर्ज वाचा व अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी या योजनेवर क्लिक करा अण्णासाहेब पाटील कर्ज योजना.