Lakhpati Didi Yojna 2024 / लखपती दीदी योजना २०२४ कागदपत्रे.

Lakhpati Didi Yojna 2024 (लखपती दीदी योजना २०२४)

आपला भारत देश हा पुरुषप्रधान देश आहे.आपल्या देशात महिला नेहमी सर्व कामांमध्ये अग्रेसर असतात.आपले शासन देखील स्त्रियांसाठी विविध योजना राबवत असते. आज बघुयात केंद्र शासनाने आणलेली लखपती दीदी योजना .आत्ताच झालेल्या आपल्या 77 व्या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने आपल्या देशाचे लाडके पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी यांनी आपल्या भाषणामध्ये लखपती दीदीची या योजनेची घोषणा केली.

या योजनेअंतर्गत आपल्या देशातील एक करोड महिला आतापर्यंत लखपती झाल्या आहेत परंतु आत्ताच झालेल्या घोषणेनुसार दोन करोड महिलांना या योजनेअंतर्गत फायदा होणार आहे .या योजनेअंतर्गत आपल्या देशातील महिलांना विविध प्रशिक्षण दिले जाईल व त्यांना आर्थिक मदत केली जाईल.याद्वारे देशातीत महिला आपला लघुउद्योग चालू करू शकतील. महिलांना उद्योगांसाठी लागणारे मार्गदर्शन त्यासाठी लागणारे प्रशिक्षण आपले भारत सरकार या महिलांना देणार आहे व आर्थिक दृष्ट्या सक्षम बनविण्याचा प्रयत्न करणार आहे.

या योजनेची घोषणा आपल्या ग्रामीण भागातील महिलांना आर्थिक दृष्ट्या सक्षम करण्यासाठी तसेच शहरी भागातील महिलांना देखील आर्थिक दृश्य सक्षम करण्यासाठी केली गेली आहे. आपल्या देशातील ज्या महिला अंगणवाडी मध्ये सेविका आहे तसेच आरोग्य सेविका आहेत. त्या सर्व महिलांना आपल्या माननीय पंतप्रधानांनी दीदी म्हणून संबोधित केले आहे.

योजनेअंतर्गत महिलांना विविध प्रशिक्षण दिले जाणार आहे जसे की एल ई डी बल्ब बनवले, प्लंबिंगचे कामे करणे ,ड्रोन मशीन चालवणे, छोटे छोटे यंत्र दुरुस्त करणे या उद्योगांसाठी प्रशिक्षण देणे व महिलेंना आर्थिक दृष्ट्या सक्षम करणे हा आपल्या केंद्र सरकारचा प्रमुख उद्देश आहे. योजनेअंतर्गत महिला स्वावलंबी बनणार आहे तसेच आर्थिक दृष्ट्या देखील सक्षम बनणार आहेत .आपल्या केंद्र सरकारचा असा मानस आहे की दोन कोटी वरून ही संख्या 9 कोटी पर्यंत न्यायची आहे जेणेकरून नऊ कोटी घरातील महिला आपला लघुउद्योग सुरू करू शकते.

योजनेअंतर्गत महिलांना स्वतःची स्किल डेव्हलप करण्यासाठी देखील भर देतील. या योजनेअंतर्गत महिलांना डिजिटल बँकिंग किंवा मोबाईल वॉलेट कसे वापरले याचे देखील प्रशिक्षण दिले जाणार आहे.लखपती दीदी योजनेची राज्या नुसार अनुदान जाहीर झालेली आहे आपल्या महाराष्ट्र राज्यासाठी 17.42 लाख महिलांना लखपती दीदी बनविण्याचा ध्यास आपल्या सरकारचा आहे

Lakhpati Didi Yojna 2024|लखपती दीदी योजना २०२४, या योजनेबद्दल आम्ही तुम्हाला परिपूर्ण माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहे, यामध्ये या योजनेविषयी थोडक्यात माहिती, त्याचे ठळक मुद्दे, योजनेची पात्रता, योजनेचे फायदे, योजनेच्या अटी व शर्ती, योजनेसाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे, आणि ऑनलाईन अर्ज कसा करावा , असा हा परिपूर्ण लेख आम्ही तुमच्यासाठी सादर करत आहोत तो तुम्ही शेवटपर्यंत वाचवा हि मनापासून इच्छा व्यक्त करत आहोत. तर चला मग बघुयात योजनेविषयी परिपूर्ण अशी माहिती,

Lakhpati Didi Yojna 2024
Lakhpati Didi Yojna 2024

लखपती दीदी योजना २०२४ ची ठळक मुद्दे :- { Lakhpati Didi Yojna 2024 }

योजना २०२४ ची ठळक मुद्दे :- { Yojna Maharastra 2024 } याची ठळक मुद्दे आम्ही तुम्हाला येथे देत आहोत या मुद्द्यांमुळे तुम्हाला या योजनेत काय महत्त्वाचं आहे ते समजणार आहे व तुम्हाला योग्य दिशा या योजनेचा लाभ घेण्यासाठी मिळेल अशी आशा करतो.

योजनेचे नावलखपती दीदी योजना २०२४ \ Lakhpati Didi Yojna 2024
योजना कोणा व्दारा सुरु झाली {Started By Whom}
ग्रामीण मंत्रालय विभाग, महाराष्ट्र राज्य.
लाभार्थी {Beneficiary}आपल्या देशातील महीला
योजने ची घोषणा कधी केली गेली१५ ऑगस्ट २०२३
अधिकृत वेबसाईट {Authorized Website}लखपती दीदी योजना २०२४ \ Lakhpati Didi Yojna 2024
अर्ज करण्याची पद्धत {Process of Application}उपलब्ध नाही

लखपती दीदी योजना २०२४ या योजनेची उद्दिष्टे (Purpose ofLakhpati Didi Yojna 2024 ) :-

  • आपल्या देशातील महिलांना लखपती बनवणे हा या योजने मागचा प्रमुख उद्दिष्ट आहे.
  • या योजने अंतर्गत आपल्या देशातील महिलांना आर्थिक दृष्ट्या सक्षम बनवणे व स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी लघुउद्योग सुरू करून देणे हा या योजने मागचा प्रमुख उद्दिष्ट आहे.
  • याद्वारे लघुउद्योगाद्वारे आपल्या देशाची आर्थिक व्यवस्था सबळ बनवणे हा देखील या योजनेचा प्रमुख उद्देश आहे.
  • या योजने अंतर्गत घर काम करणे तसेच शिलाई काम करणे, लघुउद्योग करण्यासाठी अनुदान दिल्यामुळे महिला स्वतःच्या कुटुंबाची जबाबदारी घेऊ शकतात व आर्थिक दृष्ट्या स्वतःचे स्वतःची कुटुंब सक्षम करू शकतात.

लखपती दीदी योजना २०२४ या योजनेच्या नोंदणीसाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे ( Doduments for Lakhpati Didi Yojna 2024) :-

योजनेसाठी खालील कागदपत्रे आवश्यक आहेत-

  • आधार कार्ड (Aadhar Card)
  • रेशन कार्ड (Ration Card)
  • रहिवासी दाखला (Residence Proof)
  • मोबाईल नंबर (Mobile Number) अर्जदाराचा मोबाईल नंबर आधार कार्डशी जोडलेला असायला हवा.
  • ई-मेल आयडी (Email ID)
  • पासपोर्ट साईजचेे दोन फोटो (2 Passport Size Photographs)
  • स्वयंघोषित प्रतिज्ञापत्र (Self Declartion Form)
  • जातीचा दाखला (Caste Certificate)
Lakhpati Didi Yojna 2024
Lakhpati Didi Yojna 2024

लखपती दीदी योजना २०२४ या योजनेची पात्रता (Eligibility for Lakhpati Didi Yojna 2024 ) :-

  1. योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदार भारतीय रहिवासी असावा.
  2. अर्जदाराकडे नॅशनॅलिटी,आधार कार्ड, मतदान कार्ड हे पुरावे असावेत.
  3. ही योजना भारतातील महिलांसाठी आहे त्यामुळे पुरुष या योजनेचा लाभ घेऊ शकणार नाहीत.
  4. सुरुवातीला अर्ज करणाऱ्या दोन कोटी महिलांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे.
Lakhpati Didi Yojna 2024
Lakhpati Didi Yojna 2024

लखपती दीदी योजना २०२४ या योजनेची अर्ज प्रक्रिया (How to apply for Lakhpati Didi Yojna 2024) :-

या योजनेचा आपण ऑनलाईन आणि ऑफलाइन अशा दोन्ही पद्धतीने अर्ज करू शकतो-

लखपती दीदी योजना २०२४ या योजनेची ऑफलाइन अर्ज प्रक्रिया खालील प्रमाणे :-

आता बघूया ऑफलाइन पद्धतीने या योजनेचा लाभ कसा घेता येईल-

  • लखपती दीदी योजनेचा लाभ घेण्यासाठी आपल्याला आपण ज्या क्षेत्रात राहतो त्या क्षेत्रातील बचत गट चा हिस्सा असणे गरजेचे आहे.आपल्याला या योजनेचा लाभ घेण्या साठी बचत गटासोबत जोडले जाने गरजेचे आहे.
  • तिथून आपल्याला लखपती दीदी योजनेचा अर्ज घ्यायचा आहे.
  • हा अर्ज व्यवस्थित भरून आपल्याला वरती दिलेली सर्व कागदपत्रे त्यासोबत जमा करायची आहेत.
  • आता हा अर्ज आपल्याला संबंधित अधिकाऱ्याकडे जमा करायचा आहे.

लखपती दीदी योजना २०२४ या योजनेची ऑनलाइन अर्ज प्रक्रिया खालील प्रमाणे :-

आता बघुयात ऑनलाईन पद्धतीने कसा अर्ज करता येईल-

  • अर्ज करण्यासाठी आपल्याला खालील अधिकृत वेबसाईटवर जावे लागेल.

लखपती दीदी योजना २०२४ \ Lakhpati Didi Yojna 2024

  • आता आपल्याला समोर एक पेज ओपन होईल त्यावर आपल्याला लखपती दीदी अप्लाय ऑनलाईन वर क्लिक आहे.
  • समोर एक अर्ज ओपन होईल त्यावर आपल्याला विचारलेले सर्व प्रश्नांची माहिती बरोबर भरायची आहे व वरती दिलेले सर्व कागदपत्रे त्यासोबत अपलोड करायचे आहेत.

निष्कर्ष :-

मित्रांनो, तुम्हाला आम्ही दिलेली लखपती दीदी योजना २०२४ या योजनेबद्दलची माहिती कशी वाटली याबद्दल तुम्ही आम्हाला लेखाच्या खाली कमेंट करून कळवू शकता तसेच आमच्यासाठी काही सूचना असतील त्याही तुम्ही आम्हाला सुचवू शकता अशाच सरकारी योजना संबंधी अपडेटेड माहिती मिळवण्यासाठी आमच्या योजना गॅरंटी डॉट कॉम (yojnaguarantee.com) या संकेतस्थळाला भेट देत राहा धन्यवाद|


FAQ :-


१. लखपती दीदी योजना २०२४ योजनेचा अर्ज कसा करावा ?

उत्तर-लखपती दीदी योजनेसाठीची अधिकृत वेबसाईट जाहीर झालेली आहे परंतुु त्या वेबसाईटवर कुठेही अर्ज कसा भरावा याबद्दल अधिकृत माहिती दिलीेली नाही. सरकारद्वारे अधिकृत अर्ज भरण्याचा पद्धतीचा माहिती जाहीर केली जाईल. ती आपल्याला योजना गॅरंटी द्वारे कळविण्यात येईल.

२. योजनेचा ऑनलाइन अर्ज करायचा असल्यास अधिकृत संकेतस्थळ कोणते?

उत्तर-लखपती दीदी योजना २०२४ या योजनेचा ऑनलाइन अर्ज भरण्या साठी कोणतेही अधिकृत संकेतस्थळ उपलब्ध नाही.

३. लखपती दीदी योजना २०२४ कोणत्या राज्यामध्ये लागू आहे ?

उत्तर-लखपती दीदी योजना आपल्या केंद्र सरकार ची आहे म्हणून हि योजना पूर्ण देश साठी लागू झाली आहे.

४. लखपती दीदी योजना २०२४ चे लाभार्थी कोण आहेत ?

उत्तर-आपल्या देशातील महिला या योजनेचा लाभ घेऊ शकतात.

5. लखपती दीदी योजना २०२४ अंतर्गत दिले जाणारे लाभ ?

उत्तर-आपल्या देशातील महिलांना लघुउद्योग करण्यासाठी प्रशिक्षण देणे आणि आपल्या देशातील महिलांना लखपती बनवणे.

6. लखपती दीदी योजना २०२४ चा उद्देश काय आहे ?

उत्तर-आपल्या देशातील महिलांना लघुउद्योग करण्यासाठी प्रशिक्षण देणे हा उद्देश लखपती दीदी योजनेचा आहे.

हे देखील वाचा :-


योजना प्रत्येक ज्येष्ठ नागरिकाला आपल्या उतरत्या वयात जीवन सुकर व्हाव म्हणून महाराष्ट्र सरकारने आणली आहे मुख्यमंत्री वयोश्री योजना. {Mukhyamantri Vayoshri Yojna}


शेतकऱ्यानच्या फायद्या साठी वाचा. किसान सन्मान निधी योजना | {Kisan Sanman Nidhi Yojna}


आपल्या लाडक्या लेकीच्या उज्वल भविष्यासाठी जाणून घ्या सुकन्या समृद्धी योजना। {Sukanya Samrudhi Yojna}


जर तुम्ही बेरोजगार असाल तर तुम्ही बेरोजगार भत्ता योजनेचा लाभ घेऊ शकता. अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी बेरोजगार भत्ता अर्ज कसा करावा हे वाचा.{Berojgar Bhatta yojna arj ksa karava}


महिलांना व्यवसाय स्थापन करण्यासाठी प्रोत्साहन पर योजना म्हणजेच महिला समृद्धी कर्ज योजना, अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी या योजनेवर क्लिक करा. {Pm pik vima yojna 2024}


आपल्याला आपल्या हक्काचे घर मिळणार रमाई आवास घरकुल योजना अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी या योजनेवर क्लिक करा. {Ramai Awas Gharkul Yojna}


मुलीच्या उज्ज्वल भविष्यासाठी शासन घेऊन आले आहे लेक लाडकी योजना. {LEK LADKI YOJNA}


गर्भवती महिलांना पोषक आहार मिळावा यासाठी सरकार देते रोख रक्कम त्याकरिता वाचा व अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी या योजनेवर क्लिक करा  जननी सुरक्षा योजना.


व्यवसाय सुरु करण्यासाठी सरकार देत आहे बिनव्याजी कर्ज वाचा व अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी या योजनेवर क्लिक करा अण्णासाहेब पाटील कर्ज योजना.