Kisan Sanman Nidhi Yojna
आपला भारत देश हा कृषिप्रधान देश म्हणून ओळखला जाणारा देश आहे.आपल्या देशात शेती व्यवसायाला मुख्य उद्योग-धंदा स्वरुपात बघितले जाते. आपल्या देशातील अंदाजे ५८% लोक उपजीवेकीसाठी शेती करतात.आपले भारत सरकार देशातील शेतकऱ्यासाठी नवनवीन योजना राबवत असते, या योजने अंतर्गत देशातील शेतकरी आर्थिकदृष्ट्या सक्षम होत आहेत.अशीच क्रांतीकारी किसान सन्मान निधी योजना(Kisan Sanman Nidhi Yojna) आपल्या देशात राबवली जात आहे.
किसान सन्मान निधी योजना(Kisan Sanman Nidhi Yojna) २४ फेब्रुवारी २०१९ पासून आपल्या देशात सुरु झाली आहे, किसान सन्मान निधी योजाने अंतर्गत अल्प व अत्यल्प शेती असणाऱ्या शेतकर्यांना शासन आर्थिक मदत करणार आहे,हि मदत पैशाच्या स्वरुपात आहे.किसान सन्मान निधी योजनेत मिळालेले पैसे आपल्या देशातील शेतकरी बी-बियाणे खरेदी,सिंचन,शेतीला उपयुक्त सिंचाने या साठी वापरू शकतात.या योजने अंतर्गत सुमारे पाच कोटी शेतकरी आर्थिकदृष्ट्या सक्षम होणार आहे अशी अपेक्षा आपल्या केंद्र सरकार ला आहे.
किसान सन्मान निधी योजना (Kisan Sanman Nidhi Yojna) अंतर्गत आर्थिकदृष्ट्या दुर्बल शेतकऱ्यांना वार्षिक ६०००/- मात्र मिळणार आहेत .हे पैसे शेतकर्यांना टप्याटप्याने मिळणार आहेत.प्रत्येकी ३ हफ्ते या योजने अंतर्गत बनवले आहेत.२०००/- मात्र इतके पैसे पैसे तीन वेगवेगळ्या टप्या मध्ये देशातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केली जाणार आहेत.किसान सन्मान निधी योजने साठी हेक्टरी दोन इतके किंवा त्यापेक्षा कमी क्षेत्रफळ असणार शेतकरी या योजने चा फायदा घेऊ शकतात. किसान सन्मान निधी योजनेतून दर तीन ते चार महिन्याला आर्थिक मदत करण्याचा निर्णय या योजने अंतर्गत घेण्यात आला आहे.किसान सन्मान निधी योजनेतून आता पर्यंत १३ कोटींहून अधिक शेतकरी बांधवाना मदत झाली आहे.
किसान सन्मान निधी (Kisan Sanman Nidhi Yojna)योजने अंतर्गत खेडे गावातील तशेच शहरी भागातील शेतकरी बांधव सहभागी होऊन लाभ घेऊ शकता. किसान सन्मान निधी योजने साठी ०११-२४३००६०६,१५५२६१ असे हेल्प लाईन नंबर दिले गेले आहेत.किसान सन्मान निधी योजनेचा मागिल हफ्ता २८ फेब्रुवारी २०२४ ला शेतकरी बांधवा च्या बँक खात्यात जमा झाला आहे.किसान सन्मान निधी योजना आपल्या देशाचे लाडके पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी यांनी सुरु केली.
आता किसान सन्मान निधी योजने मध्ये ६०००/- मात्र ऐवजी ८०००/- मात्र रुपये जमा करण्याचा विचार आपले केंत्र सरकार करत आहे, अस झाल्या मुळे २२ हजार कोटी किंवा त्या पेक्षा जास्त खर्च होण्याची शक्यता केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्र तोमर यांनी जाहीर केली आहे परंतु आता येणाऱ्या बैठकीत याबाबत प्रस्ताव बघणे गरजेचे आहे.
योजने चे नाव | किसान सन्मान निधी योजना(Kisan Sanman Nidhi Yojna) |
कोणी सुरु केली योजना | केंद्र सरकार |
योजनेला सुरुवात कधी झाली | २४ फेब्रुवारी २०१९ |
योजने चा फायदा कुणाला होणार आहे | शेतकरी |
उद्देश | अल्प व अत्यल्प भुधारक शेतकार्यांना आर्थिक सहाय करणे. |
सह्ययता निधी | ६०००/- मात्र वार्षिक |
योजनेचे बजेट | २.१३ लाख करोड/- |
अर्जाची प्रक्रिया | https://pmkisan.gov.in/ |
किसान सन्मान निधी योजना (Kisan Sanman Nidhi Yojna) उपयुक्त कागदपत्रे(documents)-
किसान सन्मान निधी योजना (किसान sanman nidhi ) अंतर्गत अल्प व अत्यल्प भूधारकर शेतकरी घेऊ शकतात फायदा त्या साठी आवश्यक आहेत खालील कागदपत्रे-
१.आधार कार्ड
२.जमिनीचे मालकी हक्क असलेली कागदपत्रे
३.मोबाईल नंबर(आधारकार्ड शी जोडलेला )
वरील सर्व कागदपत्रे किसान सन्मान निधी योजनेचा फायदा घेण्यासाठी अनिवार्य आहे.
किसान सन्मान निधी योजनेचा{Kisan Sanman Nidhi Yojna} फायदा कोनाला होऊ शकतो-
किसान सन्मान निधी योजनेचा फायदा घेण्यासाठी आपल्या शेतकरी बांधवाना शेतीचे कागदपत्रे असणे गरजेचे आहे.
किसान सन्मान निधी योजनेचा(Kisan Sanman Nidhi Yojna) फायदा कोनाला होऊ शकनार नाही?
किसान सन्मान निधी योजन हि आपल्या देशातील शेतकरी बांधवान साठी ची एक क्रांतीकार योजना आहे याचा फायदा शेतकरी बांधवाना होणार आहे पण देशातील काही लोक या योजनेचा फायदा घेऊ शकत नाही, तर जाणून घेऊया कोण आहेत हे –
१.अशी संस्था जिच्या नावावर जमीन आहे.
२.आता मंत्री मंडळात असलेले कर्मचारी
३.निवृत्त मंत्री मंडळातील कर्मचारी
४.आयकर भरणारी कोणतीही व्यक्ती
५.निवृत्त झालेली लोक त्यांना निवृत्त वेतन १००००/- मात्र मिळत आहे
६.आता आमदार ,खासदार असणारी व्यक्ती
७.निवृत्त आमदार ,खासदार असणारी व्यक्ती
८.नोंदणी असणारे डॉक्टर,इंजिनीअर,वकील
वरील कोणत्याही पदावर काम करणारे व्यक्ती किसान सन्मान निधी योजने चा फायदा घेऊ शकणार नाही.
किसान सन्मान निधी योजनेचे(Kisan Sanman Nidhi Yojna) उद्दिष्ट-
१.आपल्या कृषिप्रधान देशातील शेतकर्यांना आर्थिक सहाय करणे हे या योजने चे मूळ उद्दिष्ट आहे.
२.शेतकर्यांना शेतीसाठी लागणारेबी-बियाणे खरेदी,सिंचन,शेतीला उपयुक्त सिंचाने या साठी किसान सन्मान निधी योजनेतून येणारे पैसे वापरू शकतात.
३.किसान सन्मान निधी योजनेमुळे आपल्या देशातील शेतकरी बांधवाना शेती करायला प्रोत्साहन मिळणार आहे.
४.आर्थिक व सामाजिकदृष्ट्या आपले शेतकरी बांधव सबल होणार आहेत.
किसान सन्मान निधी योजनेचा (Kisan Sanman Nidhi Yojna) फायदा घेण्यासाठी अर्ज कुठ करावा-
किसान सन्मान निधी योजनेचा फायदा घेण्यासाठी खालील लिंक वर अर्ज भरावा- लिंक
किसान सन्मान निधी योजना हि आपल्या देशातील शेतकरी लोकां साठी देशाच्या सरकार कडून खूप मोठी मदत होणार आहे,या मुळे आपले किसान बांधव आपल्याला शेतीसाठी रोज लागणाऱ्या विविध गोष्टी आरामात खरेदी करू शकतो,किसान सन्मान निधी योजने अंतर्गत शेतकरी वेळेवरबियाणे घेऊ शकतो.
किसान सन्मान निधी योजनेच्या(Kisan Sanman Nidhi Yojna) निधीत वाढ होणार का?
किसान सन्मान निधी योजने मध्ये ६०००/- मात्र ऐवजी ८०००/- मात्र रुपये जमा करण्याचा विचार आपले केंत्र सरकार करत आहे, अस झाल्या मुळे २२ हजार कोटी किंवा त्या पेक्षा जास्त खर्च होण्याची शक्यता केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्र तोमर यांनी जाहीर केली आहे परंतु आता येणाऱ्या बैठकीत याबाबत प्रस्ताव बघणे गरजेचे आहे त्या नंतर आपण निकषांवर पोहचू शकणार आहोत.आपण सर्व शेतकरी अपेक्षा करूया कि आपल्याला या योजने अंतर्गत जास्तीत जास्त पैसे भेटतील,जेणे करून आपण शेतीपूरक सामानाची खरेदी वेळेवर करू शकतो आणि त्यामुळे होणाऱ्या नफ्याचा आपण आपल्या आयुष्यात उपयोग करू शकतो.
निष्कर्ष-
किसान सन्मान निधी योजनेच्या(Kisan Sanman Nidhi Yojna) योजने अंतर्गत देशातील शेतकरी आर्थिकदृष्ट्या सक्षम होत आहेत.या योजनेतून मिळणारे पैसे शेतकरी शेतीसाठी लागणारी बी बियाणे तसेच सिंचन शेतीसाठी उपयुक्त असणारे औषधी उपकरणे यासाठी करू शकतात.किसन सन्माननिधीतून ६००० रुपये ऐवजी 8000 रुपये पुंजी देण्याचा विचार सरकार आहे.किसान सन्मान योजना ही शेतकऱ्यांच्या भविष्यासाठी अतिशय चांगली योजना आपले सरकार राबवत आहे.
किसन सन्मान योजनेचा शेवटचा हप्ता फेब्रुवारी महिन्यामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाला आहे .आपण आशा करूयात की आता पुढचा हप्ता जून महिन्यामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होऊन त्यांनी तिचा वापर आपली शेतकरी बांधव आपल्या शेतकी कामासाठी करू शकतात.
FAQ
१.किसान सन्मान निधी योजने साठी कोणती कागदपत्रे व माहिती गरजेचीआहे?
किसान सन्मान निधी योजना साठी खालील माहिती व कागदपत्रे असणे जरुरी आहे.
१.नाव
२.वय
३.लिंग
४.श्रेणी
५.बँक खाते नंबर
६.मोबाईल नंबर जो आधार कार्ड सोबत जोडलेला आहे.
२.किसान सन्मान निधी योजने चा हेल्प लाईन नंबर काय आहे?
किसान सन्मान निधी योजने चा हेल्प लाईन ०११-२४३००६०६,१५५२६१ आहे, कोणत्याही प्रश्न साठी आपण या हेल्प लाईन नंबर वर संवाद साधू शकतो किंवा comment करून आम्हालाविचारू शकता, आम्ही आपल्या प्रश्न चे निराकरण करण्याचा प्रयत्न करू.
३.किसान सन्मान निधी योजनेचा पुढचा हफ्ता कधी मिळणार आहे?
किसान सन्मान निधी योजनेचा पुढील हफ्ता जुने २०२४ मध्ये मिळण्याची शक्यता आहे.
४.किसान सन्मान निधी योजनेचे किती हफ्ते आता पर्यंत झाले आहेत.
किसान सन्मान निधी योजनेचे आता पर्यंत १६ हफ्ते झाले असून आपले शेतकरी बांधव आता १७ व्या हफ्त्या ची आतुरतेने वाट बघत आहेत,१७ वा हफ्ता जून महिन्याच्या शेवट पर्यंत येण्याची शक्यता आहे.
५.जर नावावर जमीन नसेल तर किसान सन्मान निधी (Kisan Sanman Nidhi Yojna) योजनेचा फायदा घेऊ शकतो का?
नाही किसान सन्मान निधी योजनेचा फायदा घेण्यासाठी शेतकरी बांधावा च्या नावावर जमीन असणे गरजेचे आहे.
६. किसान सन्मान निधी योजनेची सुरुवात कोणी व कुठे केली?
किसान सन्मान निधी ची सुरुवात २४ फेब्रुवारी २०१९ रोजी आपल्या देशाचे माननीय पंतप्रधान नरेंद्र जी मोदी यांनी केली.उत्तर प्रदेश च्या शेतकऱ्या च्या बँक खात्यात २०००/- मात्र टाकण्यात आले,आणि या योजनेची यशस्वी पाने सुरुवात झाली असून १६ हफ्ते आता पर्यंत आपल्या देशातील कृषी बांधवाच्या नावावर जमा करण्यात आले आहेत.
वाचा-
मुलीच्या उज्ज्वल भविष्यासाठी शासन घेऊन आले आहे लेक लाडकी योजना. { LEK LADKI YOJNA }
योजना प्रत्येक ज्येष्ठ नागरिकाला आपल्या उतरत्या वयात जीवन सुकर व्हाव म्हणून महाराष्ट्र सरकारने आणली आहे मुख्यमंत्री वयोश्री योजना.{Mukhyamantri Vayoshri Yojna}
शेतकऱ्यानच्या फायद्या साठी वाचा किसान सन्मान निधी योजना |Kisan Sanman Nidhi Yojna
आपल्या लाडक्या लेकीच्या उज्वल भविष्यासाठी जाणून घ्या सुकन्या समृद्धी योजना। Sukanya Samrudhi Yojna। Bharat Sarkar।Women Empowerment.
जर तुम्ही बेरोजगार असाल तर तुम्ही बेरोजगार भत्ता योजनेचा लाभ घेऊ शकता. अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी बेरोजगार भत्ता अर्ज कसा करावा हे वाचा.
all information given by YOJNA GUARANTEE.COM
Thank you for Watching.