Kapus Soyabin Anudansathi E-KYC-कापूस-सोयाबीन अनुदान
Kapus Soyabin Anudansathi E-KYC, कापूस-सोयाबीन अनुदानासाठी ई-केवायसी- खरीप हंगाम २०२३ मध्ये कापूस आणि सोयाबीन पिकवणाऱ्या शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळण्यासाठी शेतकऱ्यांनी ई-केवायसी करणे अत्यावश्यक आहे. ज्यांनी अजूनही ई-केवायसी केलेले नाही, त्यांनी तातडीने जवळच्या कृषी कार्यालयाशी संपर्क साधून प्रक्रिया पूर्ण करावी, असे कृषी विभागाने शेतकऱ्यांना आवाहन केलेले आहे.
कापूस आणि सोयाबीन पिकांकरिता विकसित करण्यात आलेल्या पोर्टलवर, शेतकऱ्यांची पीक व गावानुसार यादी दिलेली आहे. २०२३ मधील खरीप हंगामासाठी नोंदणीकृत शेतकऱ्यांना ०.२ हेक्टरपेक्षा कमी क्षेत्र असणाऱ्यांना रु. १००० तर ०.२ हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रासाठी प्रती हेक्टरी रु. ५,००० पर्यंत अनुदान (मर्यादा २ हेक्टरच असेल) दिले जाणार आहे.
ज्या शेतकऱ्यांच्या ७/१२ उताऱ्यावर कापूस किंवा सोयाबीन पिकाची नोंद आहे आणि वनपट्टा धारक शेतकऱ्यांनाही या योजनेचा लाभ दिला जाणार आहे. हे अनुदान आधार संलग्न बॅंक खात्यांमध्ये थेट जमा केले जाईल. सध्या ९६ लाख खातेदारांपैकी ६८ लाख शेतकऱ्यांनी आधार संमती दिली आहे. ज्यांनी यापूर्वी नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेमध्ये नोंद केलेली आहे, त्यांना ई-केवायसीची आवश्यकता नाही. मात्र, २१.३८ लाख शेतकऱ्यांना याई-केवायसी पूर्ण करणे आवश्यक आहे.
अद्याप १९ लाख खातेदारांनी ई-केवायसी केलेली नाही. या शेतकऱ्यांनी https://scagridbt.mahait.org/ या पोर्टलवर जाऊन ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करणे क्रमप्राप्त आहे. गावातील शेतकऱ्यांची यादी देखील प्रसिद्ध करण्यात आली असून, संबंधित कृषी सहाय्यकांच्या मदतीने ओटीपी किंवा बायोमेट्रिकद्वारे ई-केवायसी पूर्ण करता येणार आहे. शेतकरी स्वतःही पोर्टलवर किंवा सी.एस.सी. केंद्रात जाऊन ई-केवायसी करू शकतात.
कृषी विभागाने शेतकऱ्यांना लवकरात लवकर ई-केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन केले आहे.
पात्रतेचे निकष– (Kapus Soyabin Anudansathi E-KYC)
- सन २०२३ च्या खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन पिकवणाऱ्या शेतकऱ्यांना अर्थसहाय्य मिळण्यासाठी, ०.२ हेक्टरपेक्षा कमी क्षेत्र असलेल्या शेतकऱ्यांना सरसकट रु. १००० तर ०.२ हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रासाठी प्रती हेक्टर रु. ५,००० (२ हेक्टर मर्यादेत) अनुदान सुपूर्त केले जाईल.
- केवळ २०२३ च्या खरीप हंगामात ई-पीक पाहणी अॅप किंवा पोर्टलद्वारे कापूस व सोयाबीन लागवडीची नोंद करणारे शेतकरीच या अनुदानासाठी पात्र राहनार आहेत.
- शेतकऱ्यांच्या क्षेत्रानुसार ई-पीक पाहणी अॅप/पोर्टलवर उपलब्ध असलेल्या माहितीच्या आधारेच अनुदानाची गणना केली जाणार आणि त्याच प्रमाणात अनुदान मंजूर होणार. (Kapus Soyabin Anudansathi E-KYC)
- शेतकऱ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यांमध्ये थेट लाभ हस्तांतरण (DBT) प्रणालीद्वारेच हे अनुदान जमा केले जाईल. अन्य कोणत्याही माध्यमातून अनुदान दिले जाणार नाही याची नोंद प्रत्येक शेतकऱ्याने घ्यावी.
- ही योजना फक्त २०२३ च्या खरीप हंगामातील कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठीच लागू असणार आहे.
मदतीसाठी हेल्पलाइन क्रमांक- तांत्रिक अडचणींकरिता ०२२-६१३१ ६४०१ (सोमवार ते शुक्रवार, सकाळी ९:४५ ते सायं ६:१५).
अधिकृत वेबसाईट– https://scagridbt.mahait.org/
निष्कर्ष :-
मित्रांनो, तुम्हाला आम्ही दिलेली कापूस-सोयाबीन अनुदानासाठी ई-केवायसी ( Kapus Soyabin Anudansathi E-KYC ) गरजेची! पहा कशी करायची ई-केवायसी? या बद्दलची माहिती कशी वाटली याबद्दल तुम्ही आम्हाला लेखाच्या खाली कमेंट करून कळवू शकता तसेच आमच्यासाठी काही सूचना असतील त्याही तुम्ही आम्हाला सुचवू शकता अशाच सरकारी योजना संबंधी अपडेटेड माहिती मिळवण्यासाठी आमच्या योजना गॅरंटी डॉट कॉम ( yojnaguarantee.com ) या संकेतस्थळाला भेट देत राहा धन्यवाद |
हे देखील वाचा :-
योजना प्रत्येक ज्येष्ठ नागरिकाला आपल्या उतरत्या वयात जीवन सुकर व्हाव म्हणून महाराष्ट्र सरकारने आणली आहे मुख्यमंत्री वयोश्री योजना. {Mukhyamantri Vayoshri Yojna}
शेतकऱ्यानच्या फायद्या साठी वाचा. किसान सन्मान निधी योजना | {Kisan Sanman Nidhi Yojna}
आपल्या लाडक्या लेकीच्या उज्वल भविष्यासाठी जाणून घ्या सुकन्या समृद्धी योजना। {Sukanya Samrudhi Yojna}
जर तुम्ही बेरोजगार असाल तर तुम्ही बेरोजगार भत्ता योजनेचा लाभ घेऊ शकता. अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी बेरोजगार भत्ता अर्ज कसा करावा हे वाचा.{Berojgar Bhatta yojna arj ksa karava}
महिलांना व्यवसाय स्थापन करण्यासाठी प्रोत्साहन पर योजना म्हणजेच महिला समृद्धी कर्ज योजना, अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी या योजनेवर क्लिक करा. {Pm pik vima yojna 2024}
आपल्याला आपल्या हक्काचे घर मिळणार रमाई आवास घरकुल योजना अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी या योजनेवर क्लिक करा. {Ramai Awas Gharkul Yojna}
मुलीच्या उज्ज्वल भविष्यासाठी शासन घेऊन आले आहे लेक लाडकी योजना. {LEK LADKI YOJNA}
गर्भवती महिलांना पोषक आहार मिळावा यासाठी सरकार देते रोख रक्कम त्याकरिता वाचा व अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी या योजनेवर क्लिक करा जननी सुरक्षा योजना.
व्यवसाय सुरु करण्यासाठी सरकार देत आहे बिनव्याजी कर्ज वाचा व अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी या योजनेवर क्लिक करा अण्णासाहेब पाटील कर्ज योजना.