PM Jeevan Jyoti Bima Yojna 2024| जीवन ज्योती विमा योजना २०२४

PM Jeevan Jyoti Bima Yojna 2024(जीवन ज्योती विमा योजना २०२४)

माणसाच्या आयुष्यात कोणताही प्रसंगा अचानक घडू शकतो. आपण बघतो काही घरातील कुटुंब प्रमुखाचा अचानक मृत्यू होतो. अशा परिस्थिती मध्ये कुटुंबातील उर्वरित व्यक्तींना आर्थिक दृष्ट्या सक्षम नसल्या कारणामुळे अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. यावर पर्याय म्हणून आपल्याा सरकारने पंतप्रधान जीवन ज्योती विमा योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत कोणत्याही कारणास्तव अर्जदाराचा मृत्यू झाला असल्यास, त्याच्या कुटुंबाला दोन लाखापर्यंतची आर्थिक मदत केली जाते.

ही योजना आपल्या केंद्र सरकारने अमलात आणल्या कारणास्तवही सर्व राज्यांसाठी लागूू झाली आहे .या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदाराचे वय 18 वर्षे ते 50 वर्षे असावे .या योजनेअंतर्गत खातेदाराच्या 436 /-रुपये दर वर्षाच्या 31 मे या रोजी वजा केले जातील. आपले केंद्र सरकार चालत असलेल्या सर्व योजनांपैकी ही सर्वात उत्तम योजना ही कारण या योजनेअंतर्गत लाभार्थीच्या कुटुंबाला दोन लाखापर्यंतची मदत केली जाते. पंतप्रधान जीवन ज्योती योजनेअंतर्गत अर्जदारास कुठल्याही वैद्यकीय तपासणीची गरज नाही.तसेच अर्जदाराच्या नॉमिनी ला त्याच्या बँक खात्यामध्ये ही रक्कम डायरेक्ट मिळेल.या योजनेअंतर्गत मिळालेल्या पैशातून अर्जदाराचे कुटुंब आर्थिक दृष्ट्या सक्षम होतील.

जीवन ज्योती विमा योजना २०२४ या योजनेबद्दल आम्ही तुम्हाला परिपूर्ण माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहे, यामध्ये या योजनेविषयी थोडक्यात माहिती, त्याचे ठळक मुद्दे, योजनेची पात्रता, योजनेचे फायदे, योजनेच्या अटी व शर्ती, योजनेसाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे, आणि ऑनलाईन अर्ज कसा करावा , असा हा परिपूर्ण लेख आम्ही तुमच्यासाठी सादर करत आहोत तो तुम्ही शेवटपर्यंत वाचवा हि मनापासून इच्छा व्यक्त करत आहोत. तर चला मग बघुयात योजनेविषयी परिपूर्ण अशी माहिती,

जीवन ज्योती विमा योजना २०२४ ची ठळक मुद्दे :- {Important Points of PM Jeevan Jyoti Bima Yojna २०२४ }

जीवन ज्योती विमा योजना २०२४ ची ठळक मुद्दे :- { PM Jeevan Jyoti Bima Yojna २०२४ } याची ठळक मुद्दे आम्ही तुम्हाला येथे देत आहोत या मुद्द्यांमुळे तुम्हाला या योजनेत काय महत्त्वाचं आहे ते समजणार आहे व तुम्हाला योग्य दिशा या योजनेचा लाभ घेण्यासाठी मिळेल अशी आशा करतो.

योजनेचे नावPM Jeevan Jyoti Bima Yojna २०२४(जीवन ज्योती विमा योजना २०२४)
योजना कोणा व्दारा सुरु झाली {Started By Whom}
केंद्र सरकार
लाभार्थी {Beneficiary}आपल्या देशातील नागरिक
योजने मार्फत काय लाभ होणार आहेअर्जदाराच्या कुटुंबाला अर्ज्दारच्या मृत्यु नंतर २ लाख मदत केली जाईल
अधिकृत वेबसाईट {Authorized Website}PM Jeevan Jyoti Bima Yojna २०२४(जीवन ज्योती विमा योजना २०२४)
अर्ज करण्याची पद्धत {Process of Application}ऑनलाईन / ऑफलाईन
योजनेचा हेल्पलाईन नंबर
1800-180-1111 / 1800-110-001
Jeevan Jyoti Bima Yojna 2024
Jeevan Jyoti Bima Yojna 2024

जीवन ज्योती विमा योजना २०२४ या योजनेची उद्दिष्टे (Purpose of PM Jeevan Jyoti Bima Yojna २०२४ ):-

  1. अतिशय कमी हप्त्यामध्ये गुंतवणूक केल्यास अर्जादारच्या कुटुंबाला दोन लाखापर्यंत मदत या योजने अंतर्गत केली जाणार आहे.
  2. या योजनेद्वारे घरातील प्रमुख व्यक्तीचा मृत्यू झाल्यानंतर त्याच्या कुटुंब आर्थिक दृष्टा सक्षम व्हावे यासाठी या योजनेची सुरुवात आपल्या सरकारने केली आहे.
  3. योजनेअंतर्गत अत्यंत कमी खर्चामध्ये माणसाला स्वतःच्या आयुष्याच्या संरक्षण आपले सरकार देत आहे.
  4. योजनेचा फायदा आपल्या देशातील आर्थिक दृष्ट्या गरीब कुटुंबांना होणार आहे जेणेकरून त्यांच्या विरहित त्यांच्या कुटुंबाची मदत होईल.
  5. कुटुंबातील कुणाचा मृत्यू झाल्यानंतर आर्थिकदृष्ट्या अडचणीचा सामना करावा लागू नये या उद्देश समोर ठेवून या योजनेची सुरुवात केली गेली.

जीवन ज्योती विमा योजना २०२४ या योजनेच्या नोंदणीसाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे (Documents for PM Jeevan Jyoti Bima Yojna २०२४ ) :-

योजनेसाठी खालील कागदपत्रे आवश्यक आहेत-

  • आधार कार्ड (Aadhar Card)
  • रेशन कार्ड (Ration Card)
  • रहिवासी दाखला (Residence Proof)
  • अर्जदाराचे जमिनीचा सातबारा (7/12 Documents)
  • अर्जदाराच्या जमिनीचा अट अ (8 A)
  • मोबाईल नंबर (Mobile Number)
  • ई-मेल आयडी (Email ID)
  • पासपोर्ट साईजचेे दोन फोटो (2 Passport Size Photographs)
  • स्वयंघोषित प्रतिज्ञापत्र (Self Declartion Form)
  • जातीचा दाखला (Caste Certificate)

अर्जदाराचा मृत्यू झाल्यानंतर वारसदाराला (Nominee) स्वतःची खालील कागदपत्रे जमा करणे गरजेचे आहे-

  • आधार कार्ड
  • पॅन कार्ड
  • रहिवासी दाखला
  • ई-मेल आयडी
  • फोन नंबर
  • बँक पासबुक
  • पासपोर्ट साईज फोटोज
  • अर्जदार विमधारक व्यक्तीचा मृत्यूू झाल्याचा दाखला
  • अर्जदार विमाधारक रुग्णालयात ऍडमिट केला गेला असल्यास त्याचे रिचार्ज पावती
Jeevan Jyoti Bima Yojna
Jeevan Jyoti Bima Yojna

जीवन ज्योती विमा योजना २०२४ या योजनेची पात्रता (Eligibility for PM Jeevan Jyoti Bima Yojna २०२४ ) :-

  • अर्जदार महाराष्ट्राचा व्यक्ती असावा.
  • अर्जदाराचे वय 18 वर्ष ते किमान 50 वर्ष असावे.
  • अर्जदाराला प्रत्येक वर्षी आपला विमा रिन्यू करावा लागेल.
  • वयाच्या 55 व वर्षानंतर विण्याचा कालावधी समाप्त होऊन जातो.
  • अर्जदाराचे बँकेत अकाउंट असणे गरजेचे आहे.
  • विम्याचा कालावधी एक जून पासून 31 मे पर्यंत असेल.

अर्जदाराला प्रत्येक वर्षी आपला विमा रिन्यू करावा लागेल-

  • अर्जदाराचा मृत्यू झाल्यानंतर विम्याची रक्कम त्याच्या नॉमिनीला मिळेल.
  • अर्जदाराच्या मृत्यूनंतर मिळणाऱ्या रकमेवर बँक शुल्क तसेच जीएसटी लागू होईल.
  • अर्जदाराचा मृत्यू झाल्यानंतर त्याच्या वारसांनी किमान 30 दिवसाच्या आत क्लेम सेटलमेंट चा फॉर्म भरावा.
  • जीवन ज्योती योजने अंतर्गत आपण विविध बँकांमध्ये अर्ज भरू शकतो परंतु किती बँकांमध्ये अर्ज भरला तरी अर्जदाराच्या मृत्यूनंतर सरकारमार्फत दोन लाख एवढीच रक्कम अर्जदाराच्या वारसाला मिळेल.

जीवन ज्योती विमा योजना २०२४ या योजनेची अर्ज प्रक्रिया (How to apply for PM Jeevan Jyoti Bima Yojna २०२४) :-

  1. अर्ज करण्यासाठी अर्जदारास आपण ज्या परिसरात राहत होते राष्ट्रकृत बँकेत जाणे गरजेचे आहे.
  2. बँकेत जाऊन आपल्याला प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा या योजनेचा अर्ज घ्यायचा आहे.
  3. आता आपल्याला फॉर्म व्यवस्थित रित्या भरून त्याच्याबरोबर वरती दिलेली सर्व कागदपत्रे जोडायची आहे.
  4. आता आपल्याला हा फॉर्म अधिकाऱ्याकडे जमा करायचा आहे.
  5. आमची पडताळणी झाल्यानंतर आपल्या बँक खात्यातून विम्याचा आता म्हणून 436/- रुपये वजा होतील.
  6. अशाप्रकारे आपण या योजनेचा फॉर्म भरू शकतो.

अर्जदाराचा मृत्यू झाल्यास वारसाला योजनेचा लाभ कसा घेता येईल

  1. अर्जदार व्यक्तीचा मृत्यू झाल्यानंतर वारसाला बँकेत जाऊन क्लेम सेटलमेंट चा फॉर्म भरणेे गरजेचे आहे.
  2. या अर्ज भरू आपल्याला वरती सर्व कागदपत्रे जोडायचे आहेत व अर्ज बँक कर्मचाऱ्याकडे जमा करायचा आहे.
  3. संबंधित कर्मचाऱ्याकडून कागदपत्राची तपासणी केली जाईल व विमा ची रक्कम वारसाच्या बँक खात्यातत जमा केली जाईल.
Jeevan Jyoti Bima Yojna
Jeevan Jyoti Bima Yojna

निष्कर्ष :-

मित्रांनो, तुम्हाला आम्ही दिलेली जीवन ज्योती विमा योजना २०२४ या योजनेबद्दलची माहिती कशी वाटली याबद्दल तुम्ही आम्हाला लेखाच्या खाली कमेंट करून कळवू शकता तसेच आमच्यासाठी काही सूचना असतील त्याही तुम्ही आम्हाला सुचवू शकता अशाच सरकारी योजना संबंधी अपडेटेड माहिती मिळवण्यासाठी आमच्या योजना गॅरंटी डॉट कॉम (yojnaguarantee.com) या संकेतस्थळाला भेट देत राहा धन्यवाद|


FAQ :-


१. जीवन ज्योती विमा योजना २०२४ योजनेचा अर्ज कसा करावा ?

उत्तर-अर्ज करण्यासाठी अर्जदारास आपण ज्या परिसरात राहत होते राष्ट्रकृत बँकेत जाणे गरजेचे आहे.

२. जीवन ज्योती विमा योजना २०२४ या योजनेचा ऑनलाइन अर्ज करायचा असल्यास अधिकृत संकेतस्थळ कोणते?

उत्तर- https://www.jansuraksha.gov.in/Default.aspx

३. जीवन ज्योती विमा योजना २०२४ कोणत्या राज्यामध्ये लागू आहे?

उत्तर-जीवन ज्योती विमा योजना केंद्र सरकार ची असल्या कारणामुळे,हि योजना सर्व राज्यासाठी लागू झाली आहे.

४. जीवन ज्योती विमा योजना २०२४ चे लाभार्थी कोण आहेत ?

उत्तर-आपल्या देशातील सर्व नागरिक या योजने अंतर्गत लाभ घेऊ शकतात.

5.जीवन ज्योती विमा योजना २०२४ या योजने अंतर्गत दिले जाणारे लाभ ?

उत्तर-या योजने अंतर्गत अर्जदाराचे निधन झाल्यास वारसदारास २ लाख रुपये मिळणार आहेत.

6. जीवन ज्योती विमा योजना २०२४ या योजनेचा उद्देश काय आहे ?

उत्तर-अर्जदाराला त्याच्या निधना नंतर देखील आपल्या कुटुंबाला मदत करता यावी यासाठी या योजने अंतर्गत २ लाख ची आर्थिक मदत केली जाते.

हे देखील वाचा :-


योजना प्रत्येक ज्येष्ठ नागरिकाला आपल्या उतरत्या वयात जीवन सुकर व्हाव म्हणून महाराष्ट्र सरकारने आणली आहे मुख्यमंत्री वयोश्री योजना. {Mukhyamantri Vayoshri Yojna}


शेतकऱ्यानच्या फायद्या साठी वाचा. किसान सन्मान निधी योजना | {Kisan Sanman Nidhi Yojna}


आपल्या लाडक्या लेकीच्या उज्वल भविष्यासाठी जाणून घ्या सुकन्या समृद्धी योजना। {Sukanya Samrudhi Yojna}


जर तुम्ही बेरोजगार असाल तर तुम्ही बेरोजगार भत्ता योजनेचा लाभ घेऊ शकता. अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी बेरोजगार भत्ता अर्ज कसा करावा हे वाचा.{Berojgar Bhatta yojna arj ksa karava}


महिलांना व्यवसाय स्थापन करण्यासाठी प्रोत्साहन पर योजना म्हणजेच महिला समृद्धी कर्ज योजना, अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी या योजनेवर क्लिक करा. {Pm pik vima yojna 2024}


आपल्याला आपल्या हक्काचे घर मिळणार रमाई आवास घरकुल योजना अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी या योजनेवर क्लिक करा. {Ramai Awas Gharkul Yojna}


मुलीच्या उज्ज्वल भविष्यासाठी शासन घेऊन आले आहे लेक लाडकी योजना. {LEK LADKI YOJNA}


गर्भवती महिलांना पोषक आहार मिळावा यासाठी सरकार देते रोख रक्कम त्याकरिता वाचा व अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी या योजनेवर क्लिक करा  जननी सुरक्षा योजना.


व्यवसाय सुरु करण्यासाठी सरकार देत आहे बिनव्याजी कर्ज वाचा व अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी या योजनेवर क्लिक करा अण्णासाहेब पाटील कर्ज योजना.