Site icon yojanaguarantee.com

kapus soybean anudan portal maharashtra

kapus soybean anudan portal maharashtra

kapus soybean anudan portal maharashtra

kapus soybean anudan portal maharashtra-कापूस-सोयाबीन अनुदानासाठी ई-पीक पाहणीची अट शिथिल करण्यात आली आहे !

जाणून घेऊयात काय अटी शिथिल झाल्या आहेत?

मा. उपमुख्यमंत्री आणि वित्तमंत्री यांनी ५ जुलै २०२४ रोजी सादर केलेल्या सन २०२४-२५ च्या अतिरिक्त अर्थसंकल्पीय भाषणामध्ये, राज्यातील २०२३ च्या खरीप हंगामात ई-पिक पाहणी पोर्टलवर नोंदणीकृत असलेल्या कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसहाय्य देण्याच्या प्रस्तावास ११ जुलै २०२४ रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये मंजुरी देण्यात आली. या प्रस्तावानुसार, ०.२ हेक्टरपेक्षा कमी क्षेत्र असलेल्या शेतकऱ्यांना सरसकट रु. १००० आणि ०.२ हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्र असलेल्या शेतकऱ्यांना प्रति हेक्टर रु. ५,००० (२ हेक्टरपेक्षा कमी) मदत देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासंबंधीचा शासन निर्णय २९ जुलै २०२४ रोजी जारी करण्यात आला होता.

या अर्थसहाय्याच्या वितरणासाठी कार्यपध्दती निश्चित करण्याबाबत शासन निर्णय ३० ऑगस्ट २०२४ रोजी घेण्यात आला. त्यानंतर, मा. मुख्य सचिवांच्या बोलण्याच्या आधारावर २३ सप्टेंबर २०२४ रोजी मंत्रिमंडळ बैठकीत अतिरिक्त सूचना देण्याबाबतचा प्रस्तावास मान्यता देण्यात आली.

kapus soybean anudan portal maharashtra-कापूस-सोयाबीन अनुदान कोणत्या अट शिथिल करण्यात आल्या आहेत-

कापूस-सोयाबीन अनुदानासाठी ई-पीक पाहणीची अट शिथिल करण्यात आली आहे, दि. २३ सप्टेंबर २०२४ रोजी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसहाय्य देण्याबाबत पुढील सूचना जाहीर करण्यात आलेल्या आहेत-

  1. सन २०२३ च्या खरीप हंगामात ज्या शेतकऱ्यांनी कापूस व सोयाबीन पिकांची लागवड केली असून ई-पीक पाहणी पोर्टलवर नोंद झालेली नाही, परंतु संबंधित तलाठयाची त्या ७/१२ उताऱ्यावर लागवडीची नोंद आहे, अशा शेतकऱ्यांना तातडीने अर्थसहाय्य देण्यासाठी कार्यवाही केली जाईल.
  2. ई-पीक पाहणी पोर्टलवर नोंदणीकृत शेतकऱ्यांनी आधार संमती पत्र भरल्यानंतर, संबंधित शेतकऱ्यांच्या आधार संलग्न असलेल्या बँक खात्यात अर्थसहाय्य वितरित केले जाईल.
  3. महा आयटीने ई-पीक पाहणी पोर्टलवरील शेतकऱ्यांचे आधार कार्डाशी नाव जुळवणीचे प्रमाण ९०% पर्यंत स्वीकारण्यात यवणार आहे.
  4. सामायिक खातेदारांच्या बाबतीत, जे सामायिक खातेदार इतर खातेदारांची संमती घेऊन स्वघोषणापत्र सादर करतील, त्यांना देय असलेले अर्थसहाय्य त्यांच्या आधार संलग्न बँक खात्यात वितरित केले जाईल.
  5. वैयक्तिक आणि सामायिक खातेदारांकरीता प्रति पिक २ हेक्टरची मर्यादा स्वतंत्रपणे लागू केली जाईल.

हे देखील वाचा

कापूस-सोयाबीन अनुदानासाठी ई-केवायसी (Kapus Soyabin Anudansathi E-KYC) गरजेची! पहा कशी करायची ई-केवायसी?

कृषी, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास आणि मत्स्यव्यवसाय विभागाचे शासन निर्णय-

राज्यातील सन २०२३ च्या खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्य प्रदान करण्यासंबंधीच्या अतिरिक्त सूचनांकरिता शासन निर्णय पाहण्यासाठी येथे क्लिक करावे.

kapus soybean anudan portal maharashtra-कापूस-सोयाबीन अनुदान

निष्कर्ष :-

मित्रांनो, तुम्हाला आम्ही दिलेली kapus soybean anudan portal maharashtra-कापूस-सोयाबीन अनुदान या योजनेबद्दलची माहिती कशी वाटली याबद्दल तुम्ही आम्हाला लेखाच्या खाली कमेंट करून कळवू शकता तसेच आमच्यासाठी काही सूचना असतील त्याही तुम्ही आम्हाला सुचवू शकता अशाच सरकारी योजना संबंधी अपडेटेड माहिती मिळवण्यासाठी आमच्या योजना गॅरंटी डॉट कॉम (yojnaguarantee.com) या संकेतस्थळाला भेट देत राहा धन्यवाद|

आशा आहे आपल्याला हा लेख आवडला असेल, हा लेख जास्ती जास्त लोकांपर्यंत पोहचवा.


हे देखील वाचा :-


योजना प्रत्येक ज्येष्ठ नागरिकाला आपल्या उतरत्या वयात जीवन सुकर व्हाव म्हणून महाराष्ट्र सरकारने आणली आहे मुख्यमंत्री वयोश्री योजना. {Mukhyamantri Vayoshri Yojna}


शेतकऱ्यानच्या फायद्या साठी वाचा. किसान सन्मान निधी योजना | {Kisan Sanman Nidhi Yojna}


आपल्या लाडक्या लेकीच्या उज्वल भविष्यासाठी जाणून घ्या सुकन्या समृद्धी योजना। {Sukanya Samrudhi Yojna}


जर तुम्ही बेरोजगार असाल तर तुम्ही बेरोजगार भत्ता योजनेचा लाभ घेऊ शकता. अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी बेरोजगार भत्ता अर्ज कसा करावा हे वाचा.{Berojgar Bhatta yojna arj ksa karava}


महिलांना व्यवसाय स्थापन करण्यासाठी प्रोत्साहन पर योजना म्हणजेच महिला समृद्धी कर्ज योजना, अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी या योजनेवर क्लिक करा. {Pm pik vima yojna 2024}


आपल्याला आपल्या हक्काचे घर मिळणार रमाई आवास घरकुल योजना अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी या योजनेवर क्लिक करा. {Ramai Awas Gharkul Yojna}


मुलीच्या उज्ज्वल भविष्यासाठी शासन घेऊन आले आहे लेक लाडकी योजना. {LEK LADKI YOJNA}


गर्भवती महिलांना पोषक आहार मिळावा यासाठी सरकार देते रोख रक्कम त्याकरिता वाचा व अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी या योजनेवर क्लिक करा  जननी सुरक्षा योजना.


व्यवसाय सुरु करण्यासाठी सरकार देत आहे बिनव्याजी कर्ज वाचा व अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी या योजनेवर क्लिक करा अण्णासाहेब पाटील कर्ज योजना.

Exit mobile version